Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Jaya Kishori on Mahakumbh : डुबकी घेतल्याने तुमची सर्व पापे धुतली जात नाहीत. डुबकी घेतल्याने चुकून किंवा नकळत झालेली पापे धुऊन जातात. विचारपूर्वक केलेली कृत्ये धुऊन जात नाहीत, असे त्यांनी सांगितले.
Continues below advertisement
Jaya Kishori on Mahakumbh
Continues below advertisement
1/11
प्रेरक वक्त्या जया किशोरी यांनी लखनौ येथे आयोजित कार्यक्रमात हजेरी लावली.
2/11
यावेळी त्यांनी भक्ती, जीवन आणि माया या विषयावर आपले विचार मांडले.
3/11
जया किशोरी म्हणाल्या की, महाकुंभात स्नान केल्याने पाप धुतले जात नाहीत.
4/11
एक गोष्ट लक्षात ठेवा, डुबकी घेतल्याने तुमची सर्व पापे धुतली जात नाहीत. डुबकी घेतल्याने चुकून किंवा नकळत झालेली पापे धुऊन जातात. विचारपूर्वक केलेली कृत्ये धुवून जात नाहीत, असे त्यांनी सांगितले.
5/11
गंगा माता सुद्धा असे पाप धुणार नसल्याचे त्या म्हणाल्या.
Continues below advertisement
6/11
त्या कृत्याची शिक्षा तुम्हाला नक्कीच मिळेल. कोण डुबकी घेतोय, त्याने आयुष्यात काय केलंय हा वेगळा मुद्दा असल्याचे त्या म्हणाल्या.
7/11
महाकुंभातील युवकांच्या सक्रियतेबाबत प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, आपला देश बदलत असून भक्तीकडे वाटचाल करत आहे. लोक मुक्त मानसिकतेने भक्ती आणि अध्यात्माकडे वाटचाल करत आहेत, ही चांगली गोष्ट आहे.
8/11
महाकुंभात झालेल्या अपघातावर आपले मत मांडताना त्या म्हणाल्या की, ज्यांच्यासोबत हा अपघात झाला त्यांच्यासाठी कोणतेही औषध काम करणार नाही. त्या लोकांच्या वेदना आपण कमी करू शकत नाही, पण त्यांना आधार नक्कीच देऊ शकतो.
9/11
आणि जे घडले त्याबद्दल माफी मागू शकतो. एवढ्या मोठ्या संख्येने लोक महाकुंभाला पोहोचतात ही चांगली गोष्ट आहे, पण लोकांनी काही नियम पाळले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
10/11
जया किशोरी यांना विचारण्यात आले की नास्तिक आध्यात्मिक असू शकतो का? त्याला उत्तर देताना म्हणाल्या की, 'जर तुम्ही अध्यात्मिक असाल तर तुम्हाला शक्तीवर विश्वास ठेवावा लागेल.
11/11
इथं ती शक्ती म्हणजे कृती. जर तुम्ही फक्त स्वतःला सर्वोच्च समजत असाल तर तुम्ही आध्यात्मिक नाही, असेही त्यांनी नमूद केले.
Published at : 16 Feb 2025 03:56 PM (IST)