Maharashtra News Updates: राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आज काश्मीरमध्ये समारोप, श्रीनगरच्या शेरे-काश्मीर मैदानाक काँग्रेसची जाहीर सभा.
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.
शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाच्या लढाई संदर्भात आज महत्त्वाचा दिवस. दोन्ही बाजूंचे प्रत्यक्ष युक्तिवाद संपल्यानंतर लेखी युक्तीवादासाठी आज शेवटचा दिवस आहे. शिवाय विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगर समारोप होणार आहे. श्रीनगरच्या शेर-ए- कश्मीर मैदानातील सभा घेऊन यात्रेचा समारोप होईल.
शिवसेनेच्या चिन्हासंदर्भात लेखी युक्तीवाद
शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाच्या लढाई संदर्भात आज महत्त्वाचा दिवस. दोन्ही बाजूंचे प्रत्यक्ष युक्तिवाद संपल्यानंतर लेखी युक्तीवादासाठी आज शेवटचा दिवस आहे. मागील वेळी सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंनी पक्षाच्या घटनात्मक मुद्द्यांवर एकमेकांवर आरोप केले होते. त्यानंतर 30 तारखेपर्यंत आपलं म्हणणं मांडण्यासाठी आयोगानं मुदत दिली होती. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाकडून आज निवडणूक आयोगात लेखी स्वरूपात काय काय मुद्दे मांडले जाणार आहेत.
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी मतदान
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. 2 फेब्रुवारीला मतमोजणी होईल.
बंजारा समाजाचा महाकुंभ मेळावा
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोदरी गावामधील बंजारा समाजाच्या महाकुंभ मेळाव्याचा आज मुख्य दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडवणीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, योग गुरु रामदेव बाबा हे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा श्रीनगरमध्ये समारोप
पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगर समारोप होणार आहे. श्रीनगरच्या शेर-ए- कश्मीर मैदानातील सभा घेऊन यात्रेचा समारोप होईल. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सकाळी 10 वाजता राष्ट्रीय ध्वज फडकवतील. सकाळी 11.30 वाजता सभेला सुरुवात होईल. काँग्रेसकडून विरोधी पक्षातील 21 पक्षांना कार्यक्रमात सहभागी होण्याची निमंत्रण देण्यात आलंय.
मुंबईत चोवीस तासासाठी पाणीपुरवठा बंद
मुंबईत आज चोवीस तासासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर 4 फेब्रुवारीपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. पश्चिम आणि पूर्व उपनगरात पाणी पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे.
मुंबईत सर्व पक्षीय खासदारांची बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज सर्व पक्षीय खासदारांची बैठक बोलावली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक होणार आहे.
सचिन वाझेंच्या अर्जावर सुनावणी
माजी पोलिस अधिकारी सचिन वाझेनं जामीनसाह काहा कागदपत्रांची मागणी करत विशेष एनआयए कोर्टात दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी होणार आहे.
राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर
मुंबई विद्यापीठ तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतंत्र निवड समित्या गठीत केल्या आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डी पी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठाची कुलगुरु निवड समिती गठीत करण्यात आली आहे, तर अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ अनिल सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकरिता कुलगुरु निवड समिती जाहीर करण्यात आली आहे. आयआयटी वाराणसीचे संचालक प्रा. प्रमोद कुमार जैन, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये तसेच हैद्राबाद येथील इंग्रजी व परकीय भाषा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुरेश कुमार (युजीसी प्रतिनिधी) हे मुंबई विद्यापीठ कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य असतील. तर, आयआयटी कानपुरचे संचालक डॉ अभय करंदीकर, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिपक कपूर तसेच कर्नाटक राज्य महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ मीना चंदावरकर (युजीसी प्रतिनिधी) हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य असतील.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ दिनांक १० सप्टेंबर २०२२ रोजी सपंल्याने विद्यापीठाचे कुलगुरुपद रिक्त झाले होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. दिंगबर शिर्के यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांचा कार्यकाळ दिनांक १८ मे २०२२ रोजी संपल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ कारभारी काळे यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
Pune News : बँक फसवणुकीशी संबंधित प्रकरणी ईडीकडून अमर मूलचंदानी यांच्याशी संबंधित 10 ठिकाणी छापे; 41 लाख रोख, दोन कोटींचे सोने जप्त
बँक फसवणुकीशी संबंधित प्रकरणी ईडीकडून अमर मूलचंदानी यांच्याशी संबंधित 10 ठिकाणी छापे मारण्यात आले. ईडीने ही कारवाई 27 जानेवारी रोजी केली होती. या कारवाईत पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील अमर मूलचंदानी यांच्याशी कार्यालये, निवासस्थानी शोधमोहीम राबवण्यात आली. या कारवाईत ईडीने 2.72 कोटी रुपयांचे सोने आणि हिऱ्याचे दागिने, सुमारे 41 लाख रुपयांची रोकड, डिजीटल उपकरणे, कागदपत्रे जप्त केली आहेत.
ED has conducted search operation on 27.01.2023 at 10 places at the residences and offices premises of Amar Mulchandani, ex-Chairman of Seva Vikas Co-operative Bank in Pune and Pimpri-Chinchwad in an ongoing investigation under PMLA 2002 relating to the Bank fraud,
— ED (@dir_ed) January 30, 2023
Beed News : नियम डावलून दारूच्या दुकानाला परवाने; त्पादन शुल्क विभागाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रतिकात्मक दारू विक्री आंदोलन
Beed News : बीडमध्ये नियम डावलून दारूच्या दुकानाला परवाने दिले जात असून यामध्ये अनेक हॉटेल चालक हे नियम अटीचे पालन करत नसल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विरोधात बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक दारू विक्री आंदोलन केलं.. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अनेक लोकांना नियम डाउनलोड दारू विक्रीचे परवाने दिले जात आहेत त्याचबरोबर शहरांमधील वाईन शॉप आणि परमिट रूम हॉटेल सालकाकडून अनेक नियमांचे उल्लंघन होत असून अशा लोकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे
Mumbai Fire : मुंबईतील सायन परिसरातील ओम शिव शक्ती इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग
Mumbai Fire : मुंबईतील सायन परिसरातील ओम शिव शक्ती इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागली आहे. लेवल एकची आग आहे.
Navneet Rana : शिवडी न्यायालयाचा नवनीत राणा यांना आणखी एक धक्का, हरभजन सिंग कोर्टाकडून फरार म्हणून घोषित
Navneet Rana : खासदार नवनीत राणा बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी शिवडी न्यायालयाने नवनीत राणा यांना आणखी एक धक्का दिला आहे. नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंग कोर्टाकडून फरार म्हणून घोषित करण्यात आले आहे.