Maharashtra News Live Updates : औरंगाबादच्या कपडा मार्केटमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल; देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
इंस्टाग्रामवर एका 15 वर्षीय मुलीशी मैत्री करत तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या 22 वर्षीय तरुणाला कोलशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अक्षय गायकवाड असे या तरुणाचे नाव आहे. अक्षयने पीडित तरुणी बरोबर इंस्टाग्रामवर ओळख वाढवत मैत्री केली. त्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यात पीडिता गर्भवती राहिली. गेल्या एक वर्षापासून तो पीडितेवर अतिप्रसंग करीत होता. अखेर पीडितीने या प्रकरणी कोलशेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी अक्षय विरोधात गुन्हा दखल करत त्याला बेड्या ठोकल्या.
डॉ. सुधीर तांबे यांच्यावर पक्षाची कारवाई
Mumbai News : मुंबई मॅरेथाॅनमध्ये 55 हजारांहून अधिक धावपटू सहभागी झाले होते. यात मुंबईसोबतच देशातील अनेक शहरांमधील लोकं सहभागी झाले होते. पुण्यातून देखील काही धावपटू पूर्ण मॅरेथाॅन पळताना बघायला मिळाले.
मुंबईची हवा आज दिल्लीपे
Nepal Plane Crash: नेपाळच्या यति एअरलाईन्सचं विमान कोसळलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोखरा परिसराजवळ विमान दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनाग्रस्त विमानात 72 जण होते. 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबरचा यामध्ये समावेश आहे. विमान अपघातामध्ये आतापपर्यंत 32 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अंबाजोगाईमध्ये वान नदीच्या पात्रात दोन ठिकाणी पोलिसांनी छापा मारून बनावट दारूचा अड्डा नष्ट केला आहे यामध्ये तब्बल 81 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून मोठ्या प्रमाणात बनावट दारू नष्ट केली आहे.. या पोलिसांच्या कारवाईदरम्यान आरोपी शफिक करीम हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत
राज्याचे उपमुख्यमंत्री शिर्डीहून बीडकडे रवाना...
शिर्डी विमानतळावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी घेतली भेट..
विमानतळावर दोघांमध्येही खाजगी चर्चा..
तिळगुळ देऊन दिल्या संक्रांतीच्या शुभेच्छा...
अंबरनाथमध्ये शिंदे गट आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन नेते बॅनर लावण्यावरून आपसात भिडल्याचं पाहायला मिळालं. अंबरनाथ गावात झालेल्या या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यातील दाभापहुर येथे संतापाच्या भरात सरपंचाच्या पतीने उपसरपंचावर कुन्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रक्तबंबाळ झालेल्या उपसरपंचाला तत्काळ यवतमाळ येथे हलविण्यात आले. प्रकाश गुल्हाने, असे जखमी उपसरपंचाचे नाव आहे. त्यांच्यावर संदीप पुराम (45) रा. पहूर याने हल्ला केला.
नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वत रांगामधील वालंबा, डाब आणि तोरणमाळ परिसरात तापमानात मोठी घट झाल्याने थेट दवबिंदु गोठल्याचा प्रकार समोर आला आहे. दवबिंदु गोठल्याने गवतांवर बर्फाची चादर पसरल्याचे चित्र दिसुन आले. गेल्या काही वर्षापासून या भागात तापमानात मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने अशा पद्धतीने दवबिंदु गोठुन बर्फाची चादर होत असल्याचे चित्र वारंवार दिसून आले आहे. मात्र या भागात हवामान विभागाचे कुठलेही तापमान मापक यंत्र नसल्याने नेमक तापमान किती याबाबत नोंदच होत नाही. अशातच कडाक्याच्या थंडीने सातपुडा पर्वत रांगामध्ये सकाळी उशीरापर्यत शेकोट्या पेटत असल्याचे चित्र आहे. गेल्या 48 तासात नंदुरबार मधल्या सपाटी भागतच तापमानात 8 अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली. अशातच सातपुड्याच्या पर्वत रागांमध्ये सपाटीभागापेक्षा तापमान चार ते पाच अंशानी कमी असते.
Sangli miraj Fire : मिरज औद्योगिक वसाहती मध्ये आज पहाटेच्या सुमारास गंगा प्लॅस्टिक या प्लास्टिक कारखान्याला अचानक भीषण आग लागली. प्लास्टिकचा कारखाना असल्याने आग अधिकच भडकत गेली. सदर आगीची माहिती प्राप्त होताच सांगली अग्निशमन दलाच्या 4, MIDC अग्निशमन दलाची 1, कोल्हापूर मनपाची 1 आणि तासगाव नगर परिषदेची एक अशा एकूण 6 अग्निशमन दलाच्या वाहनांनी 22 खेपा पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले. सदरची आग विझविण्यासाठी पाच तासाचा कालावधी लागला. या कामगिरीवर मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार ड्रायव्हर सतीश वाघमारे,सुरेश आलगुर, दत्ता माने, शशिकांत चव्हाण, इक्बाल मुल्ला, लिंगाप्पा कांबळे, फायरमन रोहित घोरपडे, प्रसाद माने, विशाल रसाळ, चंद्रकांत झेंडे, अविनाश चाळके, रोहित निकम हे हजर होते.
Odisha Makar Sankranti Mela Stampede : मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti 2023) उत्साहावर विरजण घालणारी बातमी ओदिशामधून समोर येत आहे. मकर संक्रातीच्या जत्रेत चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ओडिशामधील कटक येथील सिंहनाथ मंदिर परिसरात (Singhnath Temple) मकर संक्रांतीच्या जत्रेवेळी शनिवारी (14 जानेवारी) चेंगराचेंगरी झाली. यानंतर मंदिर परिसरात कलम 144 अंतर्गत लागू करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
नवीन वर्षातील पहिला सण म्हणून ओळखला जाणारा आजचा मकर संक्रांत. या दिवशी तीळगुळासोबत महिलांसाठी सौभाग्याचा आणि कुटुंबाच्या भरभराटीचा सण म्हणून मकर संक्रांतीची ओळख आहे. या दिवशी भोगी करणे, वाण- वसा, या सारख्या रिती, परंपरा आजही जोपासल्या जातात. त्यासाठीच राज्यभरातून हजारो महिला सध्या पंढरपूरमध्ये आपल्या शेतात पिकलेले नवंधान्य अर्पण करण्यासाठी दाखल झाल्या आहेत. भल्या पहाटेपासून मंदिर परिसर महिलांच्या गर्दीने फुलून गेले आहे. संक्रांतीमुळे आज दर्शनाची रांग थेट चंद्रभागेच्या तीरावरून पुढे गेली असून महिलांसोबत गैरप्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला 30 प्रकारच्या भोगीच्या भाज्यांची अनोखी सजावट करण्यात आली आहे.
नागपूरच्या अत्यंत पुरातन पोद्दारेश्वर मंदिरात चोरीची घटना घडली आहे. रात्री एकच्या सुमारास चोरट्यानी दानपेटी फोडली मात्र, मंदिरात असलेल्या सेवकांना जाग आल्यामुळे चोरटे दानपेटी तिथेच टाकून त्यातील काही रक्कम घेऊन पळून गेले... विशेष म्हणजे पोद्दारेश्वर राम मंदिर शहरातील अत्यंत गजबजलेल्या परिसरात इंदिरा गांधी शासकीय मेडिकल रुग्णालयाच्या समोर आहे.. रात्री एकच्या सुमारास मंदिर परिसरातील सभा मंडपात ठेवण्यात आलेली दानपेटी चोरट्यांनी फोडली.. अचानक आवाज झाल्याने मंदिरात असलेल्या सेवकाला जाग आल्यानंतर चोरट्याने पळ काढला.. रात्रीच घटनेची माहिती पोलिसाना देण्यात आली होती.. दरम्यान या घटनेत चोरी गेलेली रकम किती आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी धनराज विसपुते घेणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट...
आज सायंकाळी पाच वाजता घेणार भेट...
गेल्या 30 वर्षांपासून धनराज विसपुते आहेत भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते...
सायंकाळच्या भेटीनंतर धनराज विसपुते यांना भाजपकडून काय मिळणार आश्वासन याकडे लागले लक्ष....
मिरज औद्योगिक वसाहती मध्ये आज पहाटेच्या सुमारास गंगा प्लॅस्टिक या प्लास्टिक कारखान्याला अचानक भीषण आग लागली. प्लास्टिकचा कारखाना असल्याने आग अधिकच भडकत गेली. सदर आगीची माहिती प्राप्त होताच सांगली अग्निशमन दलाच्या ४, MIDC अग्निशमन दलाची १, कोल्हापूर मनपा ची १ व तासगाव नगर परिषदेची एक अशा एकूण ६ अग्निशमन दलाच्या वाहनांनी २२ खेपा पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले. सदरची आग विझविण्यासाठी ५ तासाचा कालावधी लागला. या कामगिरीवर मुख्य अग्निशमन अधिकारी श्री.विजय पवार ड्रायव्हर सतीश वाघमारे,सुरेश आलगुर,दत्ता माने,शशिकांत चव्हाण,इक्बाल मुल्ला,लिंगाप्पा कांबळे फायरमन रोहित घोरपडे,प्रसाद माने,विशाल रसाळ,चंद्रकांत झेंडे,अविनाश चाळके,रोहित निकम हे हजर होते.
नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वत रांगामधील वालंबा, डाब आणि तोरणमाळ परिसरात तापमानात मोठी घट झाल्याने थेट दवबिंदु गोठल्याचा प्रकार समोर आला आहे. दवबिंदु गोठल्याने गवतांवर बर्फाची चादर पसरल्याचे चित्र दिसुन आले. गेल्या काही वर्षापासुन या भागात तापमानात मोठ्य प्रमाणात घट होत असल्याने अशा पद्धतीने दवबिंदु गोठुन बर्फाची चादर होत असल्याचे चित्र वारंवार दिसुन आले आहे. मात्र या भागात हवामान विभागाचे कुठलेही तापमान मापक यंत्र नसल्याने नेमक तापमान किती याबाबत नोंदच होत नाही. अशातच कडाक्याच्या थंडीने सातपुडा पर्वत रांगामध्ये सकाळी उशीरापर्यत शेकोट्या पेटत असल्याचे चित्र आहे. गेल्या ४८ तासात नंदुरबार मधल्या सपाटी भागतच तापमानात ०८ अंश सेल्सिअस पर्यत घट झाल्याचे पहावयास मिळाले होते. अशातच सातपुड्याच्या पर्वत रागांमध्ये सपाटीभागापेक्षा तापमाना चार ते पाच अंशानी कमी असते.
सोलापुरातील चिप्पा मार्केट येथे एका व्यक्तीची हत्या
डोक्यात फरशी घालून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज
रात्रीच्या सुमारास घटना घडली असून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम करून
घटनास्थळी सोलापुरातला जेल रोड पोलीस ठाण्याचे पथक, श्वान पथक दाखल
Abdul Sattar : शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या अडचणी काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. टीईटी घोटाळा, महिला खासदारांबद्दल वादग्रस्त विधान, जिल्हाधिकाऱ्यांना दारूची ऑफर, सिल्लोड कृषी प्रदर्शनासाठी पैसे वसूल केल्याचा आरोप, वाशीम गायरान जमीन घोटाळ्याच्या आरोपानंतर सत्तार यांच्यावर आता आणखी एक नवीन आरोप होत आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा आकडा फुगवून जास्त शिष्यवृत्ती लाटणाऱ्या शाळांच्या यादीत अब्दुल सत्तार यांच्या अनेक शाळांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) अशा शंभरावर शाळांना जिल्हा परिषदेने नोटिसा बजावल्या असून, संबंधितांकडून जास्त शिष्यवृत्तीची रक्कम तातडीने वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Aurangabad Crime News : औरंगाबाद पोलीस दलात खळबळ उडवून देणारी माहिती समोर येत आहे. औरंगाबाद शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्तावरच (ACP - Assistant Commissioner of Police) शहरातील सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाईट ड्युटीवर असताना या पोलीस अधिकाऱ्याने रात्री 2 वाजेच्या सुमारास एका घरात घुसून महिलेची छेडछाड केल्याच्या प्रकार समोर आला आहे. तर याप्रकरणी शहरातील सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल ढुमे (ACP Vishal Dhume) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
Petrol Diesel Price on 15 January 2023 : भारतीय तेल कंपन्याने आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price Today) जारी केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारावर इंधन दर ठरवले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत आज कोणतीही वाढ झालेली नाही आहे. ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल 85.28 डॉलरवर आहे. तसेच, WTI कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 79.86 डॉलरवर पोहोचली आहे. ब्रेंट आणि डब्ल्यूटीआय या दोन्ही कच्च्या तेलाच्या किंमतीत शनिवारी वाढ झाली होती. मात्र, याचा आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही.
Maharashtra Dial 112 : प्राथमिक आणि द्वितीय संपर्क केंद्र डायल-112 या कार्यप्रणालीत आता व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात आला आहे. या एकत्रित प्रणालीचे लोकार्पण आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आले.
Mumbai Local Train Mega Block 15 January : मुंबईकरांनो (Mumbai) रविवारी घराबाहेर पडणार असाल आणि लोकल ट्रेनने प्रवास करणार असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. 15 जानेवारी रोजी रविवारी देखभालीच्या कामांसाठी मुंबई लोकल रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक (Local Train Mega Block) घेण्यात येणार आहे. आज मुंबई उपनगरीय रेल्वेच्या (Mumbai Local Mega Block) मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे विकेंडला घराबाहेर पडताना रेल्वेचं बदललेलं वेळापत्रक जाणून घ्या आणि नंतरच प्रवास करा.
सविस्तर बातमी : Mega Block : मुंबईकरांनो, मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक तपासा
Army Day 2023 : देशात दरवर्षी 15 जानेवारीला भारतीय 'सैन्य दिवस' (Army Day 2023) साजरा केला जातो. आज 75 वा सैन्य दिवस आहे. हा दिवस साजरा करण्यामागे खास कारण आहे. 15 जानेवारी 1949 रोजी भारतीय सैन्याची ब्रिटिशांपासून मुक्तता झाली होती. त्यानंतर याच दिवशी जनरल के एम करियप्पा (General K. M. Cariappa) यांना भारतीय लष्कराचा कमांडर इन चीफ म्हणून घोषित करण्यात आलं होतं. तेव्हापासून दरवर्षी 15 जानेवारीला सैन्य दिवस साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत आजच्या या सैन्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा येथील स्वामी विवेकानंद आश्रमात स्वामी विवेकानंद यांचा 160 वा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या तीन दिवसांपासून हा उत्सव सुरू असून शनिवारी या उत्सवाची सांगता झाली. यावेळी महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी दीड लाख भाविकांना एकाच वेळी, एकाच पंगतीत हा महामप्रसाद वितरित करण्यात आला, 100 ट्रॅक्टर, 3000 स्वयंसेवक यांच्या मदतीने जवळपास 60 एकर शेतात या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले
Devendra Fadnavis on Maharashtra Kesari : आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केली आहे. 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात बोलत होते. फडणवीस यांच्या हस्ते 'महाराष्ट्र केसरी' विजेता पैलवान शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याला मानाची गदा प्रदान करण्यात आली.
Tata Mumbai Marathon 2023 : मुंबईत टाटा मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आहे. दोना वर्षानंतर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आज पहाटे 5 वाजून 15 मिनीटांनी टाटा मॅरेथॉन स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतल्याचे पाहायला मिळत आहे. टाटा मॅरेथॉनमध्ये सुमारे 55,000 स्पर्धक सहभागी झाले आहेत.
Delhi Police Arrested Two Terrorist : 26 जानेवारी पूर्वी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दहशतवादी हल्ल्याचा (Terrorist Attack) मोठा कट उधळून लावला आहे. दिल्ली पोलिसांनी जहांगीरपुरी (Jahangirpuri) येथून दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. हे दोघे ISI साठी काम करत असल्याचं चौकशीमध्ये समोर आले आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने प्रजासत्ताक दिनापूर्वी दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उघडकीस आणला आहे. जहांगीरपुरी येथून अटक करण्यात आलेल्या संशयितांची चौकशी केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी हरकत उल अन्सार आणि खलिस्तान टायगर फोर्स यांचे संबंध असल्याचा खुलासा केला आहे. हे दोन्ही दहशतवादी गट पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI च्या आश्रयाखाली तयार करण्यात आली आहे, ज्याचा उद्देश भारतात दहशत पसरवणे आहे, असेही दिल्ली पोलिसांच्य स्पेशल सेलने सांगितलं आहे.
Tata Half Marathon Winner : हाफ मॅरेथॉनचे महिला विजेते (21 कि.मी.)
पहिली - पारूल चौधरी
दुसरी - नंदिनी गुप्ता
तिसरी - पुनम सोनावणे
Tata Half Marathon Winner : हाफ मॅरेथॉनचे विजेते (21 कि.मी.)
पहिला - मुरली गावित
दुसरा - अंकित देसवाल
तिसरा - दिपक कुंभार
Tata Marathon 2023 : आजच्या टाटा मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गाड्यांची व्यवस्था देखील करण्यात आली होती. बोरीवलीहून पहाटे 3 वाजून 45 मिनिटांनी लोकल सुटली. दरम्यान, या स्पर्धेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून या मार्गावरील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे. आज पहाटे तीन ते 1 वाजून 15 मिनीटांपर्यंत वाहतुकीत हे बदल करण्यात आले आहेत.
Tata Mumbai Marathon : कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी मुंबईत टाटा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आज पहाटे 5 वाजून15 मिनीटांनी टाटा मॅरेथॉन स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या मॅरेथॉनला नागरिकांचा मोठा सहभाग असल्याचे पाहायला मिळत आहे. या मॅरेथॉनला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित रहाणार आहेत.
पार्श्वभूमी
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.
आज राज्यभर मकर संक्रांतीच्या सणाचा उत्साह असरणार आहे. देशासह राज्यातही अनेक ठिकाणी सामुहिक पतंगबाजी होणार आहेत. मकर संक्रांतीच्या निमित्ताने रामकुंडावर स्नान करण्याला विशेष महत्व असल्याने भाविकांची गर्दी राहणार आहे. याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिकंदराबादला विशाखापट्टनवरून जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
राज्यभर मकर संक्रांतीच्या सणाचा उत्साह
आज राज्यभर मकर संक्रांतीच्या सणाचा उत्साह असरणार आहे. देशासह राज्यातही अनेक ठिकाणी सामुहिक पतंगबाजी होणार आहेत. मकर संक्रांतीच्या निमित्ताने रामकुंडावर स्नान करण्याला विशेष महत्व असल्याने भाविकांची गर्दी राहणार आहे.
मुंबईत टाटा मॅरेथॉन स्पर्धा
कोरोना नंतर तब्बल दोन वर्षांनी मुंबईत टाटा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आज पहाटे 5.15 वाजल्यापासून मॅरेथॉनला सुरूवात होणार आहे. मॅरेथॉनला पोहचण्यासाठी विशेष लोकल बोरीवलीहून पहाटे 3.45 वाजता सुटणार आहे. मॅरेथॉनला सिलीब्रिटी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित रहाणार आहेत.
बीडच्या गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊ यांच्या 47 व्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम
संत वामन भाऊ यांच्या 47 व्या पुण्यतिथी निमित्त पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गडावर कार्यक्रम होणार आहे.. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पंकजा मुंडेही उपस्थिती लावणार आहेत.
रत्नागिरीत कल्याण विधी सोहळा
आज प्रसिद्ध अशा मार्लेश्वर या ठिकाणी कल्याण विधी सोहळा अर्थात देवाचं लग्न सकाळी 10 नंतर संपन्न होणार आहे. राज्यातील ही अनोखी प्रथा शेकडो वर्षांपासून चालत आलेली असून आजही तितक्याच भक्तिभावाने जपली गेली आणि साजरी केली जातेय.
अमरावतीत आजपासून शंकरपटाला सुरूवात
विदर्भात सर्वात प्रसिध्द असलेला शंकरपट रविवारपासून सुरू होतोय. तळेगाव दशासर येथे कृषक सुधार मंडळाद्वारे चार दिवसीय शंकरपटाच आयोजन करण्यात आलंय. रविवारी दो-दाणी, सोमवार - मंगळवारी एकदानी आणि बुधवारी महिलांचा शंकरपट होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिकंदराबादला विशाखापट्टनवरून जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात सुरु आहे. सिद्धरामेश्वर महाराजांच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाह शनिवारी पार पडला. त्यानंतर आज संध्याकाळी यात्रेतील होम प्रदीपन सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर भाकणूक कार्यक्रम पार पडेल. बाजरीच्या पाच पेंड्यांना साडी, चोळी, खण आणि मंगल चिन्हाचा वापर करुन कुंभार कन्येचे रुप देण्यात येते. त्यानंतर मानकरी हिरेहब्बू यांच्या हस्ते पुजा करुन हा होमप्रदीपन विधी पार पडतो. तर होम विधी सोहळ्यानंतर भाकणुकीचा कार्यक्रम होईल. आगामी वर्ष कसा असेल या संदर्भात सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत भाकनुक केली जाते. संध्याकाळी 5 नंतर या सोहळ्याला सुरुवात होईल.
भारत श्रीलंका दरम्यान अंतिम सामना
भारत आणि श्रीलंका दरम्यान अंतिम सामना दुपारी 1.30 वाजता तिरूअनंतपुरम येथे होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -