Maharashtra News Updates 6 October 2022 : कुत्र्याची शिकार करण्यासाठी मागे पळालेला बिबट्या घरात घुसला, साताऱ्यातील कोयना हेळवाक येथील घटना , घर मालकाने लावली बाहेरून कडी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
बेळगाव - सुळेभावी गावात रात्री नऊ वाजता दोन तरुणांची हत्या करण्यात आल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली.महेश उर्फ रामचंद्र मुरारी (२६) आणि प्रकाश निंगप्पा उपरी पाटील (२४) अशी हत्या झालेल्या तरुणांची नावे आहेत.पूर्व वैमनस्यातून या तरुणांची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.हत्येची माहिती कळताच मारीहाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.कायदा सुव्यवस्था विभागाचे पोलिस उपायुक्त रवींद्र गडादी यांनीही घटनस्थळी भेट देऊन तपासाच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना सूचना केल्या.दोन तरुणांच्या हत्येमुळे गावात तणावपूर्ण वातावरण असून गावात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला आहे.
कुत्र्याची शिकार करण्यासाठी मागे पळालेला बिबट्या घरात घुसला, साताऱ्यातील कोयना हेळवाक येथील घटना, घर मालकाने लावली बाहेरून कडी, कुत्रा आणि बिबट्या घरात जेरबंद, सुधीर कारंडे आसे त्या घरमालकाचे नाव, वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल, बिबट्याला पिंजरा बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू, अख्खा गाव कारंडेंच्या घराजवळ
मुंबई उच्च न्यायालयाला लाभणार सहा नवे न्यायमूर्ती
राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर केंद्र सरकारकडून न्यायमूर्तीपदावरील नव्या नियुक्तींची अधिसूचना जारी
संजय आनंदराव देशमुख, यंशिवराज गोपीचंद खोब्रागडे, महेंद्र वाधुमल चांदवानी, अभय सोपनराव वाघवसे, रवींद्र मधुसुदन जोशी आणि वृषाली विजय जोशी यांची हायकोर्टात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्तीसाठी राष्ट्रपतींची मंजुरी
जव्हार मधील जुना राजवाडा येथे कुस्तीचे जंगी सामने पार पडले असून या स्पर्धेत महाराष्ट्रातील 200 पेक्षा जास्त कुस्तीपट्टूनी सहभाग घेतला होता. जव्हार मधील जुना राजवाडा येथे संस्थान काळा पासून मातीतील कुस्ती स्पर्धांच आयोजन करण्यात येतं. मात्र मागील दोन वर्ष कोरोनाच सावट असल्याने ह्या स्पर्धा पार पडल्या नव्हत्या . या वर्षी मोठ्या थाटात या कुस्ती स्पर्धा पार पडल्या असून परिसरातील नागरिकांनी ही ह्या स्पर्धा बघण्यासाठी मोठी गर्दी केली होई . या स्पर्धेत शत्रूघ्न भोईर आणि नारायण कारभारी हे अंतिम विजेते ठरले असून त्यांना बक्षीस म्हणून प्रत्येकी आठ आठ हजार रुपयांची रोख रक्कम, शाल, श्रीफळ म्हणून देण्यात आली .
बेळगाव - पतंग उडवताना घराच्या टेरेस वरून पडुन मुलाचा मृत्यू झाला.अरमान दफेदार (११) असे मुलाचे नाव आहे.तिरंगा कॉलनी येथील अरमान हा आपल्या कुटुंबियांच्या समवेत नातेवाईकांच्या घरी अशोक नगर येथे आला होता.सकाळी तो पतंग उडवण्यासाठी सकाळी तो घराच्या टेरेस वर गेला होता पतंग उडवत असताना तो खाली पडला.त्याला लगेच उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले पण तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला .
धनुष्यबाण चिन्हाबाबत चार तारखेला शिंदे गटाचे निवडणूक आयोगाला पत्र
ठाकरेच्या सेनेकडून चिन्हाचा गैरवापर होतोय - शिंदे गट
धनुष्यबाण चिन्हाचा निकाल तात्काळ लावावा- शिंदे गट
धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या शिंदे गटाची आयोगाकडे मागणी
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे याचा परिणाम आता भात शेतीवरती होत आहे. अंतिम टप्प्यात आलेली भात शेती वाया जाण्याची भीती असून काही ठिकाणी पावसाचा तडाख्यामुळे भात शेती जमिनीवर कोसळली आहे.
प्रकाश आंबेडकरांच्या अकोल्यातील सभेवर पावसाचं सावट आहे. गेल्या अर्ध्या तासापासून अकोल्यात पाऊस सुरू असून प्रकाश आंबेडकर ऐनवेळी ऑनलाईन मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानावरच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला आंबेडकर प्रमुख वक्ते आहेत. याच मेळाव्यातील भाषणातून आंबेडकरांची वर्षभरातील राजकीय दिशा ठरत असते.
बोरघाटात कंटेनर ट्रेलर आणि कारचा अपघात झाल्याने मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर सुमारे एक ते दीड किलोमीटर वाहनांची रांग लागली आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात, अपघातामुळे बोरघाट मंदावला. पावणे पाचच्या सुमारास कंटेनर आणि तवेरा गाडीचा अपघात झाला. सुदैवाने यात कोणाला मोठी इजा झाली नाही. मात्र वाहनं मार्गाच्या मधोमध असल्याने, मुंबईकडे जाणारी वाहतूक बराच काळ ठप्प होती. आता वाहनं बाजूला घेऊन वाहतूक खुली करण्यात आलीये. मात्र अद्याप ही बोरघाट हा मंदावस्थेत आहे.
मुंबई - राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे 7 हजार 649 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
विधानसभा मतदारसंघाच्या 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 21 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. कारण विधानसभेच्या संबंधित तारखेला अस्तित्वात असलेल्या याद्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आहे तशा वापरल्या जातात. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागनिहाय यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
अनिल देशमुख यांचा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टामध्ये जामीन अर्ज दाखल
या अर्जावर सीबीआय 14 ऑक्टोंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे सीबीआयला निर्देश
मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधारावर सीबीआय कोर्टात देशमुखांचा जामीन अर्ज सादर
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे उद्या मुंबई दौ-यावर
महाराष्ट्रातील मतदारांची उद्या मल्लिकार्जुन खरगे घेणार भेट
टिळक भवनला ५ वाजता भेट घेऊन मतदान करण्याची करणार विनंती
तर दुसरे उमेदवार शशी थरुर ९ आॅक्टोबर ला मुंबई दौ-यावर
महाराष्ट्रात एकुण ६५० मतदार असुन त्यांच्या भेटीगाठी घेणार
येत्या १७ आॅक्टोबंरला कांग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी मतदान होणार आहे
मतदानाच्या आधी उमेदवारांच्या गाठीभेटी सुरु
Mumbai Local Update : चिंचपोकळी येथे तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक बिघडले असून. दुपारी 12.15 पासून लोकल सेवा विस्कळित झाली आहे. लोकल सेवा अद्याप सुरू झालेली नाही. धीम्या मर्गिकेवरील गाड्या जलद मार्गिकेवर वळवल्या आहेत.
Nagpur News : नागपुरात आरएसएसच्या मुख्यालयाला घेराव घालण्याचा इशारा देत इंदोरा चौकात जमलेल्या भारत मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई सुरु केलीय. भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम यांनी घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर पोलीस आणि न्यायालयानं परवानगी नाकारल्यानंतरही मोर्चा काढण्यासाठी शेकडो कार्यकर्ते दाखल झाले. त्यांना पोलीस ताब्यात घेतायत.
America Firing : अमेरिकेच्या (America) मेक्सिकन सिटीमधून मोठी बातमी समोर येत आहे. येथील सिटी हॉलमध्ये सामूहिक गोळीबार झाला असून त्यात महापौरांसह 18 जणांचा मृत्यू झाला आहे.या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या घटनेची काही छायाचित्रे समोर आली आहेत. ज्यात एका भिंतीवर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा दिसत आहेत. किमान 30-35 गोळ्या दिसत आहेत. तर, पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे आणखी एक चित्र समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मात्र, एका संघटनेने या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे.
Bihar News : बिहारचे मुख्यमंत्री नितेश कुमार महाराष्ट्राचा दौरा करणार
महिन्याच्या अखेरीस हा दौरा होण्याची शक्यता
या दौऱ्यात नितीश कुमार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता
देश पातळीवर विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न
Kerala Bus Accident : केरळच्या पलक्कड जिल्ह्यात दोन बसची धडक झाली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 38 जण जखमी झाले आहेत. पलक्कड जिल्ह्यातील वडक्केनचेरी येथे हा अपघात झाला. राज्यमंत्री एमबी ब्रजेश यांनी या प्रकरणी सांगितले की, केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळ (KSRTC) बसची पलक्कड जिल्ह्यातील वडक्कनचेरी येथे एका पर्यटक बसला टक्कर झाली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला, तर 38 जण जखमी झाले.
Share Market Update : सेन्सेक्स 392 अंकांनी वधारला तर निफ्टीत 119 अंकांची उसळी
आशियाई बाजारातील पॉझिटिव्ह संकेतांनंतर भारतीय शेअर बाजारात तेजी
डाॅलरच्या तुलनेत रुपया 81.62 प्रति डाॅलरवर
ओपेककडून कच्च्या तेलाच्या उत्पादनात 20 लाख बॅरल प्रति दिवस घट केल्यानंतर जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे भाव वधारले
ब्रेंट क्रूड ऑईल 3 आठवड्याच्या उच्चांकीवर, तेलाच्या किंमती पुन्हा 93 डॉलर प्रति बॅरलवर
हिंदाल्को, ओएनजीसी, अदानी पोर्ट, हिरो मोटोकॉर्पसारख्या समभागात तेजी
CM Eknath Shinde Calls Mumbai CP : दसरा मेळाव्याच्या दिवशी प्रचंड ताण असूनही मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणाऱ्या मुंबई पोलिसांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलिसांचे अभिनंदन केले. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करुन पोलीस दलाचे आभार मानले.
Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्याकडून सीबीआय कोर्टामधून जामीन मिळवण्याचे प्रयत्न सुरू
हायकोर्टनं ईडीच्या केसमध्ये दिलेल्या जामीनाच्या आधारावर देशमुखांची मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टामध्ये जामीनासाठी धाव
दोन्ही गुन्हे एकाच प्रकरणाशी संबंधित असल्याचा जामीन अर्जात दावा
या अर्जावर कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन रीतसर जामीन अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात दाखल आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणातील पुराव्यांचा विचार करता अंतिमत: त्यांना याप्रकरणी दोषी ठरवले जाऊ शकत नाही, देशमुखांचा दावा
सचिन वाझे यांची विधानं विश्वासार्ह नाहीत, यामुळे देशमुखांनी त्याआधारे दोषी ठरवलं जाऊ शकत नाही : हायकोर्ट
मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठानं मंगळवारी ईडीनं दाखल केलेल्या कथित 100 कोटींच्या वसुली प्रकरणात देशमुखांनी जामीन मंजूर केला आहे.
Nandurbar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बीकेसीमधील दसरा मेळाव्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातून 120 एसटी बस पाठवण्यात आल्या होत्या. त्यामुळे काल दिवसभरात 200 पेक्षा अधिक फेऱ्या रद्द झाल्या होत्या. आज दुपारपर्यंत ही बस सेवा प्रभावित राहण्याचा अंदाज एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मुंबईतून रात्री निघालेल्या बस आज सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्ह्यातल्या विविध स्थानकांमध्ये दाखल होतील, त्यानंतर बस सेवा सुरळीत होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आज दुपारपर्यंत एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. यात दुपारपर्यंत अनेक बस फेऱ्या रद्द होऊ शकतात तर काही ठिकाणी बस उशिरा जाणार असल्याने याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत असल्याचे चित्र आहे. तसंच कामधंद्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा आणि नंदुरबार आगारातील बसेस गेल्याने अनेक फेऱ्या रद्द झाल्याचे बोर्ड बस स्थानकात लावण्यात आले आहेत .
BJP Posters : उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा संपल्यानंतर दादर परिसरात लावलेले भाजपचे पोस्टर्स फाडण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचे पोस्टर फाडण्यात आले. शिवाजी पार्कपासून अवघ्या 1 ते 2 किलोमीटर अंतरावर असलेले हे पोस्टर फाडले आहेत. उद्धव ठाकरे समर्थकांनी हे पोस्टर फाडले असावेत अशी शंका व्यक्त केली जात आहे. परंतु आधिकृतरित्या या प्रकरणी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Mumbai News : मुंबईत दादरमध्ये काल ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर या भागात भाजपचे पोस्टर्स फाडण्यात आले. पोस्टर्स कुणी फाडले हे स्पष्ट झालेलं नाही. पोलीस या प्रकरणात चौकशी करत आहेत. शिवसेनेचा मेळावा झाला त्या शिवाजी पार्कपासून एक ते दोन किलोमीटर अंतरावर भाजपचे पोस्टर्स फाडण्यात आले.
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी धुळे शहरात बालाजीचा रथोत्सव पार पडतो. या रथोत्सवाला 200 हून अधिक वर्षांची परंपरा असून, शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात येते. या रथोत्सवाच्या मिरवणुकीत शहरासह शहरालगत असलेल्या खेड्यापाड्यातील भाविक बालाजींच्या दर्शनासाठी येत असतात. नवरात्रीनिमित्त दरवर्षी 11 दिवस भगवान बालाजीचे वहन मिरवणूक शहरातील विविध मार्गावरून काढण्यात येते.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. सकाळी अजित पवार विविध विकास कामांची पाहणी करतील. तसेच ते आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. सकाळी 10 वाजता ते दौंड तालुक्यातील पारगाव येथे शेतकरी मेळाव्याला उपस्थिती लावणार आहेत.
Bharat Jodo Yatra : आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. मोठ्या कालावधीनंतर सोनिया गांधी अशाप्रकारे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. सध्या यात्रा कर्नाटकातील म्हैसुर या ठिकाणी पोहचली आहे. 7 सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेचा शुभारंभ केला. या यात्रेत कन्याकुमारी ते काश्मीर असा 3 हजार 570 किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार आहे. भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला नांदेडमध्ये प्रवेश करणार आहे. महाराष्ट्रात 16 दिवसांमध्ये 383 किमीचा प्रवास करणार आहे.
Bhiwandi News : भिवंडी येथील दिवाणी न्यायालय आणि न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग या न्यायालयाच्या नवीन भव्य तीन मजली इमारतीचे उदघाटन विजयादशमीच्या मुहूर्तावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या शुभहस्ते मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमुर्ती गौरी गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली न्यायालय प्रांगणात संपन्न झाला. याप्रसंगी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील ,राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार,शर्मिला देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होते.
उच्च न्यायालय मुंबई यांच्या वतीने आणि भिवंडी बार असोसिएशन संघटनेच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विधी पदवी प्राप्त करण्याला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने त्या शताब्दी वर्षा निमित्त भिवंडी बार असोसिएशन संघटनेच्या सहकार्याने सुरू करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेचे उदघाटन मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडलं तर न्यायालयाचे उदघाटन कोर्टाच्या एका सिपाहिच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते.
पार्श्वभूमी
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
भारत जोडो यात्रेत सोनिया गांधी सहभागी होणार
आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. मोठ्या कालावधीनंतर सोनिया गांधी अशाप्रकारे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. सध्या यात्रा कर्नाटकातील म्हैसुर या ठिकाणी पोहचली आहे. 7 सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेचा शुभारंभ केला. या यात्रेत कन्याकुमारी ते काश्मीर असा 3 हजार 570 किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार आहे. भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला नांदेडमध्ये प्रवेश करणार आहे. महाराष्ट्रात 16 दिवसांमध्ये 383 किमीचा प्रवास करणार आहे.
अजित पवार बारामती दौऱ्यावर
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. सकाळी अजित पवार विविध विकास कामांची पाहणी करतील. तसेच ते आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. सकाळी 10 वाजता ते दौंड तालुक्यातील पारगाव येथे शेतकरी मेळाव्याला उपस्थिती लावणार आहेत.
धुळ्यात बालाजी रथोत्सव
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी धुळे शहरात बालाजीचा रथोत्सव पार पडतो. या रथोत्सवाला 200 हून अधिक वर्षांची परंपरा असून, शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात येते. या रथोत्सवाच्या मिरवणुकीत शहरासह शहरालगत असलेल्या खेड्यापाड्यातील भाविक बालाजींच्या दर्शनासाठी येत असतात. नवरात्रीनिमित्त दरवर्षी 11 दिवस भगवान बालाजीचे वहन मिरवणूक शहरातील विविध मार्गावरून काढण्यात येते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -