Maharashtra News LIVE Updates : मोठी बातमी! दोन दिवसात आचारसंहिता लागतील, मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Mar 2024 07:01 PM
Lok Sabha Election 2024 : मोठी बातमी! दोन दिवसात आचारसंहिता लागतील, मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

Ravindra Chavan News : दोन दिवसात सर्व आचारसंहिता लागतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. सर्वच्या सर्व गोष्टी मी सांगितल्या तर आपण याकडे निवडणुकीचा भाग म्हणून पाहाल, आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विकास निधीचा पाढा वाचला.

Chandrapur News : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली जखमी, चंद्रपूरच्या बल्लारपूर जवळील घटना

Chandrapur Leopead Attack : चंद्रपूर : बल्लारपूर शहराच्या सीमावर्ती भागात असलेल्या दीनदयाल वार्डात बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय चिमुकली गंभीर जखमी, अंगणात खेळत असलेल्या साफिया इकबाल शेख या चिमुकलीवर बिबट्याने अचानक  केला हल्ला, सोबत खेळत असलेल्या तिच्या बहिणीने घराकडे धूम ठोकून आपल्या काकांना ही माहिती सांगितली. यानंतर काका अन्वर शेख यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला हुसकावून लावत त्याच्या तावडीतून साफियाला सोडविले, आधी बल्लारपूर रुग्णालय आणि नंतर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. दीनदयाल वार्डातील बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

Nagpur Fire : वनखात्याच्या अंबाझरी जैवविविधता उद्यानात वणवा

Nagpur News : नागपुरात वनखात्याच्या अखत्यारितील अंबाझरी जैवविविधता उद्यान मोठी आग लागली आहे. कालपासून जैवविविधता उद्यानात गवताळ भागात आग धूमसत असून आज दुपारच्या सुमारास आगीने रौद्र रूप धारण करत मोठा भाग व्यापला आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या सहकार्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असून अजून ही आग नियंत्रणात आलेली नाही. 


दरम्यान कालपासून लागलेल्या आगीत आतापर्यंत जैवविविधता उद्यानातील किती एकरावरील गवताळ भागाचा आणि झाडांचा नुकसान झाला आहे हे स्पष्ट नाही. जैवविविधता उद्यानात मोठ्या मोठ्या प्रमाणावर पक्षीही असून जमिनीवर घरटी बांधणाऱ्या पक्षांचा या आगीमध्ये मोठं नुकसान झालं असावं अशी शक्यता आहे.

Nashik Lok Sabha: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार नाशिक दौऱ्यावर; माजी महापौर दशरथ पाटील शरद पवारांच्या भेटीला

Nashik Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. शरद पवार तसंच संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे. त्यातच माजी महापौर दशरथ पाटील हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत.

Maharashtra Politics : काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची गुप्त भेट

Maharashtra Politics : काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची गुप्त भेट घेतली. ही मैत्रीपूर्ण भेट होती, राजकीय अर्थ काढू नका, असं दोन्ही नेत्यांनी म्हटलं. मात्र संजय निरुपम आणि अशोक चव्हाणांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. 

Mumbai : मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नामांतरावरून राजकारण रंगणार, ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून श्रेय घेण्याचे प्रयत्न

Mumbai : मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नामांतरावरून राजकारण रंगणार...


ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून श्रेय घेण्याचे प्रयत्न सुरु


2017 साली खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून मागणी केली होती


खासदार अरविंद सावंत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री राजनाथ सिंह यांना लिहिलेली पत्र समोर आणली आहेत तसेच संसदेत याच विषयी केलेला पाठपुराव्याचा व्हिडिओ देखील शेयर करण्यात आला आहे


अनेक वर्षांपासून मुंबईतील ब्रिटिश कालीन रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा प्रश्न उपस्थित केला जात होता

Eknath Shinde : प्रत्येक शासकीय कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे बंधनकारक, मुख्यमंत्र्यांची पोस्ट व्हायरल

Eknath Shinde : प्रत्येक शासकीय कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे बंधनकारक


एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे...! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पोस्ट व्हायरल


 आई एक नाव असतं... घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं... कवी फ.मु. शिंदे यांच्या कवितेच्या ओळींमधून आईची महती आपल्याला समजते. 


आपल्याला जन्म देण्यापासून आपल्याला मोठे करण्यात ज्या माऊलीचा सिंहाचा वाटा असतो


 तिला तिचं श्रेय देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 


यापुढे प्रत्येक शासकीय कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. 


असं या पोस्टमध्ये लिहण्यात आलंय.


 




 

Padmakar Valvi Congress Leader: एकीकडे राहुल गांधी महाराष्ट्रात असताना काँग्रेसला मोठा धक्का

Padmakar Valvi Congress Leader: एकीकडे राहुल गांधी महाराष्ट्रात असताना काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. माजी मंत्री पद्माकर वळवी काँग्रेसला रामराम करणार आहेत. पद्माकर वळवींचा आज सकाळी 10 वाजत भाजपात प्रवेश होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होईल.

Rahul Gandhi Sabha At Shivaji Park Mumbai : राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा दुसरा दिवस

Rahul Gandhi Sabha At Shivaji Park Mumbai : राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झालीय. या यात्रेचा दुसरा दिवस आहे. आज धुळे आणि मालेगावचा टप्पा पार करण्यात येणार आहे. मालेगावत दुपारी 3 वाजता राहुल यांचा रोड शो होणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात चौक सभा देखील पार पडणार आहे. त्यानंतर मालेगावजवळच्या सौंदाणे गावात जातील आणि तिथं मुक्काम करतील.

Gujarat News : गुजरातच्या किनाऱ्याजवळ 6 पाकिस्तानींना अटक


Gujarat News : गुजरातच्या पोरबंदरजवळ 450 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. बोटीवरील सहा पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. एनसीबी, गुजरात एटीएस आणि कोस्ट गार्डनं ही संयुक्त कारवाई केली आहे. मंगळवारी रात्री ही बोट भारताच्या समुद्री हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत असताना ही कारवाई करण्यात आली. गेल्या महिनाभरात गुजरातच्या किनाऱ्यावर ही दुसरी मोठी कारवाई आहे. 28 फेब्रुवारीला 2 हजार कोटींचे तीन हजार तीनशे किलोे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. 


पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Rahul Gandhi Sabha at Shivaji Park : ठाकरेंच्या होमग्राऊंडवर राहुल गांधींची सभा; 17 मार्चला शिवाजी पार्कवर भारत जोडो न्याय यात्रेचा भव्य समारोप


Rahul Gandhi Sabha At Shivaji Park Mumbai : मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याया यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) महाराष्ट्रात (Maharashtra News) दाखल झाली असून येत्या 17 मार्चला या यात्रेचा समारोप होणार आहे. काँग्रेसच्या (Congress) भव्य यात्रेचा समारोप मुंबईत (Mumbai News) शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) भव्य सभेनं होणार आहे. 


17 मार्च रोजी राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या त्यांच्या सभेनं होणार आहे. खरंतर शिवाजी पार्क मैदान आणि शिवसेना (Shiv Sena) किंवा मग ठाकरे (Uddhav Thackeray) हे एक वेगळं नातं शिवसेना पक्ष स्थापनेपासून आहे. शिवाजी पार्क मैदान एकप्रकारे ठाकरेंच्या सभेसाठीचा एक होम ग्राउंड मानलं जातं. आता याच ठाकरेंच्या होम ग्राउंडवर गांधींची सभा होणार आहे. आणि या सभेसाठी इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आणि बड्या नेत्यांना काँग्रेसकडून निमंत्रण देण्यात आलं आहे.


तुमचं राजकीय अस्तित्व धोक्यात; मनोज जरांगेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा


Manoj Jarange On Devendra Fadnavis : मराठ्यांची लोकसंख्या कमी दाखवली जातेय, असा आरोप मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सत्तेचा वापर करुन पुन्हा काही केलं, तर एकत्र यावं लागेल, असं थेट आव्हानंही मनोज जरांगेंनी मराठा बांधवांना केलं आहे. 


मंगळवारी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. बैठक झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारच्या भूमिकेमुळे समाज एकवटला आहे. त्यांना आता सुट्टी देणार नाही. तसेच, येत्या काळात आंदोलन आणखी तीव्र करणार असा इशाराही यावेळी मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.