Maharashtra News Updates 27th March 2023 : भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील सापडले; मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये त्यांना आणले

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Mar 2023 11:44 PM
Pune News : भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील सापडले; मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये त्यांना आणले

Pune News : भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील सापडले आहेत.  मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये त्यांना आणण्यात आले. जाधव कुटुंबीयांनी महादेव जाधव हरवले असल्याची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. 

Dhule News: धुळे जिल्ह्यात H3N2 व्हायरसचा शिरकाव; हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीला लागण

धुळे जिल्ह्यात H3N2 व्हायरसचा शिरकाव


हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीला लागण...


लागण झालेल्या विद्यार्थिनीची प्रकृती स्थिर...


परदेशातून आल्याने लागण झाल्याची वैद्यकीय सूत्रांची माहिती..

Mumbai News :  मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर वर्सोवा नवीन ब्रिज आजपासून वाहतुकीसाठी सुरू

Mumbai News :  मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर वर्सोवा नवीन ब्रिज आजपासून वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. आज सायंकाळी 7 वाजल्यापासून या ब्रिजवरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

Pune News : भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव याचे वडील पुण्यातून बेपत्ता; पोलिसात तक्रार दाखल

Pune News : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव याचे वडील पुण्यातून बेपत्ता


केदार जाधव याचे वडील महादेव जाधव हे पुण्यातून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे


पुण्यातील कोथरूड भागातून आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास पासून ते बेपत्ता झाल्याचे समजत आहे


मिळालेल्या माहितीनुसार, केदार जाधव याचा परिवार कोथरूड भागात राहायला आहे. महादेव जाधव यांनी आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी रिक्षा घेऊन गेले मात्र आत्तापर्यंत त्यांचा काहीच शोध लागलेला नाही


त्यांच्या जवळ असलेला फोन सुद्धा बंद लागत आहे 


पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल

नुसतं बोलून काय होणार, कृतीतून दाखवून द्या; मुख्यमंत्री शिंदे यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान

नुसतं बोलून काय होणार, कृतीतून दाखवून द्या; मुख्यमंत्री शिंदे यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान 


Maharashtra Politics: सावरकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे नेमकं काय करणार? मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल

सावरकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे नेमकं काय करणार? मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल 

Maharashtra : राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका 

Sangali Tempo Fire : तासगावच्या मणेराजूरीत उभ्या असलेल्या आयशर टेम्पोंने घेतला पेट, द्राक्षांचे रिकामे क्रेट जळून खाक

Sangali Tempo Fire : सांगलीच्या तासगाव मधील मणेराजूरीत रविवारी रात्री एक थांबलेल्या टेम्पो जळून खाक झाल्याची घटना घडलीय. आयशर टेम्पोंच्या या बर्निंग थराराच्या प्रकाराने ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकला होता. पश्चिम बंगाल येथून द्राक्ष खाली करून ही गाडी रात्री 10 च्या सुमारास आली होती. त्यानंतर गाडीचा चालक गाडी रस्त्याच्या कडेला गाडी लावून गाडीत झोपी गेला होता, मात्र काही वेळात गाडीला आग लागली. या आगीने काही वेळात रौद्ररूप धारण केले. यावेळी ग्रामस्थांनी झोपलेल्या चालकाला गाडीच्या समोरच्या काचा फोडून बाहेर काढल्याने चालकाचे प्राण वाचले, मात्र या आगीत गाडी आणि त्यातील द्राक्षांचे रिकामे क्रेट जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली, हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास तासगाव पोलीस करत आहेत.

शेगाव रेल्वे स्थानकावर नवीन तीन रेल्वे गाड्यांना थांबा मंजूर, मराठवाड्यातील भक्तांना शेगाव आणि बुलढाण्यातील भक्तांना दिल्ली, वैष्णोदेवी जाण्यासाठी होणार सोय

Buldhana News : केंद्रीय रेल्वे बोर्डाने तीन रेल्वे गाड्यांना शेगाव येथे थांबा मंजूर केला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील संत गजानन महाराज भाविकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. मराठवाड्यातून शेगाव येथे संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. परंतु शेगाव मार्गे धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना शेगाव येथे थांबा नसल्याने भाविकांची गैरसोय होत होती. मात्र रेल्वेने अलीकडेच निर्णय घेऊन शेगाव येथे तीन रेल्वे गाड्यांचे थांबे निश्चित केले आहे. त्यामुळे या तीन रेल्वे गाड्यांना शेगाव येथे थांबा दिला जाणार आहे. नांदेड अमृतसर (12421/22 अमृतसर एक्सप्रेस), नांदेड जम्मू तवी एक्सप्रेस (12751/52) आणि नागपूर-पुणे एक्सप्रेस (22141/42) या रेल्वे गाड्यांना शेगाव येथे थांबा मंजूर झाला आहे. रेल्वे बोर्डाने प्रायोगिक तत्त्वावर येत्या सहा महिन्यांसाठी हा बदल केला आहे. त्यामुळे मराठवाड्यातून शेगावला येणाऱ्या आणि शेगाव परिसरातून दिल्लीकडे, वैष्णोदेवीकडे जाणाऱ्या भक्तांची सोय होणार आहे.

Palghar News: पालघरमध्ये आरोग्य विभागाचा रुग्णांच्या जीवाशी खेळ

Palghar News: पालघर आरोग्य विभागाचा रुग्णांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ पुन्हा एकदा उघड झाला आहे. तलासरी तालुक्यातील उधवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका मद्यपी शिपायाकडून एका चिमुकल्या मुलीवर उपचार करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याची धक्कादायक समोर आली आहे. हा मद्यपी शिपाई चक्क डॉक्टरचा सल्ला न घेताच या चिमुकलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र रुग्णाच्यासोबत असलेल्या कुटुंबीयांनी त्याला रोखून धारेवर धरलं. आपण मद्य प्राशन केलं असल्याची कबुली या व्हिडीओमध्ये या शिपायाकडून देण्यात आली असून या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पालघर जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रात्रीच्या वेळी निवासी डॉक्टर राहत असल्याची ओरड नेहमीच होते. मात्र पालघर जिल्हा परिषद प्रशासन आणि सरकार यावर ठोस कारवाई करण्यात अजूनही अपयशी ठरत असल्याचं वारंवार समोर येत आहे.

India Corona Updates: कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची राज्यांसोबत मॉक ड्रीलसंदर्भात बैठक 

India Corona Updates: कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची राज्यांसोबत मॉक ड्रीलसंदर्भात बैठक 


केंद्र सर्व राज्यांसह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज कोविड-१९ आढावा बैठक घेणार 


10-11 एप्रिल रोजी कोव्हिडसंदर्भात देशव्यापी मॉक ड्रिलचेही नियोजन 


मॉक ड्रीलच्या प्रोटोकॉलवरही आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता 


केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांच्या बैठकीत चर्चा करणार, कशाप्रकारे माॅक ड्रील करायचं यासंदर्भात माहिती देणार 


भारतात दररोज एक हजारांहून अधिक रुग्णसंख्या, महाराष्ट्र सर्वाधिक रुग्णसंख्या आढळणाऱ्या राज्यापैकी एक 


याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देखील वाढत्या रुग्णसंख्येसंदर्भात आढावा

Maharashtra News: 1 एप्रिलपासून राज्यात वीज दरवाढ होण्याची शक्यता

Maharashtra News: 1 एप्रिलपासून राज्यात वीज दरवाढ होण्याची शक्यता.


वीज दरवाढ करण्याच काम एमईआरसीकडून अंतिम टप्प्यात.


पाच विभागातील हरकती सूचना मागवल्या नंतर एमईआरसीकडून आॅनलाईन सुनावणी घेण्यात आली आहे.


बहुवार्षिक वीजदर निश्चितीअंतर्गत राज्यभरात वीज वितरण करणाऱया महावितरणने 2023-24 आणि 2024-25 या दोन वर्षांसाठी 67 हजार कोटी रुपयांच्या महसुलाची मागणी केली आहे


म्हणजेच 9 ते 10 टक्के विज दरवाढ करण्याची मागणी महावितरण कडून करण्यात आली आहे . तर अदानी इलेक्ट्रिसिटीने 2023-24 या वर्षासाठी 2-7 टक्के एवढी, तर टाटा पॉवरने 10-30 टक्के एवढ्या दरवाढीची मागणी केली आहे.


त्यामुळे प्रतियुनिट विजेच्या दरात अडीच रुपयांची दरवाढ की एक रुपयाची होणार हे पहावं लागणार.


31 मार्च ला सर्व वीज कंपन्यांच्या वीजदर निश्चितीचे आदेश येण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. 

BMC Election: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मुंबई महानगरपालिकेसाठी बिगुल वाजलं

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मुंबई महानगरपालिकेसाठी बिगुल वाजलं


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची बुधवारी मुंबईत जाहीर सभा


मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 'युवा मंथन'चे मुंबईत आयोजन


युवा मंथनसाठी शरद पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणुन उपस्थित राहणार


बुधवारी सायंकाळी 5 वाजता चेंबूर येथे सभेचे आयोजन

Mumbai News: मुंबई महापालिकेच्या आशा सेविका भरतीमध्ये विवाहित आशा सेविकांना प्राधान्य; बीएमसी सूत्रांची माहिती

Mumbai News: मुंबई महापालिकेच्या आशा सेविका भरती मध्ये विवाहित आशा सेविकांना प्राधान्य,बीएमसी सूत्रांची माहिती.


मुंबई पालिकेत वस्ती पातळीवर गृहभेटीद्वारे नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधाकरिता आशा सेविका या कामावर आधारित मोबदला तत्त्वावर नेमणूक करावयाची आहे.

 

यासाठी मुंबई महापालिका आरोग्य विभागाने या संदर्भात जाहिरात काढली असून यामध्ये विवाहित आशा सेविकांना प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती आहे.

 

मुंबई महापालिकेचे आरोग्य केंद्रात 1000 ते 1200 लोकसंख्येसाठी एक आशा स्वयंसेविका व अशा 250 घरांकरिता नेमणूक करण्यात येईल.

 

निवडीच्या निकषांमध्ये जरी ही अट दिली नसली तरी यामध्ये विवाहित आशा सेविकांना प्राधान्य देण्यात येईल असं सांगण्यात आलंय.

 

शिवाय आशा सेविकांची वयोमर्यादा सुद्धा 25 ते 40 वर्षे ठेवण्यात आली आहे.

 

विविध आजारांचे रूग्ण, गरोदर माता व बालकांचे लसीकरण, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांबाबत प्रबोधनाची तसेच उपाययोजनांचीही जबाबदारी यामध्ये असणार आहे.

 

 विवाहित महिला असली तर कुटुंब नियोजन, गरोदर माता यासंबंधीच्या विषयांवर संवाद साधणे सोपे जाते त्यासाठी ही अलिखित अट असल्याचं सांगितलं गेलं आहे.
रत्नागिरीतील खेड आगाराला शिमगोत्सवात 24 लाखांहून अधिक उत्पन्न

Ratnagiri News : एसटीच्या खेड बस स्थानकातून शिमगोत्सवासाठी चालवण्यात आलेल्या जादा गाड्यांच्या फेऱ्यांतून आगाराला 24 लाखांहून अधिक प्रवासी वाहतूक उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती आगर प्रमुख प्रशांत करवंदे यांनी दिली आहे. शिमगोत्सवाच्या काळात 117 जादा गाड्यांच्या 234 फेऱ्या धावल्या होत्या.

विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे आता महाराष्ट्र ग्रामीण बँकेत विलिनीकरण होणार

Vidarbha Gramin Bank : विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे आता महाराष्ट्र ग्रामीण बँकेत विलिनीकरण केले जाणार आहे. त्यामुळे राज्यात आता एकच ग्रामीण बँक राहणार आहे. शिवाय देशातील राष्ट्रीयकृत बँकांचा एनपीए चार वर्षात 14 टक्क्यांवरुन पाच टक्के झाल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरमधील गोलवाडीत ग्रामीण बँकेची 421वी शाखा उघडण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. बँकांचे विलिनीकरण झाल्यास एकच व्यवस्थापन राहिल. योजनांची अंमलबजावणी करण्यास फायदा होईल, असं मत यावेळी व्यवस्थापक संजय वाघ यांनी देखील व्यक्त केले.

Hingoli News: पाण्यासाठी नागरिकांची नागरिकांची वणवण; पिण्याचे पाणी नसल्याने गावकऱ्यांचे स्थालंतर

Hingoli News: उन्हाळा लागला आणि तापमान वाढायला लागलं की, पाणीटंचाई सुरू होते आणि याच पाणीटंचाईच्या झळा आता हिंगोली जिल्ह्यातील लक्षमन नाईक तांडा गावाला सोसाव्या लागतायत. गावाला पिण्याचे पाणीच नसल्याने नागरिक गाव सोडून गेलेत. गावातील 50 टक्के लोकांचे पाण्यामुळे स्थलंतर झाले आहे. तर उर्वरित गावकरी 2 ते 3 किलोमिटर हून डोक्यावर पाणी आणावे लागतय. नागरिकांना गावाच्या बाजूला असलेल्या एका विहिरीतून पाणी न्यावे लागत आहे तर दरवर्षी हीच समस्या भेडसावत असल्याने अनेक नागरिकांनी गावात येणेसुद्धा बंद केलं आहे. जिल्ह्यामध्ये जल जीवन मिशन योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपयांची नळ योजनेची केली जात आहेत. परंतु या योजनेपासून हे गाव वंचित राहिला आहे गावाला पाणीच नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. 

Beed Crime: वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या मंडळ अधिकाऱ्याला धक्काबुक्की पोलिसात गुन्हा दाखल

Beed Crime: वाळू  माफीयांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूलच्या अधिकाऱ्याला धक्काबुक्की करून वाळूने भरलेला टेम्पो पळून नेल्याप्रकरणी धक्काबुक्की करणाऱ्या वाळू माफिया विरोधात गेवराईच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील आगर नांदूर येथे मोठ्या प्रमाणामध्ये वाळूचा अवैध उपसा होत असल्याची माहिती मंडळ अधिकारी बाळासाहेब बडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन कारवाई केली असता वाळू माफियांनी त्यांना धक्काबुक्की करून त्या ठिकाणाहून वाळूने भरलेल्या टेम्पो पळून नेला होता आणि त्यानंतर आता याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Parshuram Ghat Traffic Updates: परशुराम घाट आजपासून वाहतुकीसाठी बंदचा प्रस्ताव सोशल मीडियावर व्हायरल
Parshuram Ghat Traffic Updates: मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचा अंतिम टप्पा हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे घाटातील वाहतूक काही काळ बंद राहण्याची शक्यता आहे.त्यासाठी 27 मार्च ते 3 एप्रिल पर्यंत दुपारी 12 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यासाठी महामार्ग विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र याबाबत रविवारी रात्रीपर्यंत कोणतीच अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे घाटातील वाहतूक सुरूच राहणार आहे. प्रस्तावाचे पत्र सोशियल मिडीयावर व्हायरल झाल्याने गोंधळ उडाला आहे. 

 
Ratnagiri News: शिमगोत्सवात खेड आगाराला शिमगोत्सवात 24 लाखांहून अधिक उत्पन्न

Ratnagiri News: एसटीच्या खेड बस स्थानकातून शिमगोत्सवासाठी चालवण्यात आलेल्या जादा गाड्यांच्या फेऱ्यांतून आगाराला 24 लाखांहून अधिक प्रवासी वाहतूक उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती, आगर प्रमुख प्रशांत करवंदे यांनी दिली आहे.शिमगोत्सवाच्या काळात 117 जादा गाड्यांच्या 234 फेऱ्या धावल्या होत्या.

CM Eknath Shinde meet Raj Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी; राजकीय चर्चेला उधाण

CM Eknath Shinde, Raj Thackeray : मालेगावमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सहकुटुंब मनसे अध्यक्ष राज  ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घरी पोहचले आहेत. राज ठाकरे यांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सहकुटुंब पोहचले आहेत. या भेटीदरम्यान मागील काही दिवसात झालेल्या घडामोडींच्या संदर्भात देखील आजच्या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

Ratnagiri Crime: रत्नागिरीत गावठी बॉम्बसाठा जप्त; संशयित 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत

Ratnagiri Crime: खेड तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील भरणे जाधववाडी येथे येथील पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 29 हजार रुपये किमतीचे 83 गावठी बॉम्ब साठा केल्याप्रकरणी अटक केलेल्या अल्पेश प्रकाश जाधव यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बारामती तालुक्यातील खांडज येथील चार जणांचा गुदमरून मृत्यू, भाजपच्या वतीने मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर

Baramati News: बारामती तालुक्यातील खांडज येथील चार जणांचा गुदमरून मृत्यू झाला होता. त्या कुटूबियाना भाजपच्या वतीने  साडे तीन लाख रुपये मदत घोषित केली आहे. आज बावनकुळे यांनी या कुटुंबाची भेट घेऊन ही मदतीची घोषणा केली आहे. 15 मार्च रोजी जनावरांच्या गोठ्यातील गोमूत्राच्य टाकी साफ करीत असताना त्यांचा गुदमरून मृत्यू झाला होता.  भानुदास अटोळे हे टाकी साफ करण्यासाठी उतरले त्यांना वाचवण्यासाठी मुलगा प्रवीण गेला. प्रवीणला वाचवण्यासाठी चुलते गेले. त्यानंतर शेजारी राहणारा व्यक्ती गेला असता चारही जणांचा गुदमरून मृत्यु झाला आहे. प्रकाश सोपान आटोळे, प्रविण भानुदास आटोळे, भानुदास आनंदराव आटोळे, बापुराव लहूजी गव्हाणे अशी या चार जणांची नावे आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मदत जाहीर केली आहे..येत्या 2 दिवसात चेक देण्यात येईल. तसेच सरकारी मदत मिळवून देण्याचे आश्वानही बावनकुळे यांनी कुटुंबीयांना दिले आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


संसदेच्या दोन्ही सभागृहात आज सुद्धा गोंधळ सुरू रहाण्याची शक्यता आहे. भाजप खासदारांनी लोकसभा आणि राज्यभसेच्या सदस्यांसाठी व्हीप जारी केला आहे. तसेच राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेसचे खासदार आज संसदेत काळे कपडे किंवा काळ्या फिती लावून जाणार आहेत.







 






हसन मुश्रीफ यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात युक्तिवाद होणार 


मुंबई – हसन मुश्रीफ, त्यांची तिन्ही मुलं आणि सीएच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयात युक्तिवाद होईल. ईडीनं दाखल केलेल्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी मुश्रीफ प्रयत्नशील आहेत. हसन मुश्रीफांना हायकोर्टानं दिलेलं अटकेपासूनचं संरक्षण या आठवड्यात संपतेय. त्यामुळे या याचिकेवर लवकरच निकाल अपेक्षित आहे.


राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी आजपासून सुरू


कोल्हापूर – राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी खऱ्या अर्थाने आजपासून सुरू होणार आहे. विरोधी आघाडीचे उमेदवार आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विरोधी आघाडी आपली मोट बांधत आहे. त्यामुळे राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक असा पारंपारिक सामना पाहायला मिळणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून राजारामच्या निवडणुकीकडे पाहिले जाते. 


शिवेंद्रराजे भोसले यांची आज पत्रकार परिषद


सातारा – उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप गेल्या काही दिवसांमध्ये केलेले आहेत. आमदार शिवेंद्रराजे भोसले हे मुंबईहून साताऱ्यात येणार आहेत. आज ते उदयनराजे भोसले यांच्या आरोपांवर उत्तर देणार आहेत, सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. 


पुणे आणि भंडाऱ्यात राहुल गांधीच्या समर्थनात आंदोलन


पुणे – राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून पुण्यातील स्वारगेट चौकात सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सत्याग्रह. 


भंडारा – जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ आणि मोदी - अदाणी महाघोटाळा पर्दाफाश रॅलीचं आयोजन करण्यात आलीये. भंडारा शहरातील हुतात्मा स्मारक इथून दुपारी 2 वाजता निघणारी ही रॅली जिल्हाधिकारी चौकातील त्रिमूर्ती चौकापर्यंत काढण्यात येणार आहे.


पुणे


- नदीपात्रात राबविण्यात येणार असलेल्या नदी सुधार योजनेंतर्गत सहा हजार झाडे तोडण्यात येणार असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीकडून आंदोलन, सकाळी 10.30 वाजता. 


- विज दरवाढीविरोधात आम आदमी पक्षाकडून पुण्यातील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन, दुपारी 12 वाजता. 


अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर 


बारामती – विरोधी पक्ष नेते अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी 3 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करणार आहेत.


उपमख्यमंत्री फडणवीस आज नवी मुंबई दौऱ्यावर


नवी मुंबई – उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबई दौऱ्यावर आहेत. औद्योगीक प्रशिक्षण संस्था पनवेल येथे राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत कार्यक्रमाला उपस्थिती. सकाळी 10.45 मिनीटांनी हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री पुन्हा हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.