Maharashtra News LIVE Updates : देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर..

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Feb 2024 03:23 PM
Sushma Andhare : अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस यां दोघांची हत्या झाल्याचा सुषमा अंधारे यांना संशय

Sushma Andhare : मॉरिशने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही गोळी झाडून आत्महत्या केल्याचा प्रकार घडल्यानंतर आता याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी मोठे वक्तव्य केलं असून अभिषेक घुसाळकर आणि मॉरिस या दोघांचीही कुणीतरी हत्या केली असावी असं म्हणत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे

शरद पवार काँग्रेसच्या काळात सीबीआयला पोपट बोलायचे, आता तेच ईडीवरून टीका करतायेत' : दीपक केसरकर

Deepak Kesarkar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), भाजपावर सडकून टीका केली. भाजपाकडून सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यावर मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. दीपक केसरकर म्हणाले की, ज्यावेळी काँग्रेसचे (Congress) सरकार होते तेव्हा सीबीआयला पोपट बोलायचे आणि आता तेच शरद पवार इडीवरून (ED) टीका करत आहेत. त्यांनी आधी उमेदवारी जाहीर करावी. मग आम्ही बघू काय करायचे, असे ते म्हणाले. 

Bhiwandi Crime : भिवंडीत नकली बंदुकीने दहशत माजवण्याचा प्रयत्न; पोलिसांनी परस्पर गुन्हे दाखल करत बंदूक केली जप्त

Bhiwandi Crime : सध्या राज्यात गोळीबाराच्या घटनेमुळे दहशतीचे वातावरण ताजी असतानाच भिवंडी शहरातील ठाणगे आळी परिसरात दोघां तरुणांमध्ये एका जुन्या वादातून  हाणामारी झाल्याच्या घटनेनंतर हवेत गोळीबार झाल्याची घटनेची महिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. लगेचच बंदूक हिसकावून घेण्यात आले मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलिसांनी दोन्ही गटांच्या तरुणांवर अदखल पात्र गुन्हा दाखल करत बंदूक जप्त केली व त्यानंतर पोलिसांच्या लक्षात आले की ही बंदूक असली नसून नकली बंदूक (एअरगन) आहे. सध्या पोलिसांनी ही एअर बंदूक देखील जप्त केले आहे. 

Sharad Pawar: शरद पवारांनी योगी आदित्यनाथांचा दावा खोडून काढला, म्हणाले, समर्थ रामदास शिवरायांचे गुरु नाहीत

पुणे: समर्थ रामदास स्वामींच्या मार्गदर्शनामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करता आले, असे वक्तव्य करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले. काही लोक वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, खरा इतिहास काय आहे, तो जगाला माहिती आहे. आमच्यादृष्टीने राजमाता जिजाबाई याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) मार्गदर्शक होत्या, असे शरद पवार यांनी म्हटले. ते रविवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.


योगी आदित्यनाथ हे रविवारी आळंदीत आले होते. यावेळी त्यांनी समर्थ रामदास स्वामींच्या मार्गदर्शनामुळे शिवरायांना पुढील कार्य करता आले, असे त्यांनी म्हटले. याविषयी शरद पवार यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, आमच्यादृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामध्ये राजमाता जिजामात यांचे योगदान आहे. जिजाबाईंनीच शिवाजी महाराजांच्या आयुष्याला दिशा दिली. पण जिजाबाईंनी केलेले कर्तृत्त्व बाजुला सारुन त्याचे श्रेय आणखी कोणाला देण्याची भूमिका काही लोक घेत आहेत. पण शिवाजी महाराजांचं स्वत:चं कर्तृत्व, जिजाबाईंचे मार्गदर्शन यामुळे सगळा इतिहास घडला, हे सगळ्या जगाला माहिती आहे, असे शरद पवार यांनी म्हटले. 

Ajit Pawar In Pimpri : सारखं मुख्यमंत्री-मुख्यमंत्री करु नका; अजित पवारांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले, म्हणाले बाबांनो...

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा युवा मिशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं.  आपल्याला विकासावर लक्ष द्यायचं आहे. लाथ मारेल तिथं पाणी काढण्याची धमक ज्यांच्यात असते तो खरा युवक असतो. आज जग बदलत आहे, आपल्याला हा आमूलाग्र बदल स्वीकारायला लागणार आहे, असा सल्ला अजित पवार यांनी यावेळी तरुणांना दिला. त्यासोबतच अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं स्वप्न आहे असं म्हणाऱ्यांचे अजित पवारांनी कान टोचले. जरा कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री मुख्यमंत्री करू नका. आधी संघटन बांधू, ते मजबूत करू, असंही ते म्हणाले.

Uddhav Thackeray : मोदींना मतं हवीत म्हणून हवं त्यांना भारतरत्न देत आहेत, उद्धव ठाकरेंचा भारतरत्न पुरस्कारावरून गंभीर आरोप

Uddhav Thackeray : नुकताच देशातील 3 दिग्गजांना भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna) जाहीर झाला. याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) ट्विट करून दिली होती. यावरून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतं हवीत म्हणून हवं त्यांना भारतरत्न देत आहेत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटंलय. मुंबईत सुरू असलेल्या ठाकरे गटाच्या स्थानिय लोकाधिकार समिती अधिवेशनातून ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी राज्यातील गोळीबार प्रकरणावरून राज्य सरकारवर देखील निशाणा साधला आहे. 

Richest person world : जगातील सर्वात जास्त श्रीमंतांच्या यादीत अबुधाबीचे प्रिन्स मोहम्मद बिन जायद अल नाहयान

Richest person world :  जगातील सर्वात जास्त श्रीमंतांच्या यादीत अबुधाबीच्या राजघराण्याचे प्रिन्स मोहम्मद बिन जायद अल नाहयान (Mohammed bin Zayed Al Nahyan) यांनी आघाडी घेतली आहे. ते जगातील सर्वात मोठे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी अनेक दिग्गजांना मागे टाकलं आहे. अल नाहयान यांनी जेफ बेझोस आणि वॉरन बफे यांना मागे टाकलं आहे. त्यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे? जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

Pune Crime : पुण्यात 55 वर्षीय आईचा मुलाकडून निर्घृण खून, खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धक्कादायक घटना

Pune Crime : पुण्यातील खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धक्कादायक घटना..


55 वर्षीय आईचा निर्घृण खून


करदार मुलगा ज्ञानेश्वर पसार.


घराला लॉक करून मुलाचे पलायन.


सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत..

Yavatmal Rain : गारपिटीने शेतकरी पुन्हा संकटात

Yavatmal Rain : यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यात काल झालेल्या गारपिटीने चना, तूर आणि गहू या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील गोंदळी, मुबारपूर, एरंनगाव येरणगाव, विरखेड, वाढखेड गवंडी गावांतील पिकांना गारपिटीचा चांगलाच फटका बसला आहे. या तालुक्यातील जवळपास 3 हजार हेक्टर वर पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यावर्षी सुरवातीला खरिपात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कपाशी आणि सोयाबीन याचे नुकसान झाले होते. तर रब्बी हंगामातील चना आणि गहू काढणीला येत असताना गारपीट झाले. आजपर्यंत खरिपातील पिकविमाचे मदत मिळाली नसून आता आलेल्या या संकटामुळे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे।

उद्धव ठाकरेंपाठोपाठ अमित शाहा संभाजीनगरच्या दौऱ्यावर; लोकसभा निवडणुकीचा नारळ फोडणार

Chhatrapati Sambhaji Nagar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून, महत्वाच्या नेत्यांचे दौरा देखील वाढले आहे. दरम्यान, मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शाह (Amit Shah) यांचे एकापाठोपाठ दौरे असणार आहे. 12 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे तर 15 फेब्रुवारीला अमित शाह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा करणार आहे. विशेष म्हणजे अमित शाह यांची शहरातील मराठवाडा संस्कृतीक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा देखील होणार आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फोडले जाणार असल्याची चर्चा आहे

Ganpat Gaikwad : गणपत गायकवाड यांचा वाहनचालक रंजित यादवला ठाणे गुन्हे शाखेने केली अटक, उल्हासनगर कोर्टात करणार हजर

Ganpat Gaikwad : गणपत गायकवाड यांचा  वाहनचालक रंजित यादवला ठाणे क्राईम ब्रांचने अटक केली.


आज उल्हासनगर कोर्टात करणार हजर


उल्हासनगर हिललाइन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी 


गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड या गुन्ह्यात असल्याने त्याला रात्री ठाणे क्राईम ब्रांचने अटक केली आहे 


वैभव गायकवाड याल आज उल्हासनगर कोर्टात पोलीस करणार हजर

Bhandara Rain : भंडाऱ्यात 300 ग्रॅम वजनाची गारपीट, शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकरी झाला हवालदिल

Bhandara Rain : भंडारा जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पावसासह 300 ग्रॅम वजनाची गारपीट झाली. यात मोठ्या प्रमाणात शेत पिकांचं नुकसान झालं आहे. भंडाऱ्याच्या पहेला क्षेत्रातील चोवा, नवरगाव आणि परिसरातील गावातील नागरिकांना या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. या अवकाळी पावसानं रब्बी हंगामातील गहू, चणे, यासह पालेभाजी पिकांना मोठा फटका बसला आहे. टोमॅटो, वांगी पिकं गारपीटमुळं अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत. तर, काही कौलारू घरांनांही नुकसानीचा सामना करावा लागला आहे. या अवकाळी पावसामुळं शेतकरी पुरता हतबल झाला आहे. 

Kolhapur : संभाजीराजे यांचा भावी मुख्यमंत्री असा कार्यकर्त्यांकडून उल्लेख, मोठ्या संख्येने कार्यकर्ते कोल्हापूरात दाखल

Kolhapur : संभाजीराजे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख 


वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी गाड्यांवर लावले पोस्टर


संभाजीराजे यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते भवानी मंडपामध्ये दाखल


नाशिक जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर संभाजीराजेंचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख

Anil Desai : मुंबईत चित्र होतं ज्यात उद्योग परप्रांतीयांचं होतं, ठाकरे गटाचे अनिल देसाई यांचं वक्तव्य

Anil Desai : स्थानिक लोकाधिकार समिती ही चळवळ मुंबईत स्थानिकांच्या रोजगारासाठी सुरु केली होती. मुंबईत चित्र होतं ज्यात उद्योग परप्रांतीयांचं होतं. नोकऱ्यांवर देखील दक्षिणेतील लोकांचा कब्जा होता. शिवसेना प्रमुखांनी स्थापन केलेली ही संघटना सर्व व्यवस्थापनात दिसेल. मराठी माणूस आणि तरुण तरुणीजवळ कोणताही वशिला नव्हता. आता तरुण तरुणींना त्यांचे स्थान मिळायला लागले आहेत. असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी केलाय

Buldhana : खाजगी प्रवाशी बसमधून 60 लाख रुपये असलेली बॅग लंपास, सीसीटीव्हीतून प्रकार समोर

Buldhana : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नांदुरा ते मलकापूर दरम्यान अमरावतीहून सुरत कडे जाणाऱ्या एका खाजगी बस मधून तीन भामट्यांनी 60 लाख रुपये असलेली बॅग लंपास केल्याची घटना घडली आहे. तरीही बस राष्ट्रीय महामार्गावर एका हॉटेलवर थांबली असताना ही घटना घडली आहे. कुरियर कंपनीच्या माध्यमातून साठ लाख रुपये कॅश असलेली बँक एक व्यक्ती या बसमधून घेऊन जात असताना ही घटना घडली आहे. नांदुरा पोलिसांनी या संदर्भात गुन्हा नोंद केला असून चोरट्यांचा शोध घेत आहे. दरम्यान या बसमधून तीन चोरटे बॅग लंपास करतानाचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

Nashik : येवल्यात आज मराठा आणि ओबीसी यांची संयुक्त भाईचारा परिषद
Nashik Update : माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेचे आयोजन... 

ओबीसी व मराठा समाजातील सलोखा निर्माण करण्यासाठी परिषद ; आयोजकांची माहिती..

परिषदेला मराठा, ओबीसी भटके, विमुक्त , बारा बलुतेदार समाजातील विचारवंत उपस्थितीत राहणार..

भाईचारा परिषदेसाठी येवला निवडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या...

ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांचा येवला हा मतदारसंघ..

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी मराठा भाईचारा परिषदेस आले महत्व.
Buldhana : भाजपा आमदार संजय कुटे यांच्या विरोधात तामगाव पोलिसात तक्रार दाखल.

Buldhana : विकास कामांच्या भूमिपूजन समारंभात संग्रामपूर तालुक्यातील दलित महिला सरपंचांचा तुच्छ लेखून अवमान करणे आता भाजपा आ.संजय कुटे यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली असून आ.संजय कुटे यांच्या विरोधात महिला सरपंच इंगळे यांनी तक्रार दाखल केली आहे . या तक्रारीत डॉ.संजय कुटे यांनी मी दलित असल्याने माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली आहे अस सौ.इंगळे यांनी म्हटल आहे. त्यामुळे आता बुलढाणा पोलिस काय भूमिका घेतात..? आ.कुटेंवर गुन्हा दाखल होणार...? हे बघणे महत्त्वाचं आहे. दरम्यान आता जिल्हाभरात दलित संघटना , सरपंच संघटना व अनेक सामाजिक संघटना एकवटल्या असून आ.संजय कुटे यांचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे.

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस, उपचार घेण्यास दिला नकार

Manoj Jarange : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकारने काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे (Manoj Jarange) अमरण उपोषणाला बसले आहेत. कालपासून (10 फेब्रुवारी) मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarathi) आपलं उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंतचे सर्वात कठोर उपोषण करणार असल्याचे देखील जरांगे यांनी म्हटले आहे. 

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस, उपचार घेण्यास दिला नकार

Manoj Jarange : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकारने काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे (Manoj Jarange) अमरण उपोषणाला बसले आहेत. कालपासून (10 फेब्रुवारी) मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarathi) आपलं उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंतचे सर्वात कठोर उपोषण करणार असल्याचे देखील जरांगे यांनी म्हटले आहे. 

Pakistan Election : पाकिस्तानमध्ये पुन्हा होणार निवडणुका? निवडणूक आयोगाने काय निर्देश दिले? जाणून घ्या

Pakistan Election : पाकिस्तानमध्ये (Pakistan) गुरुवारी सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या, मतमोजणीही सुरू झाली. या निवडणुकांचे निकाल शुक्रवारी (Pakistan Election Result) सकाळपर्यंत उपलब्ध होतील, अशी अपेक्षा होती परंतु अद्याप निकाल जाहीर झालेला नाही. यामुळे पाकिस्तानातील नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण आहे. इथल्या मतदानादरम्यान अनेक ठिकाणी हिंसक चकमकीही पाहायला मिळाल्या. काही लोकांनी मतदान साहित्य हिसकावून त्याची नासधूस करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उमेदवार तसेच मतदारांकडून करण्यात आला. लोकांच्या या समस्यांची दखल घेत पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (Pakistan Election Commission) या मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचे निर्देश दिले आहेत.

Abdul Sattar : अब्दुल सत्तारांची पुन्हा अडचण वाढणार?, एकाच वेळी पाच फौजदारी तक्रारी दाखल; काय आहे प्रकरण?

Chhatrapati Sambhaji Nagar News : नेहमी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहणारे अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण सत्तार यांच्या विरोधात एकाच वेळी पाच फौजदारी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नसून, पोलिसांकडून तक्रारीची प्राथमिक चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. कृषी प्रदर्शन भरवण्यासाठी जमिनी सपाटीकरण करून त्यावर अवैधरीत्या ताबा केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. 

Mumbai Local MegaBlock: रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, माटुंगा ते ठाणे धीम्या मार्गावर, तर सांताक्रूझ ते गोरेगाव जलद मार्गावर ब्लॉक

Mumbai Local MegaBlock Updates: आज तुम्ही घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल आणि मुंबई लोकलनं (Mumbai Local News Updates)  प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच. घराबाहेर पडण्यापूर्वी सर्वात आधी मुंबई लोकलचं वेळापत्रक (Mumbai Local Timetable) पाहा आणि प्रवासाचं नियोजन करा. रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे, तर सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे.

MHADA : म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला; सविस्तर जाणून घ्या

MHADA Konkan Division Houses Lottery : आता सर्वसामान्य नागरिक तसेच कोकणवासीयांच्या घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. याचे कारण म्हाडा कोकण गृहनिर्माण मंडळाच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात ही सोडत काढली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 

Maharashtra Weather : आजही राज्यातील 'या' भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, पुढील 3 ते 4 दिवस 'या' जिल्ह्यांना पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update : आजही राज्यातील विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची (Rain In Maharashtra) शक्यता पुणे हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील काही भागात थंडी आता गायब होऊ लागली असून आता उकाडा जाणवू लागला आहे. दरम्यान, शनिवारी राज्यातील विदर्भातील काही भागांमध्ये गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 3 ते 4 दिवस विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : महाराष्ट्रातील काही भागात थंडी आता गायब होऊ लागली असून आता उकाडा जाणवू लागला आहे. आजही राज्यातील विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता पुणे हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे. आता सर्वसामान्य नागरिक तसेच कोकणवासीयांच्या घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. याचे कारण म्हाडा कोकण गृहनिर्माण मंडळाच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात ही सोडत काढली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.