Maharashtra News Live Updates : मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात, तीन जण जखमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 18 Dec 2022 10:34 PM
Fifa World Cup Final : 90 मिनिटं झाली, आता एक्स्ट्रा टाईम

फिफा विश्वचषक फायनलमध्ये 90 मिनिटांचा खेळ संपला असून दोन्ही संघ 2-2 गोल अशा स्कोरलाईनवर असल्याने आता अतिरिक्त वेळ देण्यात आली आहे.

Fifa World Cup Final : एम्बाप्पेचे लागोपाठ दोन गोल फ्रान्स सामन्यात परत

फ्रान्सचा स्टार प्लेअर कायलिन एम्बाप्पे याने लागोपाठ दोन गोल करत फ्रान्सला सामन्यात परत आणत स्कोरबोर्ड 2-2 असा बरोबरीत आणला आहे.

मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात, तीन जण जखमी

मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झालाय. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.  

Fifa World Cup Final : गोल!!!!!! अर्जेंटिनाचा दुसरा गोल, डी मारियाची कमाल

फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये अर्जेंटिना संघाने आणखी एक गोल करत सामन्यात 2-0 अशी आघाडी घेतली आहे. एन्जल डी मारिया याने हा गोल केला आहे.

Fifa World Cup Final : सुरुवात! लिओनल मेस्सीकडून सामन्यातील पहिला गोल

फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना यांच्यात सुरु फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये लिओनल मेस्सीनं सामन्यातील पहिला गोल पेनल्टीच्या मदतीनं करत सामन्यात अर्जेंटिनाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली आहे.

 अमित शाहांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य भोवले, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात  गुन्हा दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. पुण्यातील दत्तवाडी पोलिस ठाण्यात जाधव यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल झालाय. एका महिलेने दत्तवाडी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. 


मोबाईलवर एक ध्वनीचित्रफित प्रसारित करण्यात आली होती.  ध्वनीचित्रफित संबंधित महिलेच्या पाहण्यात आली. त्यात माजी आमदार जाधव केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केल्याचे आढळून आले. दत्तवाडी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. 

अजितदादांच्या तोंडून खोक्यांची भाषा शोभत नाही: मुख्यमंत्री शिंदे

अजितदादांच्या तोंडून खोक्यांची भाषा शोभत नाही. खोक्यांचे थर लावले तर शिखर इतकं उंच होईल की समजणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

लोकायुक्त कायद्याचं बील याच अधिवेशनात मांडणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती 

लोकायुक्त कायद्याचं बील याच अधिवेशनात मांडणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देखील लोकायुक्त कायद्यात येणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.

कल्याण शीळ रस्त्यावर डीव्हायडरला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

कल्याण शीळ रस्त्यावर डीव्हायडरला धडकून दुचाकीस्वाराचा दुदैवी मृत्यू झालाय. कल्याण शीळ रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे. या ठिकाणी खोदलेल्या रस्त्याच्या कडेला डीव्हायडर लावण्यात आले होते. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास या रस्त्यावरून जाणारा एक दुचाकीस्वार या डीव्हायडरला धडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मनोज कुमार सिंग असे या तरुणाचे नाव आहे.  या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तरुणाच्या अपघाती मृत्यूची नोंद करीत पुढील तपास सुरु केला आहे. 

Ajit Pawar: सरकार हाताळण्यात सरकार अपयशी: अजित पवार

Ajit Pawar:  सरकार हाताळण्यात सरकार अपयशी झालं आहे, असं अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. तसेच सरकारकडून कर्ज मोठ मोठी काढली जात आहेत, असंही अजित पवार यांनी सांगितलं. 



Maharashtra Winter Session : हिवाळी अधिवेशनाआधीच्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार

हिवाळी अधिवेशनाआधीच्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार : अजित पवार





Chandrapur Tiger Viral : वाघ रस्ता ओलांडतानाचा व्हिडिओ व्हायरल 
चंद्रपूर जिल्ह्यातील वाघाचा मार्ग ओलांडतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चंद्रपूर-गडचिरोली मार्गावरच्या घनदाट जंगलात दोन्ही बाजूची वाहने थांबली असताना हा वाघ रस्ता ओलांडत आहे. प्रचंड गोंगाट आणि गाड्यांच्या आवाजातही वाघाने शांतपणे सर्वांना दर्शन देत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला दमदार पावले टाकली. शेकडो नागरिकांच्या उपस्थितीनेही हा जंगलचा राजा विचलित न होता मार्गक्रमण करत राहिला. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे याबाबत माहिती नसली तरी चंद्रपूर वनविभाग याबाबत शोध घेत आहे.
Pune Daund Suicide : दौंड 11 वीतील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : दौंड तालुक्यातील रोटी येथील इयत्ता अकरावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सोमनाथ बाळू वेताळ असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. शनिवारी हा प्रकार घडला. सोमनाथ हा वरवंड येथील विद्यालयात अकरावीचे शिक्षण घेत आहे. शनिवारी सकाळी सोमनाथ हा आपल्या आईला पाटस येथे बस स्थानकावर सोडून परत घरी गेला होता. दुपारी एक ते सायंकाळी सहाच्या दरम्यान त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी त्याची आई आशाबाई बाळु वेताळ यांनी पाटस पोलीस चौकीत खबर दिली आहे. दरम्यान, या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. 

Pandharpur Mauli Corridor : सुब्रमण्यम स्वामी टीमने केली पंढरपूर कॉरिडॉरची पाहणी

पंढरपूरमध्ये होणाऱ्या वादग्रस्त कॉरिडॉरच्या विरोधात आता डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांची कायदेशीर तज्ज्ञांची टीमने कॉरिडॉरची पाहणी केली. मंदिरातील सरकारीकरणाच्या विरोधातील याचिकेत कॉरिडॉर विरोधाचा मुद्दा सहभागी करून जनहित याचिका दाखल केली जाणार असल्याचे यावेळी मुंबई उच्य न्यायालयाचे जेष्ठ विधिज्ञ विश्वनाथ शेट्टी यांनी ABP माझाशी बोलताना सांगितले. 

Congress Bharat Jodo Yatra : मालाडमध्ये काँग्रेसतर्फे आज भारत जोडो यात्रेचे आयोजन

मुंबई : मुंबईतील मालाडमध्ये काँग्रेसतर्फे आज भारत जोडो यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, मालाड परिसरात ही यात्रा 4 ते 5 लोमीटरपर्यंत काढण्यात आली. या पदयात्रेत काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, माजी कॅबिनेट मंत्री अस्लम शेख, चरणसिंग सप्रा यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

BMC Notice to Dilip Vengsarkar : दिलीप वेंगसरकर यांच्या दादर युनियन स्पोर्टिंग क्लबला मुंबई महानगरपालिकेची नोटीस
कथित जमीन अतिक्रमणाच्या तक्रारीवरून मुंबई महानगरपालिकेने  भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या दादर युनियन स्पोर्टिंग क्लबला मुंबई महानगरपालिकेची नोटीस बजावली आहे. दादर पारसी कॉलनी स्पोर्ट्स क्लबच्या तक्रारीवरून पालिकेच्या वतीने नोटीस बजावण्यात आली आहे.
Fadnavis On Sant Parampara : महाराष्ट्राचं खरं वैभव संतांनी दिलेले विचार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचं खरं वैभव आमच्या वारकरी संप्रदायातील संतांनी दिलेले विचार असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. ते नागपुरात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मारक आणि आर्ट गॅलरीच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते. महाराष्ट्रातील संतांचे विचार हेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा वैभव असून हे वैभव टिकवायचे असेल. ते पुढच्या पिढी पर्यंत न्यायचे असेल. तर ज्या ठिकाणी या संतांचा जन्म झाला, त्यांचा वास्तव्य झाला, त्या जागा टिकवाव्या लागतील. त्या ठिकाणी नवीन पिढीला न्यावं लागेल, असे फडणवीस म्हणाले.

Shirdi Deepak Kesarkar : शालेय शिक्षण मंत्री साई दरबारी, अधिवेशनापूर्वी घेतले साई दर्शन

उद्यापासून नागपूर अधिवेशनाला सुरुवात होणार असून अधिवेशनापूर्वी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी साई दरबारी हजेरी लावत साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावतीने 'महाराष्ट्राचं कल्याण होऊ दे' अशी प्रार्थना साईचरणी केली, असल्याची माहिती केसरकर यांनी दिली.

Beed Accident : मतदानासाठी बीडकडे येणाऱ्या दांपत्याच्या गाडीला भीषण अपघात तिघेजण गंभीर जखमी
बीड : पुण्याहून बीडकडे ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी येणाऱ्या मतदारांच्या गाडीला बीड केज रोडवर भीषण अपघात झाला असून यामध्ये तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.. पुण्याला वास्तव्याला असलेले बरळकर कुटुंबीय ग्रामपंचायतच्या मतदानासाठी केज तालुक्यातल्या सावला गावी येत असताना केस जवळ असलेल्या पिंपळगाव फाट्या जवळ त्यांच्या कारचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आणि यामध्ये चालकासह सतीश परळकर आणि सुभिद्रा परळकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे..

 

 
Dhule Protest Love Jihad : लव्ह जिहाद कायद्याच्या मागणीसाठी निघाला हिंदू जनआक्रोश मोर्चा



धुळे : लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा तयार करावा या प्रमुख मागण्यांसाठी धुळे शहरातून आज हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला शहरातील मनोहर चित्र मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी शहराच्या विविध भागातून निघालेल्या हा मोर्चा जेलरोड येथे या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. मोर्चादरम्यान शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवरील दुकाने व्यवसायिकांकडून बंद करण्यात आली होती. या हिंदू जन आक्रोश मोर्चात पुरुषांसह महिलांचा तसेच तृतीयपंथी बांधवांचा देखील सहभाग दिसून आला. यावेळी मोर्चादरम्यान नागरिकांना अनेक व्यवसायिकांनी पाण्याचे वाटप केले. यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या जय श्रीराम च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता, हिंदू जन आक्रोश मोर्चादरम्यान विविध पोलीस ठाण्याचे तब्बल 35 पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले होते.




Police Bharti 2022 : 18 हजार जागांवर पोलीस भरती, 18 लाखांहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल

Maharashtra Police Bharti 2022 : महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी (Maharashtra Police Constable Bharti) अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. पोलीस दलात शिपाई (Police Constable Recruitment) आणि चालक पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पोलीस भरतीतील 18 हजार पदांसाठी 18 लाखांहून अधिक अर्ज दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी 15 डिसेंबरपर्यंत 18 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पोलीस शिपाई पदासाठी 12 लाख 25 हजार 899 अर्ज आले आहेत. तर चालक पोलीस हवालदार 2 लाख 15 हजार 132 अर्ज आले आहेत.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने-सामने?

Nagpur Winter Assembly Session : Winter Assembly Session : उद्यापासून (9 डिसेंबर) नागपूरमध्ये विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Nagpur Winter Assembly Session) सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाची पूर्ण तयारी झाली आहे. विविध मुद्यांवरुन हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच या अधिवेशनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आमने-सामने येण्याची शक्यता आहे. नागपुरात (Nagpur) पार पडत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.


 

Chandrapur Accident CCTV : भरधाव चारचाकीने दोघांना उडवलं, धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद
चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरात काल रात्रीच्या सुमारास भयानक अपघात झालाय. अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये भरधाव वेगातील अनियंत्रित चारचाकीने दोघांना उडविल्याचे कैद झाले. रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या दोघांपैकी एकाचा यात घटनास्थळी मृत्यू तर दुसरा अत्यवस्थ आहे. चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट ते सिंधी कॉलनी कडे जाणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यावर हा अपघात झाला. रात्री साडेअकरा वाजता चारचाकीने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या बंडू ढोले व ओम ईटणकर यांना उडविले यात बंडू ढोले याचा मृत्यू झाला. पोलिसांनी चारचाकी चालक विनीत तावडे याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळ हा मोठा मार्ग असला तरी दुकानं व घरांच्या अतिक्रमणाने यावर दिवसरात्र मोठी वाहतूक कोंडी होते.
Baramati Suicide : बारामतीत विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

बारामती तालुक्यातील सांगवी येथील राहत्या घरातून रात्री दहा वाजल्यापासून बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेचा शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून ही आत्महत्या नसून घातपात असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. सविता अप्पासाहेब सालगुडे असे आत्महत्या केलेल्या मृत विवाहित महिलेचे नाव आहे. ही घटना शनिवार सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास समोर आली. आत्महत्येच्या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांच्या जमावाने संशयास्पद असलेल्या तरुणाला रस्त्यावर ओढत बेदम मारहाण केली. संशयास्पद तरुणाला नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीमुळे महिलेची आत्महत्या नसून घातपात असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मृत सविता सालगुडे या शुक्रवारी राहत्या घरातून रात्री बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर घरच्यांनी त्यांचा शोध घेतला असता त्या कुठेही आढळून आल्या नाहीत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शेतात गवत आणायला गेलेल्या काही महिलांना सविता सालगुडे या बारामती फलटण रस्त्याच्या कडेला शिरवली हद्दीतील शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. यामुळे आत्महत्या की घातपात याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. 


 

 
Jalgaon Dudh Sangh : जळगाव दूध संघाच्या अध्यक्षपदी भाजप आमदार मंगेश चव्हाण, पदभार स्वीकारताच खडसेंचा फोटो हटवला

Jalgaon Dudh Sangh : अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या (Jalgaon Dudh Sangh) अध्यक्षपदी भाजपा आमदार मंगेश चव्हाण ( MLA Mangesh Chavan) यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाच्या ( BJP-Shinde Group) शेतकरी सहकार पॅनलने एकनाथ खडसेंच्या (Eknath khadse) गटाचा पराभव केला होता. विशेष म्हणजे या निवडणुकीत एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदा खडसे यांनी पराभवाचा धक्का बसला आहे. दरम्यान, जळगाव दूध संघाच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत जोरदार चर्चा सुरु होती. अखेर आमदार मंगेश चव्हाण हे दूध संघाचे अध्यक्ष झाले आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : बेळगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं संभाजीराजेंच्या हस्ते अनावरण

Belgaon : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं संभाजीराजेंच्या हस्ते बेळगावात अनावरण





Kirit Somaiyya PC Today : शौचालय घोटाळ्याचे पेपर राऊतांकडे कसे आले : किरीट सोमय्या लाईव्ह

Kirit Somaiyya on Sanjay Raut : शौचालय घोटाळ्याचे पेपर राऊतांकडे कसे आले : भाजप नेते किरीट सोमय्या 

Kirit Somaiyya on Sanjya Raut : संजय राऊतांच्या घरात भूकंप होणार : किरीट सोमय्या
Sambhajiraje Chhatrapati on Har Har Mahadev : ऐतिहासिक चित्रपटांचे स्क्रिनिंग पहिल्यांदा महाराष्ट्रात झालं पाहिजे ; संभाजीराजे

Har Har Mahadev Movie Controversy : Sambhajiraje Chatrapati on har har mahadev : ऐतिहासिक चित्रपटांचे पहिलं स्क्रिनिंग महाराष्ट्रात झालं पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी म्हटले आहे. संभाजीराजे यांनी चित्रपटाला कडाडून विरोध केला आहे. 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) चित्रपटात स्त्रियांविषयी आक्षेपार्ह पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. इतिहास संशोधकांनी बोलावे. जर माझी भूमिका चुकीची असेल, तुम्ही सांगावे, मी पुन्हा कधीही अशा चित्रपटांवर पत्रकार परिषद कधीही घेणार नाही. बाजीप्रभू आणि शिवाजी महाराजांची लढाई दाखवणं मान्य आहे का? चुकीचा इतिहास दाखवण्यापेक्षा चित्रपट काढूच नका, खरा इतिहास दाखवा, विरोध थांबवतो, असे संभाजीराजे म्हणाले. 

Palghar Rape Case : पालघरमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 8 जणांकडून सामूहिक अत्याचार

पालघरमधील सातपाटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या एका मित्रासह आठ जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माहीम परिसरातील पानेरी येथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेला तिच्या मित्राने या ठिकाणी बोलवून घेतले. त्यानंतर तिच्यावर मित्रासह आठ जणांनी आळीपाळीने अत्याचार केले असून या आठही जणांना सातपाटी सागरी पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींवर सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सातपाटी सागरी पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Amravati Protest : अमरावतीत राजकमल चौकातून निघणार लव्ह जिहाद विरोधात मुकमोर्चा

अमरावतीत राजकमल चौकातून निघणार लव्ह जिहाद विरोधात मुकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राजकमल चौकात पोलीसांचा मोठा बंदोबस्त तर हिंदू संघटनेचे कार्यकर्ते राजकमल चौकात जमायला सुरुवात झाली आहे. अमरावतीत लव्ह जिहाद आणि धर्मांतरण विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी सकल हिंदू समाज कडून अमरावतीत भव्य मोर्चाच आयोजन करण्यात आलं आहे. लव्ह जिहादचे प्रकरण अमरावती जिल्ह्यात वाढलेले आहे. त्यामुळे लव्ह जिहाद विरोधात कायदा व्हावा यासाठी सकाळी 11 वाजता राजकमल चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा निघणार आहे.

Ajit Pawar : कारण नसताना बदनामी, फडणवीसांच्या टीकेला अजित पवारांचा प्रत्युत्तर, म्हणाले....

Ajit Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चावर (Maha Vikas Aghadi Morcha) फडणवीसांनी टीका केली होती. फडणवीसांनी कालच्या मोर्चाला नॅनो मोर्चा असं म्हटलं होतं. याबाबत प्रसारमाध्यमांनी अजित पवारांना विचारलं असता, आम्ही त्यांच्या वक्तव्याला महत्त्व देत नसल्याचे अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांनी मोर्चाला नॅनो म्हणावं की स्कुटर म्हणावं हा त्यांचा विषय असल्याचे अजित पवार म्हणाले.

Buldana Theft : बुलढाण्यातील चोरांची शक्कल , चोरी केलेलं सोन सुरक्षित ठेवलं चक्क पतसंस्थेत
Buldana Crime News : चोरी करून चोरलेलं सोनं, चांदीचा ऐवज चक्क सुरक्षितपणे पतसंस्थेतील लॉकरमध्ये ठेऊन नंतर काही दिवसांनी हाच ऐवज सुरक्षितपणे मोडीत काढायचा असा फंडा वापरणारी चोरांची एक टोळी पोलिसांनी पकडली असून यात बुलढाणा आणि जालना जिल्ह्यातील हायटेक चोरांचा समावेश आहे. बुलढाण्यातील एका पतसंस्थेच्या अध्यक्षासह पोलिसांनी दोन सराफा व्यावसायिकांनाही अटक केली आहे. चोरी केल्यानंतर चोरलेले सोनं, चांदी हे एका पतसंस्थेतील लॉकरमध्ये ठेवून त्यावर कर्ज काढत असत आणि अल्पावधीतच ते कर्ज फेडण्यासाठी काही सराफा व्ययसायिकांना हाताशी धरून सोन्याची विल्हेवाट सोनाराकडे लावत असतं. या चोरांमुळे आता चोरी करून चोरलेला माल सुरक्षित कसा ठेवतात हे समोर आलं आहे.
Crop Cultivation : यंदा देशात गव्हाच्या लागवडीत वाढ

Wheat Cultivation : देशात यंदा गव्हाचे उत्पादन (Wheat Production) मोठ्या प्रमाणावर होणार असल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. यंदा गव्हाची कमतरता भासणार नसल्याचेही सांगण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून सध्या मोठ्या प्रमाणावर गव्हाची खरेदी सुरु आहे. सध्या देशात रब्बी हंगामातील (Rabi season) पिकांची पेरणी सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात पिकांच्या  पेरणी होत आहे. गव्हाच्या लागवडीत (Wheat Cultivation) देखील वाढ झाली आहे. यंदा 286 लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. दरम्यान, देशातील दोन राज्यात गव्हाच्या लागवडीत घट झाली आहे. तर आठ राज्यात गव्हाच्या लागवडीत वाढ झाली आहे.

Gram Panchayat Election : वडवणीत निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या 6 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
ग्रामपंचायत निवडणुकीत वडवणी तालुक्यात निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांसह इतर विभागातील सहा कर्मचाऱ्यांवर मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या कामकाजात हलगर्जीपणा केला. ही बाब निदर्शनास येताच वडवणीचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भारस्कर यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र धर्मराज गायकवाड, महारुद्र ललितराव बादाडे, शाहूराव पांडुरंग जायभाये, दिलीप देवजी माऊची, सुवर्ण सखाराम आयचित, व्ही. एस. डाके या सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
Maharashtra Winter Assembly 2022 : अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज नागपूरमध्ये चहापान, पत्रकार परिषद

Maharashtra Winter Assembly 2022 : राज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज नागपूरमध्ये चहापानचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर दुपारी 1 वाजता विरोधी पक्ष नेत्यांची  पत्रकार परिषद होणार आहे. प्रथेप्रमाणे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चहापानासाठी आमंत्रित केले आहे. यानंतर संध्यकाळी 6 वाजता मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होणार आहे

Petrol Diesel Price Today : महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यात पेट्रोल सर्वाधिक महाग, जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे दर

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण (Crude Oil Price Fallen) सुरू आहे. मागील काही दिवसांपासून ही घसरण सुरू आहे. मात्र, कच्च्या तेलाच्या दरात (Crude Oil Price) होत असलेल्या घसरणीचा फायदा भारतातील ग्राहकांना मिळत नसल्याचे चित्र आहे. आज सकाळी सहा वाजता देशातील इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल डिझेलचे दर (Today Petrol Diesel) जाहीर केले आहेत. आज देशातील इंधन दर स्थिर असून कोणताही बदल झाला नाही. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.


राज्यात 7751 ग्रामपंचायतींसाठी मतदान (Maharashtra Gram Panchayat Election 2022)


राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 20 डिसेंबरला होईल. 


अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज नागपूरमध्ये चहापान, पत्रकार परिषद (Maharashtra Winter Assembly 2022 )


राज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज नागपूरमध्ये चहापानचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर दुपारी 1 वाजता विरोधी पक्ष नेत्यांची  पत्रकार परिषद होणार आहे. प्रथेप्रमाणे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चहापानासाठी आमंत्रित केले आहे. यानंतर संध्यकाळी 6 वाजता मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होणार आहे 


हिवाळी अधिवेशनाची तयारी पूर्ण, मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ आज नागपुरात येणार


हिवाळी अधिवेशनाची (Winter Assembly Session) तयारी पूर्ण झाली असून, कालपासून सरकारचे नागपुरात आगमन होण्यास सुरूवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शनिवारी रात्री नागपुरात (Nagpur) पोहोचले. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) रविवारी सकाळच्या वेळी नागपुरात दाखल होतील. विदर्भातील बहुतांश मंत्री शनिवारीच नागपुरात पोहोचले आहेत. इतर मंत्री रविवारी सकाळी नागपुरात डेरेदाखल होतील. दरम्यान, विधानपरिषदेच्या उपनसभापती निलम गोऱ्हे यांचे शनिवारी सकाळी नागपुरात आगमन झाले आहे. 


बेळगावात संभाजीराजेंच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण


संभाजीराजे छत्रपतींच्या हस्ते बेळगावमधील होणगा गावात शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ मूर्तीचे अनावरण करण्यात येणार आहे. बेळगाव सीमाप्रश्नाचा आणि शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्याचा वाद सध्या सुरु असताना संभाजीराजेंचा हा दौरा महत्वाचा आहे. छत्रपती संभाजीराजे नियोजित बेळगाव दौरा व स्वराज्य संघटनेचे झी स्टुडीओ वरील हल्लाबोल आंदोलन याबाबत पत्रकार परिषद घेणार आहेत, सकाळी 8 वाजता. 


आज फीफा वर्ल्डकप (Fifa World Cup Final)


कतारमध्ये आज अर्जेंटीना आणि फ्रांसमध्ये मेगा फायनल होणार आहे, भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सामना सुरु होईल. फ्रान्स सध्याचा विश्वविजेता आहे, तर अर्जेंटिनाने अखेरचा विश्वचषक 1968 मध्ये जिंकला होता.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.