Maharashtra News LIVE Updates 20th March : विजय शिवतारे काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंच्या घरी, मंत्री आनंदराव थोपटेंशी चर्चा

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 20 Mar 2024 02:50 PM
अजित पवारांनी उमेदवारी जाहीर करताच कोल्हेनी आढळरावांना डिवचले.

अजित पवारांनी शिवाजी आढळरावांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करताच, खासदार अमोल कोल्हे यांनी आढळरावांना डीवचलं. 2019च्या लोकसभेला अजित पवाराचं काय तर बराक ओबामा आले तरी मीच खासदार होणार. असं आव्हान देणारे आढळराव आता पुन्हा अजित दादांच्या पक्षाकडून लोकसभा लढणार आहेत. त्यांना चौथ्या पक्षप्रवेशाच्या माझ्याकडून शुभेच्छा आहेत. असं म्हणत कोल्हेनी आढळरावांना डिवचले. 

सांगलीसह भिवंडी मुंबईतील दोन जागा आम्ही लढवणार : नाना पटोले

महाराष्ट्राच्या जागांवर आज आमची चर्चा होणार आहे. 


आत्ता सांगली भिवंडी मुंबईतील जागेवर चर्चा झाली. आमचा दावा या जागेवर आहे.


कांग्रेस जवळ खूप उमेदवार आहे.


 आमच्या तीन जागांवर आम्ही ठाम आहोत.


मुंबईतील दोन जागेवर आम्ही समाधानी


प्रिया दत्ता आणि एकनाथ गायकवाड या जागा आम्हाला मिळतील. 


छत्रपतींनी निवडणूक लढवावी आमची भूमिका आहे. त्यांना जे वाटेल त्या पक्षाच्या चिन्हावर लढवावी.


संजय राऊतांच्या सर्टिफिकेटची गरज मला नाही. 

लोकांच्या जनभावना समजून घेतल्यानंतर निर्णय घेणार : धैर्यशील मोहिते पाटील

माढा लोकसभेचे भाजपा उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात नाराज असलेल्या मोहिते पाटील यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. आपण सध्या संपूर्ण मतदार संघात कुटुंबासह फिरून जनतेच्या मनातील जनभावना जाणून घेत आहे. यासाठी आपण करमाळा , माढा आणि आता सांगोला दौरा करत आहे. आपला दौरा झाल्यावर लोकांच्या जनभावनेचा विचार करून आपला पुढील निर्णय होईल. यामध्ये रामराजे निंबाळकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर मात्र मोहिते पाटील यांनी बोलण्यास टाळले आहे.दे

उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीस्थळी जाऊन दर्शन घेणार

उद्धव ठाकरे उद्या माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीस्थळी जाऊन वसंतदादाच्या समाधीचे दर्शन घेणार


शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांची सांगलीत पत्रकार परिषदेत माहिती


 वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील काँग्रेसकडून लोकसभेसाठी इच्छुक असतांना आणि या सांगलीच्या  जागेवर ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची वसंतदादाच्या समाधीस्थळाच्या भेटीला महत्व प्राप्त


उद्या उद्धव ठाकरे  शिवसेनेच्या जन संवाद सभेच्या निमित्ताने सांगली  दौऱ्यावर  येत आहेत, मिरजेत सायंकाळी 5 वाजता पार पडणार सभा


सांगलीत आल्यानंतर  प्रथम माजी मुख्यमंत्री कै.  वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीस्थळी जाऊन उद्धव ठाकरे दर्शन घेणार


कोल्हापूर विमानतळावर 3 वाजता ठाकरे पोचणार, नंतर थेट सांगलीच्या दिशेने निघणार


ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत  यांच्यासह ठाकरे गटाचे अनेक नेते उपस्थित राहणार

हर्षवर्धन पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक, चर्चा सकारात्मक झाल्याची हर्षवर्धन पाटलांची माहिती

आम्ही कार्यकर्त्यांच्या भावना देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडल्याचे मत भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. आज हर्षवर्धन पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. त्यानंतर पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आमची स्थानिक पातळीवरील विषयासंदर्भात बैठकीत चर्चा झाली.


चर्चा संपूर्णपणे सकारात्मक झाली आहे.


आज पहिली बैठक झाली.आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्या सोबत बैठक होणार.


बैठकीचा दुसरा टप्पा अजित पवार सुद्धा असतील.

विजय शिवतारे काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंच्या घरी, मंत्री आनंदराव थोपटेंशी चर्चा

माजी मंत्री विजय बापू शिवतारे हे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या घरी पोहोचले आहेत. ते माजी मंत्री आनंदराव थोपटे यांच्यासोबत चर्चा करत आहेत.

वर्ध्यात झालेल्या गारपिटीचा केळीच्या बागांसह गव्हाला मोठा फटका

Rain news : वर्ध्यात मंगळवारी रात्री झालेल्या गारपिटीचा शेती पिकाला चांगलाच फटका बसला आहे. वर्ध्याच्या सेलू, कारंजा, वर्धा, आर्वी आणि सामुद्रपूर तालुक्यात हे गारपीट झाले आहे. तब्बल अर्धा तास वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने काही भागात गहू पिकाचे नुकसान झाले तर काही ठिकाणी घरावरची छपरे देखील उडाली होती. पवनार येथे शेतकऱ्याच्या केळीच्या बागेचे नुकसान झाले आहे. कापणीला आलेल्या केळीच्या बागेत केळी जमीनदोस्त झाली आहे. केळीचे घड देखील खाली पडले आहे. पवनार येथील सुनील निंबाळकर या शेतकऱ्यांच्या शेतात हे नुकसान पाहायला मिळते आहे तर याच ठिकाणी आजूबाजूच्या परिसरात केळीचे मोठे नुकसान झाले आहे. 

राज्यातील काँग्रेस नेत्यांची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी बैठक

Congress Meeting : राज्यातील काँग्रेस नेत्यांची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. बैठकीत बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, नाना पटोले, विजय वडेट्टीवार बैठकीत उपस्थित राहणार आहेत. थोड्याच वेळात बैठक सुरु राहणार आहेत. 

शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी घेतली आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांची भेट

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी आज शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी माढा तालुक्यातील वाकाव येथे थेट आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी भेट दिली . येथे त्यांनी शिवसेना सोलापूर संपर्क प्रमुख प्रा शिवाजीराव सावंत आणि कुटुंबीयांची भेट घेतली . त्यामुळे उलट सुलट चर्चा सुरू झाली असून माढा तालुक्यातील सावंत यांचा गट आणि राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे यांच्यात नेहमीच संघर्ष होत असतो . यामुळेच दोन दिवसापूर्वी खासदार रणजित निंबाळकर यांनी बोलावलेल्या बैठकीस शिवसेनेचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी दांडी मारली होती . आज शिवतेज मोहिते पाटील आणि सावंत यांच्या भेटीमुळे महायुतीत असणारी नाराजीही समोर आली आहे

Holi Regulations : होळी आणि धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या मार्गदर्शक सूचना जारी

होळी आणि धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या मार्गदर्शक सूचना जारी, जमावबंदी व हत्यारबंदी,ध्वनीप्रदूषणावर नियंंत्रण ठेवणे असे आदेश जारी आहेत.


आचार संहिता सुरू असून विविध राजकिय पक्षाकडून उत्सवाचा वापर हा निवडणूक प्रचाराकरिता होण्याची शक्यता असल्याने योग्य ती खबरदारी घेण्याच्या पोलिसांना सूचना.


सोशल मिडियावर धार्मिक भावना दुखवण्यासारख्या चित्रफीती, समाजसुधारक, थोर व्यक्तीबद्दल आक्षपार्ह पोस्ट करणार्यांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना.

Lok Sabha Election : नागपूरसह पाच मतदारसंघांसाठी आजपासून अर्ज भरणे सुरू, 30 मार्च पर्यंत अर्ज माघारी घेता येणार

असा असेल निवडणूक कार्यक्रम


आजपासूनच नामनिर्देशन पत्र स्वीकारले जात आहेत. 27 मार्चपर्यंत उमेदवारांना त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 28 मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. तर 30 मार्च उमेदवारी अर्ज परत घेण्याची अखेरची मुदत असणार आहे.


विशेष म्हणजे 20 मार्च ते 27 मार्च उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालावधीमध्ये तीन दिवस प्रशासनिक सुट्टी आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना पाचच दिवस मिळणार आहेत. 

Buldhana : उद्धव ठाकरे आज बुलढाण्याच्या दौऱ्यावर, बुलढाण्याची उमेदवारी अद्यापही अनिश्चित, उद्धव ठाकरे कुणाच्या नावाची घोषणा करणार याकडे लक्ष

उद्धव ठाकरे आज बुलढाण्याच्या दौऱ्यावर असून ते मेहकर आणि सिंदखेड राजा येथे सभा घेणार आहेत. बुलढाणा लोकसभेची जागा महाविकास आघाडी तर्फे उबाठा गटाला मिळालेली आहे. बुलढाण्याची जागा प्रा. नरेंद्र खेडेकर म्हणून संभावित उमेदवार म्हणून घोषित करण्यात आली आहे. मात्र यावर अद्यापही शिक्कामोर्तब न झाल्याने या दोन सभेत उद्धव ठाकरे कुठली घोषणा करतात याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे . 


गेल्या महिन्यातील 22 फेब्रुवारी आणि 23 फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. 22 फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यात तीन सभा घेतल्या आणि उर्वरित दोन सभा या 23 फेब्रुवारी रोजी मेहकर आणि सिंदखेड राजा येथे होणार होत्या. मात्र त्याच दिवशी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने हा दौरा उद्धव ठाकरे यांना अर्धवट सोडून मुंबईला परत जावं लागलं होत.


 

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज, नागपूरसह पाच ठिकाणी 19 एप्रिल रोजी मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज निघणार.


आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास होणार सुरुवात.


पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार.


2019 मध्ये नागपूर लोकसभेसाठी 30 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.


तर रामटेक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात 2019 मध्ये 16 उमेदवार निवडणुकीत होते.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.