Horoscope Today 24 January 2025 : पंचांगानुसार, आज 24 जानेवारी 2025, शुक्रवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष (Aries Horoscope Today)


आज थोडी धडधड वृत्ती ठेवल्यामुळे अपेक्षेइतके यश मिळणार नाही.


वृषभ (Taurus Horoscope Today)


विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. व्यवसायात कामाची खूप धांदल उडेल. 


मिथुन (Gemini Horoscope Today)


आज कामामुळे थोडा थकवा जाणवेल. आरामात दोन-चार दिवस घालवावे असा मोह होईल.


कर्क (Cancer Horoscope Today)


आज अजिबात स्वस्त बसवणार नाही. तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये धोरणी आणि व्यवहारीपणा दिसेल. 


सिंह (Leo Horoscope Today)


पारंपरिक विचारांना झुगारून दिल्यामुळे जवळच्या माणसांना तुम्ही विक्षिप्त वाटण्याची शक्यता आहे.


कन्या (Virgo Horoscope Today)


संतती संबंधी काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.


तूळ (Libra Horoscope Today)


महिला पुढील काल्पनिक गोष्टींची उगीच चिंता करतील.


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)


एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याची आवड राहील.


धनु (Sagittarius Horoscope Today)


आज कोणतेही काम करताना एक ना धड भाराभार चिंध्या अशी अवस्था होऊ नये याची काळजी घ्या.


मकर (Capricorn Horoscope Today)


कुटुंबामध्ये कोणताही निर्णय घेताना सारासार विचार ठेवणे आवश्यक राहील.


कुंभ (Aquarius Horoscope Today)


राजकारणातील व्यक्तींना आपली मते समाजात रुजवण्याच्या वेगवेगळ्या संधी येतील.


मीन (Pisces Horoscope Today)


आज म्हणावे असे यश पदरात पडणार नाही. महिलांनी तटस्थ भूमिका ठेवणे चांगले राहील.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117         


हेही वाचा: 


Shani Asta 2025 : पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार