Rahul Gandhi Agniveer Scheme : अग्निवीरबाबत राजनाथ सिंह यांनी केलेले दावे खोटे, असल्याचा आरोप विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी केला. पंजाबमधील पीडित कुटुंबाला 1 कोटी रुपयांची मदत मिळाली नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला. पण राहुल गांधी यांच्या आरोपानंतर लष्कराकडून स्पष्टीकरण देण्यात आलेय. ट्वीट करत याबाबत माहिती दिली. त्यामध्ये पीडित कुटुंबाला 98 लाख रुपयांची मदत करण्यात आल्याचं लष्कराकडून सांगण्यात आलेय.


भारतीय लष्करानं नेमकं काय म्हटले ? 


कर्तव्यावर असताना प्राण गमावलेल्या अग्निवीर अजय कुमारच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात आली नाही, असे सोशल मीडियावरील काही पोस्ट्सवरून समोर आले आहे. अग्निवीर अजय कुमार यांनी केलेल्या सर्वोच्च बलिदानाला भारतीय लष्कर सलाम करते.  लष्करी सन्मानाने त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकूण देय रकमेपैकी अग्निवीर अजयच्या कुटुंबाला 98.39 लाख रुपये आधीच दिले गेले आहेत. अग्निवीर योजनेच्या तरतुदींनुसार लागू असलेल्या अंदाजे 67 लाख रुपयांचे अनुदान आणि इतर फायदे, पोलीस पडताळणीनंतर लवकरच अंतिम सेटलमेंटवर दिले जातील. एकूण रक्कम अंदाजे 1.65 कोटी रुपये असेल.






राहुल गांधींनी नेमका काय आरोप केला ?


सोमवारी लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अग्नीवर योजनेबद्दल अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत शहीद अग्निवीर अजय सिंह यांच्या कुटुंबाला मदत केल्याचं म्हटलं होतं. पण राहुल गांधी यांनी हा दावा खोटा असल्याचं म्हटले. बतचा एक व्हिडीओही पोस्ट केला होता. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या व्हिडिओमध्ये शहीद अजय सिंह यांचा उल्लेख केला होता. त्याशिवाय अजय सिंह यांच्या वडिलांची वडिलांचे फुटेज दाखवले होते.  ज्यामध्ये ते म्हणतात, "राजनाथ सिंह यांनी शहीदांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये मिळाले आहेत, असे विधान केले होते. आम्हाला कोणतेही पैसे मिळाले नाहीत." खासदार राहुल गांधी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर संसदेत खोटे बोलल्याचा आरोप करत माफी मागण्याची मागणी केली.


पाहा व्हिडीओ  



अग्निवीर कुटुंबाला किती मदत मिळते?


लष्कराच्या वेबसाइटनुसार, अग्निवीरचा ड्युटीवर असताना मृत्यू झाल्यास 48 लाख रुपयांचे विमा संरक्षण, 44 लाख रुपये एक्स-ग्रॅशिया रक्कम, चार वर्षांच्या योगदानासाठी पूर्ण वेतन आणि सेवा निधी आणि सरकारमध्ये जमा केलेल्या रकमेसह सेवा निधी मिळेल. 


ड्युटीवर असताना अग्निवीरचा मृत्यू झाला नाही, तर कुटुंबाला 48 लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि सेवा निधीमध्ये जमा केलेली रक्कम आणि सरकारचे योगदान मिळते. त्याच वेळी अपंगत्वाच्या बाबतीत, अग्निवीरला अपंगत्वाच्या पातळीनुसार, 100 टक्के, 75 टक्के किंवा 50 टक्के असेल तर पूर्ण पगार आणि सेवा यावर अवलंबून 44 लाख रुपये, रुपये 25 लाख किंवा रुपये 15 लाख रुपये मिळतात. चार वर्षांपर्यंतचा निधी, आणि सेवा निधी निधीमध्ये जमा केलेली रक्कम आणि सरकारचे योगदान त्याला दिले जाते.