Maharashtra News Updates : बोईसर तारापूर एमआयडीसीत स्फोट, दोघांचा मृत्यू तर 10 जण जखमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
राज्यात सर्वत्र भाऊबीज आणि पाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय. आजच्या दिवशी आपल्या बहीण आपल्या भावाचं औक्षण करते आणि भाऊ देखील आपल्या बहिणीला ओवाळणी देतो. सोलापुरात पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्याला सहकारी महिला नेत्याने औक्षण करत पक्षात राहण्याचे शब्द देण्याची ओवाळणी मागितली. सोलापुरातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे हे दिवाळीनंतर शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोलगे यांनी आज भाऊबीजला दिलीप कोल्हे यांचे औक्षण केले. त्यानंतर पक्षातून जाऊ नका अशी विनंती केली. आपली नाराजगी आपण शरद पवार, अजित पवार यांसमोर मांडू पण पक्ष सोडून जाऊ नका असे म्हणत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. औक्षण झाल्यानंतर दिलीप कोल्हे यांनी विद्या लोलगेना भेट म्हणून साडी दिली. पण साडी नको तर पक्षात रहा आणि शिंदे गटात जाऊ नका, हीच माझी ओवाळणी आहे अशी विनंती केली. पण राष्ट्रवादी मधील अंतर्गत गटबाजीला नाराज झालेले माजी उपमहापौर दिलीप कोल्हे राष्ट्रवादीमध्ये राहणार की नाही याबाबत एक तारखेनंतर जाहीर करतो असे सांगितले.
अडीच लाख प्रतिज्ञापत्र बाद करण्यात आली आहेत अशा पद्धतीची धाधांत खोटी बातमी सध्या पसरविण्यात येत आहे. मुळात आयोगाचे कार्यालय हे मागच्या चार दिवसांपासून बंद आहे.आणि आम्ही साडेआठ लाख प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत त्यातील आत्ता एक लाख प्रतिज्ञापत्र तपासण्यात आल्याची माहिती आमच्याकडे आहे. त्यामुळे अडीच लाख हा आकडा सदर दैनिकाने कुठून दिला याबाबत शंका आहे. मुळात माजी मुख्यमंत्री अगोदरच काय होणार हे सांगत आहेत यावरून स्पष्ट होत आहे की कशाप्रकारे व्यवस्था कोसळल्या आहेत त्यामुळे या खोट्या बातम्या पसरवणाऱ्या पासून सावध राहायला हवं
बार्शी तालुक्यातील शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी आज एकनाथ शिंदेच्या बाळासाहेबांची शिवसेनामध्ये प्रवेश केला. भाऊसाहेब आंधळकर हे मागील 12 वर्षांपासून शिवसेनेत होते. मात्र मागील 12 वर्षात प्रामाणिकपणे काम करून देखील पक्षाने कोणतीच दखल घेतली नाही. 2014, 2019 साली आमदारकीच्या तिकिटावर हक्क असताना संधी देण्यात आली नाही. उद्धव ठाकरे यांच्या शेजारी असलेल्या चांडाळ चौकडीमुळे भेट होतं नाही. असे विविध आरोप करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. आज पाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेत भाऊसाहेब आंधळकर यांनी प्रवेश केलाय. दरम्यान शिवसेने सोडताना भाऊसाहेब आंधळकर यांनी गंभीर आरोप केलेत.
कल्याण पूर्वेकडील काटेमानवली परिसरात नितीन राज हॉटेल समोरील एका भंगाराच्या गोडाऊनमध्ये आज रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली.... आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केलं... या गोडाऊनच्या बाजूला असलेल्या गॅरेजला देखील या आगीची झळ बसली.... आग लागल्याचे लक्षात येतात तत्काळ गॅरेज चालकाने गॅरेज मधील दोन गाड्या बाहेर काढल्या... मात्र गॅरेज मधील एका गाडीला आगीची झळ बसली असून या गाडीचं नुकसान झालंय... या भंगारचा गोडाऊन मध्ये लाकडी वस्तू , टायर तसेच ,जुने फ्रीज ,वॉशिंग मशीन ठेवण्यात आल्या होत्या... घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली..चार अग्नीशमनच्या गाड्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवलं.. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी गॅरेज व भंगाराच्या गोडाऊनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय... एखादा फटाका या गोडाऊन मध्ये पडला असावा त्याच्या ठिणगी मुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज अग्निशमन विभागाने व्यक्त केलाय...पुढील चौकशी सुरु आहे
मुलाने अमानुषपणे आईला मारहाण केल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दिलीप जाधव अस अमानुषपणे मारहाण केलेल्या आरोपीचे नाव आहे... वैजयंता जाधव यांनी आपल्या मुलाविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून इंदापूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैजयंता जाधव या इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील रहिवासी आहेत.
दिवाळी पाडव्यानंतर माळशिरस तालुक्यातील मेंढपाळ बांधव आपल्या मेंढ्या घेऊन मराठवाडा भागात चरायला घेऊन जातात. त्यापूर्वी रेडे गावात ग्राम दैवताला मेंढ्यांचे गोल रिंगण घालतात. बाहेरगावी जाताना आपल्या देवाचा आशीर्वाद असावा या भावनेने हे रिंगण घालण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही जपली आहे.
भिवंडी शहरातील वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष सुनील भगत यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
औरंगाबाद शहरात रात्री एका तरुणाने आकाशात उडणारे रॉकेट फटाक्याच मोठ बॉक्स हातात घेऊन वाहतूक सुरु असलेल्या रस्त्यावरच फोडायला सुरुवात केली. धोकादायक पद्धतीने फिरून हा तरुण ते रॉकेट सोडत होता. आजूबाजूला दुकाने घर यांची कोणतीही पर्वा न करता रहिवाशी भागात तरुण फटाके फोडत होता. या तरुणाचा व्हिडीओ सध्या व्हायरलं होत असून हा व्हिडिओ शहरातील जवाहरनगर परिसरातील असल्याचे समोर आले आहे.
ठाणे रायगड जिल्ह्यात दिवाळीत येणारा बलीप्रतिपदा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ठाणे रायगड जिल्ह्यातील शेतकरी बलीप्रतिपदेच्या दिवशी गायी, बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. कल्याणमध्ये देखील शेतकरी वर्गाने बलीप्रतीपदा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ठाणे जिल्ह्यात आज बलिप्रतिपदेच्या दिवशी गुरं उडवण्याची प्रथा आहे. आजच्या दिवशी घरातील जनावरांचं पूजन करून त्यांना गवताच्या जळत्या पेंडीतून उड्या मारायला लावल्या जातात. यामुळे वर्षभर जनावरांचं आरोग्य चांगलं राहतं, अशी शेतकऱ्यांची भावना आहे.
दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच बलिप्रतिपदा. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाळ्यानंतर दिवाळीत शेतीच्या कामाला सुरुवात करण्यात येते. दिवाळीच्या कालखंडात भात घरी येतो. यावेळी जनावरांची कामं पुन्हा एकदा सुरू होतात. त्यामुळेच जनावरांची दरवर्षी बलिप्रतिपदेच्या दिवशी आंघोळ घालून पूजा केली जाते. त्यांना दिवाळीचा फराळ आणि गोडधोड भरवलं जातं. त्यानंतर गावात गवताची पेंड पेटवून त्यावरून ही गुरं उडवली जातात. असं केल्यामुळे जनावरांच्या अंगावरील कीटक, जंतू मरतात आणि त्यांना कोणत्याही रोगाची लागण होत नाही. आगामी वर्षभर गुरांचं आरोग्य चांगलं राहतं, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे आणि रायगड जिल्ह्यात आणि प्रामुख्याने आगरी समाजात ही प्रथा पाळली जाते.
संगणक आणि इंटरनेटच्या युगातही गवळी समाजातर्फे शेकडो वर्षापासून सगर उत्सवाची परंपरा टिकून आहे. दरवर्षी दिपावलीनिमित्त मुक्या प्राण्यांचा सगर उत्सव नंदुरबार शहराचे आकर्षण असते. बलिप्रतिपदा निमित्त गवळी समाजातर्फे सगर उत्सवानिमित्त रेड्यांची आणि पाळीव गाई-म्हशींची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
राज्यात ज्या-ज्या ठिकाणी गवळी समाज आहे, तेथे दिवाळी सणाच्या काळात सगर उत्सव अर्थात रेड्यांसह गाई-म्हशींच्या पूजनाला महत्त्व आहे. वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे म्हैस आणि रेडाच्या माध्यमातून बंधुभाव जोपासण्यासाठी शेकडो वर्षापासूनची परंपरा आजही तग धरून आहे. दिवाळीत एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी समाज बांधव एकत्र होतात. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सगर अर्थात रेड्यांची मिरवणूक काढली जाते. तसेच पंच मंडळींच्या निर्णयानंतर रेड्यांची झुंज देखील लावली जाते.
विविध कामांना गती देण्याचा प्रयत्न - शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जनतेस दिवाळीच्या शुभेच्छा
बोईसर तारापूर एमआयडीसीत भगेरिया केमिकल कंपनीत स्फोट झाला आहे. उत्पादन सुरू असताना बॉयलरमध्ये हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला तर दहा पेक्षा जास्त कामगार जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
दिवाळीनिमित्त भाऊबीजेची सर्वत्र धामधूम सुरू असताना कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव शिवारात गोदावरी नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या मावशी भाचीवर काळाने घाला घातला असून गोदावरी नदीच्या पाणीपत्रात बुडून मावशी भाचीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. अर्चना जगदीश सोनवणे,, वय ३५ राहणार नाशिक,,,आणि गौरी शरद शिंदे वय १८ रा. मसरुळ नाशिक असे मृत्यु झालेल्या मावशी व भाचीचे नाव आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन. अंत्यविधी रात्री 9 वाजता पाषाण स्मशानभूमी मध्ये होईल.
माझ्या संपर्कात सात ते आठ अपक्ष आमदार आहेत. ते सत्ता पाडण्यासाठी किंवा सत्तेतून बाहेर पडण्यासाठी नाही तर मतदारसंघात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात, 50 खोके घेतल्याचे आरोप होतात त्यामुळे ते नाराज आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे, असे बच्चू कडू म्हणाले.
राज्यातील सत्तांतराच्या वेळी आमदार बच्चू कडू यांनी पैसे घेतल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता. आता त्यासंबंधी 1 नोव्हेंबरपर्यंत पुरावे द्या अन्यथा कायदेशीर कारवाईला तयार राहा असा इशारा बच्चू कडू यांनी राणा यांना दिला आहे.
वाशिम जिल्ह्यात गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. वाशिममध्ये तरुणींसोबत छेडछाड घडल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यावरून पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. सध्या छेडछाडीच्या घटना वाढत चालल्या आहेत. छेड काढल्याची पोलिसात तक्रार दिल्याने आरोपींनी पीडितेच्या पित्यावर तीन वेळा जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. वारंवार पोलिसात तक्रार करुनही पोलीस कारवाई करत नाही म्हणून पीडितेच्या वडीलांनी थेट जखमी अवस्थेतच जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय गाठलं.
अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीची मदत आणि पीक विमा न मिळाल्याने माजलगाव तालुक्यातल्या दिंद्रुड येथे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसह आमरण उपोषण सुरू केलं आहे.. परततिच्या पावसानं बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालंय, तर माजलगाव तालुक्यातल्या दिंदृड महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने कुठलंच पीक शेतकऱ्यांच्या हाती लागला नसल्याने शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची आणि पीक विम्याची अपेक्षा होती मात्र अद्याप देखील या शेतकऱ्यांना कुठलीच मदत न मिळाल्याने शेतकरी उपोषणाला बसले आहेत..
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. शनिवारपासून नंदूरबारमधून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या भेटीला उद्धव ठाकरे गेले होते. उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होण्याआधीच शिंदे-फडणवीस यांचा महाराष्ट्र दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यातून नवीन युतीला सुरुवात होणार आहे. ठाकरे गटाचे बालेकिल्ले असलेल्या भागात शिंदे-फडणवीस एकत्रित दौरा करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.
Raj Thackeray: महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. दिवाळीनिमित्त राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी ही मुलं दादर येथे दाखल झाली आहेत. थोड्याच वेळात अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात ही मुलं 'शिवतीर्थ'वर राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
Parbhani: अतिवृष्टीमुळे शेतकरी अगोदरच संकटात असताना जे सोयाबीन हाती लागले ते काढून ठेवत आहे मात्र अस असताना काही जण याच सोयाबीनला लक्ष करत आहेत.परभणी जिल्ह्यात काढून ठेवलेलं सोयाबीन जाळण्याचा प्रकार सातत्याने घडत आहे.परभणी तालुक्यातील मुरुंब्यातील शेतकरी मोहन जवंजाळ यांनी शेतात तब्बल 4 एकरचे सोयाबीन काढून गंजी लावली होती मात्र काल ही गंजीच कुणीतरी पेटवून दिली ज्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्याच मोठं आर्थिक नुकसान झाले आहे दरम्यान या प्रकरणात मोहन जवंजाळ यांनी पोलिसांत तक्रार दिली असुन आशा प्रकारे सोयाबीन जाळणाऱ्यावर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे
कोल्हापूर - पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे सुरु
Navi Mumbai Fire: कळंबोली येथील भारतीय कपास निगम ( CWC ) गोडाऊनला आग लागली आहे. गोडाऊनमध्ये धान्याचा मोठा साठा होता. आग विझविण्याचे कळंबोली अग्निशमन विभागाकडून प्रयत्न सुरू आहे.
Kolhapur News: कोल्हापुरात विमानांच्या नाईट लँडिंगची प्रक्रिया पूर्ण झाली असून 3 ऑक्टोबरपासून कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंगला सुरूवात होणार आहे. विमानसेवा विस्तार होण्यास मदत मिळणार आहे.
Nanded News: नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात दिवाळीनिमित्त नगर किर्तन आणि हल्लाबोल कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शिख बांधवांच्या वर्षभरातील प्रमुख व ऐतिहासिक सणांपैकी हा प्रमुख सण आहे.जगभरातील शिख समुदायाचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंह यांनी सुरु केलेल्या या सणाला अनन्य साधारण महत्व आहे... या सणात सहभागी होण्यासाठी देशविदेशात शिख बांधव नांदेडात येतात.दरम्यान दिवाळीनिमित्त हल्लाबोल चौका सून सचखंड गुरुद्वारा र्यंत शहरातील प्रमुख भागातून नगर किर्तन करुन हल्लाबोल कार्यक्रम करण्यात आलाय. यावेळी हजारो शिख बांधवांनी मोठ्याप्रमाणात सहभाग नोंदविलाय. सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे रात्री साडे अकरा वाजता पुजा पाठ, अरदास करुन या उत्सवाची सांगता केली जाणार आहे..
Devendra Fadnavis Meet CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत
पार्श्वभूमी
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...
दिवाळी पाडवा आणि भाऊबीज
आज दिवाळीचा पाडवा आणि भाऊबीज साजरी केली जाणार आहे. संपूर्ण भारतभर हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पाडव्यानिमित्त व्यापारी आपल्या हिशोबाच्या वह्यांचे पूजन करता. साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणून दिवाळी पाडव्याकडे पाहिले जाते. भाऊबीजनिमित्त बहिण आपल्या भावाला ओवाळते. त्यानंतर भाऊ बहिणीला खास भेट म्हणजे ओवाळणी देतो.
नेत्यांचं पाडवा, भाऊबीज सेलिब्रेशन
बारामतीत गोविंद बागेत दिवाळीच्या पाडव्याला पवार कुटुंबीय कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी लोकांना भेटतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार त्याचबरोबर कुटुंबातील इतर सदस्य उपस्थितीत असतात. सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळेत का कार्यक्रम पार पडणार आहे.
कोल्हापुरात गुळाचे सौदे होणार
कोल्हापुरात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मार्केट यार्डमध्ये गुळाचे सौदे होणार आहेत. या सौद्यामध्ये गुळाला किती दर मिळणार यावर पुढील दर अवलंबून असतात.
मुंबईत रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची भाऊबीज
मातोश्री सामाजिक संस्थेद्वारे एक सामजिक बांधिलकी म्हणून उद्या अनाथ आणि रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची भाऊबीज करण्यात येणार आहे. तसेच त्यांना उपयोगी साहीत्य देण्यात येणार आहे
इंदापुरात स्वप्नील सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश
इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.
सांगलीत किल्ल्याच्याच्या प्रतिकृचे उद्घाटन
कवलापूर मध्ये रायगड किल्ल्याच्याची प्रतिकृती बनवली असून त्याच उद्घाटन आहे. 55 फूट बाय 35 फूट किल्ला बनवला आहे. राज्यातील सर्वात मोठा किल्ला आहे.
गणपतीपुळ्यात दीपोत्सव
दिवाळी पाडव्यानिमित्त प्रसिद्ध गणपतीपुळ्यात संध्याकाळी ७ वाजता दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. मागील अनेक वर्षांपासूनची ही परंपरा तितकाच भक्तिभावानं जपली जाते आणि उत्साहात साजरी केली जाते. दीपोत्सवही साजरा केला जाईल.
मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार
काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज पक्ष मुख्यालयात जाऊन पदभार स्वीकारणार आहेत. सकाळी 8 वाजता- खर्गे राजघाट, शांतिवन, विजय घाट, शक्ति स्थल, वीर भूमि और समता स्थळावर जाणार आहेत. सकाळी 10.30 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. सोनिया, राहुल, प्रियांका गांधी उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11 वाजता सोनिया गांधी आणि खर्गेंचं भाषण होईल.
टी-20 विश्वचषकात भारतीय संघ आज नेदरलँड्सविरुद्ध लढत देणार
टी-20 विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा चार विकेट्सनं धुव्वा उडवल्यानंतर भारतीय संघ आज (27 ऑक्टोबर) नेदरलँड्सविरुद्ध या स्पर्धेतील दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघानं आतापर्यंत नेदरलँड्सशी टी-20 मध्ये खेळलेला नाही. बांग्लादेशविरुद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात नेदरलँड्सच्या संघाला 9 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. भारताविरुद्ध नेदरलँड्सचा संघ कशी कामगिरी बजावतो? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -