Maharashtra News Updates : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 15 कोटींचे ड्रग्ज जप्त
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE

Background
आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रायगड दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी 23 ऑक्टोबर 2022 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. रायगडमध्ये विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत.
उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादमधील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
नागपूरमध्ये भाजपचा दिवाळी मिलन कार्यक्रम
भाजप कार्यकर्त्यांच्या दिवाळी मिलन कार्यक्रमाला नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत, भट सभागृह, संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रम होईल.
पंतप्रधान मोदी अयोध्येच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. संध्याकाळी पाच वाजता मोदी अयोध्येत प्रभू रामाचं दर्शन घेतील आणि पूजा करतील. संध्याकाळी 5.45 वाजता श्रीरामाचा राज्याभिषेक होणार आहे.
काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' आज तेलंगणात पोहोचणार
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' आज सकाळी कर्नाटकातील रायचूरहून तेलंगणातील गुडेबेलूरमध्ये दाखल होणार आहे.
टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत-पाक आमनेसामने
आज मेलबर्नमध्ये भारताचा टी-20 वर्ल्डकपमधील पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सामना सुरु होईल.
Mumbai Fire: माटुंग्यामध्ये रुईया कॉलेजच्या मागे एका इमारतीमध्ये आग
Mumbai Fire: माटुंग्यामध्ये रुईया कॉलेजच्या मागे एका इमारतीमध्ये आग, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळावर, शिवनिर्मल या इमारतीच्या 17 मजल्यावर घराचं काम सुरू होतं, घरामध्ये ठेवलेल्या बांबूला आग लागली
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 15 कोटींचे ड्रग्ज जप्त
डीआरआयने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गोमधून 15 कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे . दोन किलो एम्पीपीटामाइन ड्रग्ज जप्त करण्यात आले असून हे ड्रग्ज पॅरिसहून कुरियरच्या माध्यातून मुंबईला आणण्यात आले होते.
उद्धव ठाकरे पिक पाहणीला नाही तर फक्त राजकारण करायला आले होते ; कृषिमंत्र्यांची टीका
उद्धव ठाकरे पिक पाहणीला नाही तर फक्त राजकारण करायला आले होते, अशी टीका कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. "मी सत्तर तालुक्यात फिरलो अजून मला दुष्काळ कळाला नाही. यांना वीस मिनिटात दुष्काळ काय कळाला असावा. जर असे फिरले असते तर अशी वेळ आली नसती असा टोलाही मंत्री सत्तार यांनी लगवलाय.
शेतकरी राजा संकटात असल्याने दिवाळी साजरी न करण्याचा आमदार संजय गायकवाड यांचा निर्णय
शेतकरी राजा संकटात असल्याने दिवाळी साजरी न करण्याचा आमदार संजय गायकवाड यांनी निर्णय घेतला आहे. एकीकडे सरकार म्हणतंय शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू , दुसरीकडे सत्ताधारी आमदार आंदोलन करत आहेत. दिवाळीच्या दिवशी संजय गायकवाड जिल्हाधिकारी कार्यालयात खाणार चटणी भाकर....!
आमचं काय चुकलं - योगेश क्षीरसागर..
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते जयदत्त क्षीरसागरांची शिवसेनेने हकालपट्टी केली यावर पहिल्यांदाच जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे योगेश क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली. आमचं काय चुकलं असा सवाल सुद्धा उपस्थित केलाय.
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर बीडमध्ये शिवसेना विरुद्ध क्षीरसागर राजकारण आपलं असून आम्ही विकास कामासाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि यात जर आमची काही चूक असेल तर आम्हाला आमची पुढची दिशा ठरवावी लागेल अशी प्रतिक्रिया जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे योगेश क्षीरसागर यांनी माध्यमांना दिली आहे..
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
