Maharashtra News LIVE Updates 25th March : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 25 Mar 2024 01:41 PM

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... ...More

Dombivli Holi Celebration : खासदार श्रीकांत शिंदे यांनी साजरी केली धुळवड

Dombivli News : धुळवडनिमित्त आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली शिवसेना शहर शाखेला भेट दिली. यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासोबत धुळवड साजरी केली. खासदार शिंदे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नागरिकांना धुळवडच्या  शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी देशात चारशे पार तर महाराष्ट्रात 45 पार या दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीला सामोरे जात आहोत. येत्या निवडणुकीत कोणाला मत द्यायचं आहे, हे लोकांनी ठरवलं आहे. महायुतीचे खासदार पुन्हा निवडून येतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्व करतील असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना कल्याणमधील झालेल्या विकास कामांमुळे लोकं समाधानी आहेत. कल्याण बदलतेय कात टाकतेय, मला 2014 मध्ये अडीच लाखांच्या मताधिक्य होतं, 2019 मध्ये साडेतीन लाखांचं मताधिक्य होतं, यंदा विक्रमी मताधिक्याने लोक निवडून देणार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले. पुढे बोलताना आज वेगवेगळ्या रंगात जरी रंगलेले असलो तरी आमच्या सगळ्यांचा रंग आम्हाला सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा जो रंग आहे तो भगवा रंग आहे हिंदुत्वाचा रंग आहे बाळासाहेब ठाकरे यांचा रंग आहे आणि त्या भगव्या रंगाला आम्ही पुढे घेऊन जाण्याचे काम करतोय असे सांगितले.