Maharashtra News LIVE Updates 19th March : नागपुरात पावसाची हजेरी, उन्हाच्या झळांपासून दिलासा

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 19 Mar 2024 10:42 PM
Yavatmal News : पालकमंत्री संजय राठोड यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Yavatmal News :  यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी आणि गारपीटीमुळे आर्णी तालुकयातील लोणी परिसरातील आणि दारव्हा तालुक्यातील तसेच परिसरात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. दारव्हा तालुक्यातील बिजोरा आणि आर्णी तालुक्यातील लोणी येथे पालकमंत्री संजय राठोड यांनी नुकसानग्रस्त पाहणी करत गहू, मका, पपई, टरबूज, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तींमुळे हिरावला असून अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे  स्वप्न वाहून गेले आहे. वीज पडल्यामुळे लोही येथील बाळू लक्ष्मण फुंड यांचा मृत्यू झाला. आज त्यांच्या घरी मंत्री संजय राठोड यांनी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Unseasonal Rain : पवनार शिवारात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट

Wardha Rain : वर्ध्याच्या पवनार येथे  वादळी वाऱ्यासह गारपीट झाले आहे. अनेक घरावरील टिनपत्रे उडाली.तर उभी झाडे सुद्धा कोसळली आहेय. अजूनही बऱ्याच शेतकऱ्याचा गहू चणा निघावयाचा आहे.त्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे येथे केळीच्या बागेचे सुद्धा नुकसान झाले आहे.  अचानक झालेल्या या वादळ गारपिटीने मोठे  नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे.

Parbbhani Maratha Protest :

परभणी : सरकारने एक तर मराठा समाजाची फसवणुक केली सगे सोयरेंची अंमलबजावणी केली नाही, त्यातच आता पोलिसांच्या माध्यमातून मराठा समाजाची दडपशाही केली जात आहे. 24 फेब्रुवारीला परभणी जिल्ह्यात सर्वत्र शांततेत रास्ता रोको आंदोलन केले गेले, मात्र पोलिसांनी तब्बल 750 जनावर गुन्हे दाखल केले. नुसते गुन्हेच नाही, तर जे कलम लावायला हवे, ते न लावता दुसरेच कलमं लावल्याने आज सर्वांना जामीन करून घेण्याची वेळ आलीय. मात्र आम्ही ही दडपशाही खपवून घेणार नाही, असा इशारा परभणीत सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलाय. परभणी शहरातील मराठा समाज मदत कार्यालयात सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या पत्रकार परिषदेत सुभाष जावळे यांनी मनोज जरांगे यांनी 24 तारखेला बोलावलेल्या बैठकीसाठी परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावातून दोन कार्यकर्ते जाणार तसेच गावपातळीवर प्रत्येक घरावर आम्ही लोकप्रतिनिधी अन् त्यांच्या कार्यकर्त्यांना यायचे नाही, अशा प्रकारचे पोस्टर ही वितरित करत असल्याचे सांगितले.

Gondia Rain : गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस...हवामान विभागाने दिला होता ऑरेंज अलर्ट.. 

गोंदिया  : हवामान विभागाने विदर्भात तीन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यात वर्तविली होती. त्यामुळे आज दुपारपासून गोंदिया जिल्ह्यात वादळी वारा सुरू होता. अखेर सायंकाळच्या सुमारास सडक अर्जुनी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस बरसला आहे. या पावसाचा फटका गहू पिकांसह भाजीपाला पिकांना देखील बसणार आहे.

Nagpur Rain : नागपुरात पावसाची हजेरी

Nagpur Rain : नागपुरात गेले 20 मिनिटं जोरदार पाऊस पडतोय. सकाळपासून नागपुरात ढगाळ वातावरण होते. चार वाजताच्या सुमारास थंडगार वारे वाहायला सुरुवात झाली आणि त्यानंतर गेले 20 मिनिटं दमदार पाऊस होतोय, गेल्या तीन दिवसात नागपुरात रोज कमी अधिक प्रमाणात पाऊस पडतो आहे.

ठाकरे गटाचे युवासेना सचिव वरुण सरदेसाईंचा भाजपवर हल्लाबोल 

आज यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात मेळावा आहे. शिवसेना लढणार अशा ११ मतदारसंघात आमचे मेळावे झालेय. मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळतोय... कोण युती करते यापेक्षा आमची ताकद कशी वाढेल याकडे आमचं लक्ष आहे, असं वरुण सरदेसाई म्हणाले


 मनसेवर प्रतिक्रिया 


उद्धव ठाकरे भाजप सोबत होते. तेव्हा भाजपला कोणाची गरज नव्हती. उद्धव ठाकरे यांची ताकद किती हे भाजपचा आता कळली असेल. उद्धव ठाकरे यांची कमी भरुन काढायला भाजपला आधी शिवसेना फोडावी लागली, शिंदे यांना मुख्यमंत्री करावं लागलं. त्यानंतर राष्ट्रवादी फोडावी लागली, अजीत दादांना उपमुख्यमंत्री करावं लागली. त्यानंतरंही उद्धव ठाकरे यांची कमी भरुन निघाली नाही. तर त्यांना कॅाग्रेस फोडावी लागली. त्यानंतरंही उद्धव ठाकरे यांची कमी भरुन निघाली नाही, तर त्यांना मनसे सोबत लागते


 कल्याणमध्ये उमेदवार कोण?


माझ्यावर शिवसेनेने सचिव पदाची जबाबदारी दिल्याने, सेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे प्रयत्न करतोय. आमचे नेते उमेदवार याबाबत ठरवतील. जो उमेदवार असतील त्याला आम्ही विजयी करु.. माझ्याबाबत उद्धव ठाकरे ठरवतील. त्यांचा आदेश पाळणं हे आमचं काम. 


 जागावाटप जवळपास निश्चित


जवळपास निश्चित झालेय. उद्धव ठाकरे यांनी आमच्या ७०-८० टक्के उमेदवारांची घोषणाही केलीय. २० टक्के जागांबद्दल बोलणी सुरु आहे. त्याबाबत वरिष्ठ निर्णय घेणार.. कॅाग्रेसचे उमेदवार कोण याबाबत त्यांचे नेते सांगतील.. 


रामटेक लोकसभा 


रामटेक लोकसभा मतदारसंघात आमचं काम सुरु आहे. रामटेक कायम शिवसेनेचा गढ राहीलाय. तिथे लढणार कोण? याबाबत वरिष्ठ ठरवतील 



आंबेडकर साहेबांनी सोबत यावं
 
आंबेडकर साहेबांनी सोबत यावं ही महाविकास आघाडीची इच्छा. ते राहुल गांधी यांच्या मंचावर होते. त्यांना सन्मानजनक जागा मिळेल. आता त्यांना निर्णय घ्यायचा आहे. भाजपसमोर लढताना जिंकण्याचा निकष पाहून तिकीट मिळणार

माढ्याच्या राड्यावरुन सागर बंगल्यावर बैठक, अजित पवारही उपस्थित

 माढा लोकसभा मतदारसंघावरून सुरू असलेल्या नाराजी नाट्याच्या बाबतीत सागर बंगल्यावर बैठक पार पडली. बैठकीला रामराजे नाईक निंबाळकर भाजप कडून तिकडे जाहीर झालेले रणजितसिंह नाईक निंबाळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित, माढा लोकसभा मतदारसंघाबाबत सुरू असलेल्या नाराजी नाट्याचा तिढा सुटणार का याबाबत याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

Amit Shah Raj thackeray Meet : अमित शाहांसोबत बैठकीनंतर राज ठाकरे बाहेर निघाले

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत भेट झाल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आता शाहांच्या निवासस्थानातून बाहेर पडले आहेत. या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलं नाही. या बैठकीनंतर आता मनसे महायुतीमध्ये सामील होणार असल्याचं नक्की झाल्याची चर्चा आहे. 

माझी उमेदवारी मातोश्री मधून फायनल झालीय, अजिबात धाकधूक नाही : चंद्रहार पाटील

माझ्या उमेदवारीबाबत आता मला अजिबात धाकधूक वाटत नाही, माझी उमेदवारी मातोश्री मधून फायनल झालीय.  रात्रीच उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता, 21 मार्च  रोजी मिरजेत होणाऱ्या सभेबाबत चर्चा झाली, आम्ही सभेच्या तयारीला लागलोय. माझी उमेदवारी फिक्स आहे, मी प्रचार सुरू केलाय. वरिष्ठ पातळीवर आता काय चर्चा चालू आहे याची मला कल्पना नाही, असं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी एबीपी माझाला सांगितलं. 

 राक्षशी शक्तीला घालऊयात, सुशीलकुमार शिंदेंची मोहोळकरांना साद 

सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरातील मोहोळमधील जाहीर सभेला संबोधित केलं. 



सुशीलकुमार शिंदे काय म्हणाले? 



बऱ्याच वर्षानंतर मोहोळकरांशी जाहीर सभेत बोलतोय


आज प्रणिती शिंदे येणारं होत्या पण दिल्लीत वर्किंग कमिटीची बैठक आहे, त्यामुळे त्या तिथे गेल्या आहेत


भाजप जनतेला कशा पद्धतीने भुलवते ते सांगण्यासाठी निरंजन टकले यांना घेऊन आलोय


दोन वेळेस आपली जागा गेली, खूप आश्वासन भाजपने दिले


मोदी पहिल्या लोकसभेला सोलापुरात आले होते


सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री असून सैन्याचे कपडे सोलापुरात का शिवत नाहीत असं मोदी म्हणाले


पण ते शक्य नव्हतं 13 लाख सैनिक हाताखाली काम करत होते


जिथे तापमान अतिशय कमी असतं तिथे आपल्या हॅन्डलुम चालत नाहीत


हे देखील पंतप्रधाणाला माहिती नसावी हे आपले दुर्दैव


लोकांना अशा भुलथापा देणारा पंतप्रधान दोन वेळेस आपण स्वीकारला


Ntpc, हायवे, विद्यापीठ, पॉवरग्रीड हे सगळं आम्ही आणलं मात्र उदघाटन करून स्वतः क्रेडिट घेण्याचं काम भाजपने केले


भाजप फक्त मोदी आणि त्यांची गॅरेंटी असे म्हणतात


कसली गॅरेंटी आहे त्यांनाच माहिती


आम्ही पन्नास वर्ष राजकारणात आहोत, कसली गॅरेंटी दिली नाही, जनताच तुम्हाला गॅरेंटी देते


हा देश गांधी नेहरूचा देश, पण त्यांनीच काही केलं असं म्हणतात, खोटं तरी किती बोलायचं


जेव्हा मी महाराष्ट्र मुख्यमंत्री होतो तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते


पण तेव्हा ते काहीही बोलायचे नाहीत पण पंतप्रधान झाल्यावर काय डोक्यात घुसलं काय माहिती


ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे, देशाला हुकूमशाहीकडे घेऊन जाणारी स्थिती आहे


केवळ एक विनंती आहे की खोट्या भुलथापाना बळी पडू नका एवढंच सांगणं


मोहोळ मध्ये मला अनेकांनी साथ दिली, त्यातले अनेक जण आज उपस्थित आहेत 


मध्यंतरी पक्ष फुटले आणि कुठं ncp, शिवसेना यामध्ये गट पडले


पण शिवसेना, राष्ट्रवादी आपण आता एकत्रित आहोत


आपण सगळे मिळून राक्षशी शक्तीला घालऊयात 


 

Ajit Pawar meets Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर अजित पवार दाखल

राज्यातील काही जागाचा तिढा कायम असल्याने सागरवर खलबतं, देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर अजित पवार दाखल. प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार देखील सागरवर पोहोचले. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज मुंबईतल्या सर्व खासदार आमदार यांची बैठक बोलावली आहे त्या आधी ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

दिल्लीत मोठ्या घडामोडी! मनसे-भाजप युती होणार, राज ठाकरेंची अमित शाहांसोबत खलबतं

राज्याच्या महायुतीमध्ये आता मनसेचा समावेश होणार हे निश्चित झालं असून राज ठाकरे हे दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या भेटीला गेले आहेत. या भेटीमध्ये लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा होणार असून मनसेला एक किंवा दोन जागा मिळू शकतात 

BJP MNS Alliance : भाजप-मनसे युती होणार, राज ठाकरे थोड्याच वेळात अमित शाहांची भेट घेणार

राज्यातल्या महायुतीमध्ये मनसेचा समावेश होणार असून राज ठाकरे थोड्याच वेळात केंद्रीय मंत्री अमित शाहा यांना भेटणार आहेत. त्याआधी विनोद तावडे यानी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि चर्चा केली आहे. 


 

Wardha Lok Sabha : वर्ध्यातून लढण्यासाठी काँग्रेसच्या आमदाराला शरद पवारांची ऑफर

महाविकास आघाडीत वर्धा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहण्यासाठी काँग्रेस नेते आग्रही आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडून तुतारी चिन्हावर लढण्याची ऑफर अमर काळे यांना आली आहे. आज सकाळी सिल्व्हर ओकवर शरद पवार यांची भेट झाली तर काल सायंकाळी  राष्ट्रवादी चे नेते जयंत पाटील यांनी माजी आमदार अमर काळे यांना बोलवून घेतले होते. त्यांची दोन्ही नेत्यांशी चर्चा झाली आहे.  आर्वीचे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लढण्याची ऑफर दिल्या गेली आहे. परंतु हा मतदारसंघ काँग्रेसला सुटावा अशी अपेक्षा असणाऱ्या अमर काळे यांनी शरद पवार यांना दोन दिवसांचा वेळ मागवून घेतला आहे. कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

Beed Lok Sabha Election : पंकजा मुंडेच्या विरोधात शरद पवार गटाकडून बजरंग बप्पा सोनवणे निवडणूक लढवण्याची शक्यता

महाविकास आघाडीचा बीडचा उमेदवार ठरला?


बजरंग बप्पा सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिन्हावर बीड लोकसभा लढण्याची शक्यता.


उद्या पुण्यात शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत बजरंग बप्पा सोनवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार आहे. 

Miraj : मिरजेत व्हेल माशाची 19 कोटी रुपये किमतीची उलटी जप्त, तिघांना अटक

मिरजेमध्ये व्हेल माशाची 19 कोटी रुपयांची उलटी जप्त करण्यात आली असून या प्रकरणी कोल्हापूर, मालवण परिसरातील तिघांना अटक करण्यात आली आहे. 


 

New Parliament : छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा गांधींचे पुतळे नव्या संसदेच्या परिसरात बसवणार

जुन्या संसदेसमोरील महापुरूषांचे पुतळे नवीन संसदेसमोर बसवले जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, बिरसा मुंडा, महाराणी प्रताप, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचे पुतळे नवीन संसदेत बसवले जाणार आहेत. हे सर्व पुतळे संसदेच्या गेट नंबर पाच जवळ बसवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उर्वरित महापुरूषांची पुतळे जैसे थे ठेवले जाणार आहेत. सध्या संसद संकुलात नवीन संसद, जुनी संसद, संसद ग्रंथालय इमारत आणि विस्तारात इमारतींचा समावेश आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.