Maharashtra News LIVE Updates :जूनपासून मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचं काम सुरु होणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमृत भारत योजने अंतर्गत विविध प्रकल्पांचे उद्घाटन

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Feb 2024 03:04 PM
Shiv Sena : उबाठा गटाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांचा शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

Shiv Sena : उबाठा गटाच्या पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक आणि प्रवक्त्या प्रा. शिल्पा बोडखे यांचा शिवसेनेत प्रवेश 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश संपन्न


शिल्पा बोडखे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.


मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी हा पक्षप्रवेश संपन्न झाला.


यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बोडखे यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बोलावली बैठक

Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बोलावली बैठक


वरळीतील रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांसाठी बैठक


विधीमंडळ सायंकाळी 4 वाजता होणार बैठक


एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रमुख अधिकाऱ्यांना बैठकीत हजर राहण्याचे आदेश

Prakash Ambedkar : शरद पवारांना राजकारणातुन कुणीही संपवू शकत नाही, परभणीत प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद

Prakash Ambedkar : जरांगे यांनी जालन्यातुन लोकसभा निवडणूक लढवावी त्यांचा अण्णा पाटील होऊ नये


भाजप असो की काँग्रेस दोघांनाही  मतदान न करण्याचं आवाहन ही जरांगेनी करावे


जरांगे पाटील यांच्या पाठीमागे अजुनही सर्व मराठा समाज 


शरद पवारांना राजकारणातुन कुणीही संपवू शकत नाही 


अजित पवारांचा 70 हजार कोटींचा विकास झाला 


परभणीत प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद

Prakash Ambedkar : महाविकास आघाडीची बैठक 27 ऐवजी 28 फेब्रुवारी रोजी ठेवा : ॲड. प्रकाश आंबेडकर 

Prakash Ambedkar : महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली आहे. या बैठकीत जाण्यासाठी प्रकाश आंबेडकर देखील तयार आहे. मात्र, 27 तारखेला पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या होणाऱ्या सत्ता परिवर्तन महासभेमुळे बैठकीला जाणं शक्य नसल्याचं त्यांनी एक्सवरुन माध्यमांना सांगितले आहे. तसेच, जर तारीख 27 ऐवजी 28 होणार असेल तर आम्ही येऊ, असेही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कळवले आहे.
 

Maharashtra : जुलै अखेरीस विधान परिषदेतील 21 आमदार निवृत्त होणार

Maharashtra : जुलै अखेरीस विधान परिषदेतील 21 आमदार निवृत्त होणार


स्थानीक प्राधिकारी संस्थेतील 6, पदवीधर मतदारसंघ 2, शिक्षक मतदारसंघ- 2, महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारा निवडून जाणारे 11 आमदार निवृत्त होणार


31 मे, 21 जून, 7 व 27 जुलै रोजी आमदार निवृत्त होणार

Jyoti Waghmare : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राजकीय वास, ज्योती वाघमारेंचा शरद पवारांवर निशाणा

Jyoti Waghmare : मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांना शिवसेना शिंदे गटाचा सबुरीचा सल्ला 


मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राजकीय वास असल्याचा शिवसेनेकडून आरोप


शरद पवार यांच्यावर शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचा निशाणा


मला महाराष्ट्रातल्या जनतेला आणि मराठा समाजाला आवाहन करायचा आहे.


हा महाराष्ट्र शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे.


मराठा समाजाची कोणतीही मागणी असेल त्याला सरकार हे सकारात्मक आहे.


जरांगे पाटलांच्या मागण्या सतत बदलत गेलेल्या आहेत.


मुख्यमंत्री असूनही मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना दोन वेळेस भेटले.


राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाला आरक्षण दिलेला आहे.


 एकनाथ शिंदे सह दोन उपमुख्यमंत्र्यांनी हे करुन दाखविले आहे.

Eknath Shinde : गेल्या 10 वर्षात रेल्वेत अमूलाग्र बदल झाला, अनेक बदल मोदीजींच्या नेतृत्वात झाले - मुख्यमंत्री शिंदे

Eknath Shinde : अमृत भारत स्थानक विकास योजना म्हणजे एक ऐतिहासिक कार्यक्रम झालं आहे.


आज सगळ्या सुविधा प्रवाशांना मिळत आहे.


गेल्या 10 वर्षात रेल्वेत अमूलाग्र बदल झाला.


पूर्वीचे स्थानक आताचे स्थानक यात बराच फरक आहे,


वातानुकूलित रेल्वे बुलेट ट्रेन वंदे भारत असे अनेक बदल मोदीजींच्या नेतृत्वात आपण पाहत आहोत. 

MNS : मनसेची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार, 21 लोकसभा मतदारसंघाचा आढावा राज ठाकरेंनी घेतला

MNS : मनसेची आज वांद्रे एमआयजी क्लब येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली


 राज्यातील जवळपास 21 लोकसभा मतदारसंघाचा आढावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला


यामध्ये पुणे, कोल्हापूर,नाशिक, बुलढाणा,संभाजीनगर, सोलापूर यासह 21 लोकसभा मतदारसंघाचा यामध्ये आढावा घेण्यात आल्याची माहिती आहे


राज्यातील कोणत्या लोकसभा मतदारसंघात  मनसे पक्षाची  किती ताकद आहे? कुठल्या जागा पक्षासाठी  महत्त्वाचे आहेत ? कुठे पक्षाचे किती तयारी आहे? या सगळ्याची चर्चा या  बैठकीमध्ये झाल्याची माहिती आहे


आगामी लोकसभा निवडणूक लढवताना ती  स्वबळावर लढवायची की समविचारी  मित्र पक्षांसोबत जायचं? याविषयी विविध लोकसभा मतदारसंघातील  जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचा मत या आढावा बैठकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाणून घेतलं

Nagpur Crime : नागपूरच्या बुट्टीबोरी येथे पतीने पत्नीला विजेचा शॉक देऊन केली हत्या

Nagpur Crime : नागपूरच्या बुट्टीबोरी MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेशपूर येथे पतीने पत्नीला विजेचा शॉक देऊन केली हत्या


पत्नी सुनीता राऊत हीचा घटनेत मृत्यू ...


हत्येनंतर आरोपी पती सहदेव राऊतने केला आत्महत्येचा प्रयत्न, आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरु


कौटुंबिक कलहातून हत्या झाल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती..

Prakash Ambedkar : 'जयंत पाटील यांचा मला फोन', परभणीत प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषद

Prakash Ambedkar : परभणीत प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषद


जयंत पाटील यांचा मला फोन आला होता


27 ला आमच्या पक्षाची महत्त्वाची सभा आहे 


मी 27 ऐवजी 28 ला येऊ शकतो असे म्हणालो होतो 


मात्र संजय राऊत यांनी सांगितले 27 ला बैठक होणार


याला आम्ही नाही जाऊ शकत

Prakash Ambedkar : ओबीसींच ताट अन् मराठा समाजाचे ताट हे वेगळे असले पाहिजेत - प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar : ओबीसींच ताट अन् मराठा समाजाचे ताट हे वेगळे असले पाहिजेत - प्रकाश आंबेडकर


टिकाऊ द्यायचे असतील तर 


10% आरक्षण- मसराम यांनी जो राजीनामा दिला त्यावरून कोर्ट काय निर्णय घेईल ते बघावं लागेल 


जरांगे यांच्या आंदोलना मधला जो गाभा आहे, ती वस्तू स्थिती आहे 


40 एकर वाला 4 वर आलाय 


हमी भाव हे सरकार अंमल करत नाही 


शेती ही व्यवस्थित राहिली नाही 


त्यामुळे ही वेळ आलीय

PM Modi : तुमचं स्वप्न मोदींचा संकल्प आहे, हेच विकसित भारताची गॅरंटी- पंतप्रधान मोदी

PM Modi : देशांतल्या सर्व जवानांना सांगू इच्छितो तुमचं स्वप्न मोदींचा संकल्प आहे - पंतप्रधान मोदी


आणि हेच विकसित भारताची गॅरंटी आहे - पंतप्रधान मोदी


अनेक स्टेशन त्या त्या भागातील विशेष गोष्टींपासून प्रेरीत असेल.- पंतप्रधान मोदी


जगाला प्रेरणा देईल असे स्टेशन पुर्नविकास होतायत - पंतप्रधान मोदी


मागील 10 वर्षात आपण नवा भारत बनताना पाहिला आहे - पंतप्रधान मोदी


रेल्वेत परिवर्तन आपण आपल्या डोळ्याने पाहातो आहे - पंतप्रधान मोदी


लोकांना वाटत होतं कदाचित भारतात हे असतं तर…


मात्र आपण ते आता सत्यात उतरवले आहे 


वंदे भारत रेल्वेसंदर्भात कधी कोणी विचार पण केला नव्हता मात्र आपण सत्यात उतरवले 


एका दशकाआधीपर्यंत आपण रेल्वेचा इतका विकास होईल, याचा विचार पण करु शकत नव्हतो 


मात्र आता हे सत्यात उतरलं आहे 


मानवरहित फाटक रेल्वेची ओळख होती


मात्र आता अंडरपास आणि ओव्हरब्रिज होतायत

PM Modi : जूनपासून मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचं काम सुरु होणार - पंतप्रधान मोदी

PM Modi : आज एकासोबत दोन हजारांहून अधिक रेल्वे परियोजनांचे शिलान्यास झालंय - पंतप्रधान


जूनपासून मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचं काम सुरु होणार आहे - पंतप्रधान


मात्र आत्ताचा स्पीड सगळ्यांना आकर्षित करणारा आहे - पंतप्रधान


काल मी 5 एम्स आणि मेडिकल संस्थांचे लोकार्पण केलेत - पंतप्रधान


27 राज्यातील 300 हून अधिक जिल्ह्यातील 500 रेल्वे स्टेशनचा पुर्नविकास होतोय - पंतप्रधान


गोमती स्टेशन कमालचं दिसतंय - पंतप्रधान


40 हजार कोटींची कामं एकसाथ जमीनीवर उतरतायत - पंतप्रधान


आपण अमृत भारत स्टेशनचे भूमिपूजन केले होते - पंतप्रधान


भारताची रेल्वेची प्रतिक मोठ्या प्रमाणात होते आहे - पंतप्रधान


देशातील युवा याचे लाभार्थी आहेत - पंतप्रधान


शाळा, महाविद्यालयात अभ्यास करतायत त्यांना अधिक याचा लाभ होईल - पंतप्रधान


विकसित भारत युवकांच्या स्वप्नातील भारत आहे - पंतप्रधान

PM Modi : छोटे छोटे स्वप्न पाहणं भारतानं सोडलंय, अमृत भारत योजने अंतर्गत पंतप्रधानांकडून विविध प्रकल्पांचे उद्घाटन

PM Modi : अमृत भारत योजने अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून विविध प्रकल्पांचे उद्घाटन


आजचा कार्यक्रम नव्या भारताच्या कार्यसंस्कृतीचं प्रतिक आहे -पंतप्रधान नरेंद्र मोदी


भारत अभुतपूर्व स्केल आणि स्पीडनं करतोय - पंतप्रधान नरेंद्र मोदी


छोटे छोटे स्वप्न पाहणं भारतानं सोडलंय, मोठे स्वप्न बघत दिवस रात्र आपण एक करतोय - पंतप्रधान नरेंद्र मोदी


विकसित भारत विकसित रेल्वे कार्यक्रमात हेच दिसतंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Nashik - मनमाड - येवला मार्गावर सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको सुरू

Nashik - मनमाड - येवला मार्गावर सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको सुरू..
- मनोज जरांगे यांच्या आदेशानुसार  आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू आहे रास्ता - रोको...
- मनमाड - येवला मार्गावर रेल्वे उड्डाणपूलावर आंदोलकांनी मांडला ठिय्या..
- रास्ता रोको मुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या...
- जरांगे पाटील यांचे समर्थन करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी...

Ajay Baraskar : माझी नार्को टेस्ट करा, चौकशी करा मी जाहीर सांगतोय - - अजय बारसकर

Ajay Baraskar : माझ्यावर जरांगे पाटील यांनी आरोप केलेत, त्यांनी माफी मागवी पण मागितली नाही - अजय बारसकर


माझ्या एका प्रश्नाचं  उत्तर किंवा खंडन केलं नाही


लोणावळा वाशी येथे तुम्ही पारदर्शकता भंग केली


याउलट मला धमक्या शिव्या आणि जीवे मारण्यासाठी प्रयत्न केले


माझ्या भूमिकेशी  समाज सकारात्मक आहे


मी सत्य मांडत आहेत


वारंवार मी आक्षेप घेतले आणि प्रश्न विचारले  याचे उत्तर द्या


माझ्यावर बलात्कार, पैसे घेतले आरोप केले..


माझी नार्को टेस्ट करा, चौकशी करा मी जाहीर सांगतोय

Shiv Sena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व शिवसेना खासदारांची बोलवली बैठक

Shiv Sena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी राज्यातील सर्व शिवसेना खासदारांची बोलवली बैठक


- वर्षावर होणार बैठक,


-आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन


- नाशिकचे खासदार हेमंत गोडसे मुंबईच्या दिशेनं रवाना, दुपारी 3 वाजेपर्यंत पोहचण्याच्या सूचना


-  राज्यातील शिवसेनेचे (शिंदे गट) सर्व  खासदार  सोबत मुख्यमंत्री करणार चर्चा


- काही जागांवर भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू आहे रस्सीखेच


- आजच्या बैठकीत काय निर्णय होतात याकडे लक्ष

कोविड सेंटर घोटाळा, संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांना कोर्टाचा दिलासा 

कोरोना काळातील कथित जम्बो कोविड सेंटर घोटाळा


संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्हामध्ये किल्ला कोर्टाचा दिलासा 


1 लाख रुपयांच्या जात पर्सनल बाँड वर केला जमीन मंजूर केला 


कोर्टाच्या परवानगी विना देश सोडण्यास मज्जाव 


पासपोर्ट करावा लागणार सुपूर्द 


बनावट कागदपत्र सादर करून जंबो कोव्हिड सेंटरच कंत्राट मिळवल्याचा आहे आरोप

Mahesh Gaikwad : गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण, महेश गायकवाड यांना आज मिळणार डिस्चार्ज, सायंकाळी घेणार पत्रकार परिषद

Mahesh Gaikwad : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना आज मिळणार डिस्चार्ज


ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात सुरू होते उपचार 


महेश गायकवाड सायंकाळी चार वाजता कल्याण मध्ये येणार 


शिवसेना कार्यकर्ते व महेश गायकवाड यांचे जल्लोषात स्वागत करणार 


सायंकाळी महेश गायकवाड यांची पत्रकार परिषद

Bhusalwal : भुसावळ मंडळातील 10 रेल्वे स्थनाकाचा विकास होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Bhusalwal : देशातील 554 रेलवे स्थानकाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे


अमृत भारत योजने अंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमासाठी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे नाशिकच्या देवळाली रेल्वे स्थानकावर उपस्थित आहेत


भुसावळ मंडळातील 10 रेल्वे स्थनाकाचा विकास होणार आहे

Eknath Shinde : दक्षिण आफ्रिका, युक्रेन, स्वीडनमध्ये जितके रेल्वे नेटवर्क तितकं आपण मागच्या 10 वर्षात बनवलं आहे - एकनाथ शिंदे

Eknath Shinde : मागील दहा वर्षात कायापालट झाला आहे 


पंतप्रधान नरेंद्र मोदी अमृत भारत योजनेच्या अंतर्गत विविध प्रकल्पांचे उद्घाटन


दक्षिण आफ्रिका, युक्रेन, स्वीडनमध्ये जितके रेल्वे नेटवर्क आहे तितकं नेटवर्क आपण मागच्या 10 वर्षात बनवलं आहे 


मागील 10 वर्षात पंतप्रधानांनी सुट्टी नाही घेतली आहे 


भारताचा विकास त्यामुळे तेजीनं होतोय 


सरकार रेल्वे स्टेशनला आधुनिक आणि इको फ्रेंडली बनवण्याचा प्रयत्न करतोय 


मुंबईत डीप क्लिन ड्राईव्ह सुरु केलंय 


प्रदूषण कमी होतंय

Eknath Shinde : 'मोदी है तो मुमकीन है, रेल्वे प्रवाश्यांची यात्रा सुखद होण्याचे पंतप्रधानांचे प्रयत्न - एकनाथ शिंदे

Eknath Shinde : अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत पंतप्रधान मोदींच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन


देशभरातील 554 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, 1500 रोड ओव्हर ब्रिज आणि अंडरपासचे भूमिपूजन तसेच उद्घाटन


इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच भूमिपूजन आणि उद्घघाटन होत आहे - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री


त्यामुळे मोदी है तो मुमकीन है - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री


अयोध्येला सर्व मुलांना घेऊन जायचं आहे - एकनाथ शिंदे


प्रत्येक रेल्वे प्रवाश्यांची यात्रा सुखद होण्याचे प्रयत्न मोदी करतायत - एकनाथ शिंदे


ट्रेनमधून मध्यमवर्ग लोकंच प्रवास करत होते, मात्र मागील 10 वर्षात रेल्वे नेटवर्कचं जाळं विणलं गेलंय - एकनाथ शिंदे


त्यामुळे सुविधा चांगल्या मिळत आहेत त्यामुळे आता सर्वसामान्य प्रवास करताना दिसत आहेत- एकनाथ शिंदे

Hingoli : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती बंद, कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प

Hingoli : पणन अधिनियम कायद्यामध्ये बदल प्रस्तावित आहेत आणि हे बदल करू नये या मागणीसाठी आज राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक दिवसीय बंद पुकारला जातोय त्यामुळे हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा शुकशुकाट पाहायला मिळतोय हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली आणि वसमत या महत्त्वाच्या दोन बाजार समितीमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात हळदीची आवक होत असते परंतु आजच्या बंदमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत पणन अधिनियम कायद्यातील प्रस्तावित बदल करू नयेत यामुळे व्यापारी आडती मापारी यासह बाजार समितीतील संचालक यांना याचा मोठा बसणार आहे त्यामुळे कायद्यातील याच बदलाच्या विरोधामध्ये आज हिंगोली च्या बाजार समितीमध्ये सुद्धा बंद पुकारलाय

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे 41 हजार कोटींच्या रेल्वे प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन करणार 

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हीडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे 41 हजार कोटींच्या रेल्वे प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करणार 


अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत 554 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास आणि 1 हजार 500 रोड ओवर ब्रिज आणि अंडरपासचे भूमिपूजन, उद्घाटन करण्यात येणार 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार 


चर्नी रोड स्टेशन परिसरातील रेल्वेच्या कार्यालयात कार्यक्रमाचं आयोजन 


थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार

Maharashtra Budget Session 2024 : आंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांच्या संदर्भात विरोधक आक्रमक

Maharashtra Budget Session 2024 : आंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांच्या संदर्भात विरोधक आक्रमक
 मुख्यमंत्री यांनी अनेकदा त्यांना भेट दिली आहे - अजित पवार
-मात्र प्रश्नांच्या संदर्भात सरकार आणि समोरच्या व्यक्तीने एक पाऊल मागे पुढे झालं पाहिजे -  अजित पवार
- मात्र असंच झाल पाहीजे अशी भुमिका योग्य नाही -  अजित पवार

Ambernath : अंबरनाथमध्ये नवीन नाट्यगृहाच्या शेजारी भीषण आग

Ambernath : अंबरनाथमध्ये नवीन नाट्यगृहाच्या शेजारी भीषण आग


नवीन बांधलेल्या घरांना मोठी आग


सिलेंडरचे स्फोट मुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती


अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटात मोठे फेरबदल

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटात मोठे फेरबदल
-
जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांची लोकसभा संघटक पदी नियुक्ती
-
जिल्हा प्रमुखपदी तत्कालीन महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची वर्णी
-
तर महानगर प्रमुख पदी विलास शिंदे यांची नियुक्ती


विजय करंजकर यांच्याकडे लोकसभा संघटक पद दिल्यानं लोकसभाची उमेदवारी निश्चित मानली जात आहे

MNS : मनसेची लोकसभा आढावा बैठक, 9 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार

MNS : मनसेची एम आय जी क्लब वांद्रेला लोकसभा आढावा बैठक


आजच्या बैठकीत कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील एकूण ९ लोकसभा मतदारसंघाचा आढावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार आहेत


मनसे जिल्हाध्यक्ष आणि महत्वाचे पदाधिकारी आपलापल्या मतदार संघाचा अहवाल बैठकीत सादर करतील


यावेळी राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत


लोकसभा निवडणूक मित्रपक्षासोबत लढायची की स्वबळावर याचीही चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती

Maharashtra Budget Session 2024 :  विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांच्या आंदोलनाला सुरुवात, मराठा आरक्षणावर विरोधक आक्रमक

Maharashtra Budget Session 2024 :  विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांच्या आंदोलनाला सुरुवात
मराठा आरक्षणावर विरोधक आक्रमक
पायऱ्यांवर आंदोलन सुरू
'मराठा आणि ओबीसीना पसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो' च्या घोषणा
मुख्यमंत्री विधान भवनात पोहोचलेत

Ambadas Danve : हे राज्य आहे की गुंड राज्य आहे? अंबादास दानवेंचा जरांगेंना सवाल

Ambadas Danve : हे राज्य आहे की गुंड राज्य आहे असा प्रश्न आहे


अंबादास दानवेंचा मनोज जरांगेंना सवाल


शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही


बोलवता धनी कोण हे बघण्यापेक्ष्या ते का बोलतात हे बघावं लागेल


बोलावते धनी राज्याचे मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री तर नाही ना


दोन्ही उपमुख्यमंत्री गप्प असताना मुख्यमंत्री जरांगे यांना भेटले


जरांगे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल का बोलत नाही

Jalna : मनोज जरांगे यांच्या तीन सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

Jalna : जालना-मनोज जरांगे यांच्या तीन सहकाऱ्यांना पोलिसांना ताब्यात घेतले. त्यांची नावे.



1)शैलेंद्र पवार


2)बाळासाहेब इंगळे.


3)श्रीराम कुरणकर.

Buldhana : पूर्णा नदीच्या पुलावरून दुचाकी कोसळून तीन ठार

Buldhana : नांदुरा - जळगाव जामोद - बुऱ्हाणपूर मार्गावरील मानेगाव येथील पूर्णा नदीच्या पुलावरून दुचाकी थेट पूर्णा नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात दुचाकी वरील दोन तरुण ठार झालेत . जवळपास 50 फूट खोल असलेल्या या पुलावरून भरधाव दुचाकी ही नदीत कोसळली या पुलाला अनेक वर्षापासून संरक्षक कठडा नसल्याने अनेक अपघात घडले आहेत. मात्र अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाला कठडे बसवले नाहीत. त्यामुळे या धोकादायक पुलावरून अनेक प्रवासी वाहनांना सुद्धा धोका निर्माण झालेला आहे.तर याच ठिकाणाहून काही अंतरावर असलेल्या आसलगाव जवळ अशाच प्रकारच्या कठडा नसलेल्या पुलावरून नदीत कोसळल्याने जागीच ठार झाला. त्यामुळे फक्त सहा तासांत याच मार्गावर पुलाला संरक्षक कठडा नसल्याने दोन अपघातात तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

Maharashtra Budget Session 2024 : महाविकास आघाडीची थोड्याच वेळात होणार बैठक, सत्ताधारी पक्षाला घेरण्याची ठरणार रणनीती

Maharashtra Budget Session 2024 : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडी सत्ताधारी पक्षाला घेरण्यासाठी रणनिती ठरवणार


थोड्याच वेळात महाविकास आघाडीची होणार बैठक


सत्ताधारी पक्षाला घेरण्याची ठरणार रणनीती

Bhiwandi : भिवंडी तालुक्यातील शेकडों युवकांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

Bhiwandi : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस विरेन दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली नुकताच युवक काँग्रेस पक्षामध्ये युवकांनी प्रवेश केला असून त्यांना नियुक्ती पत्र देऊन पद वाटप देखील करण्यात आले.तालुक्यातील खारबांव,महापोली,कोन गाव येथील शेकडों युवक पक्ष प्रवेशात सहभागी झाले होते.

BJP : अरुणाचल प्रदेशातील चार आमदार भाजपात

BJP : अरुणाचल प्रदेशातील चार आमदार भाजपात


अरुणाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे 2 तसेच NPP चे 2 आमदार भाजपमध्ये सहभागी 


काँग्रेसचे आमदार निनोंग एरिंग व वांगलिंन लाऊनदोंग भाजपमध्ये सामील


नॅशनल पीपल्स पार्टीचे आमदार मुचू मिथी, गोकर बासर भाजपात


60 आमदारांच्या विधानसभेत काँग्रेस व NPP कडे प्रत्येकी 1-1 आमदार उरले

Nashik : माकपचे लाल वादळ आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार, विविध मागण्यांसाठी आंदोलन
Nashik : माकपचे लाल वादळ आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे, हजारो आंदोलनकर्ते नाशिकच्या वेशीवर दाखल झाले असून दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यलयावर धडकणार आहेत. इथेच बिर्हाड मोर्चा रहाणार आहे, मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत मोर्चा इथेच राहणार रविवारी पालकमंत्री दादा भुसे यांनी माजी आमदार जे पी गावित यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे मोर्चा निघणार  आहे एकीकडे राज्य विधिमंडळचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होतंय, दुसरीकडे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यलायवर धडकणार आहे, मागील मागण्या मान्य न झाल्यानं आंदोलनकर्ते आक्रमक आहेत

 


-कांदा निर्यात बंदी मागे घ्या, 2 हजार हमीभाव द्या

-4 हजार हेक्टर पर्यंत ची वन जमिनी कसणार्याच्या नावे

-शेतीवरील कर्ज माफ करा, 24 तास द्या

-2005 पर्यतच्या शासकीय कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करा,

कंत्राटी भरती बंद करून सरळसेवा भरती करा आदी मागण्यांसाठी आंदोलन केले जात आहे, 

Chhtrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व आगारातील वाहतूक तात्पुरती बंद करण्याचे आदेश

Chhtrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व आगारातील वाहतूक तात्पुरती बंद करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले असल्याने वाहतूक थांबवण्यात आली आहे .पोलीस प्रशासनाच्या संपर्कात एसटी प्रशासन असून वाहतूक सुरू करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे.

Chhtrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व आगारातील वाहतूक तात्पुरती बंद करण्याचे आदेश

Chhtrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व आगारातील वाहतूक तात्पुरती बंद करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले असल्याने वाहतूक थांबवण्यात आली आहे .पोलीस प्रशासनाच्या संपर्कात एसटी प्रशासन असून वाहतूक सुरू करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे.

Marathwada : मराठवाड्यात इंटरनेट सेवा बंद, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गृह विभागाचा निर्णय

Marathwada : मराठवाड्यात इंटरनेट सेवा बंद


कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गृह विभागाचा निर्णय


आज 10 तास इंटरनेट सेवा बंद राहणार


गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांचे आदेश

Sujay Vikhe : 'राष्ट्रवादीला तुतारी नाही तर खंजीर चिन्ह मिळायला हवं होतं', सुजय विखेंची राष्ट्रवादीवर टीका

Sujay Vikhe : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चिन्ह चुकले, तुतारी नव्हे यांना खंजीर भेटायला हवे होते. असं म्हणत भाजप खासदार सुजय विखेंनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सुजय विखेंच्या दिल्ली वाऱ्या का वाढल्या आहेत असं म्हणत सुजय विखेंवर निशाणा साधला होता. याबाबत विचारले असता सुजय विखेंनी राष्ट्रवादीला डिवचले आहे.

Jalna : जालना जिल्ह्यातील बस सेवा बंद, 5 आगरांच्या बस बंद करण्याचा निर्णय

Jalna : जालना जिल्ह्यातील बस सेवा बंद, पोलिसांच्या सुचनेवरून परिवहन मंडळाने जिल्ह्यातील 5 आगरांच्या बस बंद करण्याचा निर्णय घेतलाय, पोलिसांचे पुढील आदेश येईपर्यत बस बंद राहतील

Pune : छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामगार संघटना बंदमध्ये सहभागी, राज्यातील सर्व बाजार समित्यांमधील कामकाज बंद

Pune : पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामगार संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत. माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे 2018 चे विधेयक (राष्ट्रीय दर्जा बाजार समिती बनविणे) मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी कामगार संघटनांनी राज्यातील सर्व बाजार समित्यांमधील कामकाज बंद ठेवण्यात आल आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामगार संघटना बंदमध्ये सहभागी झाले असून आज सकाळपासून यार्डातील कामकाज बंद ठेवण्यात आले आहे तसचं  शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस पाठवू नये, असे आवाहन देखील बाजार समिती कडून करण्यात आलं आहे. पुण्यातील मार्केट यार्ड आज सकाळपासूनच बंद असल्यामुळे या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतोय. 

Jalna : जालना-घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवली

Jalna : जालना-घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवली. तिर्थपुरी गावात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास अंबड येथून रामसगाव कडे जाणाऱ्या अंबड आगाराच्या या बसला आडवून अज्ञातांनी पेटवून दिले

Nashik : नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून पदाधिकारी जाहीर, आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची पद बदली

Nashik : नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून पदाधिकारी जाहीर, आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची पद बदली


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नाशिक जिल्हा व शहर पातळीवरील नियुक्त्या आज जाहीर करण्यात आल्या आहेत


विजय करंजकर यांची जागी सुधाकर बडगुजर यांची शिवसेनेच्या नाशिक जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे,


नाशिक लोकसभा संघटकपदी विजय करंजकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर नाशिक महानगर प्रमुखपदी विलास शिंदे यांची नियुक्ती 


हिवाळी अधिवेशनात सुधाकर बडगुजर यांच्यावर नितेश राणे यांनी आरोप केले होते त्यानंतर बडगुजर यांची चौकशी देखील सुरु होती...

Buldhana : निवडणूक आयोगाचा पोलिस विभागाला दणका, तीन पोलिस निरीक्षकांची उचलबांगडी

Buldhana : बुलढाणा जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अमरावती विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी उचलबांगडी केली आहे. यात तीन पोलीस निरीक्षकांचा समावेश असून हे तीनही पोलीस निरीक्षक गेल्या तीन ते चार वर्षापासून जिल्ह्यात कार्यरत होते. मात्र तातडीने बदली करण्याचा आदेश असतानाही काही अधिकाऱ्यानी हा आदेश पाळला नाही. मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने विशेष आदेश देऊन अमरावती विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांना या बदल्या करण्यास भाग पाडलं. त्यामुळे या तीनही पोलीस निरीक्षकांची बदली आता जिल्हा बाहेर करण्यात आली आहे.

Lasalgaon :  लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या आज राहणार बंद

Nashik :  लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या आज राहणार बंद..
- कृषी उत्पन्न पणन अधिनियम विधेयकात सुधारणा प्रस्तावित.
- बाजार समितीसह समितीतील सर्वच घटकांचे अस्तित्व संपुष्टात येणार असल्याचा शेतकरी संघटनांचा दावा..
- सरकारकडून बाजार समित्यांवर प्रशासक बसवण्याचा घाट सुरू असल्याचा शेतकरी संघटनांचा आरोप..
- बंदमुळे लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट..
- शेतकरी, व्यापारी, अडतदार,हमाल, मापारी व मार्केट मधील  सर्व घटकांचा बंद ला पाठिंबा

Sangli : सांगलीतील रिलायन्स ज्वेल्स दरोड्यातील आणखी दोघांना अटक

Sangli : सांगलीतील रिलायन्स ज्वेल्स दरोड्यातील आणखी दोघाना डेहराडूनमधील कारागृहातून अटक


जत मधील बाजार समितीमध्ये बेदाणा सौदे सुरु, पहिल्याच सौद्यात २७५ रुपये मिळाला दर


मिरज-पंढरपूर रस्त्यावर पोलिस भरती प्रशिक्षणास निघालेल्या तरुणाचा पीकअपच्या धडकेत मृत्यू


मिरज तालुक्यातील बेडग मध्ये म्हैसाळ कॅनॉल मध्ये पडून महिलेचा मृत्यू

Budget Session : आजपासून राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणार

Budget Session : आजपासून राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरूवात होत आहे. या अधिवेशनात दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीला लेखानुदान अर्थात अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल. या अधिवेशनाच्या निमित्ताने राज्य सरकारला घेरण्याची संधी विरोधकांसाठी असेल. विरोधकांकडून राज्य सरकारला कोंडीत आणण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

Mumbai : मुंबईतील राम मंदिर परिसरात दोन वाहनांना अचानक आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Mumbai Fire : मुंबईतील राम मंदिर परिसरात मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या दोन वाहनांना अचानक आग लागली.


सकाळी 6.50 च्या सुमारास ही आग लागली.


अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.


आग विझवण्याचे काम सुरू आहे.


पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना आग कशी लागली याचे कारण स्पष्ट झालेले नाही.


वाहने जाळल्याशिवाय अन्य कुठलेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

Malegaon : मालेगावात मुस्लिम धर्मियांचा सण ' शब ए बारात ' उत्साहात साजरा, हजारो मुस्लिम धर्मियांची उपस्थिती
Malegaon : नाशिकच्या मालेगावमध्ये मुस्लिम धर्मियांचा पवित्र मानला जाणारा शब ए बारात ( बडी रात ) हा सण उत्साहात साजरा झाला..सर्व गुन्ह्यांपासून मुक्ती मिळण्याची रात्र असल्यामुळे शब - ए- बारात च्या निमित्ताने रात्रीची नमाज अदा केल्यानंतर हजारो मुस्लिम बांधवांनी बडा कब्रस्थान येथे जाऊन आपल्या पूर्वजांच्या नावाने व स्वतःसाठी देखीलरात्रभर अल्लाह कडे प्रार्थना केली..या दिवशी जो प्रामाणिकपणे अल्लाहकडे त्याच्या पापांची क्षमा मागतो, त्यांच्यासाठी अल्लाह जन्नतचे दरवाजे उघडतो, अशी मान्यता आहे. मालेगावातील बडा कब्रस्थान व सर्व मशिदीवर या सणाच्या निमित्ताने आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती..शब ए बारात निमित्ताने मुस्लिम बांधवांकडून गोरगरिबांना दान केले जाते.
Jalna : जालन्यातील अंबड येथे संचारबदी लागू,

Jalna : जालन्यातील अंबड येथे संचारबदी लागू, मध्यरात्री 1 वाजल्या पासून पुढील आदेशापर्यत आदेश लागू असतील.

Weather Update : आज विदर्भातील काही भागात ऑरेंज अलर्टचा इशारा

Weather Update : आज नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया व अमरावती जिल्ह्यासाठी नागपूर वेध शाळेकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे


या सर्व जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट, वादळी वाऱ्यासह  विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे.  


या अनुषंगाने नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

APMC Strike : राज्यातील बाजार समित्यांतर्फे आज एक दिवसाचा लाक्षणिक संप

APMC Strike : केंद्र सरकारने बाजार समितीच्या धोरणात बदल करून निवडणूका न घेता कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणणारा आहे. तो तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यातील बाजार समित्यांनी आज एक 
 दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News Latest LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.