एक्स्प्लोर

Maharashtra News Updates: शिवसेना कुणाची? केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी LIVE

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates:   शिवसेना कुणाची? केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी LIVE

Background

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.

शिवसेना कुणाची, धनुष्यबाण चिन्ह कुणाला? या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणीची दुसरी फेरी मंगळवारी झाली होती. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेनेत फूट पडलीच नसल्याचा दावा करत सध्या दाखवण्यात येणारे चित्र कपोलकल्पित असल्याचा दावा केला. शिंदे गटाने दिलेली शपथपत्रे खोटी असून या सर्वांची ओळखपरेड घ्या, तरच सत्यता समोर येईल, असेही आयोगाला सांगितले. शिंदे गटातील 7 जिल्हाप्रमुखांच्या शपथपत्रावरही आक्षेप नोंदवला. यात विजय चौगुले, राजाभाई केणी, चंद्रकांत रघुवंशी, किरसिंग वसावे, नितीन मते यांच्यासह आणखी दोघांचा समावेश आहे. इतर पदांवर कार्यरत असतानाही या नेत्यांना जिल्हाप्रमुखपदी दाखवण्यात आल्याचे सिब्बल यांनी सांगितले.  10 जानेवारी रोजी झालेल्या पहिल्या सुनावणीत शिंदे गटाचे अॅड. महेश जेठमलानी यांनी उद्धव ठाकरेंचे पक्षप्रमुखपदच बेकायदा आहे. आमच्याकडे आमदार, खासदारांचे बहुमत असल्याने शिंदेंचाच पक्ष खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता. हा दावा खोडून काढताना अॅड. सिब्बल म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा पक्षच खरी शिवसेना आहे. शिंदे गटाचे आमदार, नेते काही लोकांना बाहेर घेऊन स्वत:हून बाहेर पडले आहेत. ते बेकायदा आहेत. त्याचा शिवसेनेवर काहीही परिणाम झालेला नाही. यातील काही आमदारांवर अपात्रतेचा खटला सुरू आहे. दरम्यान, आज पुन्हा यावर सुनावणी होणार आहे.

आजपासून मेट्रो 7 आणि मेट्रो 2 ए चा मार्गावरील मेट्रो सुरु 

आजपासून मेट्रो 7 आणि मेट्रो 2 अ चा मार्गावरील मेट्रो खऱ्या अर्थाने सुरु होणार आहे. दुपारी 3 नंतर ही मेट्रो सुरु होईल, अशी माहिती मिळाली आहे. मेट्रो 7 चा मार्ग आणि स्थानकं - या मेट्रो मार्गावर 13 स्टेशनवर थांबा असणार आहे. जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव पूर्व, आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठाणे, देवीपाडा, नॅशनल पार्क, ओवरीपाडा इथे मेट्रो मार्ग थांबेल. मेट्रो 2 ए मार्गावर अंधेरी पश्चिम, ओशिवारा, लोअर ओशिवरा, गोरेगाव पश्चिम, पहाडी गोरेगाव, लोअर मालाड, मालाड पश्चिम, वनराई, डहाणूकरवाडी, कांदिवली पश्चिम, पहाडी एकसर, बोरिवली पश्चिम, खंडारपाडा, आनंदनगर, दहिसर पश्चिम, मांडपेश्वर ही स्टेशन आहेत.

ब्रिजभूषण शरणसिंग यांच्याविरोधात आजही पैलवानांच आंदोलन 

दिल्ली – भारतीय कुस्ती महासंघाविरोधात पैलवानांच आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू होतं. बुधवारी क्रीडा मंत्रालयाच्या सचिवांसोबत आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंची चर्चा झालीय. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंग यांना हटवलं जात नाही तोपर्यंत जंतरमंतरवर आंदोलन सुरु राहणार असल्यांच पैलवानांनी सांगीतलय. आज पुन्हा सकाळी 10 वाजता आंदोलनाला सुरवात होणार आहे. हिमाचल प्रदेशचे सर्व कार्यक्रम रद्द करून केंद्रिय क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर दिल्लीत पोहचलेत. 

संजय राऊत आज भारत जोडो यात्रेत सहभागी होणार

जम्मू –संजय राऊत राहुल गांधी सोबत आज भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे.

20:26 PM (IST)  •  20 Jan 2023

शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकाच मंचावर?

Pune : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46 वी सर्वसाधारण सभा पुण्याजवळील मांजरी येथील संस्थेच्या आवारात आयोजित करण्यात आली आहे.  या सभेला संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकारमंत्री अतुल सावे, विरोधी पक्ष नेते अजित पवार, संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह राज्याच्या साखर उद्योगातील नेते हजेरी लावणार आहेत.  यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे 2021 - 2022 या वर्षासाठी सर्वोत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. राज्याच्या साखर उद्योगात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही मध्यवर्ती संस्था म्हणून काम करते.

20:02 PM (IST)  •  20 Jan 2023

परभणीत कर सल्लागार आणि सीए संघटनांचं आंदोलन

मागच्या 23 महिन्यांपूर्वी परभणीत कार्यरत असलेले आयकर विभाग कार्यालय अचानक पणे कुठलेही कारण नसताना हिंगोलीला हलवण्यात आले होते या निर्णया विरोधात परभणीत कर सल्लागार आणि सीए संघटनांनी विविध आंदोलन करून केंद्रीय अर्थमंत्र्यां पर्यंत या आवाज उठवला ज्याचे फलित आज झाले असुन 23 महिन्यानी पुन्हा एकदा आयकर कार्यलय परभणीत सुरू झाले ज्यामुळे कर सल्लागार संघटना आणि सीए संघटनांनी आज कार्यलयासमोर फटाके फोडून,पेढे वाटत आनंद साजरा केलाय...

19:37 PM (IST)  •  20 Jan 2023

Thackeray Vs Shinde Live: धनुष्यबाण कुणाचा? सोमवारी लेखी उत्तर सादर करावं, आयोगाच्या दोन्ही गटाला सूचना, सोमवारी पुढील सुनावणी

Thackeray Vs Shinde Live: धनुष्यबाण कुणाचा? सोमवारी लेखी उत्तर सादर करावं, आयोगाच्या दोन्ही गटाला सूचना, सोमवारी पुढील सुनावणी https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-news-live-updates-maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-twentieth-january-2022-today-sunday-marathi-headlines-political-news-mumbai-news-national-politics-news-maharashtra-live-updates-1143331

19:13 PM (IST)  •  20 Jan 2023

Thackeray Vs Shinde Live: धनुष्यबाण कुणाचा? आज दोन्ही गटाचे युक्तिवाद संपणार मात्र निकाल राखून ठेवण्याची शक्यता

Thackeray Vs Shinde Live: धनुष्यबाण कुणाचा? आज दोन्ही गटाचे युक्तिवाद संपणार मात्र निकाल राखून ठेवण्याची शक्यता
 
#ShivSena #Maharashtra https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-news-live-updates-maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-twentieth-january-2022-today-sunday-marathi-headlines-political-news-mumbai-news-national-politics-news-maharashtra-live-updates-1143331
 
18:52 PM (IST)  •  20 Jan 2023

Thackeray Vs Shinde Live: तीन तासांनंतर ठाकरे गटाचा युक्तिवाद संपला, शिंदे गटाकडून महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Kalyan : बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 9 PM : 23 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 23 December 2024 ABP MajhaVinod Kambli Health : विनोद कांबळी भिवंडीतल्या आकृती रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरूMaharashtra : लाडकी बहीण योजनेबाबत चिंता; राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आढावा अहवाल RBI कडून प्रसिद्ध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Kalyan : बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
Mhada Lottery 2024: मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
Shukra Gochar : 2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
आशयघन सिनेसृष्टीचा चेहरा हरपला, प्रायोगिक चित्रपट चळवळीचा खंदा पाईक काळाच्या पडद्याआड; श्याम बेनेगल कालवश
आशयघन सिनेसृष्टीचा चेहरा हरपला, प्रायोगिक चित्रपट चळवळीचा खंदा पाईक काळाच्या पडद्याआड; श्याम बेनेगल कालवश
Embed widget