Maharashtra News Updates 30 September 2022 : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरला भीषण आग
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Fire News : वलसाड जिल्ह्यातील पारडी येथील मोतीवाडा गावाजवळ मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कंटेनरला आग लागल्याने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग 48 दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला आहे.
ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार टेणी यांचं आज उपचार सुरू असताना मुंबईत दुःखद निधन झाले. दैनिक लोकमत, देशदूत, नवशक्ती, लोकनामा यासह विविध दैनिकात त्यांनी वृतसंपादक, संपादक अशा अत्यंत महत्वाच्या भूमिका पार पाडत मराठी पत्रकारिता क्षेत्रात आपला अमीट ठसा उमटविला होता. पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान अतिशय महत्वपूर्ण असून त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील अभ्यासू पत्रकार कायमचा पडद्याआड गेला आहे. तसेच मराठी पत्रकारिता क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.
Mumbai Local Train Update : ठाणे रेल्वे स्थानकात काही तांत्रिक बिघाड झाल्याने कल्याणकडे जाणाऱ्या सर्व लोकल मुलुंड स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत
Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीच दर्शन घेतलं. यावेळी आदित्य यांच्या हस्ते देवीची आरती देखील झाली. दरम्यान आदित्य ठाकरे येरवडा तसेच कोथरूड मधील काही नवरात्रौत्सव मंडळांना भेटी देणार होते. मात्र पुण्यात झालेला पाऊस, सर्वत्र झालेली वाहतूक कोंडी यामुळे आदित्य ठाकरे यांना इतर मंडळांच्या भेटीचा कार्यक्रम रद्द करावा लागला, अशी माहिती शिवसेना पदाधिकाऱ्यांनं दिली आहे.
Aditya Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे देखील पुण्यातील वाहतूक कोंडीत अडकले होते. पुण्यातील वाकडेवाडी परिसरातून आदित्य ठाकरे यांचा ताफा तब्बल वीस ते तीस मिनिटे अडकून पडला होता. मुंबई पाठोपाठ आता पुणे देखील थोड्या वेळाच्या पावसात जलमय होतोय हे चित्र उभे राहत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
Pune Rain : पुण्यात जोरदार पाऊस जोरदार वादळ वाऱ्यासह पाऊस झाल्याने पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील सिलिंग कोसळला. सिलिंग कोसळल्याने शासकीय गाड्यांचा मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने कोणतीही व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने मोठी हानी टळली आहे.
Kolhapur Crime : कोल्हापूर शहरातील शुक्रवार पेठेतील महिलेचा करवीर तालुक्यातील पाडळी खूर्द येथील शेतात निर्घृण खून झाल्याची घटना समोर आली आहे. नेमक्या कोणत्या कारणातून या महिलेचा खून झाला याबाबत स्पष्टता झाली नसली, तरी या महिलेजवळ सापडलेल्या आधार कार्डवरून ती कोल्हापूर शहरातील शुक्रवार पेठमधील असल्याचे समोर आले आहे. आरती अनंत सामंत (वय 45) असे त्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून करवीर पोलिस अधिक तपास करत आहेत.
Maharashtra Politics : शिंदे गटाच्या युवासेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत शिंदे गटातील नेत्यांच्या मुलांना संधी देण्यात आल्याचे कार्यकारिणीतील नावांवरून दिसत आहे.
Pune Rain : पुण्यात ब्रेक घेतलेल्या पावसाने आज संध्याकाळच्या सुमारास पुन्हा एकदा हजेरी लावली. मागील 20 मिनिटांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे
Nashik Rain : नाशिकमध्ये आज दुसऱ्या दिवशी दुपारनंतर जोरदार पावसाला सुरवात झाली असून विजांच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट देखील नाशिककरांना अनुभवयास मिळत आहे. त्यामुळे दुपारनंतर नवरात्रीचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या नाशिककरांची पुरती तारांबळ उडाली. दरम्यान पावसाने सलग दुसऱ्या दिवशी नाशिक शहरातील नाशिकरोड, सीबीएस, मेनरोड, शालिमार, गंगापूर रॉड, सिडको आदी परिसरात हजेरी लावली आहे. शिवाय सायंकाळी दांडिया गरब्याची तयारी करणाऱ्या दांडिया प्रेमींच्या उत्साहावर पाणी फेरले आहे. मात्र काल सारखंच आजही नाशिककर भर पावसात दांडिया खेळणार का? हे पहावे लागणार आहे.
कोल्हापूर शहरामध्ये आज दुपारी वादळी वारे आणि मेघगर्जनेसह जाता जाता परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या पंचमी दिवशी भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये सोयाबिन आणि भात मळणीला ऐन दसऱ्यामध्येच वेग आला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे त्यांची धावपळ उडाली.
Chandrapur News update : चंद्रपूर शहरात 60 वर्ष जुनी 3 मजली इमारत कोसळली, 1 व्यक्ती दबल्याची भीती, घुटकाळा वार्डातील राज मंगल कार्यालय परिसरात ही इमारत आहे. पुंडलिक पाटील आणि त्यांचे कुटुंब या इमारतीत वास्तव्याला होते. इमारत अचानक हलू लागल्याने कुटुंबातील व्यक्ती बाहेर आल्या. मात्र एक जण आतच अडकून राहिल्याने दबला गेल्याची भीती, घटनास्थळी चंद्रपूर महानगरपालिकेचे पथक व पोलिसांनी पोहोचून मदत कार्याला सुरुवात केली आहे. जुनी व मोडकळीस आलेली ही इमारत असल्याने मनपाने दिला होता रिकामी करण्याचा इशारा
आज शुक्रवार आणि ललीता पंचमी निमित्त तुळजापूरच्या भवानी मंदिरात मुरली अलंकार पूजा मांडण्यात आली आहे. भगवान श्रीकृष्णांनी जगदंबा मातेस आपली मुरली, बासरी दिली त्या प्रसंगाची आठवण म्हणून आज मुरली अलंकार पूजा मांडण्यात आली आहे. ह पूजा पाहण्यासाठी दर्शनासाठी मोठी रांग लागली आहे. आजपासून तुळजापूरात पाचव्या खेट्याला गर्दी वाढणार आहे. सध्या नवरात्रोत्सव सुरू असून शुक्रवारी म्हणजे आज नवरात्राची पाचवी माळ आहे. पाचव्या माळेला पारंपरिक खेटा पूर्ण करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यानंतर शनिवार, रविवार सुट्ट्या आहेत. यामुळे शुक्रवारपासून सलग 3 दिवस भाविकांच्या गर्दीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Malegaon Sahakari Sakhar Karkhana : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या ताब्यातील असणारा माळेगाव सहकारी साखर कारखान्याची आज 67 वी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. ही वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. या सभेमध्ये सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील दहा गावे माळेगाव कारखान्यामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. याशिवाय आजच्या सभेमध्ये विशेष निर्णय घेण्यात येणार आहेत. त्यामुळं भाजपाचे चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे हे आज काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
Yavatmal Crime : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हातील बसस्थानक जवळ गोळी झाडून युवकाची हत्या करण्यात आली आहे. संदीप सुधाकर तोटे असे मृत युवकाचे नाव आहे. संदीप सुधाकर तोटे हा दारव्हा नगरपरिषद माजी उपाध्यक्ष सुभाष दुधे खून प्रकरणातील आरोपी होता. सुभाष दुधेची 2018 च्या नवरात्र उत्सवादरम्यान दगडाने ठेचून हत्या झाली होती. या हत्येचा बदला म्हणून आरोपी संदीप तोटेची हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, आरोपी पसार झाला असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Gulabrao Patil : संधी मिळाली तर बिग बॉसमध्येही जावू असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. या वक्तव्यामुळं शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील पुन्हा चर्चेत आले आहेत. बिग बॉसमध्ये जाण ही माझ्यासाठी सोन्यासारखी संधी असेल असंही ते म्हणाले. बिग बॉसमध्ये बोलावलं तर नक्की जावू, अशी संधी कोणाला मिळते, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. मला माझ्या मागच्या जीवनाची आठवण होतेय. असे सांगत असताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या लहानपणाच्या आठवणींना उजाळा दिला. शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनात नाटकामध्ये म्हणा, गाण्यांमध्ये म्हणा ही भाग घ्यायचो. असेही त्यांनी सांगितले.
Nanded News : नांदेडमधील धर्माबाद बसस्थानकात वीज पडून शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. धर्माबाद येथील जिजामाता कन्या शाळेत इयत्ता नववीमध्ये ही विद्यार्थिनी शिकत होती. ती धर्माबाद तालुक्यातील चिकना येथील होती. स्वाती कामाजी आवरे असे मृत झालेल्या पंधरा वर्षीय विद्यार्थीनीचे नाव आहे. शाळा सुटल्यानंतर चिकना या गावाकडे जाण्यासाठी धर्माबाद येथील बसस्थानकाकडे एसटी बस पकडण्यासाठी जात असताना वीज पडल्याने तरुणीचा मृत्यू झाला आहे. सदर विद्यार्थिनीला धर्माबाद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वेणुगोपाल पंडित सदर मुलगी मृत्यू पावल्याचे सांगितले.
Dhule News : धुळे शहरात दहा ते बारा दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने महापालिकेत आंदोलन केले. महापालिकेच्या प्रवेशद्वारावर माठ घेऊन शिवसेनेने प्रशासनाचा निषेध केला. पोलिसांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच शिवसैनिकांना अडवले होते. आयुक्तांच्या दालनात थेट घुसण्याचा शिवसैनिकांनी यावेळी प्रयत्न केला. आयुक्त दालनात उपस्थित नसल्याने शिवसैनिकांचे दालनाबाहेर ठिय्या आंदोलन. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस यांना माठ सप्रेम भेट देत शिवसैनिकांनी सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाचा निषेध केला.
Nanded Accident News: नांदेड-भोकर राष्ट्रीय महामार्गावरील चौकीजवळ उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी धडकल्याची घटना घडली. यामध्ये एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. बारड गावाकडे जाणाऱ्या महामार्गावर NH-61 वर हा अपघात झालेला आहे. दरम्यान, अपघात झालेल्या दोन्ही व्यक्तींना शासकीय दवाखाना विष्णुपुरी नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
Rajaram Sakhar Karkhana : कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सुरु झाली आहे. या सभेसाठी दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. ठराव मांडत असताना दोन्ही गटाकडून घोषणाबाजी करण्यात येत आहे.
Palghar News : राष्ट्रीय स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल प्रकारात रुद्राक्ष पाटील याने सुवर्णपदक पटकावलं आहे. अहमदाबाद इथे सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारात अर्जुन बबुटा आणि ऐश्वर्य प्रताप तोमर या ऑलिम्पिक खेळाडूंवर मात करुन18 वर्षीय रुद्राक्ष पाटील याने सुवर्णवेध साधला. रुद्राक्ष पाटील हा पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा चिरंजीव आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी उद्या ही भेट होणार
मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यानंतर कंगना रनौत महाविकास आघाडी सरकारच्या निशाण्यावर होती
शिवसेना आणि कंगना यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोपही झाले
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात कंगना रनौतने तत्कालीन ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता
एसटी महामंडळातील काँग्रेसच्या 'इंटक' संघटनेत वादाची ठिणगी, जुने अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांना पदावरून हटवून नव्या अध्यक्षांची नेमणूक, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते डॉ. कैलास कदम इंटकचे नवे अध्यक्ष, अध्यक्ष बदलाला संघटनेचे सरचिटणीस आणि अध्यक्ष यांच्या वादाची किनार, छाजेड यांच्यावर राजकिय स्वार्थासाठी संघटनेचा वापर केल्याचा संपुर्ण कार्यकारणीचा आरोप, छाजेड यांना एकमतानं पदावरून हटवून संघटनेकडून नवीन कार्यकारणी जाहीर
शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीत होणार आहे. या मेळाव्याचा दुसरा टीझर प्रदर्शित करण्यात आलाय. या टीझरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांच्या क्लीप वापरण्यात आल्यात.
आज नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने कालिका मातेचे दर्शन घेऊन नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असून आज विविध लोकप्रतिनिधी, संस्था प्रशासन यांच्या सूचना जाणून घेऊन पुढील कामकाजाचा आराखडा तयार करणार असून नवनियुक्त पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिक च्या जनतेचे आभार मानले.
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर मंत्री दादा भुसे यांनी आज नाशिक चे ग्रामदैवत कालिका मातेचे दर्शन घेत नाशिकच्या जनतेचे आभार मानले.
Accident News : मुंबई- पुणे जुन्या महामार्गावर खालापूरनजीक अपघात झाल्याची घटना घडली. कलोते गावाजवळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर कंटेनर ट्रेलरचा अपघात झाला. कंटेनर ट्रेलर रस्त्याखाली गेल्यानं मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.
Share Market Update : सेन्सेक्सची 170 अंकांची घसरगुंडी तर निफ्टी देखील 20 अंकांनी खाली
जागतिक बाजारातील पडझडीचे सत्र कायम असल्याने, सोबतच आशियाई बाजारपेठांमध्ये घसरणीसोबत सुरुवात झाल्याने भारतीय शेअर बाजारावर परिणाम
जागतिक मंदीची भीती व्यक्त होत असतांना आरबीआयकडून आज क्रेडिट पॉलिसी जाहीर होणार
ग्रासिम, हिंदाल्को, अदानी पोर्ट, एशियन पेंट्ससारख्या कंपन्यांचे समभाग वधारलेत
आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीच्या शेवटच्या दिवशी रुपया मजबूत स्थितीत उघडला
डॉलरच्या तुलनेत रुपया 24 पैशांनी मजबूत, रुपया 81.62 प्रति डॉलरवर उघडला
जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव 89 डॉलर प्रति बॅरलवर
Rain News : पुणे जिल्ह्यात चांगलाच पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील जेजुरीत जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. 45 मिनिटं झालेल्या पावसानं रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आलं होतं.
Nashik : शिंदे-फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 44 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. यामुळे राज्यातील अनेक विभागाचा कारभार बदलणार आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ लीना बनसोड यांची ठाण्याच्या आदिवासी अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर आशिमा मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Mumbai Model Suicide : मुंबईच्या अंधेरी भागातील एका हॉटेलच्या खोलीत एका 30 वर्षीय मॉडेलने पंख्याला गळफास लावून घेतला, हॉटेलच्या खोलीत पंख्याला लटकलेला मृतदेह सापडला, घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून वर्सोवा पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
Pankaja Munde : परळीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दांडिया महोत्सवात पंकजांनी झिंगाट गाण्यावर डान्स केलाय. तरुणाईचा हट्ट आणि उत्सवाचे वातावरण पाहून पंकजांना देखील आपला मोह आवरता आला नाही. नवरात्र उत्सवानिमित्त पंकजा मुंडे सध्या परळीमध्ये ठाण मांडून आहेत. विविध ठिकाणी आयोजित केलेल्या दांडिया उत्सवास त्या भेटी देत आहेत.
RBI Monetary Policy Committee : आरबीआयकडून आज पतधोरण जाहीर होणार आहे. सकाळी दहा वाजता गव्हर्नर शक्तिकांत दास क्रेडिट पॉलिसी जाहीर करणार आहे. सलग चौथ्यांदा रेपो रेट वाढण्याचे संकेत आरबीआयने दिले आहेत. आरबीआयने मे महिन्यापासून आतापर्यंत रेपो रेट 140 बेसिस पॉईंट्सने वाढवला आहे, जो 5.40 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. व्याजदर 0.05 टक्क्यांनी पुन्हा वाढले तर त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांनी घेतलेल्या कर्जाच्या ईएमआयवर होणार आहे. गृह कर्ज, पर्सनल लोन, शैक्षणिक कर्ज, गाडीचे कर्ज, व्यावसायिक कर्जांच्या हफ्त्यात वाढ होणार आहे.
उदाहरणार्थ 1 कोटीचे कर्ज 6.9 टक्क्यांनी 20 वर्षांसाठी घेतले असेल तर तुमचा ईएमआय 76 हजार 931 रुपये असेल. मात्र, रेपो रेट 0.05 टक्क्यांनी वाढला तर तुमचा ईएमआय 87 हजार 734 रुपये होईल.
Mumbai News : गेल्या काही दिवसांपासून शाळेतील विद्यार्थ्यांच्या अपहरणाच्या अफवा समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्याचाच परिणाम आता शाळांवर देखील होऊ लागला आहे. अपहरणाच्या या खोट्या व्हायरल व्हिडीओज आणि मेसेजमुळे पालक आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचं की नाही या चिंतेत आहेत. विशेष करुन महापालिका शाळेतील विद्यार्थी आणि पालकांमध्ये या खोट्या अफवांमुळे भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये पालक शिक्षकांना आपल्या शाळेच्या परिसरात अशा काही घटना घडल्या आहेत का याची विचारणा करण्यासाठी येत आहेत. तर काही शाळांमध्ये पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना पाठवूनच बंद केला आहे. त्यामुळे याचा परिणाम शाळेच्या पटसंख्येवर होताना दिसून येत आहे. घाटकोपरच्या मुंबई महानगरपालिकेच्या जय महाराष्ट्र गणेश मैदान मराठी माध्यमाच्या शाळेत देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. अनेक पालकांनी अफवांना बळी पडून आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंद केलं आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आला आहे. शाळेची पटसंख्या देखील कमी झाली आहे. त्यामुळे आता या शाळेने पोलिसांच्या मदतीने पालकांना शाळेमध्ये बोलावून त्यांना या अफवांबाबत जनजागृती करण्याची मोहीम सुरु केली आहे. पोलिसांनी देखील आता शाळांमध्ये जाऊन पालक आणि शिक्षकांना अशा अफवांना बळी न पडता नियमित शैक्षणिक वर्ग भरवण्याचे आवाहन केले.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर टेम्पोने पेट घेतल्याची घटना घडली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर बोर घाटात ही घटना आहे. भिवंडीहून हैदराबादला निघालेल्या आयशर टेम्पोमधील केमिकल ड्रमने घेतला पेट घेतला. त्यामुळं पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ रोखण्यात आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. टेम्पोला लागलेल्या आगीमुळं टेम्पो जळून खाक झाला आहे. अग्निशमाक दलाच्या मदतीने आग विझवण्यात यश आलं आहे. टेम्पो चालक आणि वाहक सुखरूप आहेत.
Wardha : वर्धा जिल्ह्यातील तळेगाव (Talegaon) टालाटुले या गावी अनोख्या पद्धतीने नवरात्री उत्सव साजरा केला जातो. गेल्या 40 वर्षांपासून चक्क 20 फूट खोल असलेल्या तलावात मध्यभागी देवीची स्थापना केली जाते. जिल्हाभरातील नागरिकांची येथे देवीच्या दर्शनासाठी गर्दी दिसून येते.
Nalasopara News : नालासोपाऱ्यात फेरीवाल्यांच्या हातगाड्यांवर वसई विरार महापालिकेने रात्री हातोडा मारला आहे. नालासोपारा पूर्व स्टेशन परिसर, आचोळा मुख्य रस्ता, वसई स्टेशन परिसरात फेरीवाल्यांनी ठाण मांडून पूर्ण रस्ते गिळंकृत केले होते. अनेक वेळा कारवाई करुन सुद्धा फेरीवाले जात नसल्याने रात्री महापालिकेने हातगाड्यांवर कारवाही करुन चक्क जेसीबीने हातगाडे तोडून टाकले. महापालिकेच्या कारवाईदरम्यान फेरीवाल्यांची दादागिरी ही अनेकदा समोर आली आहे. त्यामुळे रात्री पूर्ण बंदोबस्तासह महापालिकेने फेरीवाल्यांवर तोडक कारवाई केली आहे. महापालिकेच्या या कारवाईमुळे फेरीवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
Raigad News : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर टेम्पोने पेट घेतला. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर बोरघाटात ही घटना घडली. भिवंडीहून हैदराबादला निघालेल्या आयशर टेम्पोमधील केमिकल ड्रमने मध्यरात्री पेट घेतला. टेम्पोला लागलेल्या आगीमुळे टेम्पो जळून खाक झाला. अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्यात यश आलं. टेम्पो चालक आणि वाहक सुखरुप आहेत. दरम्यान या घटनेमुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ रोखण्यात आली होती.
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज धुळे शहरातील सैनिक लॉन्स येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्याला मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री अर्जुन खोतकर उपस्थित रहाणार आहेत.
चांदणी चौकातील पुलाच्या मधल्या भिंतीत स्फोटके भरण्याचे काम मध्यरात्री सुरु होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुण्यातील चांदणी चौकातील कामाची हेलिकॉप्टरमधून पाहणी करणार आहेत
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज दिग्विजय सिंग, शशी थरुर नामांकन अर्ज भरणार आहे. आज काँग्रेसच्या ध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. 17 ऑक्टोबरला अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. 19 ऑक्टोबरला नव्या अध्यक्षांची घोषणा होणार आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज प्रदान करण्यात येणार आहे. 'मी वसंतराव देशपांडे' या सिनेमासाठी राहुल देशपांडेला सर्वोत्कृष्ट गायक या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आगे. तर 'अवांछित' आणि 'गोदाकाठ' साठी किशोर कदम यांना विशेष ज्युरी पुरस्कार मिळेल. जून सिनेमासाठी सिद्धार्थ मेननला विशेष ज्युरी पुरस्कार मिळेल. अजय देवगणला तान्हाजी सिनेमासाठी पुरस्कार जाहीर झालाय. या सिनेमाचं दिग्दर्शन ओम राऊतनं केलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदी गांधीनगर- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Todays Headline 30th September : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज धुळे शहरातील सैनिक लॉन्स येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्याला मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री अर्जुन खोतकर उपस्थित रहाणार आहेत.
गडकरी पुण्यातील चांदणी चौकातील कामाची पाहणी करणार
चांदणी चौकातील पुलाच्या मधल्या भिंतीत स्फोटके भरण्याचे काम मध्यरात्री सुरु होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुण्यातील चांदणी चौकातील कामाची हेलिकॉप्टरमधून पाहणी करणार आहेत
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज दिग्विजय सिंग, शशी थरुर नामांकन अर्ज भरणार
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज दिग्विजय सिंग, शशी थरुर नामांकन अर्ज भरणार आहे. आज काँग्रेसच्या ध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. 17 ऑक्टोबरला अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. 19 ऑक्टोबरला नव्या अध्यक्षांची घोषणा होणार आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज प्रदान करण्यात येणार आहे. 'मी वसंतराव देशपांडे' या सिनेमासाठी राहुल देशपांडेला सर्वोत्कृष्ट गायक या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आगे. तर 'अवांछित' आणि 'गोदाकाठ' साठी किशोर कदम यांना विशेष ज्युरी पुरस्कार मिळेल. जून सिनेमासाठी सिद्धार्थ मेननला विशेष ज्युरी पुरस्कार मिळेल. अजय देवगणला तान्हाजी सिनेमासाठी पुरस्कार जाहीर झालाय. या सिनेमाचं दिग्दर्शन ओम राऊतनं केलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदी अहमदाबाद दौऱ्यावर
पंतप्रधान मोदी गांधीनगर- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहे.
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -