Maharashtra Live Update: दहा वर्षात काय केलं? भाजप उमेदवार अनुप धोत्रेंना करावा लागला गावकऱ्यांच्या रोषाचा सामना
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
...तर तुम्हाला चार-पाच पेले कोमट पाणी प्यायची वेळ येईल; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर येथील सभेत भाजपवर जोरदार टीका केली. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज मी उद्धव ठाकरे यांचे भाषण मोबाईलवर ऐकले. त्यात ते म्हणाले अडीच वर्षात आम्ही काय काम केलं, ते ऐकायचे असेल तर एका मंचावर या. उद्धवजी अडीच वर्ष तुम्ही नुसतं फेसबुक लाईव्ह करत होते आणि कोमट पाणी प्या असे म्हणत होते. उपराजधानी नागपूरला सुद्धा तुम्ही आले नाही. तुम्ही आमच्याशी विकासावर चर्चा करू नका. जर आम्ही नुसतं गडकरींनी केलेल्या विकास कामांची यादी सांगितली, तर तुम्हाला चार-पाच पेले कोमट पाणी प्यायची वेळ येईल. त्यामुळे तुम्ही नुसते टोमणे मारत बसा. टोमणे मारल्यामुळे तुम्हाला मत तर मिळणार नाही. मात्र तुमच्या मनाचा समाधान नक्कीच होईल, अशी टीका त्यांनी केली आहे.
गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू
शेतात गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्याने झालेल्या घटनेत चार शेळ्यांसह शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना पैठण तालुक्यातील टाकळी अंबड येथे घडली. सुधाकर धोडीराम पाचे असे वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
शरद पवारांना चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर; म्हणाल्या...
शरद पवारांनी लेक व सुनेत फरक केला. 40 वर्षे पवार कुटुंबात वावरणाऱ्या सुनेबाबत भेदभाव करण्यात आला. बारामतीचा निकाल हा पवारांच्या सुनेच्याच बाजूने लागणार आहे. मराठवाड्यातल्या पाटलाची लेक पवारांना परकी वाटू लागली, असे प्रत्युत्तर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी शरद पवारांना दिले आहे.
'मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमचीही भूमिका, पण...', नेमकं काय म्हणाले प्रकाश शेंडगे?
ओबीसी बहुजन पार्टी या पक्षाचा जन्मच आरक्षणाच्या लढाईतून झाला आहे. ही भावना असली तरी मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची सुद्धा भूमिका आहे. पण, ते आरक्षण 50 टक्केच्यावर द्यावं. आम्हाला आमचं आरक्षण वाचवायचं असेल तर, आमची सत्ता आल्यानंतर प्रत्येक जी आर पाहावं लागेल. बेरोजगार, शेतकरी हे मुद्दे सुद्धा आहेतच, अशी प्रतिक्रिया प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे.
माढा लोकसभेसाठी ओबीसी बहुजन पार्टीकडून लक्ष्मण हाके यांना उमेदवारी जाहीर
प्रकाश शेंडगे, अध्यक्ष, ओबीसी बहुजन पार्टी
लक्ष्मण हाके यांना माढा लोकसभा मतदारसंघातून ओबीसी बहुजन पार्टीकडून उमेदवारी मिळाली आहे. प्रकाश शेंडगे यांनी माहिती दिली आहे.
माढ्यात प्रस्थापित विरुद्ध विस्तापित अशी ही लढत असोल
राज्य मागासवर्गीय आयोगावर हाके सदस्य होते
हाके यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली नाही मात्र अवाका मोठा आहे
शिवसेनेत प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाली होती मात्र त्यांची घुसमट होत होती
अशात आज ओबीसी बहुजन पार्टीतून त्यांनी उमेदवारी घेण्याची इच्छा व्यक्त केली
आज त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केलेला आहे
उद्धव ठाकरेंना त्यांनी मॅसेज देखील पाठवलेला आहे
लक्ष्मण हाकेंसाठी ही लढत मोठी नाही आहे, आम्ही त्यांचे स्वागत करतो