Wardha Crime : वर्ध्याच्या स्टेशनफैल परिसरात युवकाने प्रियसीला विहिरीत ढकलल्याची घटना घडलीय. सावंगी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावातून प्रियसीला गाडीवर घेऊन युवक वर्ध्याच्या स्टेशन फैल परिसरात आला. यावेळी दोघेही एका विहिरीजवळ उभे असताना दोघात वाद झाला, अचानक या शाब्दिक वादादरम्यान युवकाने तरुणीला विहिरीत ढकलले. तरुणीच्या ओरडण्याने परिसरातील नागरिक धावून आले आणि तिला कसेबसे विहिरीच्या बाहेर काढलेय. तरुणी बचावली असून तिला सावंगी रुग्णलयात दाखल करण्यात आले आहेय. युवकाकडून तरुणीवर अत्याचार करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अत्याचार करण्यात आला असल्याची माहिती आहे. 


प्रियकराने विहिरीत ढकलले, मैत्रिणीने आरडा ओरडा करत प्राण वाचवले


वर्ध्याच्या स्टेशन फैलात राहणारा जुबेर पठाण  सावंगी हद्दीतील परिसरातील तरुणीशी प्रेम करीत होता. सहा महिन्यापूर्वी इन्स्टाग्रामवर या दोघांची ओळख झाली होती. तो तरुणीला भेटायला गेला, यावेळी त्याने तरुणीला जबरदस्तीने गाडीवर बसविले, सोबत तरुणीची  मैत्रीण देखील होती, तिघंही गाडीवर बसून वर्ध्याच्या स्टेशन फैल भागात आले. या दरम्यान येथे असलेल्या एका विहिरीजवळ दोघे बोलत होते, तर मैत्रीण लांब उभी होती. अचानक दोघात शाब्दिक वाद झाला आणि अचानक जुबेर पठाण याने तरुणीला विहिरीत ढकलले. सोबत असलेल्या मैत्रिणीचे लक्ष जाताच तिने आरडा ओरड केली. परिसरातील नागरिक धावले, आणि विहिरीत ढकललेल्या तरुणीला बाहेर काढलंय. पोलिसांनी आरोपी जुबेर पठाण याला अटक केली आहेय. त्याच्यावर अपहरण, अत्याचार व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


नववर्षाच्या पहिल्या दिवशी प्रियसीवर अत्याचार 


युवकाने प्रियसीला विहिरीत ढकलले मात्र, मैत्रिणीच्या समयसुचकतेने वाचले तरुणीचे प्राण वाचवले आहेत..तरुणीच्या मैत्रिणीने आरडाओरड करताच नागरिक विहिरीकडे धावले. आणि त्यांनी तरुणीचे प्राण वाचवले आहेत. नववर्षाच्या पहिल्या दिवशी प्रियसीवर अत्याचार करण्यात आले तर दुसऱ्या दिवशी विहिरीत ढकलल्याचा धक्कादायक प्रकार वर्ध्यात घडलाय. 




इतर महत्त्वाच्या बातम्या 


Beed Crime : वाल्मिक कराडला सोयी सुविधा, बाहेरच्या लोकांना भेटायला मुभा; संतोष देशमुखांच्या भावालाही अरेरावी ; एपीआय दराडेंवर धनंजय देशमुखांचे गंभीर आरोप


Pune Crime News: प्लॉटिंगच्या समोर लघुशंका करताना हटकलं; उलट्या खोपडीच्या तरुणांकडून दगडफेक अन् गोळीबार, सुरक्षारक्षकाच्या पत्नीचा मृत्यू