Maharashtra News Updates 26 September 2022 : आयुष्यभर बाळासाहेबांचा सहाय्यक राहिलेला चंपासिंह थापा शिंदे गटात सामिल
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
घटस्थापनेलाच परभणी जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावलीय.आज सायंकाळच्या सुमारास परभणी शहरासह जिल्ह्यात वादळी वारे,विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावलीय. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची पंचायत झालीय. तसेच शहरातील देवींच्या मिरवणूक ही या पावसामुळे थांबवावी लागलीय. अनेक दिवसानंतर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु असल्याने रस्त्यांवर चांगलेच पाणी साचले आहे. तर आता ऐन काढणीच्या मोसमात आलेल्या सोयाबीन पिकाचेही या पावसाने नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचा सहाय्यक आणि शेवटपर्यंत सोबत असलेला चंपासिंह थापा यांने शिंदे गटात प्रवेश केला आहे. चंपासिह थापा याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
रायगड : उरण येथील करंजाजवळील समुद्रात मासेमारी करणारी संशयास्पद बोट सापडली आहे. या बोटीला नंबरप्लेट नसल्याने ही बोट ताब्यात घेण्यात आलीय. मत्स्य विभाग गस्त घालत असताना ही बोट सापडली आहे. डिझेल चोरीसाठी ही बोट वापरण्यात येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व्यावसायिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आहे. मालवण बंदर कार्यालयाजवळ बंदर अधिकाऱ्यां समोर पर्यटन व्यावसायिक समुद्रात बोट उतरवून अनधिकृतरित्या पर्यटन व्यवसाय करत असल्याच्या आरोपावरून बाचाबाची झाली.
उल्हासनगरमध्ये फटाक्यांच्या विनापरवाना दुकानावर पोलिसांनी कारवाई केली असून यात तब्बल 43 लाख रुपयांचे फटाके जप्त करण्यात आलेत. या कारवाईमुळे अनधिकृत फटाका विक्रेते धास्तावले आहेत.
बारामती तालुक्यातील काऱ्हाटीमध्ये शुभम संतोष खंडाळे या वीस वर्षीय तरुणाचा नदी पात्रातील बंधाऱ्यांमध्ये पोहत असताना बुडून मृत्यू झालाय. शुभम हा आईसोबत गोधडी धुण्यासाठी कऱ्हा नदीच्या बंधाऱ्यावर गेला होता. गोधडी धुवून झाल्यानंतर बतो पोहण्यासाठी गेला असता त्याचा त्याचा नदीत बुडून मृत्यू झाला.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या बारामती दौऱ्यात झालेल्या गोंधळानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. डोर्लेवाडीतील प्रमुख पदाधिकऱ्यांची ग्रामस्थांची अजित पवारांनी बैठक बोलावल्याची माहिती मिळत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या गावभेटी दरम्यान डोर्लेवाडीत रस्त्याच्या वादावरून दोन गटात गोंधळ झाला होता.
Gangapur Dam : नाशिककरांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणाचं विधिवत जलपूजन मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते आज रोजी करण्यात आले. पूजा झाल्यानंतर धरणाच्या पाण्यामध्ये आयुक्तांच्या हस्ते श्रीफळ वाहण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनीही पाण्यामध्ये श्रीफळ वाहिले. धरणाच्या पुलाजवळ असलेल्या मारुतीचेही पूजन आयुक्तांनी केले. धरणाच्या प्रती, निसर्गाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा परंपरेने इथं संपन्न झाला. नाशिक शहरावर निसर्गाची अशीच कृपा राहो, असं आयुक्तांनी यावेळी सांगितलं. पूर्ण भरलेल्या धरणाचा जलसाठा पाहून उपस्थित सर्वांनीच आनंद व्यक्त केला. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे 5.6 टीएमसी क्षमतेचे गंगापूर धरण आशियातील पाहिले मातीचे धरण आहे.
अनिल अंबानी यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा
अनिल अंबानी यांच्याविरोधात 17 नोव्हेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे प्राप्तिकर विभागाला निर्देश
स्विस बँकेतील दोन खात्यांत 814 कोटी रुपयांहून अधिक रक्कम ठेवत 420 कोटींची कर चुकवेगिरी केल्याचं प्रकरण
याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने अनिल अंबानींना ऑगस्टमध्ये बजावली होती नोटीस
त्या नोटीसविरोधात अनिल अंबानी यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे
Ambarnath News : अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसला अपघात झाला आहे. या स्कूल बसमधून 17 ते 18 विद्यार्थी प्रवास करत होते. सुदैवानं कुठल्याही विद्यार्थ्यांना इजा झाली नसल्याची माहिती मिळतेय. अंबरनाथमधल्या ग्रीन सीटी संकुल परिसरात हा अपघात झाला आहे.
Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आता ‘पालकमंत्री तुमच्या दारी‘ अभियान
मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजपचा नवा फॅार्म्युला
मुंबईकरांसाठी आता ‘पालकमंत्री तुमच्या दारी‘ येणार
मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून उपक्रमाची सुरुवात
मुंबई आणि उपनगरतील सर्व महापालिका वॅार्डात घेणार जनता दरबार
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर थेट जनतेशी जुळवून घेण्याचा भाजपचा फॅार्म्युला
उदय सामंत, सुधीर मुनगंटीवार गुजरात दौऱ्यावर
गांधीनगरमधे 11.30 वा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
औद्योगिक सेंट्रलाईज्ड सिस्टीमचा अभ्यास करण्यासाठी पोहोचले
मेट्रो 3 पाठोपाठ आता मेट्रो 9च्या कारशेडवरून वादाची शक्यता निर्माण झालीय. मीरा भाईंदरमधील कारशेडसाठी राखीव असलेली जागा सुपीक असल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय. दहिसर पूर्व ते मिरा भाईंदरपर्यंत प्रस्तावित मेट्रो नऊच्या कारशेडसाठी 80 एकर जागा राखीव ठेवण्यात आलीय. त्यावर सूचना आणि हरकती मागवण्यात आल्यात. त्यावर ही जागा सुपीक असल्याचा दावा करत ग्रामस्थांनी विरोध सुरु केलाय.
Nanded News : नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील मुक्ता पार्डी येते अंदाजे सकाळी नऊच्या सुमारास देळुबवरुन मुक्ता पार्डीकडे येणाऱ्या भरधाव ट्रकने तीन दुचाकींना चिरडलं. यानंतर ट्रक थेट घरात घुसला. दरम्यान भरधाव वेगात हा ट्रक थेट घरात घुसल्याने, बाथरुममध्ये आंघोळ करणाऱ्या वर्षा माणिक मधने या 19 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अर्धापूर पोलीस स्टेशनचे पोलीस पोलीस पथक दाखल झाले आहे.
Navi Mumbai News : नवी मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या वाशी येथील टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या 10 ते 12 वाहनांना मागून येणाऱ्या भरधाव डम्परने धडक दिली. या धडकेत दोन नागरिक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. तसेच या धडकेत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मर्सिडीज, इको, वॅगनआर अशा चार चाकी गाड्यांचा समावेश आहे. भरधाव डम्परचे ब्रेक अचानक निकामी झाल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला असल्याचे समजते. दरम्यान या प्रकरणी डम्पर चालकावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai News : गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवात देखील वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर
वरळीतील अनेक नवरात्रोत्सवाच्या मंडळांसमोर बॅनर गेटची उभारणी आणि बॅनर
आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष लक्ष
वरळीत शिवसेनेच्या बॅनर ऐवजी शिंदेंचेच बॅनर अधिक
Ambarnath News : अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली. ग्रीन सिटी संकुलात सकाळी पावणेसात वाजता ही घटना घडली. या बसमध्ये 17 ते 18 विद्यार्थी होते. सुदैवाने कुणालाही फारशी इजा झालेली नाही. विद्यार्थ्यांना बाहेर काढून घरी पाठवल्याची माहिती आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बस बाजूला करण्याचं काम सुरु आहे.
Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पावसामुळे धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात मका, उडीद, तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तर नवापूर तालुक्यात भाताची शेती उद्ध्वस्त झाली होती. त्याचसोबत कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. तसेच पुरामुळे शेतजमिनी वाहून जाण्याच्या प्रकारे जिल्ह्यात झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी उद्ध्वस्त झाला होता. याची दखल घेत पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले असून येत्या काळात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिल, त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करु नये, असं आश्वासही त्यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.
Navratri 2022 : शक्ती आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या आदिशक्तीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होतेय. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होत असलेल्या नवरात्रोत्सवाने राज्यासह देशभरात चैतन्याचे वातावरण आहे. नवरात्रोत्सवानिमित्त राज्यातील शक्तीपीठं गजबजलीत. साडेतीन शक्तीपीठं असलेल्या देवस्थानांमध्ये नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आलीय. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता आणि नाशिकच्या वणीची सप्तश्रुंगी देवीचं मंदिर नवरात्रोत्सवानिमित्त सजलंय. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचं दर्शन तुम्ही एबीपी माझावर घेऊ शकणार आहात.
Tanaji Sawant on Maratha Reservation : वेगवेगळ्या मुद्यावरून चर्चेत असलेले आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मराठा आरक्षणावरून केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आताच मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का निर्माण झाली? असा सवाल तानाजी सावंत यांनी केला आहे. या सरकारच्या काळात मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळणारच, पण मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation News) विषय अत्ताच काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे, असं सावंत यांनी म्हटलं आहे. आरक्षणावरून राष्ट्रवादीनं (NCP) दुटप्पी भूमिका घेतल्याचं सांगत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
Girish Mahajan on Shiv Sena : 50 पैकी चाळीस आमदार गेले, 18 पैकी 12 खासदार गेले, यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलेले नाही, अशी टीका मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) केली आहे. तसेच आता शिवसेना भवनासाठी (Shiv Sena Bhavan) देखील मारामाऱ्या होतील, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान, शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतर पक्षात उभी फूट पडले. त्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह काही आमदार, खासदार आणि नगरसेवकांनी बंड करत आमचीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. पक्षातील गटनेतेपदासोबतच, पक्ष, पक्षातं चिन्हावरही शिंदे गटानं दावा केला आहे. या संघर्षासंदर्भातील प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित आहे.
Girish Mahajan on Shiv Sena : 50 पैकी चाळीस आमदार गेले, 18 पैकी 12 खासदार गेले, यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलेले नाही, अशी टीका मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) केली आहे. तसेच आता शिवसेना भवनासाठी (Shiv Sena Bhavan) देखील मारामाऱ्या होतील, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान, शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतर पक्षात उभी फूट पडले. त्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह काही आमदार, खासदार आणि नगरसेवकांनी बंड करत आमचीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. पक्षातील गटनेतेपदासोबतच, पक्ष, पक्षातं चिन्हावरही शिंदे गटानं दावा केला आहे. या संघर्षासंदर्भातील प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित आहे.
पार्श्वभूमी
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
तळेगावात भाजपचं आंदोलन
पुण्यातील तळेगावात आदित्य ठाकरे यांचे जिथे आंदोलन झाले त्याच ठिकाणी आज भाजपकडून आंदोलन करण्यात येणार आहे. मावळचे माजी आमदार संजय भेगडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनाला नितेश राणे, गोपीचंद पडळकर आणि राम शिंदे उपस्थित राहणार आहेत.फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प महाविकास आघाडीमुळे गुजरातला गेल्याच्या आरोपातून सकाळी दहा वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे.
'साई रिसॉर्ट'आज हायकोर्टात सुनावणी
दापोलीतील बहुचर्चित 'साई रिसॉर्ट'आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
अंबाबाई देवीच्या पेड ई पासला विरोध करणाऱ्या याचिकेवर सुनावणी
अंबाबाई देवीच्या पेड ई पासला विरोध करणाऱ्या याचिकेवर आज दुपारी सुनावणी होणार आहे.
शिवसैनिकांच्या पदयात्रेला सुरुवात
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर येथील शिवसैनिक नगर ते मुंबई ९ दिवस पदयात्रा करणार आहेत. सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून ही पदयात्रा निघणार आहे. २०० ते २५० शिवसैनिक मुंबई येथे ५ ऑक्टोबरला होणाऱ्या दसरा मेळाव्यात पदयात्रेने सहभागी होणार आहेत.
अगस्ती साखर कारखाना निवडणूक मतमोजणी
अकोले तालुक्यातील अगस्ती साखर कारखाना निवडणूक मतमोजणी आज होणार आहे. कारखाना स्थापनेपासून ताब्यात असलेली सत्ता टिकविण्याचं मोठं आव्हान पिचड पिता पुत्रांसमोर आहे.
सैराट चित्रपटातील प्रिन्स उर्फ सूरज पवार याची राहुरी पोलिस चौकशी करणार
मंत्रालयात सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीतील आरोपीनं नाव घेतलेला सैराट चित्रपटातील प्रिन्स उर्फ सूरज पवार याला राहुरी पोलिसांनी आज चौकशीसाठी बोलावलं आहे.
राष्ट्रपती कर्नाटकच्या दौऱ्यावर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 28 सप्टेंबरपर्यंत कर्नाटकचा दौरा करणार आहेत. राष्ट्रपती म्हणून त्यांचा हा पहिलाच राज्य दौरा असेल. राष्ट्रपती आज म्हैसूरच्या चामुंडी हिल्स येथे म्हैसूर दसरा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत.
खंडणी प्रकरणी जॅकलीन फर्नांडिसला आज कोर्टात समन्स
सुकेश चंद्रशेखर याच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकलेली बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आज पटियाला हाऊस कोर्टात हजर होऊ शकते.
काँग्रेसची पत्रकार परिषद
काँग्रेसचे खासदार आणि प्रवक्ते शक्ती सिंह गोहिल आज दुपारी 12 वाजता दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -