Maharashtra News Updates : सोलापुरात आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांत राडा 

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Nov 2022 11:19 PM
Solapur : सोलापुरात आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांत राडा 

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या सोलापुरातील आगमनापूर्वीच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे आणि उत्तर पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंग पवार यांच्यात वादावादी झाली. दोन्ही पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर गेल्याची माहिती आहे. कालच्या बैठकीत झालेल्या वादावादीचा जाब विचारत आज पुन्हा वादावादी झाली. पोलिसांच्या मध्यस्तीनंतर हा वाद मिटला आहे. 

Nashik : काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी धारदार कोयत्याने कापला केक

काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी धारदार कोयत्याने कापला केक,


कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात खोसकरांचे कृत्य,


दोन दिवसांपूर्वीची ही घटना असून केक कापतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल,


एकीकडे सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे शिंदे- फडणवीस सरकारचे मंत्री अब्दुल सत्तार वादात सापडले असतानाच दुसरीकडे आता काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकरही चर्चेत. 

Ambarnath: अंबरनाथमध्ये एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी फुटली

अंबरनाथमध्ये एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती एमआयडीसी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.

यवतमाळच्या शहर पोलीस ठाण्यात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात तक्रार दाखल

देशातील राजकारणात आपल्या स्वकर्तृत्वावर ठसा उमटवणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी वापरली. यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी लेखी तक्रार शहर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अॅड. क्रांती राऊत यांनी दिली.  पुरोगामी महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यापासून स्त्रियांवर अन्याय वाढत चाललेले आहे. आता तर या सरकारमधील मंत्री महिला खासदारांवर सुद्धा शिवीगाळ करून अपमान करीत आहे. अब्दुल सत्तार हे विसरले आहे की, त्यांनी ही आईच्या पोटातून जन्म घेतला ती सुद्धा एक स्त्री होती. मग अब्दुल सत्तार आपल्या आईला सुद्धा शिव्या देणार का? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. खासदार सुळे यांच्यावर झालेल्या शिवीगाळ बाबत आज शहर पोलीस स्टेशन येथे लेखी रिपोर्ट देण्यात आला आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर कलम 294 तसेच 509 अनुसार गुन्हा नोंद करण्याची मागणी केलेली आहे.

दौंडमधील कुरकुंभ एमआयडीसीतील शोगन कंपनीत स्फोट, तीन जण जखमी 

Pune News Update : दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीतील केमिकल रसायन बनवणाऱ्या शोगन या कंपनीत रिअॅक्टरचा अचानक स्फोट झाला. रिॲक्टरमध्ये पॅराडाईज क्लोराईड हे केमिकल होतं. या केमिकलचा स्फोट झाला आहे.  यामध्ये तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. 


दुपारी तीनच्या दरम्यान कुरकुंभ येथील शोगन या मच्छर प्रतिबंधक तसेच इतरही प्रकारचे रसायन बनवणाऱ्या कंपनीत अचानक आग लागली. तांत्रिक दोषामुळे रिऍक्टरचा स्फोट झाला असून त्यात कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. स्फोटानंतर धुराचे लोट सुरू होते. अग्निशमन दलाने  आग नियंत्रणात आणल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.  

बेळगाव: शहापूर येथील श्री विठ्ठल देवस्थानचा रथोत्सव मानकरी आणि भक्तांच्या उपस्थितीत संपन्न

दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला श्री विठ्ठल मंदिरात काकड आरती प्रारंभ होते आणि त्याची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते. काकड आरतीची सांगता झाल्यावर दरवर्षी रथोत्सव करण्यात येतो. अखंड 370 वर्षांपासून ही रथोत्सवाची परंपरा अखंडितपणे सुरू आहे. 1652 पासून श्री विठ्ठल देवस्थानचा रथोत्सव दरवर्षी केला जातो. रथोत्सवाच्या मार्गावर ठिकठिकाणी सडा घालून स्वागत करण्यात येत होते. रथात विराजमान झालेल्या विठुरायाची आरती करून श्रीफळ देखील वाढवण्यात येत होते. रथ ओढण्यासाठी महिला देखील भक्तिभावाने सहभागी झाल्या होत्या. 

कोल्हापूर : अंगणवाडी मदतनीस महिलेचा अपघाती मृत्यू; कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील घटना

कोल्हापूर : मृत्यूचा सापळा झालेल्या कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील वाकरेनजीक अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अंगणवाडी मदतनीस असलेल्या वैशाली मोरे यांचा अपघाती मृत्यू झाला. वाहनाने धडक दिल्यानंतर त्या रस्त्यावर कोसळल्याने डोक्याला गंभीर मार लागला. अत्यंत गंभीर अवस्थेत त्यांना सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 

Nandurbar News: नंदुरबार बाजार समिती ज्वारी तेजीत, पहिल्यांदाच ज्वारीला 2966 रुपयांचा दर

Nandurbar News: यंदा ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दरवर्षी राज्यभरात ज्वारीला हजार ते पंधराशे रुपये क्विंटल दर मिळत असतो. मात्र यावर्षी ज्वारीचे दर तेजीत असल्याचे चित्र नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत दिसून येत आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती चांगल्या प्रतीच्या ज्वारीला प्रतिक्विंटल 2966 रुपयांचा दर मिळत आहे. हा आजपर्यंतचा सर्वाधिक दर असल्याचे व्यापारी आणि शेतकरी सांगतात. 

Nandurbar News: नंदुरबार बाजार समिती ज्वारी तेजीत, पहिल्यांदाच ज्वारीला 2966 रुपयांचा दर

Nandurbar News: यंदा ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दरवर्षी राज्यभरात ज्वारीला हजार ते पंधराशे रुपये क्विंटल दर मिळत असतो. मात्र यावर्षी ज्वारीचे दर तेजीत असल्याचे चित्र नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत दिसून येत आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती चांगल्या प्रतीच्या ज्वारीला प्रतिक्विंटल 2966 रुपयांचा दर मिळत आहे. हा आजपर्यंतचा सर्वाधिक दर असल्याचे व्यापारी आणि शेतकरी सांगतात. 

बससेवा सुरळीत करा मागणीसाठी बेळगावात विद्यार्थ्यांचा रास्ता रोको
Belgaon News : बससेवा सुरळीत करा या मागणीसाठी हुदली विद्यार्थ्यानी रास्ता रोको करुन दोन तासाहून अधिक काळ वाहतूक रोखून धरली. बेळगावपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या हुदली गावातून दररोज विद्यार्थी आणि नोकरदार बेळगावला जातात.पण बससेवा सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा आणि कॉलेजला जाण्यास उशीर होत आहे. नोकरदार व्यक्तींना देखील कामावर उशिरा गेल्यामुळे आर्थिक फटका बसत आहे. शाळा आणि कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्याना बस वेळेवर मिळत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. बससेवा सुरळीत करावी या मागणीसाठी एसटी खात्याच्या अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांनी भेटून निवेदन दिले आहे. पण अद्याप बससेवा सुरळीत झाली नाही. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आणि नोकरदारांनी रास्ता रोको करून वाहतूक रोखून धरली. त्यामुळे शेकडो वाहने रस्त्यावर दुतर्फा थांबली होती. अखेर एसटीच्या अधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करणाऱ्यांची भेट घेऊन बस वाहतूक सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.
Parshuram Ghat:  केंद्र सरकारतर्फे परशुराम घाटाचे होणार सर्वेक्षण, देशातील नामांकित संस्था करणार पाहणी

Parshuram Ghat:  केंद्र सरकारच्या Tehri Hydro Development Corporation Ltd. (THDCL) या संस्थेद्वारे  परशुराम घाटाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.  डोंगराळ भागातून गेलेल्या घाट रस्त्याचे दोन अभियंत्यामार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पावसाळ्यात घाट खचण्याची कारणे शोधण्यासाठी केंद्र सरकारकडून नव्या उपाय योजना राबवण्यासाठी THDCL संस्थेद्वारे मुंबई गोवा महामार्गावरील घाटाची पाहणी करण्यात आली. पाहणी केल्यानंतर केंद्र सरकारला अहवाल सादर करण्यात आहे.  

Abdul Sattar यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन, साताऱ्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

Satara News :  साताऱ्यातील कोयना येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तारच्या पुतळ्याला जोडे मारो अंदोलन केले. सत्तार यांनी सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल काल केलेल्या अपशब्दांमुळे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी अब्दूल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादीचं बारामतीमधील भिगवन चौकात आंदोलन

Baramati News : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ बारामती येथे राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत भिगवन चौकात आंदोलन केले. यावेळी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी तसेच आंदोलनात गावढ आणून गाढवाच्या गळ्यात अब्दुल सत्तार यांचा फोटो बांधण्यात आला. तसेच यावेळी अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेजोडे मारले तसेच प्रतिमेचे दहन केले तसेच अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. 

Abdul Sattar:  अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याबाबत कारवाईची करा, वकील इंदरपाल सिंह यांची विधानसभा आणि लोकसभा अध्यक्षांकडे मागणी

Abdul Sattar:   मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याबाबत कारवाईची मागणी वकील इंदरपाल सिंह यांनी केली आहे.  वकील इंदरपाल सिंह यांनी विधानसभा आणि लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. तसेच दोन्ही सभागृहाच्या अध्यक्षांनी या घटनेची सुमोटो अंतर्गत तक्रार दाखल करून सत्तारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. वकील इंदरपाल सिंह यांनी अब्दुल सत्तारांविरोधात राष्ट्रीय महिला आयोगातही तक्रार दाखल केली आहे

रिफायनरीशी संबंधित काम सुरू झाल्यास आता चाकरमानी उतरणार मैदानात, मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला निर्णय

Kokan Refinery : कोकणातला रिफायनरी विरोधात दिवसागणिक काही ना काही घडामोडी घडत आहे. त्यामध्ये आणखीन एका घटनेची भर पडली आहे. राजापूर तालुक्यातील  बारसू आणि सोलगाव या ठिकाणी रिफायनरी संबंधित कोणतंही काम सुरू झाल्यास आता मुंबईतील चाकरमानी देखील रस्त्यावरती उतरणार आहेत. यापूर्वी या आंदोलनामध्ये  केवळ गावच्या नागरिकांचा सहभाग असायचा. पण आता आंदोलन झाल्यास त्यामध्ये मुंबईतील चाकरमानी देखील सहभागी होणार आहेत. सध्या राजापूर तालुक्यातील बारसू  - सोलगाव या ठिकाणी रिफायनरीसाठी चाचणी सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणच्या आसपासच्या गावातील मुंबईला नोकरीनिमित्त स्थायिक असलेल्या चाकरमान्यांनी मुंबईमध्ये बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे.

Vile Parle Blast:  विलेपार्ले येथे सिलेंडरचा स्फोट होऊन पाच जण जखमी

Vile Parle Blast:  विलेपार्ले येथे सिलेंडरचा स्फोट होऊन पाच जण जखमी झाले आहेत.  सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.  न्यू कल्पना चाळ, पश्चिम द्रूतगती मार्गाजवळ विलपार्ले पूर्व येथे ही घटना घडली आहे. जखमींवर विरा देसाई रुग्णालयात  उपचार सुरू आहेत.

Beed News:  चॉकलेटच्या गोदामातून दहा लाख रुपयांच्या चॉकलेटची चोरी, दोघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

Beed News:  चॉकलेटच्या गोदामात काम करणाऱ्या दोन नोकरांनीच 10 लाख रुपयांच्या चॉकलेटची चोरी केल्याचा प्रकार अंबाजोगाईमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन्ही नोकराविरोधात शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबाजोगाई येथील व्यावसायिक प्रदीप वाघमारे यांच्या चॉकलेटच्या गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या दोन नोकरांनी गोडाऊनची डुप्लिकेट चावी तयार करून दहा लाख रुपयांच्या चॉकलेटची चोरी केली हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर दोघांवर पाळत ठेवून चोरी करत असताना रंगे हात पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.

Sahitya Sammelan: अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक, 96 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचे नाव ठरणार

Sahitya Sammelan: अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक आज वर्धा येथे होत असून याच बैठकीत 96 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचे नाव ठरणार आहे.  थोड्याच वेळात स्वाध्याय मंदिरात बैठकीला सुरुवात होईल आणि  ज्येष्ठ लेखक व विचारवंत सुरेश द्वादशीवार यांच्यासह उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व वैचारिक लेखनासाठी प्रसिद्ध असलेले नरेंद्र चपळगावकर यांच्यातून कुठले नाव अध्यक्षपदावर येईल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. 

बीडमध्ये मुलीच्या लग्नपत्रिका वाटून गावी परतणाऱ्या पित्याचा अपघातात मृत्यू

Beed News : मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटून परत येणाऱ्या पित्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना परळीत घडली आहे. 52 वर्षाचे सुभाष दीक्षित हे आपल्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटून परळीकडे परत येत असताना कुप्पा गावाजवळ त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सुभाष दीक्षित यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

Har Har Mahadev : ‘हर हर महादेव’ चित्रपटाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे मनसेच्या सर्व प्रवक्त्यांना न बोलण्याचे आदेश

Har Har Mahadev :  ‘हर हर महादेव’ चित्रपटाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे मनसेच्या सर्व प्रवक्त्यांना न बोलण्याचे आदेश दिले आहे.  चित्रपटाकडे चित्रपट म्हणून पाहणं गरजेचं, प्रकरणाला राष्ट्रवादीकडून जातीय रंग दिला जात असल्यानं काहीच न बोलण्याची भूमिका आहे.  चित्रपटाबाबत दिग्दर्शक अभिजित देशपांडेच भूमिका मांडणार आहेत. 

Parshuram Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट चौपदरीकरणाच्या भरावाच्या कामासाठी पुन्हां बंद करणार, ईगल्स इंफ्रा कंपनीची माहिती

Parshuram Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणनजीकचा परशुराम  घाटातील मार्गाचे गेले वर्षेभर काम सुरु आहे.अर्धवट स्थितीत असलेला हा घाट पावसाळ्यात दरडी खाली आल्याने या घाटातील वाहतूक जवळपास महिनाभर बंद करण्यात आली होती. मात्र आता पाऊस उघडल्याने या घाटातील चौपदरीकरणाचा भराव आणि रुंदीकरणाचे काम जलद गतीने व्हावे यासाठी घाटातील वाहतूक काही दिवस बंद ठेवावी लागणार आहे.पर्यायी वाहतूक लोटे-चिरणी-कळबस्ते मार्गाने वळवण्यात येईल, अशी माहिती ईगल्स इंफ्रा कंपनीकडून देण्यात आली आहे.. 

Ratnagiri News : दापोलीतील वादग्रस्त साई रिसाॅर्ट प्रकरणी माजी पालकमंत्री अनिल परब यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली पोलीस स्थानकात भादंवि कलम 34 आणि 420 अंतर्गत या तिघांनी काल रात्री 12 च्या सुमारास गुन्ह्याची नोंद करण्यात आली. अनिल परब यांनी खोटी कागदपत्र सादर करुन शासनाचा महसूल बुडवून फसवणुक केल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. सोबत एफआयआरची कॉपी देखील शेअर केली आहे.

 

 

 

आमदार यशोमती ठाकूर अमरावती जिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभारावर संतापल्या

Amravati News : आमदार यशोमती ठाकूर जिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभारावर संतापल्या. काल सायंकाळी तिवसा तालुक्यात झालेल्या विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू तर 12 जण जखमी झाले. काही जखमींना अमरावती जिल्हा रुग्णालयात आणले. त्यांना पाहण्यासाठी आमदार यशोमती ठाकूर अमरावती जिल्हा रुग्णालयात रात्री दाखल झाल्या. यावेळी रुग्णांची ड्रेसिंग बरोबर झाली नाही. एका बेडवर दोन रुग्णांना ठेवले. त्याचा जाब विचारला असता तिथल्या परिचारिकेने थातूरमातूर उत्तर दिल्याने "तुमच्याने ड्रेसिंग होत नसेल तर मी करते" या शब्दात यशोमती ठाकूर यांनी सुनावलं. आमदार यशोमती ठाकूर यांनी संपूर्ण जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती घेतली आणि स्वच्छता नसल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली.



चंद्रपुरात 35 वर्षीय तरुणाचा भर रस्त्यात निर्घृण खून, जुन्या वादातून हत्या झाल्याचा पोलिसांचा कयास

Chandrapur News : चंद्रपुरात 35 वर्षीय तरुणाचा भर रस्त्यात निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली. चंद्रपूर शहरातील दुर्गापूर भागात ही घटना घडली असून महेश मेश्राम असं मृताचं नाव आहे. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सात ते आठ जणांनी मिळून धारदार शस्त्राने त्याची हत्या केली. धारदार शस्त्राने वार करत तरुणाचं शीर धडावेगळं केलं. मृत महेशची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असल्याने जुन्या वादातून खून झाल्याचा पोलिसांचा कयास आहे. दुर्गापूर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून भर रस्त्यात खून झाल्याने दुर्गापूर परिसरात तणाव आहे.

Chandrapur News:  चंद्रपुरात 35 वर्षीय तरुणाचा भर रस्त्यावर निर्घृणपणे खून

Chandrapur News:  35 वर्षीय तरुणाचा भर रस्त्यावर निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. चंद्रपूर शहरातील दुर्गापूर भागातील घटना घडली आहेय  महेश मेश्राम असं मृतकाचं नाव, रात्री 10.30  च्या सुमारास सात ते आठ जणांनी मिळून धारदार शस्त्राने हत्या केली . धारदार शस्त्राने शीर धडावेगळं केलं.  मृतक महेशची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याने जुन्या वादातून खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दुर्गापूर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले भर रस्त्यात खून झाल्याने दुर्गापूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. 

Guru Nanak Jayanti 2022: गुरुनानक जयंतीनिमित्त वाशीम शहरात सिंधी समाजाकडून भव्य मिरवणूक

Guru Nanak Jayanti 2022: शिख समुदायाचे धर्मगुरू  गुरुनानक  महाराज यांच्या 583 व्या जयंतीनिमित्त वाशिमच्या सिंधी  समाजाच्या वतीने आज सकाळी  सहा वाजता वाजत गाजत  प्रतिमेसह भव्य मिरवणूक काढण्यात  आली.  यामध्ये  मोठ्या  प्रमाणात तरुणाई आणि महिलांनी  डीजेच्या तालावर थिरकत  शहरातील चौका चौकातून मार्गक्रमण केले . आज दिवसभर सिंधी समाजाकडून विविध  सामाजिक धार्मिक उपक्रम देखील राबविण्यात येतात

Bharat Jodo Yatra:  भारत जोडो यात्रेला थोड्याच वेळात सुरूवात होणार

Bharat Jodo Yatra:  राहुल गांधी यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेचा आज पहिला दिवस आहे. अगदी काही वेळातच राहुल गांधी यात्रेला सुरुवात करणार आहेत या ठिकाणी अगदी काही वेळात भारत यात्रा निघणार आहे. त्यापूर्वी भारत जोडो यात्रेतील सहभागी झालेल्या सर्व राज्य पराज्यातील मंडळीच्यावतीने घोषणा देत वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला जातो.  नांदेड जिल्ह्यातील वन्नाळी गावातून अगदी काहीच वेळामध्ये ही भारत जोडो यात्रा सुरू होणार आहे 

Rohit Sharma Injured : इंग्लंडविरोधातल्या सेमी फायनलपूर्वी सराव करताना रोहित शर्माच्या हाताला दुखापत

Rohit Sharma Injured : टी-20 वर्ल्डकप संदर्भात  या घडीची मोठी बातमी समोर येत आहे. सराव करताना रोहित शर्माच्या हाताला दुखापत झाली आहे.  इंग्लंडविरोधातल्या सेमी फायनलपूर्वी रोहितला दुखापत दिले आहे.

Nandurbar News:  विसरवाडी पोलिसांनी मोटरसायकल चोरट्यासह सहा मोटरसायकली केल्या जप्त
Nandurbar News:  नवापूर तालुक्यात मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढलं होतं. दिवसागणिक मोटरसायकल चोरी जात असल्याने याला आळा घालण्यासाठी विसरवाडी पोलीसांनी धडक कारवाई करत मोटरसायकल चोरीतील एक आरोपीस जेरबंद करीत सहा मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीने सदरच्या मोटरसायकल विसरवाडी, खांडबारा, निजामपूर, ताहाराबाद या भागातून चोरल्या असल्याची कबुली दिली आहे. विसरवाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या पथकाने मोटरसायकल चोरट्याला जेरबंद केले आहे.संशयित आरोपी बाळा छोटीराम गायकवाड (वय 21 वर्षे, रा. वरपाडा पो. पिंपळगांव, ता. साक्री) यास ताब्यात घेतले. आरोपीने   पोलीसांना कबुली दिल्याने पोलीसांनी त्याकडून एकूण  सहा मोटर सायकली जप्त केल्या असुन सदर आरोपीत याने सोशल मिडीया वर असलेले व्हिडीओ पाहुन मोटरसायकल चोरी करण्याचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती दिली.
Kolhapur News:  हातकणंगले तालुक्याच्या आळते गावात गेल्या 37 दिवसांपासून पाणी पुरवठा नाही, महिलांकडून गट विकास अधिकाऱ्यांना घेराव

Kolhapur News:  हातकणंगले तालुक्याच्या आळते गावात गेल्या 37 दिवसांपासून पाणी पुरवठा नाही. आळते गावच्या महिलांकडून गट विकास अधिकाऱ्यांना घेराव घातला. कार्यालयातील अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी  धारेवर धरलं आहे. पाण्याच्या घागरी घेऊन महिला थेट कार्यालयात पोहचल्या आहेत.  पाण्याची योजना करून एकवर्षं पूर्ण होण्याच्या आधी योजना अयशस्वी झाली आहे.  

पुणे-नाशिक महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसने टायर पेटवले, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याविरोधात राज्यभर निदर्शन

पुणे-नाशिक महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसने टायर पेटवले. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव बायपास जवळ हा प्रकार घडला. कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी खासदार सुप्रिया सुळेंवर केलेल्या वक्तव्याचे डसाद उमटले. यामुळं दोन्ही बाजूची वाहतूक बराचवेळ ठप्प होती. याप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्षांसह दहा कार्यकर्ते ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Bharat Jodo Yatra: राहुल गांधींची वणाळी येथील गुरुद्वाराला भेट

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी  यांनी वणाळी गावातील बाबा फतेह सिंह गुरुद्वारा येथे भेट दिली आहे  



 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


महाराष्ट्रातील जनतेच्या वेदना समजून घ्यायच्या आहेत: राहुल गांधी


 कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत धावणाऱ्या भारत जोडो यात्रेचा उद्देश देशाला जोडणे हा आहे.  सध्या देशात द्वेष पसरवला जात आहे.  अशा स्थितीत भारत तोडण्याच्या विरोधात भारत जोडो यात्रा सुरू करण्यात आली आहे.  हा मोर्चा काश्मीरपर्यंत कोणीही रोखू शकत नाही.  सोमवारी रात्री नांदेडमध्ये पोहोचल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ही हाक दिली.  या पदयात्रेत मी पुढील 14 दिवस महाराष्ट्राचा दौरा करणार असून येथील जनतेचे दुःख समजून घेण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काल महाराष्ट्रात देगलूर येथे दाखल झाली आहे.  आज सकाळी 8.30 वाजता नांदेडमधील गुरुद्वारापासून यात्रेला सुरुवात होणार आहे


आदित्य ठाकरे आज औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबादच्या दौऱ्यावर 


आदित्य ठाकरे आज औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. ते सकाळी 11 वाजता औरंगाबाद येथील पैठण येथे  शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करतील आणि शेतकऱ्यांशी संवाद साधतील.  गद्दारांचं सरकार कोसळणारच  आदित्य ठाकरे यांची अकोल्यात गर्जना..तर ज्यांनी स्वतःला विकलं नाही त्यांना भेटायला आलोय असं म्हणत आदित्य ठाकरेंकडून नितीन देशमुखांचं कौतुक 


राज्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलने 


 राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार  यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राज्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली .डोंबिवलीतही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी सत्तारांविरोधात घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले. डोंबिवली मानपाडा रोड परिसरात अब्दुल सत्तार यांचा प्रतिकात्मक पुतळा बनवत त्या पुतळ्याला  महिला कार्यकर्त्यांनी जोडे मारत आंदोलन केले या वेळी कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत यांचा पुतळा जाळण्याचाही प्रयत्न केला मात्र पोलिसांनी  पुतळा ताब्यात घेत पुढची कारवाई सुरू केली.


सील्टबेल्टची सक्ती 11 नोव्हेंबरपासून नको तर 31 डिसेंबरपासून करा ! टॅक्सी संघटनांची मागणी. 


 सील्टबेल्टची सक्ती 11 नोव्हेंबरपासून नको तर 31 डिसेंबरपासून करा ! टॅक्सी संघटनांची मागणी  केली आहे.  मुंबईत अनेक जुन्या टॅक्सी आहेत त्यात प्रवाश्यांना सीट बेल्ट नाहीत. बाहेर सीट बेल्ट पुरेसे उपलब्द होत नसल्याने सीटबेल्ट सक्तीची मुदतवाढ मागितली आहे,


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.