Maharashtra News LIVE Updates : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा फक्त एका क्लिकवर..

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Feb 2024 03:12 PM
Waris Pathan : वारीस पठाण यांना दहिसर चेक नाक्यावर अडविण्यात आलं, तीव्र शब्दात नाराजी

Waris Pathan : मिरा भाईंदर शहरात आज दुपारी एम आय एम चे नेते वारीस पठाण येणार असल्याने त्यांना शहरात न येऊ देता दहिसर चेक नका येथे अडवण्यात आलं. त्यांना मिरा भाईंदर हद्दीत प्रवेश न दिल्याने त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडून आपला विरोध केला. वारीस पठाण याना अखेर दहिसर चेक नाका येथून  त्यांच्याच गाडीत बसवून पोलीस बंदोबस्तात दहिसर पोलीस ठाणे येथे घेवून जाण्यात आले आहे. वारीस पठाण यांनी यावेळी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तल्याच्या मार्फत यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Amravati  : अमरावतीच्या पंचवटी चौकात एका तरुणाने स्वतःवर पेट्रोल टाकून जाळून घेतलं..

Amravati  : अमरावतीच्या पंचवटी चौकात एका तरुणाने स्वतःवर पेट्रोल टाकून जाळून घेतलं.


नागरिकांच्या सतर्कतेने या तरुणाचे प्राण वाचले असून सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे..


युवक 60 टक्के जळल्याची डॉक्टरांची माहिती..


प्रविण देशमुख, (वय 35) लक्ष्मी नगर अमरावती अस जाळून घेतलेल्या तरुणाचं नाव असल्याची प्राथमिक माहिती...


तरुणावर सध्या अमरावती जिल्हा सामन्य रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील तपास पोलिस करत आहे...


स्वतःला युवकाने का जाळून घेतल याच कारण अद्याप कळू शकल नाही...

Pune : पुण्यात पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न.

Pune : पुण्यात पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न..


महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न..


मात्र महिला घरात पळून गेल्याने घटना टळली..


पार्किंगच्या वादातून हा संपूर्ण प्रकार घडला..


दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने हा संपूर्ण प्रकार केलाय..


चंदन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खराडी परिसरात घडली घटना..


चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल..

Pune : पुण्यात PMPL च्या बस खरेदी विरोधात मनसे आक्रमक

Pune : पुणे महानगर परिवहन महामंडळ म्हणजेच PMPL 12 मीटर लांबीच्या 400 CNG  बसेस खरेदी करणार आहे त्यासाठी PMPL ने निविदा देखील प्रसिद्ध केली आहे मात्र या बस खरेदीला मनसेने आक्षेप घेतला आहे. CNG बस खरेदीमुळे 350 कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचा आरोप देखील मनसेकडून करण्यात आला आहे .CNG ऐवजी इलेक्ट्रिक बस खरेदी कराव्यात अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.या बस खरेदी विरोधात ही खरेदी रद्द करण्यात यावी यासाठी मनसेकडून पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार आणि CAG कडे तक्रार देखील दाखल केली आहे.

Nashik : नाशिक खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा अपघात, गाडीला मोठे नुकसान

Nashik : नाशिक खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा अपघात. 
राजधानी दिल्लीतील बी डी मार्गावर झाला अपघात 
हेमंत गोडसे वाचले.
गाडीला मोठे नुकसान..

Raj Thackeray : राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल, म्हणाले, 'शिक्षकांनी निवडणुकीचं काम करु नये कोण कारवाई करतं बघतोच'

Raj Thackeray : शिक्षकांना निवडणुकीच्या कामात जुंपण्यावरुन राज ठाकरे आक्रमक. 


शिक्षक निवडणुकीच्या काळात कामं करण्यासाठी आहेत का? 


निवडणूक आयोग पाच वर्षे काय करत असतो, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 


आतापासून निवडणूक आयोगाने शिक्षकांना सांगितले आहे, रुजू व्हा. 


पुढील तीन महिने शिक्षक त्यांना हवेत, हे शिक्षक कशासाठी हवेत? 


मी दादरच्या शारदाश्रम शाळेतील शिक्षकांना सांगितले आहे की, तुम्ही निवडणुकीच्या कामासाठी रुजू होऊ नका. 


तुमच्यावर कोण काय कारवाई करते, ते मी पाहतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले


 


 

Pune : पुण्यातील बार, पब्स, रेस्टॉरंट यांना पुणे पोलीस पाठवणार नोटीस

Pune : पुण्यातील बार, पब्स, रेस्टॉरंट यांना पुणे पोलीस पाठवणार नोटीस


कलम 144 अंतर्गत एक नोटीस बजावणार


पुण्यातील बार, पब्स जर रात्री 1.30 नंतर सुरू ठेवल्यास कठोर कारवाई होणार 


पुणे पोलीस ठेवणार रु्फ टॉप हॉटेल्सवर करडी नजर


पुण्यात सर्व हुक्का पार्लर बंद


पब्स, रेस्टॉरंट मध्ये हुक्का सेवन आणि विक्री करण्यास कठोर कारवाई केली जाणार

Supriya Sule : पुणे, नागपूर, ठाणे या तिन्ही ठिकाणी गुन्हेगारी वाढली, गृहमंत्रालयाचे हे अपयश

Supriya Sule : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थाबद्दल मी अनेक वेळा बोलली आहे, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया


-मी अमित शहा यांच्याशी सुद्धा सांगितलं आहे 


-पुणे, नागपूर आणि ठाणे या तिन्ही ठिकाणी गुन्हेगारी वाढली आहे


- गृहमंत्रालयाचे हे अपयश आहे


-मी राजीनामा मागितला की माझ्यावर टीका केली जाते


-गृहमंत्री देवेंद्र जी यांच्याकडे आल्यापासून गुन्हेगारी वाढली आहे 


-देशाच्या गृहमंत्री अमित शहा यांना विनंती की गृहमंत्रालयाचे ऑडिट करा

Breaking : मनसेला महायुतीत घेण्यासाठी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा, सूत्रांची माहिती 

Breaking : मनसेला महायुतीत घेण्यासाठी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा, सूत्रांची माहिती 


केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन शेलार ठाकरेंच्या भेटीला गेल्याची सूत्रांची माहिती


मुंबईतील लोकसभा जागांसाठी भाजपचे *नो रिस्क धोरण*


मुंबईतल्या लोकसभेच्या सर्व 6 जागा जिंकण्यासाठी भाजपची रणनिती

Manoj Jarange : सगेसोयरे बाबत मराठा आमदारांनी आवाज उठवावा, नाहीतर त्यांना मराठा विरोधी समजल जाईल

Manoj Jarange : आंदोलनामुळे मागसवर्गीय आयोगाचं अहवाल आला..


पुढील आंदोलनाची दिशा अधिवेशन झाल्यावर ठरवू.


आमदार यांना विनंती आहे, सर्वांनी उद्या अधिवेशनात आवाज उठवावा आणि ओबीसी मधून आरक्षण पाहिजे अशी मागणी मराठा आमदारांनी अधिवेशनात मांडाव..


सगेसोयरे बाबत मराठा आमदारांनी आवाज उठवावा, नाहीतर त्यांना मराठा विरोधी समजल जाईल


स्वतंत्र आरक्षण हा श्रीमंतांचा हट्ट आहे. सरकार गोरगरिबांचे ऐकत नाही. त्या आरक्षणसाठी आम्हीच न्याय देण्याचं काम केलं. 


ज्याच्या नोंदी सापडल्या त्यांना सर्टिफिकेट द्या, ज्यांचा सापडणार नाही त्यांना सगेसोयरेचा कायदा आहे

Manoj Jarange : कोट्यवधी मराठा लोकांना 50 टक्क्यांच्या आत ओबीसीतून आरक्षण हवंय - मनोज जरांगे

 Manoj Jarange - मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया


- ओबीसीला धक्का लागत नाही, आम्ही ओबीसीमध्ये आहोत, त्यांना सगेसोयरेची अंमलबजावणी करावी लागेल


- 4 महिन्यांचा वेळ सगेसोयरेच्या अंमबजावणीसाठी दिलं आहे. हरकती रात्रीतून पाहता येतील त्या फार नाहीत.


 - उद्या जो कायदा होईल त्याचा आनंद व्यक्त केला जाईल. शे-दोनशे लोकांना ते आरक्षण लागतं,


 -कोट्यवधी मराठा लोकांना 50 टक्क्यांच्या आत ओबीसीतूनआरक्षण हवं आहे.


- 20 ला लक्षात येईल हे सगेसोयरे याची अंमबजावणी करतील की नाही

Mumbai : मुंबईतील अंधेरी लोखंडवाला भागातील इमारतीत आग,अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल

Mumbai : मुंबईतील अंधेरी लोखंडवाला भागात असलेल्या आकाशदीप नावाच्या इमारतीत आग लागली.


आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली.


या आगीच्या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही, आग कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Supriya Sule : केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Supriya Sule : सुप्रिया सुळे - शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा.


याठिकाणी असणाऱ्या पुतळा स्थापनेला 4 वर्षानी 100 वर्ष होणार आहेत, त्यावेळी आपण मोठा कार्यक्रम करूया


ही मूर्ती नाही तर एक विचार आहे


आयुष्यात सर्वांना संघर्ष करावा लागत आहे


काल आपल्याला आनंदाची बातमी मिळाली, कांदा निर्यात बंदी मागे घ्यावी लागली, आपल्या प्रयत्नांना यश मिळालं


केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे


दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहे. आपण झुकणार नाही, आपण झुकणारे नाहीत


ही लढाई वैयक्तीक नाही, ही लढाई विचारांची आहे


आता स्वनिमानाची लढाई आहे, कामाला लागा


तुमचे आशीर्वाद असेच कायम रहातील

Chandrapur : अधिकृत राज्यशस्त्र म्हणून दांडपट्ट्याची आज होणार घोषणा

Chandrapur : अधिकृत राज्यशस्त्र म्हणून दांडपट्ट्याची आज होणार घोषणा, आज संध्याकाळी आग्रा येथे होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना दांडपट्ट्याचा अध्यादेश सुपूर्द करणार आणि दांडपट्टा हे राज्यशस्त्र घोषित होणार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चंद्रपुरात घोषणा, दांडपट्टा हा मराठा सैन्याचं वैशिष्ट्यपूर्ण शस्त्र आहे आणि त्याचं महत्त्व अधोरेखित होण्यासाठी दांडपट्टा होणार राज्यशस्त्र, छत्रपती शिवाजी चौकात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करत सुधीर मुनगंटीवार यांची महत्त्वाची घोषणा

Pune : पुण्यातील वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू

Pune : पुण्यातील वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू


पुण्यात सुरू होते रोहिदास जाधव या तरुणावर उपचार


काही दिवसांपूर्वी रोहिदास ने ज्वलनशील पदार्थ टाकून स्वतःला पेटवून घेतलं होतं


दिलेल्या तक्रारीत पोलिस योग्य ती कारवाई करत नसल्याने पोलिसांचे नाव घेत या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता


लोणी कंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या वाघोली पोलीस चौकी समोर त्याने स्वतःवर डिझेल टाकून पेटवून आत्महत्येचा प्रयत्न केला होता


तेव्हाच तो 90 टक्के भाजलेला असून त्याच्यावर सूर्या हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झाला


या संपूर्ण प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेत लोणी कंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस  निरीक्षक यांची तडफडकी बदली केली होती


याच प्रकरणी 2 पोलीस कर्मचारी निलंबित झाले होते..

Sambhaji Raje : सरकारला आरक्षणासाठी थोडा वेळ द्यायला हवा, संभाजी राजेंची प्रतिक्रिया

Sambhaji Raje : संभाजी राजेंची प्रतिक्रिया


सरकारला आरक्षणासाठी थोडा वेळ द्यायला हवा


मी मागासवर्गीय आयोगासाठी 2 वर्षांपासून मागे लागलो आहे


उशीर झाला आहे पण सरकारने केलं आहे


पण हे कोर्टात टिकणार कसं यावर विचार केला पाहिजे


फक्त कायदा परित होऊन काही होणार नाही

Pune : पुण्यात तब्बल 4 कोटी रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांकडून जप्त 

Pune : पुण्यात तब्बल 4 कोटी रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांकडून जप्त 


पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली कारवाई


पुणे पोलिसांनी केले तब्बल 4 कोटी रुपयांचे एम डी ड्रग्स जप्त


ड्रग्स तस्करांविरोधात पुणे पोलिसांची मोठी कारवाई ड्रग्स तस्करांचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस


पोलिसांकडून 3 ड्रग्स तस्करांना पोलिसांनी केली अटक

Sindhudurg : शिवराजेश्वर मंदिरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी, मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित

Sindhudurg : महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव शिवराजेश्वर मंदिरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करणार आली. मालवण मधील सिंधुदुर्ग किल्ल्यावर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेत शिवजयंती साजरी केली, यावेळी मोठ्या संख्येने शिव भक्त उपस्थित होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने पर्यटक देखील सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देत आहेत.

Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसलेंनी सातारा लोकसभा निवडणूक लढण्याची जाहीर केली इच्छा

Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा निवडणूक लढण्याची जाहीर केली इच्छा ...


नरेंद्र मोदी यांच्या कामाचे केले तोंड भरून केले कौतुक 


कोणत्याही समाजाची व्यक्ती असो जो आर्थिक मागास आहे, त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे.


असे मत देखील उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.

Jalgaon : जळगावात शिवजयंती निमित्त भव्य शोभा यात्रा

Jalgaon : शिवजयंती निमित्ताने जळगाव शहरामध्ये आज शिव जयंती उत्सव समितीतर्फे भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर फेर धरल्याचे पाहायला मिळाले आहे

Pune : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवमहोत्सव सोहळ्याला शरद पवार, सुप्रिया सुळेंची उपस्थिती

Pune : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवमहोत्सव सोहळ्याला शरद पवार, सुप्रिया सुळेंची उपस्थिती


शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला शरद पवार घालणार पुष्पहार


आदर्श माता-पिता पुरस्कार तसेच शिव सन्मान पुरस्कारकत्याना शरद पवार  यांच्या हस्ते करण्यात येणार सन्मानित.


शिवाजीनगर येथील एस एस पी एम एस  येथे होत आहे सोहळा

Sanjay Pande : ओठांवर छत्रपती आणि पोटात औरंगजेब हीच उद्धव ठाकरेंची नीती, भाजप नेते संजय पांडेंचा उद्वव ठाकरेंवर निशाणा

Sanjay Pande : ओठांवर छत्रपती आणि पोटात औरंगजेब हीच उद्धव ठाकरेंची नीती


भाजप नेते संजय पांडे यांचा उद्वव ठाकरेंवर निशाणा


सत्तेसाठी औरंजेबाच्या कबरीवर फुल वाहणार्यांच्या मांडीवर जाऊन बसले 


अडीच वर्षे महाविकास आघाडीचं सरकार होतं शिवजयंती साजरी करणाऱ्यावर बंदी घालण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. 


राजकारणासाठी औरंजगेबाच्या कबरीवर माथा टेकणाऱ्यांच्या मांडीवर जावून बसले.


छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःच्या राजकारणासाठी महाराष्ट्रापुरतं मर्यादित केलं. हे आता देशाला कळलय


छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं भाजप नेते संजय पांडे यांची उद्धव ठाकरेंवर खरमरीत टिका

Eknath Shinde : छत्रपती म्हणजे नियतीला पडलेले सुंदर स्वप्न!

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदें शिवजयंती निमित्त म्हणाले,
-शिवछत्रपती जेवढे धार्मिक तेवढेच विज्ञाननिष्ठ होते.
-महाराजांनी धर्म किंवा पंथ यांचा विचार न करता स्वराज्य स्थापन केले. 
-छत्रपती म्हणजे नियतीला पडलेले सुंदर स्वप्न. 
-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नौदलाच्या झेंड्यावर शिवाजी महाराजांचे शिल्प लावले. 
-आम्ही जमेल तेवढे छत्रपति शिवाजी महाराजांबद्दल करत असतो. 
-युनोस्कोमधे अकरा गड किल्ल्यांची नोंद झाली ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट. 
-मुनगंटीवार यांनी दांडपट्टा हा राज्याचा खेळ म्हणून जाहीर केलाय.

Devendra Fadnavis : पुरातत्व विभागाच्या कामांच्या पद्धतीमुळेच गड किल्यांच्या विकासाला अडथळा येतो

 
Devendra Fadnavis : शिवाजी महाराजांनी अन्यायाच्या विरोधात लढायला शिकवले. अन्याय करणारा कितीही मोठा असो देश आणि धर्मासाठी लढणारा जिंकतो. 
-शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधात लढायला शिकवले. 
-आम्हीही शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून राज्यकारभार करण्याचा प्रयत्न करतोय. 
-पुरातत्व विभागाच्या कामांच्या पद्धतीमुळेच गड किल्यांच्या विकासाला अडथळा येतो. मात्र यामधे बदल करण्यात आलाय.

Sindhudurg : सिंधुदुर्गात दाट धुकं पसरल्याने आंबा, काजू उत्पादक शेतकरी चिंतेत

Sindhudurg : सिंधुदुर्गात सर्वत्र दाट धुकं पसरल्याने जिल्यातील आंबा, काजू उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. दाट धुकं हे आंबा आणि काजू साठी मारक आहे, कारण धुक्यातून जे दवबिंदू आंबा, काजुवर येतात. त्यामुळे कीड रोगांचा प्रादुर्भाव होणार आहे. आधीच बदलत्या वातावरणामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत, त्यात आता धुकं पडत असल्याने बागायतदार अडचणीत सापडले आहेत. मात्र दाट धुकं आणि थंडी पडत असल्याने नागरिकांना मात्र हा सुखद अनुभव आहे.

Ajit Pawar : महायुती सरकार गड किल्ल्यांसाठी काम करतेय, अजित पवारांचे वक्तव्य

Ajit Pawar : शिवाजी महाराज म्हणजे सर्वांना एकत्र घेऊन जाणारा विचार. सर्व जाती, धर्मांना एकत्र करून गुलामगिरीच्या विरोधात लढले पाहिजे हे शिवाजी महाराजांनी लोकांच्या मनावर बिंबवले. 
-महायुती सरकार गड किल्ल्यांसाठी काम करतेय. 
-गडासाठी 83 कोटी खर्च करण्यात आलेत. 
-याबरोबरच इतर गड किल्ल्यांच्या जिर्णोद्धार करण्याचे काम करण्याची सुचना मला मुख्यमंत्र्यांनी केलेय.
-या भागातील आदिवासी समाजाला हीरडा पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळावी.

Shivneri : अटल सेतू वरून एसटीची " शिवनेरी " धावणार

Shivneri : शिवडी ते नाव्हाशेवा दरम्यान बांधण्यात आलेल्या नव्या " अटल सेतू "वरून एसटीची शिवनेरी बस सुरू करण्यात आली असून प्रायोगिक तत्त्वावर उद्या दिनांक २० फेब्रुवारीपासून पुणे स्टेशन -मंत्रालय(सकाळी ६.३०) व  स्वारगेट- दादर (७.००) या दोन मार्गावर शिवनेरी बस सुरू करण्यात येत आहेत. या बसेस पुणे येथून निघून थेट पनवेल नाव्हाशेवा, शिवडी मार्गे मंत्रालय/दादर येथे पोहोचतील. परत ११ वाजता याचमार्गे अनुक्रमे मंत्रालय व दादर येथून निघतील. यामुळे गर्दीच्या वेळी प्रवासाचा सुमारे १ तास वाचणार आहे. तिकट दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरी प्रवाशांनी या बस फेऱ्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. या बस फेऱ्या अर्थात, एसटीच्या अधिकृत msrtc mobile reservation ॲप वर व www.msrtc.gov.in संकेतस्थळावर  आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. 

Rohit Pawar : पोलीस यंत्रणाही गुंडांना संरक्षण देत असतील तर हे सुसंस्कृत पुण्याला शोभणारं नाही, रोहित पवारांची पोस्ट

Rohit Pawar : रोहित पवारांनी सोशल मीडीयावर पोस्ट केलीय, ते म्हणाले, 'आपल्या पक्षातील नेते व पदाधिकारी वारंवार सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठात धुडघुस घालत असताना पोलीस काहीही कारवाई का करत नाहीत? दुसरीकडं अन्यायाविरोधात जाब विचारणाऱ्यांवर मात्र गुन्हे दाखल करून पोलिस नेमके कोणाचे आदेश पाळत आहेत? पुणे विद्यापीठ हे जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र आहे, याचा विसर आपल्या कार्यकर्त्यांना पडला आहेच मात्र पोलीस यंत्रणाही विद्यापीठात एका विशिष्ट विचारधारेच्या गुंडांना संरक्षण देत असतील तर हे सुसंस्कृत पुण्याला शोभणारं नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांवर दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल.'

Raigad : शिवनेरी गडावर सोडलं जात नसल्यानं शिवभक्तांमध्ये नाराजी

Raigad : शिवनेरी गडावर सोडलं जात नसल्यानं शिवभक्तांमध्ये नाराजी, मराठा आरक्षण मिळावं आणि मनोज जरांगेंना ऊर्जा मिळावी म्हणून साकडं घपणार. 

Sports : विदर्भाचा माजी कर्णधार फैज फैजलने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे घोषणा

Sports : विदर्भाचा माजी कर्णधार फैज फैजलने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे घोषणा केली 


 फैज फैजलच्या कर्णधार पदाखाली विदर्भ क्रिकेट संघाने 2017 आणि 2018 असे सलग दोन वर्षे रणजी करंडक जिंकला होता 


 फैज फैजलने विदर्भासाठी 108 सामन्यांमध्ये 7693 धावा केल्या आहेत 


सध्या विसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या हरयाणाविरुद्धचा रणजी सामना फैज च्या कारकीर्दीतील शेवटचा सामना ठरणार आहे

Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार एकसंघ असून येत्या दोन-तीन दिवसात जागा वाटपाचा अंतिम निर्णय पूर्ण होणार

Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षातील बड्या नेत्या बाबत येणाऱ्या बातम्या केवळ अफवा आहेत


प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची 'एबीपी माझा'ला माहिती


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार एकसंघ असून येत्या दोन-तीन दिवसात जागा वाटपाचा अंतिम निर्णय पूर्ण होणार असल्याची पाटील यांची माहिती


लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केवळ विरोधकांबाबत संभ्रम करण्याचा प्रयत्न असल्याची पाटील यांची सत्ताधारी गटावर टीका

Weather Update : देशात पुन्हा थंडीचा जोर वाढणार? कुठे वादळी वाऱ्यासह पाऊस, तर कुठे गारपिटीची शक्यता

Weather Update : येत्या तीन ते चार दिवसांत हवामानात बदल पाहायला मिळणार


राज्यासह देशात ऐन हिवाळ्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली


जोरदार वारे वाहतील. पाऊस पडेल आणि गाराही पडतील.


त्याचा परिणाम दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये दिसून येत आहे. 

Sangali : सांगलीतील एका डॉक्टरला सीआयडी चौकशीची भीती घालत 19 लाखाची फसवणूक

Sangali : सांगलीतील एका डॉक्टरला सीआयडी चौकशीची भीती घालत 19 लाखाची फसवणूक


शिराळा तालुक्यातील आंबेवाडीत आर्थिक वादातून दोन गटात हाणामारी, दोन्ही गटातील चौघांवर गुन्हे दाखल


सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवजयंतीचा उत्साह, विविध ठिकाणी मर्दानी खेळांचे आयोजन


सांगलीतील जुना बुधगाव रस्त्यावर तरसाचे दर्शन,

Satara : अजिंक्यताऱ्यावर दोन्ही राजेंच्या वतीने मशाल महोत्सव आणि दिव्यांचा उत्सव

Satara : छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला किल्ले अजिंक्यताऱ्यावर दोन्ही राजेंच्या वतीने मशाल महोत्सव आणि दिव्यांचा उत्सव साजरा करण्यात आला. उशीरा झालेल्या या दोन्ही कार्यक्रमाला साताराकरांनी मोठी गर्दी केली होती. मशाली आणि दिव्यांच्या प्रकाशाने संपर्ण किल्ला उजळून निघाला होता. आज हेलिकॅप्टर मधून साताऱ्यातील शिवतिर्थावरील छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेवरही पुष्पवृष्टी केली जाणार आहे.

London : लंडन मध्ये शिवजयंती उत्साहात, मार्बल आर्च परिसरात शिवजयंती निमित्त रॅली, भारतीय विद्यार्थ्यांकडून अभिवादन

London : लंडन मध्ये शिवजयंती उत्साहात


लंडन मधील मार्बल आर्च परिसरात शिवजयंती निमित्त रॅली.


छत्रपती शिवाजी महाराज युथ असोसिएशनचच्या वतींने डबल ट्री बाय हिल्टन हॉटेल मधील सभागृहात भारतीय विद्यार्थ्यांकडून अभिवादन.


भारताबाहेर देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह सुरू आहे,


लंडनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली,


छत्रपती शिवाजी महाराज युथ असोसिएशनचच्या वतींने लंडन मधील 'डबल ट्री बाय  हिल्टन मार्बल आर्च' हॉटेल मधील सभागृहात हा जयंती उत्सव पार पडला


यावेळी शिवप्रतिमेच पूजन करून या विद्यार्थ्यांनी अभिवादन केलं, 


यापूर्वी लंडन शहरातील मार्बल आर्च परिसरात शिवरायांच्या जयंती निमित्त एक रॅली देखील काढण्यात आली


या रॅलीत शंभरहुन अधिक शिवप्रेमीं  सहभागी झाले होते.

Nagpur : नागपूरच्या महाल भागात शिवजयंती उत्सव सुरू

Nagpur : शिवजयंती उत्सव संपूर्ण राज्यात साजरा केला जात आहे. नागपूरच्या महाल भागात राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात शिवजयंती उत्सव सुरू झाला. सकाळी 6 वाजता दुग्धाभिषेक सोहळ्याने शिव जयंती उत्सवाला सुरवात झाली. हा सोहळा बघाल शेकडो नागपूरकरांनी देखील गर्दी केली.

Nagpur : नागपूरच्या महाल भागात शिवजयंती उत्सव सुरू

Nagpur : शिवजयंती उत्सव संपूर्ण राज्यात साजरा केला जात आहे. नागपूरच्या महाल भागात राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात शिवजयंती उत्सव सुरू झाला. सकाळी 6 वाजता दुग्धाभिषेक सोहळ्याने शिव जयंती उत्सवाला सुरवात झाली. हा सोहळा बघाल शेकडो नागपूरकरांनी देखील गर्दी केली.

राज्यातील गणवेश योजनेच्या कापड खरेदीचे टेंडर रद्द करा, सपा आमदार रईस शेख यांची मागणी

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून 40 लाख 60 हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेसाठी कापड खरेदीबाबत शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्यावतीने 138 कोटी रुपयांचे नुकतेच टेंडर काढले आहे.


या टेंडरमध्ये गुजरात व राजस्थानच्या कापड उत्पादकांना अनुकूल अशा अटी- शर्ती टाकण्यात आल्या आहेत, असा आरोप समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी केला आहे.

Amravati : अमरावतीत शिवजयंती निमित्त प्रहार संघटनेच्या वतीने भव्य शिव-भीम दौड स्पर्धा

Amravati : अमरावतीत शिवजयंती निमित्त प्रहार संघटनेच्या वतीने भव्य शिव-भीम दौड स्पर्धा


यावेळी आमदार बच्चू कडू आणि पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी स्वतः उपस्थित...


शिव-भीम दौड स्पर्धेत शेकडो युवक - युवती सहभागी...

Raigad : छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरीत शिवभक्तांची मांदीयाळी

Raigad : छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी नटलेली आहे. गडाच्या पायथ्याला शिवभक्त जमू लागलेत. काही शिवभक्त शिवज्योत घेऊन आपापल्या गावी मार्गस्थ होतायेत. 

Bhandara : विद्युत करंटनं दोन अस्वलांचा मृत्यू, आरोपींच्या शोधात वन विभागाची पथके गठीत

Bhandara : वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेल्या विद्युत प्रवाहांच्या तारांमध्ये अडकून दोन अस्वलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक रविवारी दुपारी उघडकीस आली. ही घटना लाखनी वनपरिक्षेत्रातील रामपुरी नियतक्षेत्रात घडली. मृतक दोन्ही अस्वल हे नर प्रजातीची असून सुमारे 05 वर्षांचे असल्याची माहिती लाखनी वनपरिक्षेत्राधिकारी एस. पी. गोखले यांनी दिली. याप्रकरणी वन विभागागे वन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आता आरोपींचा शोध घेण्यासाठी वन विभागाचे दोन पथक गठीत केले आहे. शनिवारी लेंडेझरी वनपरिक्षेत्रात दोन बिबट्यांच्या झुंजीत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती, तर आता दोन अस्वल शिकऱ्यांच्या जाळ्यात फसल्यानं मृत पावलेत.

Hingoli : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक रोषणाई

Hingoli : शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे पुतळा परिसरामध्ये लावण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण पुतळा परिसर उजळून निघाला आहे हीच डोळ्याची पारणे फेडणारी दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी ड्रोन च्या साह्यायाने टिपले आहेत. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली होती त्यामुळे हिंगोलीचा शिवाजी महाराज पुतळा परिसर उजळून निघाला होता

Nanded : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रात्री 12 वाजता आतिषबाजी 

Nanded : रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्ताने नांदेड मध्ये मोठया उत्साहात रात्री 12 वाजता  फटाक्यांची आतिषबाजी करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याला रोषणाई करण्यात आली फटक्याचा आतिषबाजी आणि आकर्षक रोषणाई मुळे परिसर संपूर्ण दुमदुमून गेला

Amravati : अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपूलावर आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसण्याची शक्यता

Amravati : अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपूलावर आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसण्याची शक्यता


काल एकाच दिवसात राजापेठ उड्डाणपूलावर परकोटाचा ओटा तयार करण्यात आला..


आजच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात येणार असल्याची शहरात जोरदार चर्चा... 


राणा दाम्पत्याच्या कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उड्डाणपूलावर बसणार असल्याची माहिती...


रात्रभरापासून राजापेठ उड्डाणपूलावर पोलीसांचा तगडा बंदोबस्त.... दंगल नियंत्रण पथकही तैनात..

Solapur : सोलापुरात मध्यरात्री 12 वाजता छत्रपती शिवरायांचा पाळणा सोहळा पार

Solapur : सोलापुरात मध्यरात्री 12 वाजता छत्रपती शिवरायांचा पाळणा सोहळा पार पडला. "झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजींचा,चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा….!  या सुमंगल पाळणा गीताने अवघे आसमंत दुमदुमले होते. हजारो महिला शिवभक्तांच्या उपस्थितीत नेत्रदीपक असा हा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी माँसाहेब जिजाऊ यांचे वंशज शिवाजीराजे जाधवर, संगीताराजे जाधवर तसेच सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज शितलताई मालुसरे, रायबा मालुसरे हे देखील हा सोहळा अनुभवण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. उपस्थित वंशज, वीर माता, वीर पत्नी यांच्या हस्ते पाळणा सोहळा पार पडला. फटाक्यांची आतीशबाजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोशाणे आसमंत दुमदुमून गेले होते.

Eknath Shinde : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तलवारीचे टोक पाकिस्तानकडे

Eknath Shinde : छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय..


छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत..


मी मुख्यमंत्री म्हणून देखील भाग्यवान आहे आणि आपले सरकार म्हणून भाग्यवान आहे की 350 वा राज्याभिषेक सोहळा रायगड माझ्या वतीने होणार..


छत्रपती शिवाजी महाराजांचा एक धर्माधिकारी उल्लेख आपण करतो..


छत्रपती शिवाजी महाराज यांनी गडकोट किल्ले बांधले..


आग्राला जिथे दिवाण-ए-आम या सभाग्रहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजां बरोबर दुष्ट औरंगजेबने ज्या पद्धतीने वागला,


त्या दिवाण-ए-आम मध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज संध्याकाळी आपण साजरी करत आहे


गेल्या महिन्यात भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा केला आहे.


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तलवारीचे टोक पाकिस्तानकडे आहे त्यामुळे पाकिस्तानचे डोळे उघडून बघण्याचे हिम्मत होणार नाही

Shiv Jayanti 2024 : मुंबईच्या चेंबूरमध्ये मध्यरात्री शिवजयंती साजरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याला माल्यार्पण

Shiv Jayanti 2024 : मुंबईच्या चेंबूर मध्ये मध्यरात्री शिवजयंती साजरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याला माल्यार्पण


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती महाराजांच्या पुतळ्याला माल्यारपण..


मोठे संख्येनी शिवप्रेमी शिवजयंती साजरा करण्यासाठी उपस्थित..


चेंबूर येथील शिवरायांच्या पुतळा आणि स्थळचा होणार पुनर्बांधणी..


पुनर्बांधणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.