Maharashtra News Live Updates : अदानी वीज वितरण कंपनीची नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये एन्ट्री? उद्या राज्यभर वीज कर्मचारी, अभियंते, अधिकाऱ्यांची निदर्शने

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Mar 2023 09:08 PM
Nandurbar : नंदुरबार जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले, अनेक नद्यांना पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Nandurbar News : गेल्या आठवड्याभरापासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. सातपुडा पर्वत रांगेतील अनेक नद्यांना पूर आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अदानी वीज वितरण कंपनीची नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये एन्ट्री? उद्या राज्यभर वीज कर्मचारी, अभियंते, अधिकाऱ्यांची निदर्शने

Maharashtra News :  महावितरण कंपनीचे कार्यक्षेत्र असलेल्या छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक शहरामध्ये अदानी इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनीने वितरणाचे कार्यक्षेत्र आपल्या ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. तसेच उत्तरप्रदेशमधील वीज कर्मचाऱ्यांच्या संघर्ष समितीने उत्तर प्रदेश सरकारच्या वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्याच्या धोरणाच्या विरोधात 72 तासाचा यशस्वी संप केला आणि सरकारला खाजगीकरण रद्द करण्यात भाग पाडले. महाराष्ट्र सरकारने स्थायी मंजूर पदावर कंत्राटी पद्धतीने कामगार भरण्याचा जो निर्णय घेतला त्यास विरोध, राज्य कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करा या व इतर मागण्याकरीता पुकारलेल्या बेमुदत संपाला पाठिंबा देण्यासाठी उद्या महाराष्ट्रभर वीज कंपन्यातील 86000 कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी द्वारसभा घेऊन निदर्शने करणार आहेत. 

अदानी वीज वितरण कंपनीची नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये एन्ट्री? उद्या राज्यभर वीज कर्मचारी, अभियंते, अधिकाऱ्यांची निदर्शने

Maharashtra News :  महावितरण कंपनीचे कार्यक्षेत्र असलेल्या छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक शहरामध्ये अदानी इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनीने वितरणाचे कार्यक्षेत्र आपल्या ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. तसेच उत्तरप्रदेशमधील वीज कर्मचाऱ्यांच्या संघर्ष समितीने उत्तर प्रदेश सरकारच्या वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्याच्या धोरणाच्या विरोधात 72 तासाचा यशस्वी संप केला आणि सरकारला खाजगीकरण रद्द करण्यात भाग पाडले. महाराष्ट्र सरकारने स्थायी मंजूर पदावर कंत्राटी पद्धतीने कामगार भरण्याचा जो निर्णय घेतला त्यास विरोध, राज्य कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करा या व इतर मागण्याकरीता पुकारलेल्या बेमुदत संपाला पाठिंबा देण्यासाठी उद्या महाराष्ट्रभर वीज कंपन्यातील 86000 कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी द्वारसभा घेऊन निदर्शने करणार आहेत. 

Navi Mumbai : नवी मुंबईतील बिल्डरच्या हत्येचे गूढ उकललं; जुून्या प्रकरणातील सूड भावनेने केली कारवाई

Navi Mumbai :  नवी मुंबईत दिवसाढवळ्या बिल्डरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा  उलगडा करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आलेय. मृतक सावजीभाई मंजेरी याने आपल्या गुजरात मधील मूळ गावी 25 वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्याच्या सूडापोटी ही हत्या करण्यात आली असल्याचे तपासात उघड झाले आहे.

Devendra Fadanvis: कर्मचारी आपलेच आहेत, त्यांना चांगल्यात चांगलं देणार; संप मागे घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

कर्मचाऱ्यांचं सामाजिक सुरक्षेचं तत्व मान्य केलं असून राज्य सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना चांगल्यात चांगलं दिलं जाईल अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासाठी नेमण्यात आलेल्या समितीला तीन महिन्यांची मुदत दिली असून त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल असंही ते म्हणाले. सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याबद्दल त्यांनी आभार मानले. 

Maharashtra Strike : शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचा सात दिवसांचा संप मागे; सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर संप मागे

Maharashtra Strike : शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचा सात दिवसांचा संप मागे

अनिल परब यांना ईडीच्या कारवाईपासून दिलेला दिलासा 23 मार्चपर्यंत कायम

Anil Parab : अनिल परब यांना ईडीच्या कारवाईपासून दिलेला दिलासा 23 मार्चपर्यंत कायम


ईडीने दापोली रिसॉर्ट प्रकरणी दाखल केलेल्या ईसीआयआर रद्द करण्यासाठी अनिल परब यांची हायकोर्टात याचिका


नियमित कोर्ट कामकाजासाठी उपलब्ध नसल्याने सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब

Buldhana News : एक दिवस अन्नदात्यासाठी उपवास, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ अनोखं आंदोलन

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील शेतकरी चळवळतील कार्यकर्त्यांनी काल छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर 'एक  दिवस अन्नदात्यासाठी उपवास ' हे आंदोलन केलं. सामाजिक, राजकीय तसेच शेतकरी चळवळीतील संवेदनशील कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकरी आत्महत्यांना आळा बसावा, शेतकऱ्यांना विश्वास बसावा की त्यांच्यासोबत सर्वजण आहेत. शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि शेतकऱ्यांच्या समस्या शासनाला कळव्या, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे दरवर्षी याच ठिकाणी एक दिवस अन्नदात्यासाठी उपवास' हे आंदोलन करण्यात येते. राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या ही यवतमाळ जिल्ह्यात 19 मार्च 1986 रोजी झाली होती. साहेबराव करपे यांनी कुटुंबासह आत्महत्या केली होती, या कुटुंबाला श्रद्धांजली म्हणून हा काळा दिवस म्हणून पाळण्यात येतो.

KDMC News : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, दोन मयतासह आठ सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचा बदल्या
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. 17 मार्च 2023 रोजी काढलेल्या चतुर्थ श्रेणी कामगारांच्या बदल्यांचा आदेशात दोन मयत कर्मचाऱ्यासह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्याचे समोर आले आहे.
Jalna Old Pension : जालन्यात सरकारी कर्मचाऱ्यांकडून थाळीनाद आंदोलन
Jalna Old Pension : जालना येथे जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आज सातव्या दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांनी थाळी नाद आंदोलन केलं, यावेळी कर्मचाऱ्यांनी थाळी वाजवत जिल्हाधिकारी कार्यलया समोर रॅली देखील काढली, जुन्या पेंशन  मागणी साठी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत सरकार जुनी पेंशन लागू करत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिला
Washim Old Pention : जुन्या पेन्शन योजना लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी केले थाळीनाद आंदोलन

Washim Old Pention : जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी गेल्या सात दिवसापासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. वाशीम जिल्ह्यातील सतरा हजार कर्मचारी या संपात सहभागी असून आज सातवा टप्पा म्हणून या संपकरी कर्मचाऱ्यांनी थाळीनाद आंदोलन करत शासनच्या जुनी पेन्शन योजनेच्या धोरणाचा निषेध करत पेन्शन आमच्या हक्काची अश्या घोषणा दिल्या. 

Buldhana Dialysis Centre : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका किडनी विकार रुग्णांना

  • राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका किडनी विकार रुग्णांना

  • आठवडाभरापासून खारपान पट्ट्यातील डायलिसिस सेंटर संपामुळे बंद

  • एबीपी माझाने वास्तव दाखवताच वरवट बकाल ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटर करण्यात आल सुरू.


 

 

 
काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांची इंदापुरात पेढ्यांची तुला

Pune News : पुण्यातील कसबा मतदारसंघाचे काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले. आज पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील गागरगाव येथील बाळासाहेब आणि कैलास नरळे या दोन कार्यकर्त्यांनी त्यांच्या वजनाइतकी 86 किलो पेढ्याची तुला करत ते पेढे उपस्थित त्यांना वाटण्यात आले. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी रवींद्र धंगेकर यांना पेढे भरवले. सध्या या पेढ्यांच्या तुलेची इंदापूर तालुक्यात जोरदार चर्चा होत आहे.

भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली दबले जाऊन तीन मजुरांचा मृत्यू, जळगावातील तंबाखू कारखान्यातील घटना
Jalgaon News : भिंत कोसळून तीन मजूर दबले जाऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव शहरालगत असलेल्या एका तंबाखू कारखान्यात घडली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहतीनुसार  काल  (19 मार्च) संध्याकाळी चाळीसगाव शहरातील घाट रोड परिसरात असलेल्या एका तंबाखू कारखान्याच्या कंपाऊंड भिंती लगत असलेल्या गटारात स्वच्छतेचे काम सुरु होतं. त्यासाठी वायब्रेटर मशीनचा वापर करण्यात येत होता. या वायब्रेटरमुळे कंपन होऊन भिंत कोसळून चार मजूर ढिगाऱ्याखाली दाबले गेले होते. यातील एकाला वाचवण्यात यश आले असले तरी उर्वरित तिघांचा मात्र जागेवरच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अवकाळी पावसामुळे सातपुड्याच्या नद्यांना आला पूर

Nandurbar Unseasonal Rain : नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने गेल्या सहा दिवसांपासून कहर केला असून सततच्या जोरदार पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. यातच नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, शहादा आणि अक्कलकुवा भागात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे सातपुड्याच्या नद्यांना आता पूर येऊ लागला आहे. पुराची तीव्रता बघून आपल्याला असं वाटेल की जणू आता पावसाळा चालू झाला आहे की काय. हे आस्मानी संकट आता अजून कधी दिवस चालणार आहे असा सवाल नागरिक विचारत आहे.

मुंबईतील पेटंट आणि ट्रेडमार्क कार्यालय गुजरातला हलवण्याच्या हालचाली सुरु?

मुंबईतील पेटंट आणि ट्रेडमार्क कार्यालय गुजरातला हलवण्याच्या हालचाली सुरु?


पेटंट आणि ट्रेडमार्कचं विभागीय कार्यालय मुंबईत आहे 


मात्र या कार्यालयातील महत्त्वाचे अधिकारी यांची बदली गुजरातला करण्यात आली आहे


तर लाखो अर्जावर करावाई न करता प्रलंबित ठेवण्यात आलेले आहेत


हे अर्ज प्रलंबित राहत आहेत म्हणून हे कार्यालय गुजरातला हलवण्यात येईल अशी दबक्या आवाजात चर्चा

भंडाऱ्यात अवकाळी पावसाने घेतला दोघांचा बळी, वीज पडून शेळ्यांचा मृत्यू तर शेतपिकांचं मोठं नुकसान

Bhandara News : भंडारा जिल्ह्यात रविवारी (19 मार्च) गारपिटीसह विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसाने दोन व्यक्तींसह पाच शेळ्यांचा मृत्यू झाला. तर गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने अनेक ठिकाणचे वृक्ष उन्मळून पडल्याने मोठं नुकसान झालं आहे. याशिवाय शेतातील उभ्या पिकांनाही याचा फटका बसला आहे. अवकाळी पावसाने भातपीक, गहू, चणा, पालेभाज्या यासह अन्य कडधान्याची शेती, सोबतच टरबूज, खरबूज यांनाही याचा फटका बसला आहे. मृत्यू झालेल्या दोघांमध्ये एक लाखांदूर तालुक्यातील दोनाड येथील बाबुराव मेश्राम (वय 45 वर्षे) हे असून ते शेतात असताना त्यांच्यावर वीज कोसळली. तर दुसरे जामगाव वळद येथील प्रभू राघोर्ते (वय 60 वर्षे) यांच्या अंगावर शेतातील झाड कोसळल्याने त्यात दबून त्यांचा मृत्य झाला. पवनी तालुक्यातील कुर्झा इथे वीज कोसळल्याने पाच शेळ्यांचा मृत्यू झाला.

पुन्हा धमकी मिळाल्याने सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली

Salman Khan Security : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला पुन्हा धमक्या आल्याने त्याच्या घराबाहेर सुरक्षा कडक करण्यात आली आहे.  मुंबई पोलीस कर्मचारी गॅलेक्सी या सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर रात्रभर गस्त घालत होते. तसंच सलमान खानच्या घराबाहेर पोलीस गर्दी जमू देत नाहीत. सलमान खानला 18 मार्च रोजी एक धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला होता. त्यानंतर सलमान खानच्या मॅनेजरने मुंबईच्या वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित ब्रार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वरळी सीफेसजवळ कारने उडवल्याने महिलेचा मृत्यू, मॉर्निंग वॉक करणांऱ्याची आंदोलनाची हाक, कारवाईबाबत माहिती देण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आंदोलकांचा घेराव

Mumbai News : मुंबईचा वरळी सीफेसजवळ काल मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका महिलेला भरधाव कारने जोरदार धडक दिली. यात या महिलेचा मृत्यू झाला आहे, याप्रकरणी मॉर्निंग वॉक करणाऱ्या मंडळीने आज सकाळी दादर शिवाजी पार्क ते वरळी पोलीस स्टेशनपर्यंत आंदोलनाची हाक दिली होती. मात्र या अपघात प्रकरणी आंदोलकांना कारवाई बद्दल माहिती देण्यासाठी पोलीस शिवाजी पार्क परिसरात पोहोचले. मात्र यावेळी आंदोलकांनी सुरक्षेबाबत प्रश्न विचारत पोलिसांना घेराव घातला. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


मुंबईसह राज्यात अवकाळीचा कहर सुरुच, शेती पिकांचं नुकसान


Unseasonal Rain : सध्या राज्यात अवकाळी पावसानं (Unseasonal Rains) जोर कायम आहे. राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली. दरम्यान, या  अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेकऱ्यांची (Farmers) पिकं जमिनदोस्त झाली आहेत. सध्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. 


पुन्हा कोरोनाचा वाढता धोका, आरोग्य मंत्रालयाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी


New Corona Guidelines : देशात एकीकडे H3N2 विषाणूचा (H3N2 Influenza) संसर्ग वाढत असतना दुसरीकडे पुन्हा एकदा कोरोना विषाणूनं (Coronavirus) डोकं वर काढलं आहे. कोविडच्या (Covid19) रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचने कोरोनाचा वाढता धोका पाहता नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मंत्रालयाने सांगितलं आहे की, पाच दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. बॅक्टेरियल एन्फेक्शन (Bacterial Infection) झाल्याची शंका असल्यास अँटीबायोटिकचा वापर करु नये. 


सरकारी कर्मचारी संपाचा आज सातवा दिवस


राज्यातील सरकारी, निमसरकरी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठीचा संप आणखी तीव्र करणार, या आठवड्यात संपाचा पुढच्या टप्यातील कार्यक्रम संघटनांकडून जाहीर संपाचा 7 दिवस असून सरकार कडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने 18 लाख संपकऱ्यांनी आपला संप अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून संघटनांनी पुढील आठवड्याचा संपाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सोमवारी राज्यातील शाळांमध्ये कॉलेज,कार्यलयामध्ये थाळीनाद आंदोलन करत सरकारच्या मागणी संदर्भातील नकारात्मक भूमिकेचा धिक्कार केला जाणार आहे. त्यानंतर 23 मार्च काळा दिवस पाळला जाणार आणि 24 मार्च माझे कुटुंब माझी पेन्शन अभियान राज्यभर राबविले जाणार आहे. 


विधीमंडळ अधिवेशनाचा शेवटचा आठवडा


अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु होत आहे. अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावरती चर्चा आणि उत्तर होईल. मुंबईच्या चर्चेवर सत्ताधारी आमदारांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावर नगरविकास विभागाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उत्तर देतील. यावेळी सत्ताधारी आमदारांनी अनेक मुद्यांवर चौकशीची मागणी केली आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात 62 हजार 480 हेक्टर वरील पिकांचं अवकाळी मुळे नुकसान झाला आहे. तर पावसामुळे आतापर्यंत सहा लोकांचा मृत्यू झाला असून 36 जण जखमी झाले आहेत. आत्तापर्यंत 76 जनावरे देखील या अवकाळी पावसामुळे दगावले आहेत. आता विरोधकांकडून लवकरात लवकर पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत करावी आणि दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. या मुद्द्यावरुन सभागृहात आज गोंधळ होण्याची शक्यता आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.