Maharashtra News Updates 27 November 2022 : बल्लारपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे फुट ओवर ब्रिजचा स्लॅब कोसळून 14 प्रवासी जखमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एकनाथ शिंदेंचा गुवाहाटी दौरा आणि उद्धव ठाकरेंची चिखलीतील सभा, यामुळे शनिवारचा दिवस गाजला... रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. आज मनसे गटाध्यक्षांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलणार आहेत, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात हा कार्यक्रम होणार आहे. यासह दिवसभरात नियोजित असलेल्या महत्वाच्या राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्री आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडीचा आढावा घेणार आहोत.. पाहूयात आज दिवसभरात कोणत्या महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत..
राज ठाकरेंची तोफ धडाडणार
रविवारची संध्याकाळ राज ठाकरेंच्य़ा सभेनं हिट होणार आहे. कारण, सहा महिन्यानंतर राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. 27 नोव्हेंबरला मुंबईतील नेस्को ग्राउंडवर मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा होणार आहे. आणि या मेळाव्यात पुन्हा एकदा राज गर्जना होईल. काऱण, राज्यातलं सध्याचं वातावरण, त्याचच टिझर मनसेनं लाँन्च केलंय. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, सावरकर, राज्यपाल भरतसिंग कोश्यारी यांनी महाराजांबाबत केलेलं विधान, हर हर महादेव चित्रपट वाद आणि शरद पवार यांच्या संदर्भात राज ठाकरे भाष्य करणार असल्याचं बोललं जातंय.
इस्लामपुरात जयंत पाटलांच्या मुलाचा शाही विवाहसोहळा
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुलगा प्रतिक याचा राहूल किर्लोस्कर यांची कन्या अलिका हिच्याशी शाही विवाहसोहळा होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार आणि इतर अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
ललित गांधी यांची पत्रकार परिषद
सोलापूर- सोलापुरात विमानसेवा सुरु व्हावी या मागणीसाठी मागील 22 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. सोलापूरकरांच्या या मागणीला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने पाठिंबा दिलाय. यासंदर्भात चेंबर्सचे अध्यक्ष ललित गांधी सोलापुरात येत आहेत. सोलापुरात त्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. काल सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शाह यांना रि्व्हॉल्व्हर दाखवून धमकवण्याचे प्रयत्न करण्यात आला. सिद्धेश्वर सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांनी केला धमकवण्याचा प्रयत्न केला. केतन शाह यांचा टिकटॅक, रिव्हॉल्वर दाखवतानाचे व्हीज चाललेत.
मोदींची मन की बात
दिल्ली- आज मोदींची मन की बात होणार आहे. हा मन की बात चा ९५ वा एपिसोड आहे, सकाळी 11 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई- भाजपच्या ‘जागर मुंबई’चा मध्ये आशिष शेलार, प्रवीण दरेकरांची भाषणं होणार आहेत. दहिसर येथे संध्याकाळी 6 वाजता भाषणे होतील.
पुणे- स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांच्या वास्तव कट्टा या गृपकडून आयोजित संवादात सहभागी होण्यासाठी सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, अभिमन्यू पवार आणि निरंजन डावखरे येणार.
कृषीथॉनचे आयोजन
नाशिक- नाशिकच्या ठक्कर डोममध्ये आंतरराष्ट्रीय कृषीथॉनचे आयोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांना उपयुक्त असणाऱ्या अनेक अधुनिक साधनांचे स्टॉल या प्रदर्शनात बघायला मिळतायत. नाशिकच्या के के वाघ महाविद्यालयाच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पेरणी, नांगरणी, कापणी आणि इतर अशी एकूण शेतीची सात कामे करता येतील, दोन टन मालाची वाहतूक क्षमता, सर्व प्रकारच्या खडतर परिस्थितीत चालणारी आणि एक लिटर पेट्रोलमध्ये 25 किमी प्रवास करेल अशी बाईक तयार केली असून ही बाईक सगळ्यांचं लक्ष वेधून घेते आहे.
शिर्डी- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज मतदारसंघात असून गायरान जमिनी वादाबाबत मीडियाशी संवाद साधणार आहेत.
'इंडियां बुक ऑफ रेकार्ड 2022'' बुक मध्ये रोशनचे नाव
वर्धा- वर्ध्यातील रोशनच्या एका हाताने टाळी वाजविण्याच्या कलेची 'इंडिया बुक ऑफ रेकार्ड' मध्ये नोंद. वर्धा जिल्ह्यातील रोशन संजय लोखंडे यांने एका हाताने 30 सेकंदात 180 पेक्षा अधिक टाळ्या वाजवल्या आहे. आणि त्याचीच दखल घेत 'इंडियां बुक ऑफ रेकार्ड'' या संस्थेने घेतली आहे. त्याच्या या अद्भुत कलेला वाव देण्याकरिता 'इंडियां बुक ऑफ रेकार्ड 2022'' बुक मध्ये रोशनचे नाव नोंदविले गेले आहे..
भारत-न्यूझीलंड दुसरा सामना
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
नंदुरबारात जयपुरी मुस्लिम लोहार समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात 19 जोडप्यांचे शुभमंगल
Nandurbar News : नंदुरबार येथील पटेलवाडीतील बादशहा नगरात जयपुरी मुस्लिम लोहार समाजाच्या खान्देशातील सहाव्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामूहिक विवाह सोहळ्यात समाजातील 19 जोडप्यांचा शुभमंगल लावण्यात आला. महाराष्ट्रातील खान्देशात हा सहावा सामूहिक विवाह सोहळा नंदुरबारात पार पडला. आतापर्यंत शिरपूर धुळे शहादा आदी ठिकाणी जयपुरी मुस्लिम लोहार समाजाचे सामूहिक विवाह सोहळे झाले. यावर्षी सहाव्या खांदेस्तरीय सामूहिक विवाह सोहळ्याचे नंदुरबारात आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण देशभरातून समाजबांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
बंदी असलेल्या प्लास्टिक कॅरीबॅग विकणाऱ्या विक्रेत्यांवर शहादा पालिकेची धडक कारवाई; चारशे किलो प्लास्टिक पिशव्या जप्त
Nandurbar News : पर्यावरणासाठी हानिकारक असलेल्या आणि सरकारने बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री होत असल्याची माहिती शहादा पालिकेच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर पालिकेच्या वतीने प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्या दुकानांवर धाडसत्र राबवत 400 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत. प्लास्टिक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड पालिकेच्या वतीने ठोठाविण्यात आला आहे. पालिकेच्या वतीने शहरात सलग तीन दिवस ही मोहीम राबविण्यात येणार असून प्लास्टिकमुक्त शहादा शहर करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलली
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022 संयुक्त पेपर क्रमांक 1 - 24 डिसेंबर 2022
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 पोलीस उपनिरीक्षक -31 डिसेंबर 2022
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2, राज्य कर निरीक्षक -7 जानेवारी 2023
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 सहाय्यक कक्ष अधिकारी - 14 जानेवारी 2023
यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलं आहे.
प्रस्तुत परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.
वाशीम जिल्ह्यातील 287 ग्राम पंचायतींचं बिगुल वाजलं
Vashim News: वाशीम जिल्ह्यातील 287 ग्राम पंचायतींचा बिगुल वाजला आहे. आजपासून अर्ज भरण्याला सुरुवात झाली आहे. तर 18 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार असून 20 डिसेंबरला मत मोजणी होणार आहे. सर्व ग्राम पंचायतींची निवडणूक चुरशीची होणार असून या निवडणुकीत अधिकाधिक युवा चेहरे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या गावागावातील गटातटाच राजकारण आता सक्रीय झालं आहे. या निवडणुका जरी ग्राम पंचायतच्या असल्या तरी इथं राजकीय पक्ष सहभागी नसल्याच दिसतंय.
Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलिसांना एका वाहनाची सिनेस्टाईल पाठलाग
Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलिसांना एका वाहनाची सिनेस्टाईल पाठलाग 24 लाख 80 हजार रुपये किमतीची अवैध दारु सह मुद्देमाल जप्त केली. दरा फाट्यावर नाकाबंदी दरम्यान पीकअपमध्ये दारुची अवैध तस्करी सुरु असल्याची बाब पोलीसांना समजली. यावरुन पोलिसांनी सदर वाहनाला थाबवण्याचा प्रयत्न केला मात्र तोरणमाळ रस्त्याकडे पळून जाण्याचा प्रय्तन करणाऱया या वाहनाचा पोलीसांनी पाठलाग करत वाहनाला घाटात अडवून ताब्यात घेतलं. मात्र त्यातील तीनही आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. या पीक अप व्हॅनमध्ये महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधीत असणारी विदेशी मद्य आढळून आले आहे.