Maharashtra News LIVE Updates : भारतात ड्रग्सची तस्करी करणाऱ्या 6 पाकिस्तानींना अटक, 480 कोटींचे अंमली पदार्थ जप्त

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Mar 2024 08:08 PM
SBI Submitted Data to ECI : स्टेट बँक ऑफ इंडियाने माहिती निवडणूक आयोगाला सादर

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाने माहिती निवडणूक आयोगाला सादर केली आहे. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत माहिती सादर करण्याचे निर्देश एसबीआयला देण्यात आले होते. 





Gujrat Drugs Seized : भारतात ड्रग्सची तस्करी करणाऱ्या 6 पाकिस्तानींना अटक

Gujrat Crime News : भारतात ड्रग्सची तस्करी करणाऱ्या सहा पाकिस्तानी इसमांना समुद्रात अटक


गुजरात ATS, भारतीय तटरक्षक दल यांची संयुक्त कारवाई


एकूण 480 कोटींचे अंमली पदार्थ जप्त


ही कारवाई 11-12 मार्च रात्री करण्यात आली आहे


ताब्यात घेतलेल्यांना पोरबंदर ला आणले जाणार

Jalgaon Bus Accident : कन्नड घाटात बस वळणावर उतरली, अनेक जण जखमी 

Jalgaon Bus Accident : छत्रपती संभाजीनगर येथून मध्यप्रदेशातील सेंधवाकडे जाणारी बस कन्नड घाट उतरत असताना वळणावर दस्तुरी फाट्याजवळ घाटाच्या खाली उतरली. यात झालेल्या अपघातात जवळपास 20 च्या वर  मजूर प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. काही जखमींवर चाळीसगाव येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले तर सहा ते सात मजुरांना जबर मार लागल्याने त्यांना धुळे येथे नेण्यात आल्याचे समजते. या अपघातप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथून मध्यप्रदेश परिवहन मंडळाची बस मजुरांना घेऊन सेंधवाकडे जात असताना आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास बस घाटात वळण रस्त्यावर वळण घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खाली उतरली. बसमध्ये 37 प्रवासी होते. त्यातील 20 च्या वर मजुर प्रवाशांवर चाळीसगावात उपचार करण्यात आले तर 7 प्रवाशांना जास्त मार लागल्याने त्यांना धुळे येथे नेण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच शहर वाहतुक शाखा, महामार्ग पोलीसांसह वैद्यकीय पथकाने तात्काळ घटनास्थळ पोहचून मदत कार्य केले.रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अर्पिता पाटील, कैलास राठोड, आरोग्य सेवक नितीन तिरमली, अश्विनी बनसोडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मदत कार्य केेले. जखमींना रूग्णवाहीकेतून ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.

Bhandara News : लाखनी तहसील कार्यालयावर धडकला काँग्रेसचा मोर्चा....राज्य सरकारच्या विरोधात दिल्यात घोषणा....

Bhandara Congress Morcha : राज्यातील महायुती आणि केंद्रातील भाजपच्या सरकारनं शेतकरी, शेतमजूर आणि बेरोजगारांना दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही. अशात महागाई वाढत चालली असून बेरोजगारांची संख्याही वाढत आहेत. कृषी पंपांना 24 तास वीजपुरवठा करण्याचे दिलेलं आश्वासनही हवेत विरलं असून आता लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप सरकार जुमालेबाजी करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. लाखनी तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात शेकडो शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार सहभागी झाले होते.  

Latur News : न्यायालयाच्या आवारात कोयता घेऊन फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Latur Crime News : निलंगा येथील न्यायालयाच्या आवारात कोयता घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अविनाश बालाजी कांबळे असं ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. दोन हातात दोन कोयते घेऊन निलंगा कोर्टाच्या आवारात हा तरूण दहशत निर्माण करत फिरत होता. त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली, पोलिसांनी या तरुणाला आता ताब्यात घेतलं आहे आणि त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.


 

Rahul Gandhi LIVE Updates : राहुल गांधींचा मोदी सरकारवर जोरदार निशाणा

Bharat Jodo Nyay Yatra Live : मोदी सरकारवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले की, हळूहळू जंगल आणि जमिनी या अदानीला सरकार देत आहे. आता जमिनी राहिल्या नाहीत. तुम्हाला भिक मागायला हे सरकार लावत आहे. मोदींनी आदिवसीचं एक रुपये कर्ज माफ केलं नाही. उद्योगपतींना कर्ज माफ केलं. 16 लाख करोड माफ केले.  मनरेगाचे 24 वर्षाचे बजेट केवळ 22 लोकांवर खर्च केले. 

Rahul Gandhi On PM Modi : उद्योगपतींचं 16 लाख रुपयांचं कर्ज मोदींनी माफ केलं, राहुल गांधीचा गंभीर आरोप

Rahul Gandhi LIVE : पंतप्रधान मोदींनी उद्योगपतींचं कर्ज माफ केलं आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. उद्योगपतींचं 16 लाख रुपयांचं कर्ज मोदींनी माफ केलं, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला आहे.

Rahul Gandhi : आम्ही तुम्हाला आदिवासी म्हणतोय, भाजप वनवासी म्हणते : राहुल गांधी

राहुल गांधी यावेळी म्हणाले की, भारताची जी संपत्ती आहे, त्याचे ओरिजनल मालक तुम्ही आहेत. आदिवासी या शब्दसोबत जंगल, पाणी जोडले गेले आहे, म्हणून आम्ही तुम्हाला आदिवासी म्हणतोय आणि भाजप वनवासी म्हणते आहे. आधार कार्ड आदिवासी भागातून का प्रोजेक्ट केले. कारण तुम्ही या ठिकाणचे ओरिजनल मालक आहेत. 

Bharat Jodo Yatra : आदिवासी देशाचे खरे मालक : राहुल गांधी

Rahul Gandhi in Nandurbar : 'आदिवासी आणि वनवासी या शब्दातील फरक तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही आदिवासी आहेत का वनवासी, तुम्हाला आदिवासी म्हणजे काय माहित आहे का. आदिवासी शब्दाचा अर्थ देशाचे ओरिजनल मालक आहेत. ज्यावेळी देशात कोणीच नव्हते त्यावेळी आदिवासी होते', असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Rahul Gandhi Live : राहुल गांधी लाईव्ह, काँग्रेसची भारत जोडो यात्रा नंदुरबारमध्ये

Rahul Gandhi Live : नंदुरबारमध्ये राहुल गांधी लाईव्ह बोलत आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा नंदुरबारमध्ये पोहोचली आहे. येथे राहुल गांधींचं जनसंबोधन सुरु आहे.


Nandurbar : राहुल गांधी नंदूरबार मध्ये येताच भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का! पद्माकर वळवी भाजपच्या वाटेवर? 

Nandurbar : राहुल गांधी नंदूरबार मध्ये येताच भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का


नंदुरबारचे माजी पालकमंत्री पद्माकर वळवी भाजपच्या वाटेवर? 


पद्माकर वळवी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला

Mumbai : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा भाग कोसळून चार जखमी, जखमींपैकी तिघांचा मृत्यू 

Mumbai : मुंबईच्या बोरिवली पश्चिमेकडील एका निर्माणाधीन इमारतीचा सोळाव्या मजल्यावरील मचान कोसळून दुर्घटना घडली आहे. यात चार जण जखमी झाले असून त्यांना बोरिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र जखमींपैकी तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आता पुढे आली आहे. बोरिवली पश्चिमेकडील कल्पना चावला चौकातील सोनी वाडी येथे 24 मजली इमारतीचे बांधकाम सुरू असून बांधकाम करण्यासाठी उभारण्यात आलेले लोखंडी मचान कोसळून ही दुर्घटना घडली आहे दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

Latur Accident : ट्रॅक्टरने तिघांना चिरडले,दोन ठार एक गंभीर, अंबुलगा मेन गावाजवळील दुर्दैवी घटना

Latur Accident : ऊस भरून निघालेला ट्रॅक्टर आणि मोटरसायकलच्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. ही घटना लातूर जिल्ह्यातील अंबुलगा मेन या गावाजवळ झाली आहे.निलंगा ते राठोडा लातूर या जिल्हा मार्गावर हा भीषण अपघात घडला आहे. गंभीर त्या जखमी असलेल्या तरुणाला लातूर येथे हलवण्यात आला आहे.



एकाच हेडला दोन ट्रॉल्या जोडलेल्या उसाचा ट्रॅक्टर या रस्त्यावरून जात असताना दुचाकीन जोरदार धडक दिली आहे. दुचाकी वरील तीन जणांपैकी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात गोविंद पांडुरंग कांबळे वय 45 वर्ष राहणार राठोडा आणि दिनकर रावसाहेब तोंडवळे वय ४६ राहणार आंबुलगा मेन यांचा जागीच मृत्यू झाला आहे. गोविंद मारुती गायकवाड वय 25 वर्ष हा तरुण गंभीर जखमी असल्याने यास लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

Washim : समृद्धी महामार्गावर वाशिमच्या कारंजा जवळ टोल वसुली बंद

Washim : समृद्धी महामार्गावर वाशिमच्या कारंजा जवळ पुन्हा एक वेळा टोल कर्मचाऱ्यांना पगार नसल्याने टोल वसुली बंद करण्यात आली आहे.
 काल रात्रीपासून ही टोल वसुली बंद असल्याचं सांगितले जात आहे गेल्या काही दिवसा अगोदरच या टोल कर्मचाऱ्यांनी आपलं काम आंदोलन केलं होतं मात्र दोन दिवसात तोडगा कडून असा निर्णय झाल्यानंतर परत टोल कर्मचाऱ्यांनी आपलं काम चालू केलं होतं मात्र दोन दिवसानंतर ही कुठलाच पगार न झाल्याने परत काल रात्री पासून एक वेळा टोल वसुली बंद करून आंदोलन सुरू केलंय या आंदोलनात आता मनसेने उडी घेतली असून कर्मचाऱ्यांना जोपर्यंत पगार होत नाही तोपर्यंत टोल नाका सुरू करणार नाही अशी भूमिका मनसेने घेतली असून या सर्व कर्मचाऱ्यांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उतरले आहेत

Washim : समृद्धी महामार्गावर वाशिमच्या कारंजा जवळ टोल वसुली बंद

Washim : समृद्धी महामार्गावर वाशिमच्या कारंजा जवळ पुन्हा एक वेळा टोल कर्मचाऱ्यांना पगार नसल्याने टोल वसुली बंद करण्यात आली आहे.
 काल रात्रीपासून ही टोल वसुली बंद असल्याचं सांगितले जात आहे गेल्या काही दिवसा अगोदरच या टोल कर्मचाऱ्यांनी आपलं काम आंदोलन केलं होतं मात्र दोन दिवसात तोडगा कडून असा निर्णय झाल्यानंतर परत टोल कर्मचाऱ्यांनी आपलं काम चालू केलं होतं मात्र दोन दिवसानंतर ही कुठलाच पगार न झाल्याने परत काल रात्री पासून एक वेळा टोल वसुली बंद करून आंदोलन सुरू केलंय या आंदोलनात आता मनसेने उडी घेतली असून कर्मचाऱ्यांना जोपर्यंत पगार होत नाही तोपर्यंत टोल नाका सुरू करणार नाही अशी भूमिका मनसेने घेतली असून या सर्व कर्मचाऱ्यांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उतरले आहेत

Political news : मोदी सरकार हे टोप्या घालणारे सरकार, राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांचा भाजप सरकारवर जोरदार टीका

Political news : इलेक्ट्रोल बॉण्ड हा देशातला सर्वात मोठा घोटाळा


मोदी सरकार हे टोप्या घालणारे सरकार आहे


राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांचा भाजप सरकारवर जोरदार टीका

Yavatmal : उद्धव ठाकरे यांचा यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे जनसंवाद मेळावा

Yavatmal : उद्धव ठाकरे यांचा यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे जनसंवाद मेळावा


आज होणाऱ्या 2 जनसंवाद मेळाव्यापैकी ही पहिला मेळावा गांधी ले आउट मैदानावर होत आहे.. 


राळेगाव हे यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बहुल भाग असून ( राळेगाव विधानसभेतील आदिवासी राखीव मतदारसंघ आहे..) उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या दोन दिवसीय दौऱ्यात विशिष्ट पॉकेट्स वर लक्ष केंद्रित केले आहे.. आजचा पहिला मेळावा आदिवससी बहुल राळेगाव ला तर दुसरा मेळावा बंजारा समाज बहुल पुसद ला होणार आहे...

 Nandurbar : लोकसभा निवडणुकीचा सुरुवात आम्ही नंदुरबार मधून करतोय - नाना पटोले

 Nandurbar : लोकसभा निवडणुकीचा सुरुवात आम्ही नंदुरबार मधून करतोय - बाळासाहेब थोरात


  नंदुरबार इथूनच आम्ही सुरुवात करतो हा इतिहास आहे


 जागा वाटपा संदर्भात चर्चा सुरू आहे


 कोणतेही मतभेद आमच्यात नाहीत


 बाळासाहेब थोरात आम्ही सगळे चर्चा करून निर्णय घेऊ


 धानोरकरांनी आपली इच्छा व्यक्त केली आहे पक्षात अशा प्रकारे इच्छा व्यक्त केली जाते


 मात्र त्यांनी काही बद्दल स्टेटमेंट केले त्याबद्दल मी बोलणार नाही

Nana Patole : राहुल गांधी  स्वतः जातीने ब्राह्मण आहेत, राम मंदिरात नेहमी जातात - नाना पटोले

Nana Patole : राहुल गांधी  स्वतः जातीने ब्राह्मण आहेत, यांचं काय? - नाना पटोले


राम मंदिरात नेहमी जातात


यांनी तर मंदिर इथेच बनवणर सांगितलं मात्र कुठे बनवल


आम्ही नाशिकला  रस्त्यात त्रंबकेश्वर मंदिरात दर्शन घेऊ

Thane : मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानाबाहेर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची बॅनरबाजी

Thane : मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानाबाहेर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची बॅनरबाजी...


ठाणे शहरात मोठ्या  प्रमाणात राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय  यात्रेची  बॅनरबाजी...


काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली असून येत्या 16 तारखेला ही न्याय यात्रा ठाणे शहरात असणार आहे


दरम्यान याच पार्श्वभूमीवर ठाणे काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानाबाहेर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे पोस्टर लावण्यात आले आहे भारताचा ढाण्या वाघ ठाण्यात असा मजकूर लिहत राहुल गांधींचा एक फोटो या पोस्टरवर लावण्यात आला आहे. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हितेश पांचाळ यांनी..

Amravati : पांढरी खानमपूर येथे प्रवेशद्वाराचा वाद अजून पेटण्याची शक्यता

Amravati : पांढरी खानमपूर येथे प्रवेशद्वाराचा वाद अजून पेटण्याची शक्यता..


26 जानेवारी रोजी ग्रामसभेत घेतलेला प्रवेशद्वारचा ठराव हा सर्वानुमते रद्द करण्यात आला आहे...


आज विशेष ग्रामसभा बोलविण्यात आली ज्यामध्ये प्रवेशद्वार उभारण्याचं ठराव रद्द करण्यात आला...


ग्रामसभेला दुसऱ्या गटातील मोठ्या प्रमाणावर ग्रामवासी होते हजर..


कालच प्रवेशद्वार वरून अमरावती आयुक्त कार्यालयावर झाला होता राडा...

Kapil Patil : अशोक चव्हाण भाजपात आल्याने नांदेडची जागा एकतर्फी येईल, केंद्रीय मंत्री कपिल पाटलांचा विश्वास

Kapil Patil : केंद्रीय मंत्री कपिल पाटील आज विकसित भारत संकल्प पत्र अभियान अंतर्गत नांदेड दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत प्रगती करत आहे. केवळ भारतातच नाही तर विश्वामध्ये नरेंद्र मोदी यांनी भारताचा गौरव वाढविण्याचे काम केले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेलं अशोकराव चव्हाण भाजपात आल्याने नांदेडची लोकसभेची जागा एक हाती निवडून येईल असा विश्वास केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला.

Dharashiv : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या पुतळ्याचे उद्धव ठाकरे गटाकडून दहन

Dharashiv : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी परंडातील कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यावर कडक शब्दात टीका केल्याच्या निषेधार्थ... धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तानाजी सावंत यांचा पुतळा जाळून बोंब मारो आंदोलन करण्यात आले... तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी शब्दात केलेली टीका... आणि धाराशिव चे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा 100 बापाची अवलाद असा उल्लेख केल्याने संतापलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून आंदोलन करण्यात आले

Vijay Wadettiwar : प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर आमची मोहबत की दुकान सुरू - विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar : प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर आमची मोहबत की दुकान सुरू आहे. आमची गाडी सुसाट नाही - विजय वडेट्टीवार


प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण पाठवले जाईल.


आमची बोलणी सुरू आहेऱ् ना मी पत्र पूर्ण वाचलेले नाही. 


आमच्यात वादच नाही. काही गफलत होत आहे. आम्ही शिवाजी पार्कच्या रॅलीत सगळे एकत्रीत जात आहोत. यावरून समजा

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे वर्षा बंगल्यावर दाखल, रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेबाबत चर्चेची शक्यता

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे वर्षा बंगल्यावर दाखल


थोड्या वेळात मुख्यमंत्री वर्षावर येतील


रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेबाबत चर्चेची शक्यता

Congress : राहुल गांधी यांची सभा शिवतीर्थावर होणार, सुभाष देसाईंची माहिती

Congress : राहुल गांधी यांची सभा शिवतीर्थावर होणार आहे - सुभाष देसाई
                   


                 विराट सभा होणार आहे


                 शिवतिर्थवर एका शिवसेनेची एवढी मोठी सभा होते,


                 तर आता इंडिया आघाडीची सभा होणार आहे


                 ⁠ऐतिहासीक सभा होणार आहे

Congress : राहुल गांधी यांची सभा शिवतीर्थावर होणार, सुभाष देसाईंची माहिती

Congress : राहुल गांधी यांची सभा शिवतीर्थावर होणार आहे - सुभाष देसाई
                   


                 विराट सभा होणार आहे


                 शिवतिर्थवर एका शिवसेनेची एवढी मोठी सभा होते,


                 तर आता इंडीया आघाडीची सभा होणार आहे


                 ⁠ऐतिहासीक सभा होणार आहे

Haryana Politics : हरियाणात भाजप कसं वाचवणार सरकार? 

Haryana Politics : हरियाणात भाजप कसं वाचवणार सरकार? 


जेपीपीने पाठिंबा काढण्यापूर्वी मंत्रिमंडळाचा राजीनामा


'जेपीपी 'चे एकूण १० आमदार


भाजपचे आमदार एकूण ४१ आमदार


बहुमताचा आकडा ४६


भाजपच्या सरकारला सहा अपक्ष, जेपीपी व इंडियन नॅशनल लोक दल (१ आमदार) यांचा पाठिंबा होता


आता मनोहर लाल खट्टर यांनी राजीनामा दिल्यावर त्यांना लोकसभा लढायला सांगू शकतात अशी चर्चा आहे

Shirdi : लोकसभेचे विद्यमान खासदार लोखंडे यांच्या विरोधात शिंदे गटातच नाराजी

Shirdi : लोकसभेचे विद्यमान खासदार लोखंडे यांच्या विरोधात शिंदे गटातच नाराजी...
ऐन निवडणुकीच्या तोंडावर उत्तर नगर जिल्ह्यातील शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे...
विद्यमान खा.लोखंडे विश्वासात घेत नसल्याने नाराजी..
कोणतेही विकासकामे केले नसल्याने पदाधिकारीसह शेकडो कार्यकर्त्यांचे राजीनामे.
उमेदवार शिंदे गटाचा द्या मात्र लोखंडे नको...पदाधिकाऱ्यांची मागणी..
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटातील पक्षांतर्गत नाराजी चव्हाट्यावर..
शिर्डीच्या शिंदे गटाच्या संपर्क कार्यालयात पदाधिकारी यांची बैठक संपन्न...

Pandharpur : 15 मार्च पासून विठ्ठलाचे मंदिर गाभाऱ्यात काम सुरू होणार, या काळात फक्त मुखदर्शन घेता येणार

Pandharpur : 15 मार्च पासून विठ्ठलाचे मंदिर गाभाऱ्यात काम सुरू होणार ..


विठ्ठल मूर्तीवर अनब्रेकेबल काचेचे मूर्तीवर कवच टाकून काम होणार .. फक्त देवाचे नित्योपचार होणार ..



भाविकांचे पायावरील दर्शन 15 मार्चपासून किमान दीड महिन्यासाठी बंद होणार ..



रोज सकाळी 5 ते 11 पर्यंत फक्त मर्यादित काळात मुखदर्शन घेता येणार


 


मंदिर समिती बैठकीत जिल्हाधिकारी यांनी दिली माहिती

Sanjay Raut :  महविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा समाज माध्यमांवर होत नाही - संजय राऊत

Sanjay Raut :  महविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा समाज माध्यमांवर होत नाही


- आमच्यामधील कोणतीही चर्चा आम्ही समाज मध्यांनवर व्यक्त होत नाही

- मी काय खोटं बोललो हे प्रकाश आंबेडकरांनी सांगावं

- आम्हाला प्रकाश आंबेडकरांची साथ हवी आहे

-  आधी निवडणुका घ्या हिम्मत असेल तर 



- तुम्ही साध्या महानगरपालिकेच्या निवडणुका घेत नाही

Pune : पुण्यातील बावधन झ-यातील पाण्याबाबत हायकोर्टात याचिका

Pune : पुण्यातील बावधन झ-यातील पाण्याबाबत हायकोर्टात याचिका


पिण्याचं पाणी बांधकाम आणि औद्योगिक कामांसाठी वापरण्यास मनाई करा, याचिकेत मागणी


राज्य सरकार आणि पुणे महापालिकेला पाण्याचा अपव्यय टाळण्याकरता उपाययोजना सादर करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश


जलाशयाच्या 500 मी. च्या परिसरात असलेल्या खासगी विहीरींवर प्रतिबंध घालण्याची याचिकेत मागणी


मुळशीचं पाणी केवळ पिण्यासाठी राखीव असल्यानं पुणे महापालिकेनं त्याचा योग्य वापर करण्यावर भर देण्याची याचिकेत मागणी


शैलेंद्र पटेल यांची मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका

Prakash Ambedkar : जागा वाटपला वंचित कारणीभूत नाही - प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar : जागा वाटपला वंचित कारणीभूत नाही - प्रकाश आंबेडकर


10 जागेवरून मतभेद सुरू आहे.. 5 जागा अश्या आहे त्यावर तिन्ही पक्षात शेअरिंग होत नाही.. पाचही जण जागा मागत आहे..


संजय राऊत खोटं बोलत आहे.. त्यांचे भांडण संपत नाही तोपर्यंत वंचित सांगत आहे आधी तुमचं मिटवा...


काँग्रेस प्रभारी रमेश यांना मी पत्र लिहिलं आहे.. सगळी हकीकत मी लिहलं आहे.. 


आम्ही समजोता करायला तयार आहे पण त्यांच्याकडून अजून उत्तर आलेलं नाही.. आम्ही अपेक्षा करतो.. की महाविकास मध्ये आम्ही लढवावं...

Nagpur : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस मार्च विथ सेंट्रल फोर्स 

Nagpur : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सुरक्षा यंत्रणेच्या राखीव दल वेगवेगळ्या भागात तैनात व्हायला सुरवात झाली आहे. नागपूर मध्ये दाखल झालेल्या केंद्रीय सुरक्षा बलाने नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वात नागपूर संवेदनशील मानल्या जाणार मध्य नागपूर भागातील मोमीनपू, गोळीबार चौक, महाल भागात रूट मार्च केला.

Nandurbar : अशी असणार आदिवासी न्याय होळी.. पुढचे पाच वर्ष दरवर्षी ही नवसाची होळी पेटवली जाणार..

Nandurbar : अशी असणार आदिवासी न्याय होळी..


पुढचे पाच वर्ष दरवर्षी ही नवसाची होळी पेटवली जाणार..


आदिवासी बांधवांसाठी होळीचा सण आजपासून सुरुवात झाला आहे आणि म्हणूनच राहुल गांधी यांची भारत जोडून या यात्रा ज्यावेळी नंदुरबार मध्ये पोहोचेल त्यावेळी आदिवासी बांधव राहुल गांधी यांच्यासाठी होळी पेटवून हा होळीचा उत्सव साजरा करणार आहेत.. नंदुरबार शहरातील सीबी मैदानावर ही होळी पेटणार आहे

Prakash Ambedkar : वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर अमरावतीत, बैठकीनंतर भूमिका करणार स्पष्ट

Prakash Ambedkar : वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर अमरावतीत दाखल


काल आयुक्त कार्यालयावर झालेल्या लाठीचार्ज आणि दगडफेक प्रकरणी घेणार माहिती..


प्रकाश आंबेडकर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांच्या सोबत बैठक सुरू...


प्रकाश आंबेडकर जिल्हाधिकारी यांच्या सोबत बैठक झाल्यानंतर आपली भूमिका करणार स्पष्ट..


प्रकाश आंबेडकर अमरावतीत काल झालेल्या दगडफेकीवर अमरावतीत माध्यमांशी साधणार संवाद...

Sudhir Mungantiwar : सुनेत्रा पवार यांचं नाव आमच्या यादीत नाही, साधारण 2 दिवसात लोकसभेचे नावं जाहीर होतील - भाजप नेते सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar : साधारण 2 दिवसात लोकसभेचे नावं जाहीर होतील - भाजप नेते सुधीर मुनगंटीवार


स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह त्या बैठकीत होते, 25 जागांबद्दल सध्या चर्चा झाली आहे, बाकी निर्णय वरिष्ठ घेतील -


सुनेत्रा पवार यांचं नाव आमच्या यादीत नाही, ते राष्ट्रवादी च्या यादीत घोषित होईल


माझं नाव पक्षाने सुचवलं आहे, पक्ष आग्रह करतोय मात्र मी प्रयत्न करतोय की माझी तिकीट कापली गेली पाहिजे, पण वरच्यांची इच्छा आहे की मी दिल्लीत यावं पण मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की माझा राज्यात जास्त उपयोग होईल


शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कोण असावे हे आम्ही ठरवू शकत नाही, आम्ही उमेदवार तपासून घ्या, सर्व्हे करा इतकंच सांगू शकतो, उद्या ते पण भाजपचे उमेदवार निश्चित करतील, भाजप अशे प्रयत्न करत नाही

Lok Sabha Election : माढा लोकसभा मतदारसंघावर आता शेतकरी कामगार पक्षाचा दावा, आघाडीत नवीन पेच

Lok Sabha Election : माढा लोकसभा मतदारसंघावर आता शेतकरी कामगार पक्षाचा दावा, आघाडीत नवीन पेच 


माढा लोकसभा मतदार संघावर आता शेकाप ने दावा केल्याने आघाडी मध्ये पेच वाढण्याची शक्यता


सांगोला येथे शेकापने भव्य मेळावा घेत शक्तिप्रदर्शन


सांगोला तालुक्यासह माढा तालुक्यात शेकापची मोठी ताकद असून माढा, हातकणंगले हे दोन मतदारसंघ शेकापला मिळावेत


असा दावा भाई जयंत पाटील यांनी केला आहे.


यामुळे रासाप साठी मतदारसंघ सोडायची तयारी दर्शविणाऱ्या राष्ट्रवादीची गोची होणार.


 

Narendra Modi : 'कॉंग्रेसच्या काळात या गोष्टी रखडल्या, देशातला तरूण ठरवेल की त्याला काय निवडायचे आहे' - नरेंद्र मोदी

Narendra Modi : 'कॉंग्रेसच्या काळात या गोष्टी रखडल्या, देशातला तरूण ठरवेल की त्याला काय निवडायचे आहे' - नरेंद्र मोदी


वंदे भारतला खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे, 200 जिल्हपर्यंत ती येवून पोहचलाय,


रेल्वेला आधुनिक करत राहण्याचा आमचा प्रयत्न आहे.


हे विकासकार्य देशनिर्माणासाठी आहे. हीच मोदीची गॅरेंटी आहे.


मालगाडीसाठी वेगळ्या ट्रक असाव्या अशी मागणी होती. प्रवासी आणि माल वाहतुक दोन्ही गोष्टी वेगात झाल्या असत्या. 


पण कॉंग्रेसच्या काळात या गोष्टी रखडल्या. 


मालगाडीची स्पीड वाढून दुपट्ट झाली आहे.

Narendra Modi : भारतीय रेल्वेला मोठे करण्यासाठी जी इच्छाशक्ती हवी, ती आमच्या सरकारमध्ये आहे


Narendra Modi : 11 लाख कोट्यवधींच्या योजना आम्ही सुरू केल्या आहे. गेल्या काही दिवसात 7 लाख कोटीचा योजना सुरू केल्या आहे. 


85 हजार कोटी रुपयांचे प्रकल्पाचे भुमिपूजन आम्ही करत आहोत. विकासाचा दर मला कमी होऊ द्यायचा नाही.


आज गुजरात आणि महाराष्ट्रात सुद्धा आम्ही योजना सुरू करत आहोत. वोकल फॅार लोकल योजना सुरू करून स्थानिकांना प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
भारतीय रेल्वेला मोठे करण्यासाठी इच्छा शक्ती हवी जी आमच्या सरकारमध्ये आहे. आपल्या इन्फ्रास्ट्रकचर मध्ये खूप वाढ झाली. येत्या काळात तुम्हाला दिसले की त्यात अजून किती युधारणा होते. 

Pune Metro : पुणेकरांसाठी बातमी! चांदणी चौक ते वाघोली मेट्रो प्रवास करता येणार

Pune Metro : वनाज ते रामवाडी या मार्गिकेची विस्तारीत मार्गिका वनाज ते चांदणी चौक 
रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) या प्रकल्पांना मान्यता दिली 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मेट्रो मार्गिकेसाठी
राज्य सरकारच्या माध्यमातून सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता.

Bharat Jodo Yatra : आज राहुल गांधीसाठी नवसाची होळी पेटणार - काँग्रेस आमदार के सी पाडवी

Bharat Jodo Yatra : आज राहुल गांधीसाठी नवसाची होळी पेटणार - काँग्रेस आमदार के सी पाडवी


भाजपने आदिवासींच्या राष्ट्रपतींना बाहुले म्हणून ठेवले..


2014 आणि 2019 च्या निवडणुकीच्या वेळी दुर्दैवाने गांधी घराण्यातील कोणी नेता येऊ शकला नाही म्हणून त्याचा परिणाम असा झाला..


मात्र सुदैवाने आता 2024 च्या निवडणुका आहेत म्हणून निश्चितपणे यावेळेसचा परिणाम वेगळा होईल...


नेहरू पासून नंदुरबार जिल्ह्याचा काँग्रेस सोबत जिव्हाळ्याचा संबंध राहिलाय..


आणीबाणी नंतरची पहिली सभा इंदिरा गांधी यांनी नंदुरबार जिल्ह्यात घेतली होती..


काँग्रेसचे सूत्र हाती घेतल्यानंतर सोनिया गांधी यांनी सुद्धा पहिली सभा नंदुरबार मध्येच घेतली होती..


काँग्रेसच्या सत्तेच्या काळात देशातील आधार कार्डचा शुभारंभ हा नंदुरबार शहरातून पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्या उपस्थितीमध्ये झाला होता..


आदिवासी बांधवांचा आणि काँग्रेस घराण्याचं जिव्हाळ्याचं नातं आहे

Nashik : गिरीश महाजन, श्रीकांत शिंदे आज नाशिक दौऱ्यावर, अचानक ठरलेला नाशिक दौराही चर्चेचा विषय

Nashik : स्वामी शांतिगिरी महाराज यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने नाशिकचे राजकीय वातावरण तापलेले असतांनाच आज भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन तसेच शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे नाशिक दौऱ्यावर आहेत. गिरीश महाजन जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 12 वाजता आगामी कुंभमेळ्याबाबत आढावा बैठक घेणार असून त्यानंतर स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटी गाठी घेणार आहेत तर श्रीकांत शिंदे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून दुपारी पेठ आणि सुरगाणा तालुक्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन ते करणार आहेत

Mangalvedha : मंगळवेढ्यातील कायम दुष्काळी 24 गावांचे ग्रामस्थ घेणार कर्नाटक मुख्यमंत्र्यांची भेट, शिंदे फडणवीस सरकारवर नामुष्कीची वेळ 

Mangalvedha : कायम दुष्काळी असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांनी अलमट्टीच्या पाण्यासाठी कर्नाटक मध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर गुरुवारी  कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी थेट भेटीची वेळ दिल्याने उद्या या गावातील ग्रामस्थ २४ गाड्या घेऊन बेंगळुरूकडे रवाना  होणार आहेत. यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी खळबळ उडाली असून शिंदे फडणवीस सरकारसाठी हा धक्का मानला जातोय . गुरुवारी  बेंगळुरू येथे मुख्यमंत्री कार्यालयात या 24 गावातील प्रतिनिधींची भेट घेणार आहेत .

Amravati - अमरावतीच्या उमेदवाराबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर निर्णय होणार 

Amravati - अमरावतीच्या उमेदवाराबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर निर्णय होणार 


विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र वैधतेविषयी सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली असून आगामी काही दिवसात न्यायालय निकाल देणार आहे 


विश्वसनीय सूत्रांची माहिती


 

Nashik : जय बाबाजी भक्त परिवाराकडून हेमंत गोडसेंचा एक व्हिडिओ पोस्ट

Nashik : जय बाबाजी भक्त परिवाराकडून हेमंत गोडसेंचा एक व्हिडिओ पोस्ट


स्वामी शांतिगिरी महाराजांनी नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा


त्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले


शांतिगिरी महाराजांना महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता


शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी देखील पुन्हा लोकसभा लढवण्याची तयारी केलीय


जय बाबाजी भक्त परिवाराकडून गोडसेंचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला

Jalna : जालन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशात विविध रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन होणार

Jalna : जालन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशात विविध रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे, जालना येथील दिनेगाव येथील 182 हेक्टर वरती उभारण्यात येणाऱ्या ड्रायपोर्ट तथा मल्टी मॉडल लॉजेस्टिक पार्क च्या पाहिल्या फेज चे देखील पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होईल, जालना येथील या लॉजेस्टिक पार्क चे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण होईल.

Kolhapur Politics : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून सरप्राईज उमेदवार?

Kolhapur Politics : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून सरप्राईज उमेदवार?


उमेदवारीसाठी संजय पाटील यड्रावकर यांच्या नावावर मुंबईत चर्चा


संजय पाटील यड्रावकर हे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू


संजय पाटील यड्रावकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे म्हणून ओळख


संजय पाटील यड्रावकर यांचं नाव अचानक चर्चेत आल्यान अनेकांच्या भुवया उंचावल्या


विद्यमान धैर्यशील माने यांच्या बद्दल नाराजीचा सूर असल्यान आयत्या वेळी नव्या नावांवर चर्चा


जातीय समीकरण लक्षात घेत संजय पाटील यड्रावकर यांच्या नावावर खल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशभरात अनेक ठिकाणी विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन करणार!

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी आयोजित कार्यक्रमांमध्ये 85,000 कोटींहून अधिक किमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन/समर्पण करतील आणि 10 वंदे भारत ट्रेन्सला हिरवा झेंडा दाखवतील.  


यामध्ये वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल्सचे उद्घाटन/समर्पण, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, सोलर पॅनल, ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टीम, गति शक्ती कार्गो टर्मिनल्स, गुड्स शेड्स, लोको शेड्स/वर्कशॉप्स, नवीन लाईन्स/लाइन्सचे दुहेरीकरण/गेज कन्व्हर्जन, जनऔषधी केंद्र,  रेल्वे कोच रेस्टॉरंट्स आणि वंदे भारत ट्रेन्सला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ यांचा समावेश असेल

Wardha : बल्लारशा तिसऱ्या रेल्वे लाईनचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार ई लोकार्पण

Wardha : देशात विविध ठिकाणच्या रेल्वे उपक्रमाचे लोकार्पण व्हिडीओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून होत आहेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे ई लोकार्पण होत आहे. यात - वर्धा ते बल्लारशा या तिसऱ्या लाईनचे देखील लोकार्पण आज केले जाणार आहे. या मार्गावर ही तिसरी लाईन केल्याने या मार्गावरील मालवाहतुकीचे लोड कमी होऊन आधीच्या लाईनवर असलेली गाड्यांची गर्दी कमी होण्यास मदतच होणार आहे. 132 किलोमीटरची।ही तिसरी लाईन वर्ध्यातील हिंगणघाट येथून जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा या भागात कोळसा खाणी मोठ्या प्रमाणात आहे, येथून रेल्वेने कोळसा वाहतुक मोठ्या प्रमाणात होते, कोळसा वाहतुकीसाठी रेल्वे हा चांगला पर्याय असल्याने वाहतुकीसाठी वर्धा ते बल्लारशा या तिसऱ्या लाईनची गरज होती, या लाईनचे काम पूर्णत्वास आले आहे, येथील उड्डाण पूल देखील पूर्णत्वास आले आहे.

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत शिवसेना खासदार संजय राऊत ही सहभागी होणार

Nashik : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत शिवसेना खासदार संजय राऊत ही सहभागी होणार
-
शरद पवार यांच्यासह संजय राऊत चांदवड मधील सभेत होणार सहभागी
-
14 मार्च ला भारत जोडो यात्रा चांदवड मार्गे नाशिकमध्ये दाखल होणार
-
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्याची महाविकास आघाडीचो रणनीती
-
महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षाचे प्रमुख नेते असणार एकाच व्यासपीठावर


संजय राऊत आज पासून पुढील 3 दिवस असणार नाशिक मुक्कामी
-
नाशिक लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणार, उमेदवारांची चाचपणी करणार


13 मार्च ला शरद पवार आणि संजय राऊत  यांची नाशिकमध्ये भेट होण्याची शक्यता

Kolhapur : यशवंतराव चव्हाण यांची 111 वी जयंती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार अभिवादन

Kolhapur : यशवंतराव चव्हाण यांची 111 वी जयंती. या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील यशवंतरावांचे आणि आई त्यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी येत असतात. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. अवघ्या काही वेळासाठी येणाऱ्या अजित पवार यांच्यामुळे त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळं वातावरण पाहायला मिळत आहे.

Bhandara : भंडाऱ्यातील मोहरणात पाण्याची कृत्रिम टंचाई, पाण्यासाठी रात्रभर झुंबड, महिलांची पाण्यासाठी भटकंती

Bhandara :  मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत.


तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यातील अनेक तलाव आता निम्म्यावर आलेत.


भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मोहरणा गावात मागील पंधरा दिवसांपासून पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे.


त्यामुळं गावातील नागरिकांची विशेषतः महिलांची पाण्यासाठी भटकंती होत आहे.


गावातील तुषार राऊत या तरुणानं स्व:खर्चातून ट्रॅक्टरवर पाण्याचा टँकर बसवून ग्रामस्थांना मोफत पाण्याची व्यवस्था केली आहे.


रात्रीच्या सुमारास पाण्याचा टँकर गावात पोहचताचं पाण्यासाठी ग्राबस्थांची झुंबळ उडतं असल्याचं चित्र मोहरणा गावात बघायला मिळत आहे.

Bharat Jodo Yatra : काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज नंदुरबारमध्ये, राहुल गांधीचा आजपासून महाराष्ट्राचा दौरा सुरू

Bharat Jodo Yatra : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी हे आज महाराष्ट्राचा दौरा नंदुरबार मधून सुरुवात करत आहेत...


या भारत जोडो यात्रेला आता भारत जोडो न्याय  यात्रा असे नाव देण्यात आले आहे..


मागच्या दहा वर्षाचा अपवाद वगळता नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा


नेहरूंपासून गांधी घराण्यातील व्यक्तींचा नंदुरबार जिल्ह्याची जिव्हाळ्याचा संबंध राहिलाय


मात्र मागच्या 14 वर्षांमध्ये गांधी घराण्यातील कोणी व्यक्ती हा नंदुरबार मध्ये आला नव्हता..


म्हणूनच विशेषत: आदिवासी बांधवांमध्ये राहुल गांधी यांच्या आगमनाची मोठी प्रतीक्षा होती ती आज पूर्ण होणार आहे..


 

Amravati : पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत 27 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी..

Amravati : आंदोलकांनी काल आयुक्त कार्यालयात पोलिसांवर केलेल्या दगडफेकी मध्ये 27 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी..


5 महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश...


काही खाजगी तर काही जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू..

Political -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आमदार संजय शिरसाठ यांची तब्बल एक तास चर्चा..

Political News - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शुभ-दीप निवासस्थानी आमदार संजय शिरसाठ यांची तब्बल एक तास चर्चा..


-भेटी संदर्भात बोलताना टाळलं..

Maharashtra : राज्यातील 506 प्रकल्पांचे उद्घाटन, भूमिपूजन आज होणार

Maharashtra : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी रेल्वे प्रकल्पांचे भूमिपूजन, स्थानकांवरील स्टॉल्सचे उद्घाटन, नवीन गाडयांना हिरवा झेंडा दाखविणे अशा तब्बल 505 प्रकल्पांचे उद्घाटन किंवा भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज होणार.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...




- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.