Maharashtra News Updates 4th April 2023: पॉर्न स्टार प्रकरणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Apr 2023 11:18 PM
Donald Trump : पॉर्न स्टार प्रकरणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक, अमेरिकेच्या इतिहासात माजी राष्ट्राध्यक्षांना पहिल्यांदाच अटक

Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प न्यूयॉर्कमधील मैनहैटन कोर्टात हजर झाले. कोर्टात हजर होताच ट्रम्प यांना पोलिसांनी अटक केलंय. न्यूयॉर्क ग्रँड ज्युरीने ट्रम्प यांच्यावर अॅडल्ट स्टार प्रकरणात फौजदारी खटला चालवण्यास मान्यता दिली आहे. यासह ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले माजी राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत ज्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे.

Nandurbar News : अक्कलकुवा लगत बिबट्याचा 8 वर्षीय बालकावर हल्ला, सुरेश पाडवी या बालकाचा मृत्यू

Nandurbar News : अक्कलकुवा लगत  बिबट्याचा 8 वर्षीय बालकावर हल्ला


हल्यात 8 वर्षीय सुरेश पाडवी या बालकाचा मृत्यू


मदरश्या च्या मागील मक्यांच्या  शेतात नेल फरपटत


घटनास्थळी पोलीस आणी वन विभाग दाखल

Mumbai News: धीरेंद्र शास्त्री कडून साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, मनसे कडून कांदिवलीत साईबाबा मंदिरात महाआरती

Mumbai News: साईबाबा यांच्या संदर्भात पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं याचा निषेध सर्व साई भक्तांकडून देशभरात सुरू आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर चिटणीस नयन कदम आणि प्रवक्ते हेमचंद्र कांबळी यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली पूर्वेकडील ठाकूर व्हिलेज येथील साई मंदिरामध्ये महाआरती करत साईबाबांच्या शिकवणीनुसार श्रद्धा व सबुरी ठेवत शांततापूर्व मार्गाने आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कांदिवली परिसरातील मनसैनिक या शांततापूर्व आंदोलनात व महाआरतीसाठी सहभागी झाले होते. यावेळी मनसैनिकांनी साईबाबा ची आरती करताना धीरेंद्र शास्त्री यांना सद्बुद्धी प्राप्त होवो अशी प्रार्थना देखील करण्यात आली. 

Thane News: रोशनी शिंदे यांच्याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल 

Thane News:  रोशनी शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल 


रोशनी शिंदे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट 


बाळा गवस यांच्याकडून तक्रारवरून दाखल केला गुन्हा 


दुसरीकडे, काल रोशनी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीच्या अर्जावरुन तक्रार दाखल करुन घेतली असून चौकशी सुरु असल्याचं पोलिसांचं म्हणणं

यवतमाळमध्ये अनैतिक संबंधातून युवकाची हत्या, लोहारा परिसर घटना

Yavatmal Crime News : यवतमाळ जिल्ह्यात गुन्हेगारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 90 दिवसांत 19 हत्या झाल्या आहेत. काल रात्रीच्या सुमारास पुन्हा एका युवकाची हत्या झाली आहे. ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रवीण बर्डे असे मृताचे नाव आहे. त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करुन जीवानिशी ठार केल्याची धक्कादायक घटना यवतमाळच्या पंजाबराव कृषी विद्यापीठ जवळ घडली. या प्रकरणी रजनीश इंगळे आणि त्याचा एक साथीदार अशा दोघांना लोहारा पोलिसांनी अटक केली असून मृताचे मारेकऱ्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी लोहारा पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

Thane News : ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण, फेसबुक पोस्टच्या कारणावरुन 

 


Thane News :  फेसबुक पोस्ट केल्याच्या कारणावरुन ठाण्यात (Thane) ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली. घोडबंदर रोडवरील कासारवडवली परिसरात हा प्रकार घडला. रोशनी शिंदे (Roshni Shinde) असं या महिला पदाधिकाऱ्याचं नाव आहे. त्या सहा महिन्यांच्या गर्भवती असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अजून एफआयआर (FIR) दाखल केलेली नाही. वैद्यकीय अहवाल आल्यावर तपास सुरु करणार असल्याची माहिती पोलिसांनी (Police) सांगितली आहे.

Maharashtra Weather : राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा

Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कधी थंडी तर कधी उन्हाचा कडाका जाणवत आहे. अशातच आता हवामान विभागानं (Meteorological Department) राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा (rain) इशारा दिला आहे. सात एप्रिलपर्यंत राज्यातील विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा यलो अलर्टचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान, आज (4 एप्रिल) विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

Mumbai News: साईबाबांवर भाष्य केल्यानं बागेश्वर बाबा अडचणीत; युवा सेनेची तक्रार

Mumbai News: बागेश्वर बाबा उर्फ ​​धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशी तक्रार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युवा सेनेने केली आहे. बागेश्वर बाबा यांनी शिर्डीच्या साईबाबांविरोधात केलेले वादग्रस्त वक्तव्य समोर आल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युवासेनेने मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. बागेश्वर बाबावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. बागेश्वर बाबा हे शिर्डी साईबाबांच्या भक्तांच्या भावनांशी खेळत असल्याचे युवासेनेचं म्हणणं आहे. 

Thane Crime News: ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला फेसबुक पोस्टवरून मारहाण

Thane Crime News: ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला फेसबुक पोस्टवरून मारहाण करण्यात आली.. घोडबंदर रोडवरील कासारवडवली परिसरात हा प्रकार घडला. रोशनी शिंदे असं या महिला पदाधिकाऱ्याचं नाव आहे. त्या सहा महिन्यांच्या गर्भवती असल्याचं समजतंय.. रोशनी शिंदे संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतण्याच्या तयारीत असताना, ऑफिसच्या आवारात शिरून त्यांना शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली, असा आरोप आहे. पोलिसांनी मात्र अजून एफआयआर दाखल केलेली नाही. तर वैद्यकीय अहवाल आल्यावर तपास सुरू करणार, असं पोलीस सांगतायत.

Kolhapur News: ऐन उन्हाळ्यात कोल्हापुरात धुक्याची चादर, नागरिकांनी घेतला थंडीचा अनुभव

Kolhapur News: ऐन उन्हाळ्यात कोल्हापुरात धुक्याची चादर


उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी घेतला थंडीचा अनुभव


पहाटे ते सकाळी साडेआठ वाजेपर्यंत कोल्हापूरकरांनी अनुभूवली गुलाबी थंडी

Maharashtra News: महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक गावातील नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू

Maharashtra News: महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक गावातील नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू


महाराष्ट्र शासनाने दाबा सांगितलेल्या बेळगाव कारवार कलबुर्गी व बिदर जिल्ह्यातील बारा तहसील मधील 865 गावांना योजनेचा फायदा होणार


सदर नागरिकांना योजनेअंतर्गत प्रतिक कुटुंब प्रति वर्ष 1.5 लक्ष रकमेचे विमा संरक्षण रक्कम व 996 उपचारांचा लाभ अनुज्ञेय राहणार आहे


बेळगाव येथील केएलई हॉस्पिटल व पणजी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या रुग्णालयांमध्ये योजनेचा लाभ मिळणार

Lemon Production : देशातील सहा राज्यात लिंबाचे 70 टक्के उत्पादन

Lemon Production in India : भारतातील काही राज्यांमध्ये लिंबाचे (Lemon) मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. देशातील 70 टक्के लिंबाचं उत्पादन हे सहा राज्यांमध्ये होतं. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळानं (National Fruit Production Board) दिलेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) लिंबू उत्पादनाच्या बाबतीत भारतातील सर्व राज्यांमध्ये आघाडीवर आहे. त्या पाठोपाठ गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि ओडिशा या राज्यांचा क्रमांक लागतो. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Covid 19: दिल्ली, मुंबईत वाढतोय कोरोनाचा वेग; गेल्या 10 दिवसांतील रुग्णसंख्या चिंता वाढवणारी

Delhi Mumbai Corona News: देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना (Covid-19) च्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. दिल्ली (Delhi) आणि मुंबई (Mumbai) यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य मंत्रालयाची चिंताही वाढली आहे. त्यानंतर विभागानं लोकांना मास्क वापरण्याचं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. यासोबतच लोकांना गर्दीची ठिकाणी जाणं टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. दिल्ली आणि मुंबईच्या गेल्या दहा दिवसांच्या आकडेवारीवरून, कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत असल्याचं लक्षात येत आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भाजपने राज्यभर सावरकर यात्रा सुरु केली आहे. या यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. या निमित्ताने नागपुरात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली यात्रेचा समारोप होत आहे. त्याचसोबत आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून त्याला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. 


शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी 11.30 वाजता राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय मुंबई येथे पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्यभरातील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहतील. राज्यात लवकरच महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत चर्चा होईल तसेच स्थानिक परिस्थितीचा आढावा शरद पवार बैठकीमध्ये नेत्यांकडून घेतील.
 
सावरकर गौरव यात्रेचा समारोप 


स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्या विरोधात सुरू केलेल्या सावरकर गौरव यात्रेचा आज समारोप आहे. आज दुपारी 4.30 वाजता नागपूर शहरातील सर्व सहा विधानसभा क्षेत्रात स्थानिक आमदार आणि नेत्यांच्या नेतृत्वात सावरकर गौरव यात्रा काढली जाणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणातून निघणाऱ्या सहाही यात्रा संध्याकाळी 7 वाजता नागपूरच्या शंकर नगर चौकावर एकत्रित येतील. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धरमपेठ परिसरातून सावरकर गौरव यात्रेत सहभागी होतील आणि पायी शंकर नगर चौकापर्यंत येतील. अशाच पद्धतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही यात्रेत सहभागी होऊन शंकरनगर चौकात पोहोचतील. शंकरनगर चौकात एकत्रित सभेचे आयोजन करण्यात आले असून या समारोपीय सभेत देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी उपस्थित राहणार आहेत.


संत बाळूमामा मंदिर ट्रस्ट नवीन विश्वस्तांची नेमणूक होणार 
 
सोमवारी कोल्हापूरमधे संत बाळूमामाच्या विश्वस्तांमध्ये जोरदार हाणामारी झाली. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास आदमापूर येथे बाळूमामाच्या मंदिरामध्ये नवीन विश्वस्तांची नेमणूक केली जाणार आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूचे विश्वस्त उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे काल झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर आज गोंधळाची शक्यता आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.