Maharashtra News Updates 13 October 2022 :दौंडमध्ये टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात, तीन महिलांचा मृत्यू

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Oct 2022 10:31 PM
मुरजी पटेल उद्या भाजपाकडूनच उमेदवारी अर्ज दाखल करणार

मुरजी पटेल उद्या भाजपाकडूनच उमेदवारी अर्ज दाखल करणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आशिष शेलार यांच्या बैठकीत अंतिम निर्णय


अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे विरुद्ध भाजपा असा सामना

Nashik Breaking: Cbi ची नशिकमध्ये मोठी कारवाई, कॉम्बॅक्ट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये कारवाई, दोन लष्करी अधिकारी CBIच्या जाळ्यात आल्यानं खळबळ

Nashik Breaking: Cbi ची नशिकमध्ये मोठी कारवाई, कॉम्बॅक्ट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलमध्ये  (कॅट्स) झाली कारवाई, दोन लष्करी अधिकारी CBIच्या जाळ्यात आल्यानं खळबळ


कॅट्सला लाचखोरीची लागण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस,  एका ठेकेदारकडून लाच माण्यासह स्वीकारताना सीबीआयने केली कारवाई 
-
मेजर हिमांशू मिश्रा (असिस्टंट गॅरिसन इंजिनिअर) आणि मिलिंद वाडिले (ज्युनिअर इंजिनिअर)
दोघाना अटक



किती रुपयांची आणि कुठल्या कामासाठी लाच मागीतली हा तपशील आद्यप स्पष्ट नाही

आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल 

आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल  झाला आहे. ठाण्यात केलेल्या वक्तव्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यात भास्कर जाधव यांनी राष्ट्रपती पदांचा अपमान केल्याप्रकरणी गोंदियात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

दौंडमध्ये टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात, तीन महिलांचा मृत्यू

दौंड तालुक्यातील रावणगावमध्ये टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात. यामध्ये पाच ते सहा महिला गंभीर जखमी झाल्या असून तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जखमींना दौंड व भिगवण येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. टोमॅटोने भरलेला ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढत असताना ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. यामध्ये ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॉलीत बसून निघालेल्या महिला या ट्रॉलीखाली सापडल्या. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या.  सुरेखा बाळू पानसरे, रेश्मा भाऊ पानसरे या दोन्ही सख्ख्या जावा आहेत व अश्विनी प्रमोद आटोळे ह्या तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत टोमॅटोचे 70 ते 80 क्रेट यामध्ये होते. टोमॅटो घेऊन ट्रॅक्टर ट्रॉलीसह शेतातून बाहेर पडताना खडकवासला कालव्याच्या 32 व्या क्रमांकाच्या वितरीकेवरून निघाला होता. त्यामध्ये चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात  घडला. त्यामध्ये नऊ महिला होत्या. रावणगाव परिसरातील या महिला होत्या. उपचारादरम्यान यापैकी तीन महिलांचा मृत्यू झाला आहे..

शाळेत जाण्यासाठी पाण्यातून जीवघेणा प्रवास, विद्यार्थ्यांचं रामेश्वर तलावात उतरून जलसमाधी आंदोलन
बीडच्या पाटोदा तालुक्यातील शिंदे वस्ती येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो या ठिकाणी रस्ता व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी रामेश्वर तलावात उतरून जलसमाधी आंदोलन केलं. शिंदे वस्तीवरील विद्यार्थी दररोज वस्तीवरून तराफ्यावर बसून पाण्यातून प्रवास करतात आणि सौताडा येथे असलेल्या शाळेमध्ये पोहोचतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून तात्काळ विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पूल बांधून रस्ता करून देण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं.

 
ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट 

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट 


सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीचा अठरा हजार रुपये बोनस जाहीर 


मुख्यमंत्री, माजी महापौर नरेश म्हस्के, आयुक्त आणि प्रशासक अभिजीत बांगर यांच्या संयुक्त बैठकीत झाला निर्णय 


यांमध्ये परिवहनच्या कर्मचाऱ्यांना देखील देण्यात येणार बोनस

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीचा अठरा हजार रुपये बोनस जाहीर 

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीचा अठरा हजार रुपये बोनस जाहीर, मुख्यमंत्री, माजी महापौर नरेश म्हस्के, आयुक्त आणि प्रशासक अभिजीत बांगर यांच्या संयुक्त बैठकीत झाला निर्णय 


यामध्ये परिवहनच्या कर्मचाऱ्यांना देखील देण्यात येणार बोनस

अंधेरी विधानसभेसाठी कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत वर्षावर होणार निर्णय

ऋतुजा लटकेंसोबत असलेल्या सहानुभूतीनंतर भाजपातीन मुरजी पटेल यांना उमेदवारी न देता शिंदे गटातून द्यावी असा मतप्रवाह निर्माण झालाय. मुरजी पटेल यांना भाजपातून किंवा शिंदे गटातून उमेदवारी मिळण्यार का हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. भाजपकडून उमेदवारी मिळण्यावर अद्यापही शिक्कामोर्तब नाही, असी वरिष्ठ सुत्रांची माहीती. मुरजी पटेल यांना फोन काॅलची वाट पाहा असा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा मेसेज… आज रात्री एबी फॉर्म मिळण्यापुर्वी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता.

पंजाबमधील एका दहशतवाद्याला मुंबईतून अटक

पंजाबमधील एका दहशतवाद्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. चरतसिंग इंद्रजितसिंग करिसिंग कारज सिंग नाव असं अटक केलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे. त्याच्याविरुद्ध 8 गुन्हे दाखल आहेत. मार्च 2022 पासून तो पंजाबच्या कपूरथला तुरुंगातून 2 महिन्यांच्या पॅरोल रजेवर बाहेर होता. त्याच्या पॅरोल कालावधीत त्याने त्याच्या साथीदारांसह पंजाब पोलिस, इंटेलिजन्स हेड क्वार्टर, मोहाली येथे 9 मे 2022 रोजी रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड (RPG) ने हल्ला केला होता. त्याच्या ठावठिकाणाबाबत महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार एटीएसच्या पथकाने त्याला मालाड, मुंबई येथून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तो सध्या कॅनडामध्ये असलेल्या लखबीर सिंग लांडा नावाच्या वॉन्टेड दहशतवाद्याच्या संपर्कात असल्याचे उघड झाले. पुढील आवश्यक कारवाईसाठी अटक आरोपीला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Amit Thackeray : अमित ठाकरे यांचे जालन्यात जंगी स्वागत

मराठवाडा दौऱ्यावर असलेले मनसे नेते अमित ठाकरे हे आज जालना दौऱ्यावर असून जालना शहरात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. मनसे कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याच्या स्वागतासाठी क्रेनच्या सहाय्याने हार घालून अमित ठाकरे यांच्या रॅलीचे स्वागत केले. शहरातील नूतन वसाहत भागांमध्ये  कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत आपल्या नेत्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील केली.

Ahmednagar : मनमाड महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे ठिय्या आंदोलन 

मनमाड महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने अहमदनगर जिल्ह्यात रोज आंदोलन होत आहेत. कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना नगर मनमाड महामार्गावर भर पावसात ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली आहे. सरकार कोणाचेही असो जनतेचे प्रश्न महत्वाचे असून रस्त्याचे रिटेंडर कधीही करा, मात्र रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे. 


गेल्या दोन दशकांपासून नगर मनमाड महामार्गाची दुरावस्था झाली आहे. खड्यांमुळे रस्त्याची चाळण झाल्याने शेकडो निष्पाप लोकांना रस्ता अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. एकीकडे विरोधक रस्त्याच्या कामासाठी विवीध आंदोलन करत असताना भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आज राज्य सरकारला घरचा आहेर दिला. भर पावसात खड्डयाजवळ बसून दोन तास महामार्गावर कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन करत कोल्हे यांनी हे अनोख आंदोलन केलं.

कोपरगाव भरपावसात माजी आमदार कोल्हे यांच आंदोलन, रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी आंदोलन

नगर - मनमाड महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने अहमदनगर जिल्हयात रोज आंदोलन होतायत...कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना नगर मनमाड महामार्गावर भर पावसात ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आलीय....सरकार कोणाचेही असो जनतेचे प्रश्न महत्वाचा असुन रस्त्याचे रिटेंडर कधीही करा मात्र रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा अशी मागणी कोल्हे यांनी केलीय...

Ratnagiri Rain : रत्नागिरी जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर कायम, भात पीक धोक्यात

रत्नागिरी जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर कायम असून खेड,दापोलीमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. चिपळूणमध्येही परतीच्या पावसाचा जोर वाढला. वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले भात पीक धोक्यात आलं आहे. 

शहादा पंचायत समिती मध्ये काँग्रेसचे संख्याबळ अधिक असूनही भाजपाने केली सत्ता काबीज...
संख्याबळ जास्त असुनही अंतर्गत वादामुळे शहादा पंचायत समितीत कॉग्रेसला सत्ता काबीज करता आली नाही. शहादा पंचायत समितीमध्ये सभापतीपदी आणि उपसभापतीपदी भाजपाच्या उमेदवारांची विजय झाला आहे. २८ सदस्य संख्या असलेल्या शहादा पंचायत समितीमध्ये कॉग्रेसचे 14 राष्ट्रवादीचे ०२ तर भाजपाचे १२ असे संख्याबळ आहे. मात्र आज झालेल्या सभापती पदाच्या निवडणुकीत कॉग्रेसच १४ सदस्य आणि राष्ट्रवादीचा ०१ असे १५ सदस्य अनुपस्थित राहीले आहेत. त्यामुळे अध्यक्षपदी भाजपाचे विरसिंग ठाकरे यांची निवड झाली. तर तर उपसभापतीपदी भाजपच्या कल्पना श्रीराम पाटील यांची निवड झाली आहे. त्यांना भाजपाच्या १२ आणि राष्ट्रवादीचे ०१ असे १३ मते मिळाली आहेत. अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी कॉग्रेसकडुन तब्बल ०४ अर्ज देखील दाखल करण्यात आलेले होते. मात्र त्यांचे काही सदस्य भाजपाच्या गळ्याला लागल्याने पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी कॉग्रेसचे संख्याबळ जास्त राहुनी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.जिल्ह्याचे माजी मंत्री अॅड .के.सी पाडवी आणि पदमाकर वळवी यांना हा झटका मानला जात आहे.
विमा कंपनी विरोधात आमदार बांगर आक्रमक, विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड 

बोगस पंचनामे आणि बनावट सह्यांच्या आधारे फसवणूक करणाऱ्या पिक विमा कंपनीच्या कार्यालयात आज आमदार बांगर यांनी तोडफोड केली आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीच्या तक्रारी  पिक विमा कंपन्याकडे दिल्या,  परंतु पिक विमा कंपनीच्या वतीने परस्पर पंचनामे केले जात आहेत, तर बोगस पंचनामे तयार करून बनावट सह्या करत अहवाल दाखल केला जातो. इतर या अहवालामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान सुद्धा अत्यल्प स्वरूपात दाखवले जाते. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा नुकसान झालेले असताना पिक विमा कंपन्या बनावटपणा करत आहेत. हा प्रकार उघड झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आमदार बांगर यांच्याकडे व्यथा मांडल्या आणि आमदार बांगर यांनी पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी निमंत्रित केले. परंतु त्यांनी येण्यास टाळाटाळ केली अखेर आमदार बांगर यांनी थेट पीक विमा कंपनीचा कार्यालय गाठलं त्या ठिकाणी  अधिकारी नसल्याने आमदार बांगर चांगलेच आक्रमक झाले त्यांनी चक्क विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे अनेक शिवसैनिक आणि शेतकऱ्यांसोबत आमदार बांगर यांनी विमा कंपनीच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे.

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात अर्धनग्न आंदोलन
अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालूक्यातील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अर्धनग्न आंदोलन केलंय. मुर्तिजापूर तालूक्यातील राजनापूर खिनखिनी, माना परिसरात गेल्या चार दिवसांत मोठी अतिवृष्टी झालीय. यात हातातोंडाशी आलेलं सोयाबीन पिक अक्षरश: मातीमोल झालंय. अतिवृष्टीमूळे सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी सरकारकडे केलीये. सोबतच आंदोलक शेतकऱ्यांनी या नुकसानासाठी पिकविमा  त्वरीत देण्याची मागणी सरकारकडे केलीये. यावेळी शेतकऱ्यांच्या घोषणांनी अकोल्याचं जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेलं होतंय.

 
सिंधुदुर्ग : सह्याद्री पट्ट्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, कुडाळ तालुक्यातील नारूर गावात ढगफुटी सदृश्य पाऊस, ढगफुटी सदृश्य पावसामुळे पूर परिस्थिती, भातशेतीचं मोठं नुकसान

सिंधुदुर्ग : सह्याद्री पट्ट्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, कुडाळ तालुक्यातील नारूर गावात ढगफुटी सदृश्य पाऊस, ढगफुटी सदृश्य पावसामुळे पूर परिस्थिती, भातशेतीचं मोठं नुकसान

निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत, 755 कोटी रुपयांच्या निधीचे औरंगाबाद, अमरावती आणि पुणे विभागातील नऊ जिल्ह्यांमध्ये  वितरण करण्याचा GR निघाला

निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत करण्याबाबत  मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात शासन निर्णय काढून जिल्ह्यांना निधी वितरित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे आज मदत व पुनर्वसन विभागाने 755 कोटी रुपयांच्या निधीचे औरंगाबाद, अमरावती आणि पुणे विभागातील नऊ जिल्ह्यांना  वितरण करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.  जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या व निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने यातून दिलासा दिला आहे.

Wardha News: जिल्ह्यातील शालेय पोषण आहार कर्मचारी आयटकच्या नेतृत्वात आक्रमक

वर्धा : शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या 6 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयातील प्राथमिक शिक्षण विभागासमोर आयटकच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आलं. कर्मचाऱ्यांचे कोरोना काळातील मानधन देखील अद्याप प्रलंबित असल्याने आज ठिय्या आंदोलन केलं.

Sharad Pawar LIVE: छगन भुजबळ यांनी दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधलं, दिल्लीतील सर्वात उत्तम वास्तू बांधली : शरद पवार

Sharad Pawar LIVE: छगन भुजबळ यांचा 75 व्या वाढदिवसनिमित्त आयोजित कार्यक्रमातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लाईव्ह

नंदुरबार:  शहादा पंचायत समितीत  सर्वाधिक संख्याबळ काँग्रेसकडे असतानाही भाजपची सत्ता, अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसचे 4 सदस्य अनुपस्थित राहिल्यामुळे भाजपचा सभापतीपदाचा उमेदवार विजयी

नंदुरबार:  शहादा पंचायत समितीत  सर्वाधिक संख्याबळ काँग्रेसकडे असतानाही भाजपची सत्ता, अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसचे 4 सदस्य अनुपस्थित राहिल्यामुळे भाजपचा सभापतीपदाचा उमेदवार विजयी ...


भाजपचे विरसिंग ठाकरे सभापती तर उपसभापतीपदी कल्पना श्रीराम पाटील विजयी..


काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा बहुमत असतानाही शहाद्यात मोठा फटका..

शिवसेनेनं अनेक वादळं अंगावर घेतली आहेत मात्र शरद पवार आमच्यासोबत आहेत जे वादळ निर्माण करतात. मी तर लढाईची वाटच बघतोय... : उद्धव ठाकरे

Shivsena: शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना दिलासा; राजीनामा स्वीकारल्याचे पत्र देण्याचे हायकोर्टाचे मुंबई महापालिकेला आदेश

शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना दिलासा; राजीनामा स्वीकारल्याचे पत्र देण्याचे हायकोर्टाचे मुंबई महापालिकेला आदेश

दक्षिण आणि मध्य मुंबईत मुसळधार पाऊस सुरु

Mumbai Rain : दक्षिण आणि मध्य मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. सकाळपासून पावसानं काहीशी उघडीप दिली होती मात्र, पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. 

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला शिंदे सरकारचा आणखी एक धक्का, ग्रामविकास विभागाअंतर्गत ग्रामीण भागात विकासात्मक मंजूर केलेली सर्व कामे रद्द

Maharashtra Politics : तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला शिंदे सरकारचा आणखी एक धक्का


ग्रामविकास विभागाअंतर्गत ग्रामीण भागात विकासात्मक मंजूर केलेली सर्व कामे रद्द


महाविकास आघाडी सरकारच्या काळात 1 एप्रिल 2021 पासून 2515 आणि 1238 सर्व कामे रद्द करण्याचा निर्णय


महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक लोकप्रतिनिधींनी सुचवलेली ही सर्व कामे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे


सर्व कामांना शिंदे सरकारने स्थगिती दिलेली होती आता मात्र ही कामे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय


या निर्णयावरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

चिकोडी : टॉवरवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या; कागवाड तालुक्यातील मंगावती येथील घटना 

टॉवरवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना कागवाड तालुक्यातील मंगावती गावांत घडली. संजय कलगौडा पाटील (वय 35) असे मयत तरुणाचे नाव आहे. संजय पाटील काल मंगावती गावातील टॉवरवर चढला. त्यावेळी अर्ध्यावर पाय घसरून खाली पडल्याने गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाला. रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच संजयचा मृत्यू झाला. संजय हा एका बँकेत काम करीत असल्याचे समजते. टॉवरवरून पडल्याचा व्हिडिओ सद्या व्हायरल होत आहे. 

HIjab Case : दोन न्यायमुर्तींचं एकमत न झाल्यानं हिजाब प्रकरण आता तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग

HIjab Case : हिजाब मुद्द्यावर दोन्ही न्यायमूर्तींची वेगवेगळी मतं

Ratnagiri : उदय सामंतांसमोर राजन साळवीचं आव्हान उभं करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न?

Ratnagiri : विधानसभा निवडणुकांना तसा अद्याप अवधी आहे. पण सध्या राज्यातलं राजकारण पाहता प्रत्येक मतदारसंघानुसार आता सर्व शक्यतांची पडताळणी प्रत्येक पक्ष सध्या करताना दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात उदय सामंत यांच्या विरोधात राजन साळवी उभे राहिल्यास उदय सामंत यांच्यासमोर तगडं आव्हान उभं राहू शकते. त्यामुळे राजन साळवी यांना रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून उदय सामंत यांच्या विरोधात उमेदवारी तर दिली जाऊ शकत नाही ना? अशी चर्चा दबक्या आवजात सध्या सुरू झालेली आहे. शिवा विविध प्रकारच्या चर्चा आणि शक्यतांची चाचपणी देखील सध्या केली जात असल्याची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू झालेली आहे. राजन साळवी हे मूळचे रत्नागिरीतील आहेत. शिवसेनेच्या बांधणीसाठी राजन साळवी यांनी घेतलेली मेहनत, कार्यकर्त्यांची असलेली फौज  आणि आणि दांडगा जनसंपर्क  या राजन साळवी यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे राजन साळवी  हे उदय सामंत यांच्यासमोर तगड आव्हान उभं करू शकतात असा मांडणारा देखील एक मोठा वर्ग आहे. आणि त्याचमुळे सध्या विविध चर्चा रंगताना दिसून येत आहेत. लांजा राजापूर मतदार संघात सध्या शिवसेनेतल्या अंतर्गत घडामोडी देखील वेगाने घडत आहेत. नाना पटोले यांच्या दौऱ्यानंतर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस लक्ष केंद्रित करत आहे का? अशी चर्चा देखील सुरू झालेली आहे. शिवाय राजन साळवी यांच्या विरोधात नाणार रिफायनरीच्या मुद्द्यावरून काही प्रमाणात नाराजी देखील दिसून येत आहे. या साऱ्याचा विचार केल्यास लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातून साळवी यांना निवडणूक जड जाऊ शकते. या साऱ्यांमध्ये काँग्रेसचे 2019 मधील उमेदवार अविनाश लाड देखील सध्या  या ठिकाणी सक्रिय झालेले दिसून येत आहेत. या साऱ्या शक्यतांचा, राजकीय गणिताचा विचार केल्यास शिवा राजन साळवे यांची रत्नागिरी येथील ताकद पाहिल्यास साळवी सामंतांसमोर तगडा आव्हान उभं करू शकतात. आणि त्यामुळे सध्या ठाकरे गट उदय सामंत यांच्यासमोर साळवी यांचं आव्हान उभे करण्याच्या प्रयत्नत असल्याची चर्चा सुरू झालेली आहे.

ब्राझीलला मागे टाकत जगात भारत साखर उत्पादनात पहिल्या क्रमांकांवर

साखर उत्पादनात ब्राझील हा देश सर्वात अग्रेसर आहे. ब्राझील पाठोपाठ भारत हा देश साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर येतो.


या वर्षीच्या गाळप हंगामानंतर भारत पहिल्या क्रमांकावर पोंहचा आहे


त्यात महाराष्ट्र सर्वात पुढे


36.88 मिलिअन मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू... 


ऋतुजा लटकेंच्या याचिकेवर सुनावणी 


दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटकेंनी पालिके विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.  
 
मुरजी पटेल आज उमेदवारी अर्ज भरणार 


अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल आज उमेदवारी अर्ज भरणार.  


छगन भुजबळ यांचा आज 75 वा वाढदिवस


ज्येष्ठ राजकीय नेते छगन भुजबळ यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात छगन भुजबळांचा अमृत महोत्सव सोहळा पार पडणार आहे.  


प्रबोधन यात्रेचा दुसरा मेळावा  


शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची प्रबोधन यात्रा आज नवी मुंबईत असणार आहे. या यात्रेत सुषमा अंधारे, अरविंद सावंत, राजन विचारे, भास्कर जाधव यांच्यासारखे नेते संबोधित करणार आहेत, दुपारी 4 वाजता, विष्णुदास नाट्यगृह, वाशी येथे ही यात्रा होणार आहे.  


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उना आणि चंबा दौऱ्यावर 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उना आणि चंबा दौऱ्यावर आहेत. मोदी साधारण अडीच तास ते उनामध्ये असणार आहेत. यावेळी ते जाहीर सभा घेणार आहेत.  


कर्नाटक हिजाब प्रकरणी आज सुप्रिम कोर्टाचा निकाल 


कर्नाटक हिजाब प्रकरणी आज सुप्रिम कोर्टात निकाल येणार आहे. या याचिकेत कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देण्यात आले होते. ज्यात शाळा आणि महाविद्यालयामध्ये गणवेशाच्या नियमांचे पालन योग्य ठरवले होते.
 
खासदार विनायक राऊत आणि काँगेसचे आमदार सतेज पाटील यांची टू व्हीलर रॅली
 
खासदार विनायक राऊत आणि काँगेसचे आमदार सतेज पाटील कुडाळ विश्रामगृह येथून टू व्हीलर रॅलीने कुडाळ नगरपंचायत कार्यालयाकडे नवीन अग्निशामक वाहनाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पोहचणार आहेत.
 
अमित ठाकरे आज जिल्हा जालना दौऱ्यावर
 
मनसे नेते अमित ठाकरे आज जिल्हा जालना  दौऱ्यावर आहेत. यावेळी सकाळी 11 वाजता मनसे कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. दुपारी 3 वाजता सिडस कंपनी महिको कार्यालयाला भेट देणार आहे.
 
प्रकाश आंबेडकरांच्या जिल्हा अकोला दौऱ्याचा दुसरा 


वंचित बहुजन आगाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या  अकोला जिल्हा दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.