Maharashtra News Updates 24 January 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. केंद्रिय सहकार मंत्री अमित शहांसोबत या दोघांची बैठक होणार आहे. याबरोबरच गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आरोप निश्चितीची प्रक्रियाआज होणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह या प्रकरणातील सहआरोपी प्रवीण राऊत, वाधवान ब्रदर्स यांच्याविरोधात आरोप निश्चित होणार आहे. शिवाय अन्वय नाईक मृत्यूप्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामींविरोधात नाईक कुटुंबियांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. केंद्रिय सहकार मंत्री अमित शहांसोबत या दोघांची बैठक होणार आहे.
मुंबईतील गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आरोप निश्चितीची प्रक्रिया
गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आरोप निश्चितीची प्रक्रियाआज होणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह या प्रकरणातील सहआरोपी प्रवीण राऊत, वाधवान ब्रदर्स यांच्याविरोधात आरोप निश्चित होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून सर्व आरोपींना हजर राहण्याची नोटीस जारी केलीय.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नशिक दौऱ्यावर
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज नशिक दौऱ्यावर आहेत. सकाळी 10.30 वाजता हात से हात जोडो कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. त्यानंतर पदवीधर मतदारसंघच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ नाना पटोले यांची बैठक होणार आहे.
अर्णब गोस्वामींविरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी
अन्वय नाईक मृत्यूप्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामींविरोधात नाईक कुटुंबियांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
राखी सावंतच्या याचिकेवर पुन्हा सुनावणी
अभिनेत्री राखी सावंत हिने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. एका प्रसिद्ध मॉडेलने दिलेल्या तक्रारीनुसार राखीविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळालेल्या मुलांशी पंतप्रधान मोदी साधणार संवाद
राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळालेल्या मुलांशी पंतप्रधान मोदी आज संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय बाल पुरस्कार बीडच्या राजुरी येथील 15 वर्षाच्या रोहन रामचंद्र बहिर याला मिळालाय.
केंद्रिय मंत्रिमंडळाची बैठक
आज सायंकाळी सहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रिय मंत्रिमंडळाची बैठक होआर आहे.
राहुल गांधी यांची पत्रकार परिषद
भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांची पत्रकार परिषद होआर आहे. आज दुपारी 1 वाजता जम्मू-काश्मीरमधील इज्जर कोटलीमध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे.
इंदौरमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटाचा सामना
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अखेरचा एकदिवसीय सामना आज दुपारी 1.30 वाजता इंदौरच्या होळकर स्टेडीयमवर होणार आहे. याबरोबरच आजच रणजी ट्रॉफीत दिल्ली आणि हैदराबाद यांचा सामना होणार आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर नियंत्रण सुटलेला ट्रेलर आडवा; वाहनांच्या रांगाच रांगा
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर नियंत्रण सुटलेला ट्रेलर आडवा झाला आहे. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलीस आणि आय आर बी कर्मचाऱ्यांकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीचे पत्रच नाही. राजभवनाचे माहिती अधिकारात उत्तर
शिवसेनेतून बाहेर पडत एकनाथ शिंदे यांनी भाजपा बरोबर सरकार स्थापन केले. सरकार स्थापनेनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर भाजपाचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. मात्र या दोघांना शपथविधीसाठी आमंत्रित केलेले पत्रच नसल्याचे माहिती आधिकारात पुढे आले आहे. नवी मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष जाधव यांनी राजभवन मध्ये अर्ज केला होता. भाजपा - शिंदे सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी त्यांना पत्र दिले होते का. दिले असेल तर त्यांची प्रत देण्यात यावी अशी मागणी केली होती. यावर राजभवनाकडून उत्तर आले असून सरकार स्थापन करण्यासाठी कोणतेही पत्र दिलेले नसल्याने त्याची प्रत उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे सरकार चुकीच्या पध्दतीने आले असून याबाबत आपण न्यायालयात जाणार असल्याचे संतोष जाधव यांनी सांगितले आहे.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या कार्यालयाची तोडफोड; अधिकार्यांच्या तोंडाला काळे फासले.
पीकविम्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि जनहित शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांसह शेतकर्यांनी आक्रमक भूमिका घेत प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या कार्यालयाची तोडफोड करुन टाळे ठोकले. केंद्र आणि राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. तसेच पीकविम्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास 26 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांना शहरात पाय ठेवू देणार नाही असा इशाराही आंदोलकांनी दिला.
शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी पीकविम्याच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा आठ दिवसांपूर्वीच दिला होता. आज दुपारी आक्रमक शिवसैनिकांसह जनहित शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांसमवेत शेतकरी बँक कॉलनी भागातील पीकविमा कार्यालयासमोर धडकले. शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांच्या प्रती उपलब्ध करुन देण्याची मागणी करीत आंदोलकांनी कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. हजर असलेल्या दोन अधिकार्यांच्यांच्या तोंडाला काळे फासून कार्यालयाला टाळे ठोकले. या आंदोलनामुळे कार्यालय परिसरात गोंधळ उडाला. शिवसेनेसह जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी जोरदार घोषणा देत केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करत शेतकर्यांना हक्काचा पीकविमा मिळालाच पाहिजे अशी मागणी केली.
करुणा मुंडे यांच्या विरोधात परळी मध्ये गुन्हा दाखल..
उद्धव ठाकरे यांची अजित पवार घेणार भेट
जयंत पाटील आणि अजित पवार उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीसोबतचा निर्णय जाहीर करणार आहेत.