Maharashtra News LIVE Updates : अरविंद केजरीवालांना 10 दिवसांची ईडी कोठडी, कोर्टाचा निर्णय
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Nashik : सिटीलिंक बस वाहकांचा संप अखेर मागे
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला सिटी लिंकच्या वाहक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. ३१ मार्च पर्यंत थकीत वेतन अदा केले जाणार असल्याचं सिटीलिंक प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आल्याने हा संप मागे घेण्यात आला आहे.
Arwind Kejriwal : अरविंद केजरीवालांना ईडी कोठडी
Arwind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना 10 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आलीये.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नऊ जागा निश्चित
बारामती, माढा, रावेर, सातारा, शिरुर, नगर दक्षिण, दिंडोरी, बीड, वर्धा या जागांवर शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढवली जाणार, अशी माहिती मिळत आहे. या नऊ संभाव्य उमेदवारांची यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे.
जागा आणि संभाव्य उमेदवार
बारामती - सुप्रिया सुळे
माढा - महादेव जानकर (रासप)
सातारा - बाळासाहेब किंवा श्रीनिवास पाटील
शिरुर - अमोल कोल्हे
नगर दक्षिण - निलेश लंके
बीड - बजरंग सोनवणे किंवा ज्योती मेटे
वर्धा - अमर काळे
शरद पवार गट निवडणूक आयोगात तक्रार दाखल करणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुक आयोगात तक्रार दाखल केली जाणार आहे. अजित पवार यांच्या पक्षाकडून अजूनही घड्याळ चिन्ह वापरलं जात असताना प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तात्पुरत्या स्वरूपात वापरत आहेत अस लिहिलं जात नसल्याने तक्रार करण्यात येणार आहे. तक्रार दाखल करण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड दिल्लीत पोहोचले आहेत. 2 दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार चिन्ह वापरताना सूचना लिहिण्याचे निर्देश दिले होते. त्याचे पालन केल जात नसल्याने आव्हाड यांच्याकडून तक्रार करण्यात येणार आहे.
इक्बाल सिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी अतिरिक्त मुंबई महापालिका (प्रकल्प) पी वेलरासू यांची नियुक्ती सचिव, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.