Maharashtra News Updates : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 15 कोटींचे ड्रग्ज जप्त 

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Oct 2022 09:21 PM
Mumbai Fire:  माटुंग्यामध्ये रुईया कॉलेजच्या मागे एका इमारतीमध्ये आग

Mumbai Fire:  माटुंग्यामध्ये रुईया कॉलेजच्या मागे एका इमारतीमध्ये आग, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळावर, शिवनिर्मल या इमारतीच्या 17 मजल्यावर घराचं काम सुरू होतं, घरामध्ये ठेवलेल्या बांबूला आग लागली  


 

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 15 कोटींचे ड्रग्ज जप्त 

डीआरआयने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गोमधून 15 कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे . दोन किलो एम्पीपीटामाइन ड्रग्ज जप्त करण्यात आले असून हे ड्रग्ज पॅरिसहून कुरियरच्या माध्यातून मुंबईला आणण्यात आले होते.    

उद्धव ठाकरे पिक पाहणीला नाही तर फक्त राजकारण करायला आले होते ; कृषिमंत्र्यांची टीका

उद्धव ठाकरे पिक पाहणीला नाही तर फक्त राजकारण करायला आले होते, अशी टीका कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. "मी सत्तर तालुक्यात फिरलो अजून मला दुष्काळ कळाला नाही. यांना वीस मिनिटात दुष्काळ काय कळाला असावा.   जर असे फिरले असते तर अशी वेळ आली नसती असा टोलाही मंत्री सत्तार यांनी लगवलाय.  

शेतकरी राजा संकटात असल्याने दिवाळी साजरी न करण्याचा आमदार संजय गायकवाड यांचा निर्णय

शेतकरी राजा संकटात असल्याने दिवाळी साजरी न करण्याचा आमदार संजय गायकवाड यांनी निर्णय घेतला आहे. एकीकडे सरकार म्हणतंय शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू , दुसरीकडे सत्ताधारी आमदार आंदोलन करत आहेत. दिवाळीच्या दिवशी संजय गायकवाड जिल्हाधिकारी कार्यालयात खाणार चटणी भाकर....!

आमचं काय चुकलं - योगेश क्षीरसागर..

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते जयदत्त क्षीरसागरांची शिवसेनेने हकालपट्टी केली यावर पहिल्यांदाच जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे योगेश क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली. आमचं काय चुकलं असा सवाल सुद्धा उपस्थित केलाय. 


माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर बीडमध्ये शिवसेना विरुद्ध क्षीरसागर राजकारण आपलं असून आम्ही विकास कामासाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि यात जर आमची काही चूक असेल तर आम्हाला आमची पुढची दिशा ठरवावी लागेल अशी प्रतिक्रिया जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे योगेश क्षीरसागर यांनी माध्यमांना दिली आहे..

Live: शेतकऱ्यांना पन्नास हजार हेक्टरची मदत करा: उद्धव ठाकरे

Aurangabad : उपमुख्यमंत्री म्हणाले की पाऊस किती पडावा महापलिका ठरवत नाही. अस्मानी संकट आपल्या हातात नसतात. घोषणाची अतिवृतिष्टी सुरु आहे. भावनांचा दुष्काळ या सरकारमध्ये आहे. हे ऊत्सव मग्न हे सरकार आहे. उत्सव साजरे करा पण आपली प्रजा ही सुख, समाधान आहे का पाहावे. हे सरकार बेदकरपने सांगत की ओला दुष्काळ जाहीर करण्याची स्थिती नाही. मी हा दौरा प्रतिकात्मक केला आहे. शिधा वटपत घोटाळा झाला की नाही हे पुढे समोर येईल. मी जे म्हणतोय ते शेतकऱ्यांची मागणी आहे. दिवाळी सजारी करण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही का?. ओला दुष्काळ आतापर्यंत जाहीर झालं पाहिजे होतं पण भावनांचा दुष्काळ आहे. पन्नास हजर रुपये मदत मिळाली पाहिजे ही मागणी होती

Uddhav Thackeray: शिंदे-फडणवीस सरकार उत्सवी सरकार : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray: अस्मानी संकट आपल्या हातात नसतात उपमुख्यमंत्री म्हणाले की, पाऊस किती पडावा महापलिका ठरवत नाही.  भावनांचा दुष्काळ या सरकारमध्ये आहे. उत्सव मग्न हे सरकार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Live: या निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ आहे: उद्धव ठाकरे

या निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ आहे. हे उत्सवी सरकार आहे. उत्सव साजरे करा मात्र यावेळी राज्यातील प्रजा समाधानी आहे की नाही हे पाहणं राज्यकर्त्यांचे काम आहे

Uddhav Thackeray:   शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा, शेतकऱ्यानी उद्धव ठाकरेंसमोर मांडली  कैफियत

Uddhav Thackeray:   शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा, नोटिसा थांबवा अशी कैफियत शेतकऱ्यानी उद्धव ठाकरेंसमोर मांडली 

CM Eknath Shinde in Raigad: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगडच्या रेवदंडामध्ये दाखल

CM Eknath Shinde in Raigad: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगडच्या रेवदंडामध्ये दाखल झाले आहेत. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त आहे. 

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. अतिवृष्टीमुळे  झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. सत्तांतरानंतरचा उद्धव ठाकरेंचा पहिला दौरा आहे. 

Dhanteras: धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर 15 हजार कोटींच्या दागिन्यांची संपूर्ण देशात विक्री

Gold: धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर  देशभरात 15 हजार कोटी रुपयांची सोन्याची विक्री झालीये. मुंबईतील सराफा बाजारात काल 600 कोटींची उलाढाल झाली. यामध्ये सोन्याबरोबरच चांदी
आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचाही समावेश आहे.

BEST Bus Workers Strike: मुंबईच्या मजास डेपोतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे

मुंबईच्या मजास डेपोतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आलाय. कंत्राटदार कंपनीने 15 दिवसांत इतर  मागण्या पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेण्यात आलाय.

Aurangabad: उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल; नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी

Aurangabad: औरंगाबाद दौऱ्यावर असणारे उद्धव ठाकरे नुकतेच विमानतळावर दाखल झाले आहे. यावेळी शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले आहे. तर उद्धव ठाकरे आता गंगापूरच्या दिशेने निघाले आहे. यावेळी तेनुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे.

 Latur: लातूरतील सर्वात मोठा दरोड्याचा लागला तपास

 Latur: दहा दिवसापूर्वी लातूर शहरात व्यावसायिक अग्रवाल यांच्या घरी तीन कोटींचा धाडसी दरोडा पडला होता. या टोळीतील चारजणांना पकडण्यात आणि 79 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. इतर आरोपी आणि उरलेल्या मुद्देमालाचा शोध सुरु आहे.

  Nagpur Crime: नागपुरात लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार

Nagpur Crime: 'मेट्रोमोनियल' साईटच्या माध्यमातून एका तरूणाने एका मुलीशी संपर्क साधत तिच्याकडून पाच लाख रूपये घेत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये घडला. त्या मुलीला लग्नाचं आमिष दाखवत तिच्यावर अत्याचारही केला असल्याची पीडित मुलीने गणेशपेठ पोलीसांकडे तक्रार नोंद केली आहे.   

Wardha: वर्ध्यात आनंदाचा शिधा अद्याप पोहचला नाहीच

Wardha:  आनंदाचा शिधा योजनेअंतर्गत वर्धा जिल्ह्यात एकूण 2 लाख 85 हजार 36 लाभार्थी आहेत. मात्र काही नागरिकांना अजूनही शिधा मिळालेला नाही. दिवाळी नंतर आनंदाचा शिधा मिळणार असेल तर त्याचा काय फायदा असा सवाल नागरिक विचारताहेत.

Maharashtra Monsoon: राज्यातून मोसमी वारे परतणार'

पुढील दोन दिवसांत राज्यासह देशातून र्नैऋत्य मोसमी वारे माघारी जातील,असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. दोन दिवसांत केवळ दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आलीय.

पार्श्वभूमी

आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रायगड दौऱ्यावर
 
मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे हे रविवारी 23 ऑक्टोबर 2022 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. रायगडमध्ये विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत. 
 
उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर 
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  आज औरंगाबादमधील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.  


 नागपूरमध्ये भाजपचा दिवाळी मिलन कार्यक्रम 
 भाजप कार्यकर्त्यांच्या दिवाळी मिलन कार्यक्रमाला नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत, भट सभागृह, संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रम होईल. 
 
पंतप्रधान मोदी अयोध्येच्या दौऱ्यावर 
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत.  संध्याकाळी पाच वाजता मोदी अयोध्येत प्रभू रामाचं दर्शन घेतील आणि पूजा करतील.  संध्याकाळी 5.45 वाजता श्रीरामाचा राज्याभिषेक होणार आहे.  


काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' आज तेलंगणात पोहोचणार


राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' आज सकाळी कर्नाटकातील रायचूरहून तेलंगणातील गुडेबेलूरमध्ये दाखल होणार आहे.


टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत-पाक आमनेसामने
 आज मेलबर्नमध्ये भारताचा टी-20 वर्ल्डकपमधील पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे.  भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सामना सुरु होईल. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.