Bapu Andhale Case : बीडच्या परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे (Bapu Andhale Case) यांच्यावर 29 जून 2024 रोजी गोळीबार करण्यात आला होता. परळी (Parli News) शहरातील बँक कॉलनी परिसरात हा थरार घडला होता. या घटनेत बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. आता या प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराडवर (Walmik Karad) गंभीर आरोप केलाय.
बापू आंधळे खून प्रकरणावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Faction) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आज एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ज्यात 29 जून 2024 रोजी महादेव गित्ते याच्यावर वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आलाय. तर जखमी इसमाचा अंबाजोगाई मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत असतानाचा व्हिडिओ देखील आव्हाडांनी शेअर केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे यांचा 29 जून 2024 ला गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. जुन्या वादातून त्यांची हत्या करण्यात आली होती. परळी शहरामधील बँक कॉलनी भागात त्यांच्यावर गोळीबार झाला होता. या प्रकरणामध्ये बबन गित्ते, मुकुंद गित्ते, महादेव गित्ते, राजाभाऊ निहरकर आणि राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर परस्पर विरोधी नोंदवण्यात आलेल्या तक्रारीमध्ये मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणात वाल्मिक कराडचा तपासात सहभाग आढळत नाही, म्हणून तपास अधिकाऱ्याने वाल्मिक कराडचे नाव या गुन्ह्यातून कमी केले होते. मात्र आता जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटनंतर या प्रकरणात नवा ट्विस्ट आल्याचे दिसून येते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Walmik Karad Audio Clip : सनीला गुतवू नका, वाल्मिक कराडचा PI ला फोन, कथित ऑडिओ क्लिपमध्ये काय काय?