Maharashtra News Updates 27 September 2022 : शिवभोजन थाळी सुरु ठेवण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Sep 2022 03:07 PM
Big Breaking : शिवभोजन थाळी सुरू ठेवण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 10 ऑक्टोबरपर्यंत तहकूब

मुरबाडमध्ये जादूटोण्याचा प्रकार समोर, ग्रामस्थांकडून आरोपींना चोप, नऊ जण पोलिसांच्या ताब्यात
Thane News : मुरबाड तालुक्यातील सोनगाव येथील एका घरात रात्री जादूटोण्याचा प्रकार नागरिकांनी उधळून लावला. हा प्रकार करताना ग्रामस्थांनी नऊ जणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणाने मुरबाड तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी टोकवाडे पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष आणि अघोरी प्रथा, जादूटोणाविरोधी कायद्यानुसार  आरोपींवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. रविवारी रात्री रशीद फकीर शेख यांच्या घरात जादूटोण्याचा प्रकार सुरु असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली होती. ग्रामस्थांनी घरात प्रवेश केला असता त्यांना पूजेसाठी असणारे लिंबू, मिरची, अगरबत्ती, नारळ वगैरे असे साहित्य दिसून आले. तसेच तेथे 7 पुरुष आणि दोन मुली होत्या. जादूटोण्याचा प्रकार सुरु असल्याच्या रागातून ग्रामस्थांनी आरोपींना चोप दिला आणि फोन करुन या प्रकाराबाबत टोकावडे पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन या सर्व आरोपींना ताब्यात घेतले. यातील एका तरुणीने तिला करणी उतरवण्यासाठी आणल्याचे सांगितले तर दुसरीने तिला भूत उतरण्यासाठी आणल्याचे पोलिसांना सांगितले. 2009 मध्ये सोनगाव येथे जादूटोणा करताना एका बालिकेचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण मुरबाड तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
पालघरमधील वाडा पोलिसांनी दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या

Palghar News : पालघरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना वाडा पोलिसांनी अटक केली तर एक आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला. वाडा तालुक्यातील शिरीषपाडा कांबरे या मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास संशयास्पद फिरणारी व्हॅगनार कार ताब्यात घेऊन वाडा पोलिसांनी चौकशी केली. मात्र या गाडीत आलेले पाच जण हे दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली. यानंतर चार जणांना वाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं. एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. या आरोपींकडे दरोडा टाकण्यासाठी लागणारं सर्व साहित्य असल्याने वाडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली. या प्रकरणात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

कोरोना संसर्गात मोठी घट, 3 हजार 230 रुग्णांची नोंद, 32 जणांचा मृत्य

देशात गेल्या चार महिन्यांमध्ये पहिल्यांदा मोठी घट झाली आहे. जून महिन्यानंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांवर पोहोचली आहे. देशात गेल्या 24 तासांत नव्या 3 हजार 230 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर सोमवारी दिवसभरात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या सक्रिय रुग्ण दराहून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अधिक आहे. देशात सध्या पॉझिटिव्हिटी रेट 1.18 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.72 टक्के आहे. 

Dasara Melava : यंदा दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर आनंद शिंदे यांचा गायनाचा कार्यक्रम पाहिला मिळणार?

Dasara Melava : यंदा दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर आनंद शिंदे यांचा गायनाचा कार्यक्रम पाहिला मिळणार?


राष्ट्रवादीचे नेते आणि प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी काल (26 सप्टेंबर) दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली


ठाकरे- शिंदे भेटीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडून आनंद शिंदे मेळाव्यापूर्वी गायनाचा कार्यक्रम सादर करण्याची शक्यता


'एबीपी माझा'ला विश्वसनीय सूत्रांची माहिती



Dasara Melava : यंदा दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर आनंद शिंदे यांचा गायनाचा कार्यक्रम पाहिला मिळणार?

Dasara Melava : यंदा दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर आनंद शिंदे यांचा गायनाचा कार्यक्रम पाहिला मिळणार?


राष्ट्रवादीचे नेते आणि प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी काल (26 सप्टेंबर) दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली


ठाकरे- शिंदे भेटीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडून आनंद शिंदे मेळाव्यापूर्वी गायनाचा कार्यक्रम सादर करण्याची शक्यता


'एबीपी माझा'ला विश्वसनीय सूत्रांची माहिती



महाराष्ट्र भाजप राबवणार धन्यवाद मोदीजी अभियान, 2 तारखेपासून अभियानाला सुरुवात, लोकसभेच्या मिशन 45 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपचे अभियान

Mumbai News : महाराष्ट्र भाजप राबवणार धन्यवाद मोदीजी अभियान


2 तारखेपासून अभियानाला सुरुवात


लोकसभेच्या मिशन 45 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपचे अभियान


केंद्र सरकारच्या लाभ मिळाल्या व्यक्तीच्या नावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवणार पत्र


केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थीशी संपर्क साधणार


जवळपास 10  लाख लाभार्थी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवणार

Share Market Updates : सेन्सेक्स 541 अंकांनी वधारला तर निफ्टी 150 अंकांनी वधारला

सेन्सेक्स 541 अंकांनी वधारला तर निफ्टी 150 अंकांनी वधारला


आशियाई एक्सचेंज हिरव्या रंगात उघडल्यानं भारतीय बाजारावर देखील त्याचा परिणाम, मागील काही दिवसांच्या पडझडीनंतर बाजारात पुन्हा समभागांची खरेदी


डाॅलरच्या तुलनेत रुपया आज मजबूत, 22 पैशांनी वधारत 81.45 प्रति डॉलरवर उघडला 


मंदीच्या शक्यतेनं जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, ब्रेंट क्रूड 85 डाॅलर प्रति बॅरलवर घसरला

नांदेड जिल्ह्याचे ग्रामदैवत, नवसाला पावणारी माता रातनेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ

कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यावर्षी नवरात्र उत्सव उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्याचे ग्रामदैवत असणारी माता रातनेश्वरी देवीचा उत्सवासही भक्तांची मांदियाळी जमलीय. नांदेड शहरापासून 10 किमी अंतरावर वडेपुरी गावानजिक सह्याद्रीच्या उंच डोंगरावर माता रातनेश्वरीच हेमाडपंती देऊळ आहे.नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असणाऱ्या रातनेश्वरी देवीच्या दर्शनासाठी नवरात्र उत्सवाच्या काळात महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश,तेलंगणा,कर्नाटक राज्यातून हजारो भाविक मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि कामना पूर्ण झाल्यानंतर फेडतात बोललेला नवस फेडण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. 

सांगली : पीएफआय संबंधित असल्याच्या संशयावरुन एक जण ताब्यात

पीएफआय संस्थेशी संबंधित असल्याच्या संशयावरुन मिरजमधील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयित व्यक्तीची चौकशी सुरु आहे.

Maharashtra : ठाणे, मुंबई, पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांना अटक, ठाणे गुन्हे शाखेकडून पीएफआयच्या चार कार्यकर्त्यांना अटक

Maharashtra : ठाणे, मुंबई, पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांना अटक... ठाणे गुन्हे शाखेकडून पीएफआयच्या चार कार्यकर्त्यांना अटक





पोलीस ठाण्यात कामकाजावरुन पोलीस निरीक्षकासोबत वाद झाल्यानंतर बेपत्ता असलेला कर्मचारी मुदखेड रेल्वे स्थानकावर सापडला
Parbhani News : पोलीस ठाण्यातील कामकाजावरुन पोलीस निरीक्षकांसोबत वाद झाल्याने आत्महत्या करावीशी वाटण्याचं स्टेटस ठेवून गायब झालेले पोलीस जमादार रफिक मुस्ताक अन्सारी हे मुदखेड रेल्वे स्थानकावर आढळून आले आहेत त्यांना मुदखेड इथून आणून त्यांच्या घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश राहिरे आणि पाथरी पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेत कार्यरत असलेले रफिक मुस्ताक अन्सारी यांच्यात ठाण्यातील कामकाजावरुन काल वाद झाला आणि यानंतर 2 वाजून 44 मिनिटाला रफिक मुस्ताक अन्सारी यांनी पोलीस निरीक्षकांकडून आपल्याला अपमानित केले गेल्याची भावना झाली असून आत्महत्या करावीशी वाटतेय असे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून दोन्ही मोबाईल बंद करत गायब झाले होते यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली होती.या प्रकारानंतर अन्सारी यांचा शोध घेतल्यानंतर ते रात्री मुदखेड रेल्वे स्थानकावर पोलिसांना आढळून आले त्यांना पहाटे मुदखेड इथून पाथरी येथे आणल्यानंतर त्यांच्या कुटुंबांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
धनुष्यबाण कुणाचा? निवडणुकीच्या चिन्हावर घटनापीठासमोर आज सुनावणी

धनुष्यबाण कुणाचा? निवडणुकीच्या चिन्हावर घटनापीठासमोर आज सुनावणी, अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष





जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर राजकीय अंत्यसंस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमध्ये दाखल

Shinzo Abe State Funeral : जपानचे (Japan) माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांच्यावर आज राजकीय अंत्यसंस्कार (State Funeral) पार पडणार आहेत. भर सभेत शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आज शिंजो आबे यांच्या राजकीय अंतसंस्कार पार पडणार आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जपानची राजधानी टोकियो येथे दाखल झाले आहेत. शिंजो आबे यांनी 8 जुलै 2022 रोजी अखेरचा श्वास घेतला. शिंजो आबे यांच्या पार्थिवावर 15 जुलै रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. आज शिंजो आबे यांच्यावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

छत्रपती संभाजी महाराजांचा जागर करण्यासाठी परभणीत शिवप्रतिष्ठानकडून दुर्गामाता दौड

Parbhani News : छत्रपती संभाजी महाराजांचा जागर करण्यासाठी शिवप्रतिष्ठान परभणीच्या वतीने आज दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील माऊली मंदिरापासून या दुर्गामाता दौडचा प्रारंभ होऊन विद्यानगर, त्रिमूर्तीनगर, सिंचननगर मार्गे नाथनगरपर्यंत काढण्यात आली. या दौडमध्ये मोठ्या संख्येने तरुण, तरुणी तसेच परभणीकरांनी सहभाग घेतला. या दौड दरम्यान उपस्थितांनी दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्रीरामच्या घोषणांनी परभणी शहर दणाणून गेले होते. पुढचे 8 दिवस ही दुर्गामाता दौड शहरातील विविध भागात काढली जाणार आहे.

CSMT इथे एसबीआय आणि मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं स्वच्छता अभियान, हाती झाडू घेत कर्मचाऱ्यांकडून सीएसएमटी आणि आजूबाजूचा परिसर चकाचक

Mumbai News : भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव यंदा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून साजरा होत आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत स्वच्छता अभियान आणि स्वच्छतेबाबत प्रवाशांमध्ये जनजागृती केली. यात एसबीआयचे सीजीएम जी एस राणा आणि मध्य रेल्वेचे एडीआरएम अमरेन्द्रा सिंग आणि इतर बड्या अधिकाऱ्यांनीही हाती झाडू घेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर चकाचक केला. आजादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमात युनायटेड इंडिया फॉर स्वच्छता हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानात सीएसएमटी स्थानकाची जबाबदारी एसबीआयला देण्यात आली आहे. त्यामुळे आज आयोजित या अभियानासह इतर ही स्वच्छतेबाबतचे उपक्रम राबवले जाणार आहे.

Aurangabad NIA Raid : औरंगाबादमध्ये PFI चे 13 ते 14 कार्यकर्ते ताब्यात, सोलापूरमध्येही NIA ची कारवाई

Maharashtra NIA Raid : औरंगाबादमध्ये PFI चे 13 ते 14 कार्यकर्ते ताब्यात, सोलापूरमध्येही NIA ची कारवाई





Maharashtra NIA Raid : औरंगाबाद, सोलापूरमध्ये PFI संघटनेविरोधात NIA ची कारवाई...

Aurangabad NIA Raid : औरंगाबाद, सोलापूरमध्ये PFI संघटनेविरोधात NIA ची कारवाई...





पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...  


महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी


सुप्रीम कोर्टात आज महाराष्ट्राच्या दृष्टीने निर्णायक दिवस असेल. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर आज महत्त्वाची सुनावणी आहे. शिवसेना पक्षावर शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून जो निवडणूक आयोगात दावा करण्यात आला आहे त्याबाबत आयोगाचं कामकाज चालू राहणार की नाही हे कोर्टात ठरेल. 


संजय राऊतांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी 


पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊतांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. राऊतांच्या जामीनाला ईडीचा  तीव्र विरोध आहे. संजय राऊतच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा ईडीचा आरोप आहे.  संजय राऊतांना कोर्टापुढे हजर केलं जाणार आहे. 


अनिल देशमुख आज हायकोर्टात जामीनासाठीच्या याचिकेवर सुनावणीची मागणी करणार


 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार अनिल देशमुख आजच हायकोर्टात जामीनासाठीच्या याचिकेवर सुनावणीची मागणी करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयानं निर्देश देऊनही काही कारणास्तव हायकोर्टातील सुनावणी अद्याप प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाचे देशमुखांच्या जामीनावर याच आठवड्यात सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. 


आरे कारशेडसंदर्भातली सुनवाणी आज सर्वोच्च न्यायालयात 


आरे कारशेडसंदर्भातली सुनवाणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडणार आहे. मागील महिन्यात सुनावणी जैसे थे परिस्थिती ठेवत पुढे ढकलण्यात आली होती. कारशेडचं काम जोरदार सुरु असल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे उद्याच्या सुनावणीत पर्यावरणवाद्यांच्या हाती काय लागतं? हे बघणं महत्त्वाचे असेल.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्यापासून दोन दिवस अकोल्याच्या दौऱ्यावर 


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्यापासून दोन दिवस अकोल्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या तयारीच्या आढाव्यासाठी हा दौरा असणार आहे. यासोबतच पक्ष संघटन मजबूतासाठीही या दौऱ्यात ते चर्चा करणार आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.