Maharashtra News Updates : बोईसर तारापूर एमआयडीसीत स्फोट, दोघांचा मृत्यू तर 10 जण जखमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...
दिवाळी पाडवा आणि भाऊबीज
आज दिवाळीचा पाडवा आणि भाऊबीज साजरी केली जाणार आहे. संपूर्ण भारतभर हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पाडव्यानिमित्त व्यापारी आपल्या हिशोबाच्या वह्यांचे पूजन करता. साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणून दिवाळी पाडव्याकडे पाहिले जाते. भाऊबीजनिमित्त बहिण आपल्या भावाला ओवाळते. त्यानंतर भाऊ बहिणीला खास भेट म्हणजे ओवाळणी देतो.
नेत्यांचं पाडवा, भाऊबीज सेलिब्रेशन
बारामतीत गोविंद बागेत दिवाळीच्या पाडव्याला पवार कुटुंबीय कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी लोकांना भेटतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार त्याचबरोबर कुटुंबातील इतर सदस्य उपस्थितीत असतात. सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळेत का कार्यक्रम पार पडणार आहे.
कोल्हापुरात गुळाचे सौदे होणार
कोल्हापुरात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मार्केट यार्डमध्ये गुळाचे सौदे होणार आहेत. या सौद्यामध्ये गुळाला किती दर मिळणार यावर पुढील दर अवलंबून असतात.
मुंबईत रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची भाऊबीज
मातोश्री सामाजिक संस्थेद्वारे एक सामजिक बांधिलकी म्हणून उद्या अनाथ आणि रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची भाऊबीज करण्यात येणार आहे. तसेच त्यांना उपयोगी साहीत्य देण्यात येणार आहे
इंदापुरात स्वप्नील सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश
इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.
सांगलीत किल्ल्याच्याच्या प्रतिकृचे उद्घाटन
कवलापूर मध्ये रायगड किल्ल्याच्याची प्रतिकृती बनवली असून त्याच उद्घाटन आहे. 55 फूट बाय 35 फूट किल्ला बनवला आहे. राज्यातील सर्वात मोठा किल्ला आहे.
गणपतीपुळ्यात दीपोत्सव
दिवाळी पाडव्यानिमित्त प्रसिद्ध गणपतीपुळ्यात संध्याकाळी ७ वाजता दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. मागील अनेक वर्षांपासूनची ही परंपरा तितकाच भक्तिभावानं जपली जाते आणि उत्साहात साजरी केली जाते. दीपोत्सवही साजरा केला जाईल.
मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार
काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज पक्ष मुख्यालयात जाऊन पदभार स्वीकारणार आहेत. सकाळी 8 वाजता- खर्गे राजघाट, शांतिवन, विजय घाट, शक्ति स्थल, वीर भूमि और समता स्थळावर जाणार आहेत. सकाळी 10.30 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. सोनिया, राहुल, प्रियांका गांधी उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11 वाजता सोनिया गांधी आणि खर्गेंचं भाषण होईल.
टी-20 विश्वचषकात भारतीय संघ आज नेदरलँड्सविरुद्ध लढत देणार
टी-20 विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा चार विकेट्सनं धुव्वा उडवल्यानंतर भारतीय संघ आज (27 ऑक्टोबर) नेदरलँड्सविरुद्ध या स्पर्धेतील दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघानं आतापर्यंत नेदरलँड्सशी टी-20 मध्ये खेळलेला नाही. बांग्लादेशविरुद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात नेदरलँड्सच्या संघाला 9 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. भारताविरुद्ध नेदरलँड्सचा संघ कशी कामगिरी बजावतो? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
'तुम्ही पक्ष सोडून कुठे जाऊ नका, तुम्ही राष्ट्रवादीतच राहण्याचा शब्द द्या, हीच माझी ओवाळणी''
राज्यात सर्वत्र भाऊबीज आणि पाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय. आजच्या दिवशी आपल्या बहीण आपल्या भावाचं औक्षण करते आणि भाऊ देखील आपल्या बहिणीला ओवाळणी देतो. सोलापुरात पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्याला सहकारी महिला नेत्याने औक्षण करत पक्षात राहण्याचे शब्द देण्याची ओवाळणी मागितली. सोलापुरातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे हे दिवाळीनंतर शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोलगे यांनी आज भाऊबीजला दिलीप कोल्हे यांचे औक्षण केले. त्यानंतर पक्षातून जाऊ नका अशी विनंती केली. आपली नाराजगी आपण शरद पवार, अजित पवार यांसमोर मांडू पण पक्ष सोडून जाऊ नका असे म्हणत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. औक्षण झाल्यानंतर दिलीप कोल्हे यांनी विद्या लोलगेना भेट म्हणून साडी दिली. पण साडी नको तर पक्षात रहा आणि शिंदे गटात जाऊ नका, हीच माझी ओवाळणी आहे अशी विनंती केली. पण राष्ट्रवादी मधील अंतर्गत गटबाजीला नाराज झालेले माजी उपमहापौर दिलीप कोल्हे राष्ट्रवादीमध्ये राहणार की नाही याबाबत एक तारखेनंतर जाहीर करतो असे सांगितले.
प्रतिज्ञापत्र बाद करण्यात आल्याची बातमी खोटी - खासदार अरविंद सावंत
अडीच लाख प्रतिज्ञापत्र बाद करण्यात आली आहेत अशा पद्धतीची धाधांत खोटी बातमी सध्या पसरविण्यात येत आहे. मुळात आयोगाचे कार्यालय हे मागच्या चार दिवसांपासून बंद आहे.आणि आम्ही साडेआठ लाख प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत त्यातील आत्ता एक लाख प्रतिज्ञापत्र तपासण्यात आल्याची माहिती आमच्याकडे आहे. त्यामुळे अडीच लाख हा आकडा सदर दैनिकाने कुठून दिला याबाबत शंका आहे. मुळात माजी मुख्यमंत्री अगोदरच काय होणार हे सांगत आहेत यावरून स्पष्ट होत आहे की कशाप्रकारे व्यवस्था कोसळल्या आहेत त्यामुळे या खोट्या बातम्या पसरवणाऱ्या पासून सावध राहायला हवं
भाऊसाहेब आंधळकर यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
बार्शी तालुक्यातील शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी आज एकनाथ शिंदेच्या बाळासाहेबांची शिवसेनामध्ये प्रवेश केला. भाऊसाहेब आंधळकर हे मागील 12 वर्षांपासून शिवसेनेत होते. मात्र मागील 12 वर्षात प्रामाणिकपणे काम करून देखील पक्षाने कोणतीच दखल घेतली नाही. 2014, 2019 साली आमदारकीच्या तिकिटावर हक्क असताना संधी देण्यात आली नाही. उद्धव ठाकरे यांच्या शेजारी असलेल्या चांडाळ चौकडीमुळे भेट होतं नाही. असे विविध आरोप करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. आज पाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेत भाऊसाहेब आंधळकर यांनी प्रवेश केलाय. दरम्यान शिवसेने सोडताना भाऊसाहेब आंधळकर यांनी गंभीर आरोप केलेत.
कल्याण पूर्वेतील भंगाराच्या गोडाऊनला आग
कल्याण पूर्वेकडील काटेमानवली परिसरात नितीन राज हॉटेल समोरील एका भंगाराच्या गोडाऊनमध्ये आज रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली.... आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केलं... या गोडाऊनच्या बाजूला असलेल्या गॅरेजला देखील या आगीची झळ बसली.... आग लागल्याचे लक्षात येतात तत्काळ गॅरेज चालकाने गॅरेज मधील दोन गाड्या बाहेर काढल्या... मात्र गॅरेज मधील एका गाडीला आगीची झळ बसली असून या गाडीचं नुकसान झालंय... या भंगारचा गोडाऊन मध्ये लाकडी वस्तू , टायर तसेच ,जुने फ्रीज ,वॉशिंग मशीन ठेवण्यात आल्या होत्या... घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली..चार अग्नीशमनच्या गाड्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवलं.. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी गॅरेज व भंगाराच्या गोडाऊनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय... एखादा फटाका या गोडाऊन मध्ये पडला असावा त्याच्या ठिणगी मुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज अग्निशमन विभागाने व्यक्त केलाय...पुढील चौकशी सुरु आहे