एक्स्प्लोर

Maharashtra News Updates 17 November 2022 : राहुल गांधी यांच्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 17 November 2022 : राहुल गांधी यांच्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

OBC Reservation : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

राज्यातील 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण (OBC Reservation) लागू होणार की नाही याचा फैसला आज, गुरुवारी सुप्रीम कोर्टात होणार आहे.  राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण, थेट नगराध्यक्ष पद्धत याबाबत ही सुनावणी होणार आहे. मागच्या चार-पाच वेळी सुप्रीम कोर्टात सुनावणी होऊ शकली नव्हती अखेर आजची तारीख सुनावणीसाठी निश्चित करण्यात आली आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांचे काय होणार याचे उत्तरही या सुनावणीत मिळणार आहे. सोबत बीएमसीच्या प्रभाग रचनेबाबत सुप्रीम कोर्टाने हायकोर्टात जायला सांगितलं होतं, त्याबाबत हायकोर्टातही आजच सुनावणी होणार आहे. ओबीसी आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल आगामी 92 नगरपरिषदांना लागू होत नव्हता. मात्र या निकालावर राज्य सरकारनं पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं पाच आठवडे स्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय विशेष खंडपीठ गठित करणार असल्याचंही म्हटलं होतं. 

ऊस दरावरुन रयत क्रांती संघटना आक्रमक, बेळगावच्या साखर आयुक्तालयाला ठोकलं टाळे 

दिवसेंदिवस ऊस दराच्या (sugarcane price) मुद्यावरुन वातावरण चांगलच तापल्याचे पाहायला मिळत आहे. विविध शेतकरी संघटना आक्रमक होत आहे. रयत क्रांती संघटनेनं (Ryat Kranti Sanghatana) ऊसाला प्रतिटन  5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी रयत क्रांती सघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी बेळगावातील गणेशपूर रोडवरील साखर आयुक्तालयाला टाळे ठोकले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे.

योग्य दर मिळेपर्यंत लढा सुरुच ठेवणार
ऊस दराच्या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यापासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. पण या मागणीकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. ऊस दरप्रश्नी  साखर कारखानदारांनी एकजूट केली असून, त्याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळं आक्रमक बनलेल्या रयत संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी  बेळगावात साखर आयुक्तालयास टाळे ठोकले. या आंदोलनामुळं पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, कारखानदार आणि सरकारकडून योग्य दर मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. साखर आयुक्त कार्यालयात उपस्थित नसल्यानं रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयास टाळे ठोकले. 

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार लोकार्पण
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे कार्यान्वित करण्यात येणा-या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाचे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.   उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, राज्याचे पर्यटन आणि महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार श्रीमती वर्षा गायकवाड, आमदार सुनील शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्याशिवाय महानगरपालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांचीही उपस्थिती असणार आहे. दुपारी चार वाजता होणारा हा कार्यक्रम धारावी परिसरातील शीव – वांद्रे लिंक रोड नजीक असणा-या संत रोहिदास मार्गावरील ओएनजीसी इमारतीच्या प्रवेशद्वार क्रमांक दोन व काळा किल्ला नजिक हा कार्यक्रम आयोजित होणार आहे.

23:36 PM (IST)  •  17 Nov 2022

राहुल गांधी भविष्यात कदाचित पंतप्रधान होतील पण त्यांना उद्याची सभा कायम लक्षात राहील, उद्याची सभा मनसे उधळणार- मनसे नेते अविनाश जाधव यांचा इशारा

राहुल गांधी भविष्यात कदाचित पंतप्रधान होतील पण त्यांना उद्याची सभा कायम लक्षात राहील, उद्याची सभा मनसे उधळणार मनसे नेते अविनाश जाधव यांचा इशारा, संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांच्यासह मुंबई नाशिकचे मनसे कार्यकर्ते शेगावच्या दिशेने रवाना
संभाजीनगर ला मुक्काम करून उद्या जाणार शेगावला, काहीही झाले तरी शेगाव गाठणार, मनसे नेत्यांचा निर्धार, राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्त्याचा निषेध करण्यासाठी मनसैनिक मार्गस्थ, भारत जोडो यात्रा दरम्यान राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर केलेल्या वक्त्याव विरोधात मनसे आक्रमक

23:26 PM (IST)  •  17 Nov 2022

राहुल गांधी यांच्या विरोधात ठाण्यात गुन्हा दाखल

राहुल गांधी यांच्या विरोधात ठाण्यात गुन्हा दाखल

22:53 PM (IST)  •  17 Nov 2022

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात संचालक (प्रशासन) पदी हेमराज बागुल रुजू

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील संचालक (प्रशासन) या पदाचा कार्यभार Hemraj Bagul यांनी आज मंत्रालयात स्वीकारला. विभागाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांच्या उपस्थितीत संचालक (वृत्त व जनसंपर्क) गणेश रामदासी यांच्याकडून बागुल यांनी पदभार स्वीकारला. याप्रसंगी उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे, उपसंचालक (प्रशासन) गोविंद अहंकारी, उपसंचालक (प्रकाशने) अनिल आलुरकर, उपसंचालक (प्रदर्शने) सीमा रनाळकर आदींनी पुष्पगुच्छ देवून बागुल यांचे स्वागत केले. महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभाग आणि औरंगाबाद-लातूर विभागाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही बागुल यांच्याकडे देण्यात आला आहे. बागुल यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी तसेच महासंचालनालयात प्रकाशने, महान्यूज, वृत्त आदी शाखांमध्ये त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. शासकीय सेवेत येण्यापूर्वी  बागुल यांनी पत्रकारितेत योगदान दिले आहे. तसेच साहित्यविषयक विविध पुरस्कारांनी  बागुल यांना सन्मानित करण्यात आले आहे.

22:52 PM (IST)  •  17 Nov 2022

कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावात 19 ते 29 डिसेंबर दरम्यान

कर्नाटक सरकारने बेळगावसह सीमाभागात आपला हक्क सांगण्यासाठी बेळगावात सुवर्णसौध ही विधिमंडळाची इमारत बेळगावात उभारली आहे.कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या इमारतीचा वर्षात केवळ दहा दिवस हिवाळी अधिवेशन घेण्यासाठी केला जातो.बेळगावात हिवाळी अधिवेशन घेण्यास प्रारंभ केल्या पासून महाराष्ट्र एकीकरण समिती दरवर्षी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भव्य महामेळावा घेऊन विरोध करत असते.यावर्षी देखील कर्नाटक सरकारच्या बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळाव्याचे आयोजन करणार आहे.
 
22:52 PM (IST)  •  17 Nov 2022

आता पंढरपूरचे नागरिक शासनाला 15 दिवसात देणार विकास आराखडा, पालकमंत्र्यांचे मोठ्या पॅकेजचे मधाचे बोट

Pandharpur News: ABP माझाच्या बातमीनंतर वादग्रस्त माउली कॉरिडॉर आणि विकास आराखड्याबाबत बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील याना आज संतप्त नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले . पंढरपूर विकास आराखडा आणि कॉरिडॉर हा वारकऱ्यांना केंद्रबिंदू मानून बनविण्यात आला असला तरी स्थानिक नागरिकांना उध्वस्त करून राबविला जाणार नसल्याची ग्वाही विखे पाटील यांनी नागरिक, व्यापारी यांना दिली . दरम्यान नागरिकांनी आपला आराखडा येत्या 15 दिवसात देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांना दिल्यावर शासनाचा आराखडा आणि नागरिकांचा आराखडा हे दोन्ही समोर ठेऊन निर्णय घेऊ असे सांगितले. हा कॉरिडॉर अथवा शहरातील विकास आराखडा हा भविष्याचा विचार करून केला जाणार असल्याचे सांगताना यात विस्थापोटी होणार्यांच्यासाठी चांगले पॅकेज देण्याचाही प्रयत्न असल्याचे सांगत मधाचे बोट लावले आहे . यापूर्वी वाराणशी अथवा उज्जैन अशा ठिकाणी झालेल्या कॉरिडॉरला तेथील व्यापारी अथवा नागरिकांनी विरोध केल्याचे समोर आले नसून त्याच धर्तीवर येथील व्यापारी आणि नागरिकांना चांगला मोबदला देत त्यांना विश्वासात घेऊन आराखडा राबविण्याचा शासनाचा विचार असल्याचे सांगितले . ज्यावेळी तो टप्पा येईल त्यावेळी विस्थापित होणारे व्यापारी आणि नागरिकांचे एक बोर्ड बनवून पुढील चर्चा होईल असे संकेत दिले . एकंदर पालकमंत्र्यांनी आज यात राजकारण करणार्यांना बाजूला ठेवण्यासाठी मोठ्या पॅकेजचा उल्लेख केला असून आता नागरिक 15 दिवसात  कसा आराखडा देतात आणि शासन नेमके कोणते पॅकेज देणार यावर या कॉरिडॉर आणि विकास आराखड्याचे भवितव्य अवलंबून असणार आहे . 
 
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mangaldas Bandal  : मंगलदास बांदलला 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी,शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण
Mangaldas Bandal : मंगलदास बांदलला 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी, पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
राज ठाकरेंचा भंडाऱ्यातील मुक्काम अचानक हलवला, मनसेनं सांगितलं राज'कारण'; अमित ठाकरेही सोबत
राज ठाकरेंचा भंडाऱ्यातील मुक्काम अचानक हलवला, मनसेनं सांगितलं राज'कारण'; अमित ठाकरेही सोबत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar On Badlapur : जनतेत अस्वस्थता सर्वांना परिवर्तन पाहिजे : शरद पवारZero Hour : बदलापूर वेदनादायी घटनेतही राजकारणाचा शिरकाव,विरोधकांचा आक्रोश,सत्ताधाऱ्यांचं प्रत्युत्तरZero Hour : महायुतीचं टेन्शन वाढलं, समरजितसिंह घाटगे भाजपला धक्का देणार?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 21 August  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mangaldas Bandal  : मंगलदास बांदलला 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी,शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण
Mangaldas Bandal : मंगलदास बांदलला 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी, पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
राज ठाकरेंचा भंडाऱ्यातील मुक्काम अचानक हलवला, मनसेनं सांगितलं राज'कारण'; अमित ठाकरेही सोबत
राज ठाकरेंचा भंडाऱ्यातील मुक्काम अचानक हलवला, मनसेनं सांगितलं राज'कारण'; अमित ठाकरेही सोबत
BMC Recruitment 2024 : BMC मधील 1846 जागांसाठी अर्ज करताय?; शैक्षणिक अर्हता अन् परीक्षा शुल्क किती?, डिटेल्स घ्या जाणून
BMC मधील 1846 जागांसाठी अर्ज करताय?; शैक्षणिक अर्हता अन् परीक्षा शुल्क किती?, डिटेल्स घ्या जाणून
Ramesh Kadam : राजन पाटलांचं टेन्शन वाढणार, मोहोळमधून रमेश कदम पुन्हा मैदानात उतरणार, जयंत पाटलांच्या भेटीनंतर घडामोडींना वेग
Ramesh Kadam : राजन पाटलांचं टेन्शन वाढणार, मोहोळमधून रमेश कदम पुन्हा मैदानात उतरणार, जयंत पाटलांच्या भेटीनंतर घडामोडींना वेग
धक्कादायक! नाशिक मर्डरचा गुंता सुटला, शिक्षिकेने विद्यार्थ्यांनाच दिली सुपारी; 25 वर्षीय प्रियकराला संपवले
धक्कादायक! नाशिक मर्डरचा गुंता सुटला, शिक्षिकेने विद्यार्थ्यांनाच दिली सुपारी; 25 वर्षीय प्रियकराला संपवले
Yavatmal News : रानडुकरांमुळे बैल गाडीवरील नियंत्रण सुटलं, बैलगाडी थेट तलावात शिरली; शेतकरी बाप-लेकाचा दुर्दैवी अंत 
रानडुकरांमुळे बैल गाडीवरील नियंत्रण सुटलं, बैलगाडी थेट तलावात शिरली; शेतकरी बाप-लेकाचा दुर्दैवी अंत 
Embed widget