Maharashtra News LIVE Updates : मोठी बातमी! दोन दिवसात आचारसंहिता लागतील, मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE

Background
Lok Sabha Election 2024 : मोठी बातमी! दोन दिवसात आचारसंहिता लागतील, मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती
Ravindra Chavan News : दोन दिवसात सर्व आचारसंहिता लागतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. सर्वच्या सर्व गोष्टी मी सांगितल्या तर आपण याकडे निवडणुकीचा भाग म्हणून पाहाल, आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विकास निधीचा पाढा वाचला.
Chandrapur News : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली जखमी, चंद्रपूरच्या बल्लारपूर जवळील घटना
Chandrapur Leopead Attack : चंद्रपूर : बल्लारपूर शहराच्या सीमावर्ती भागात असलेल्या दीनदयाल वार्डात बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय चिमुकली गंभीर जखमी, अंगणात खेळत असलेल्या साफिया इकबाल शेख या चिमुकलीवर बिबट्याने अचानक केला हल्ला, सोबत खेळत असलेल्या तिच्या बहिणीने घराकडे धूम ठोकून आपल्या काकांना ही माहिती सांगितली. यानंतर काका अन्वर शेख यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला हुसकावून लावत त्याच्या तावडीतून साफियाला सोडविले, आधी बल्लारपूर रुग्णालय आणि नंतर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. दीनदयाल वार्डातील बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
Nagpur Fire : वनखात्याच्या अंबाझरी जैवविविधता उद्यानात वणवा
Nagpur News : नागपुरात वनखात्याच्या अखत्यारितील अंबाझरी जैवविविधता उद्यान मोठी आग लागली आहे. कालपासून जैवविविधता उद्यानात गवताळ भागात आग धूमसत असून आज दुपारच्या सुमारास आगीने रौद्र रूप धारण करत मोठा भाग व्यापला आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या सहकार्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असून अजून ही आग नियंत्रणात आलेली नाही.
दरम्यान कालपासून लागलेल्या आगीत आतापर्यंत जैवविविधता उद्यानातील किती एकरावरील गवताळ भागाचा आणि झाडांचा नुकसान झाला आहे हे स्पष्ट नाही. जैवविविधता उद्यानात मोठ्या मोठ्या प्रमाणावर पक्षीही असून जमिनीवर घरटी बांधणाऱ्या पक्षांचा या आगीमध्ये मोठं नुकसान झालं असावं अशी शक्यता आहे.
Nashik Lok Sabha: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार नाशिक दौऱ्यावर; माजी महापौर दशरथ पाटील शरद पवारांच्या भेटीला
Nashik Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. शरद पवार तसंच संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे. त्यातच माजी महापौर दशरथ पाटील हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत.
Maharashtra Politics : काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची गुप्त भेट
Maharashtra Politics : काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची गुप्त भेट घेतली. ही मैत्रीपूर्ण भेट होती, राजकीय अर्थ काढू नका, असं दोन्ही नेत्यांनी म्हटलं. मात्र संजय निरुपम आणि अशोक चव्हाणांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
