Maharashtra News Updates 12 October 2022 : मुंबई क्राईम ब्रँचच्या पोलिस अधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र सादर केलेल्या शिवसैनिकांची चौकशी सुरू

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Oct 2022 06:18 PM
पालघरमध्ये परतीच्या पावसाचा धुमाकूळ, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान  

Palghar Rain : मागील तीन ते चार दिवसांपासून पालघर जिल्ह्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून या परतीच्या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यात 75 हजार हेक्टर पेक्षाही जास्त क्षेत्रावर असलेली भातशेती या परतीच्या पावसामुळे संकटात सापडली आहे. तयार झालेल्या भात पिकाला मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलय. त्यामुळे येथील शेतकरी पुन्हा एकदा अस्मानी संकटात सापडलाय. तयार झालेली भात पिकं शेतातच असून ऐन भात पिकं काढण्याच्या वेळेसच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पाऊस हिरावून घेतोय की काय अशा चिंतेत सध्या शेतकरी आहेत. 

 शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी शिवसेनेने रोखला राष्ट्रीय महामार्ग 

Nagpur News : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ त्यांच्या खात्यात मदत जमा करावी. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्यावा या मागणीसाठी तब्बल दीड तास राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरीत जमा करावी, पीक विम्याच्या नुकसानीची पाहणी करुन तत्काळ मदत देण्यात यावी. नियमीत शेतकरी पीक कर्जदारांना शासनाचे प्रोत्साहन पर 50 हजार अनुदान त्वरीत देण्यात यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.  दरम्यान आंदोलनामुळे जवळपास पाच किलोमीटरवर वाहणांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी मशाल हाती घेऊन आंदोलन करण्यात आले. 

Palghar Rain : पालघरमध्ये परतीच्या मान्सूनची दमदार हजेरी, शेतकरी अडचणीत

मागील तीन ते चार दिवसापासून पालघर जिल्ह्यात परतीच्या पावसाने दमदार अशी हजेरी लावली असून या परतीच्या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यात 75 हजार हेक्टर पेक्षाही जास्त क्षेत्रावर असलेली भातशेती या परतीच्या पावसामुळे संकटात सापडली आहे. तयार झालेल्या भात पिकाला मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलंय. त्यामुळे येथील शेतकरी पुन्हा एकदा अस्मानी संकटात सापडला आहे. तयार झालेली भात पिकं शेतातच असून ऐन भात पिकं काढण्याच्या वेळेसच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पाऊस हिरावून घेतोय की काय अशा चिंतेत सध्या शेतकरी आहेत.

मुंबई क्राईम ब्रँचच्या पोलिस अधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र सादर केलेल्या शिवसैनिकांची चौकशी सुरू

मुंबई क्राईम ब्रँचच्या पोलिस अधिकाऱ्यांकडून शिवसैनिकांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्रतिज्ञापत्र सादर केलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची चौकशी केली जात आहे.  कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले पोलिस ठाण्यात पाच ते सहा शिवसैनिकांना चौकशीसाठी बोलांवलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाने दाखल केलेली प्रतिज्ञापत्र खरी की खोटी याची सत्यता पडताळण्यासाठी तपास सुरू करण्यात आलाय. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह शिवसैनिक हातकणंगले पोलिस ठाण्यात दाखल जाले आहेत. 

रायगड जिल्ह्यातील रोहा, उरण परिसरात पावसाची हजेरी

रायगड जिल्ह्यातील रोहा आणि उरण परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. रोहा परिसरात परतीच्या पावसाची हजेरी लावली असून विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. 

पंढरपूर वारी छायाचित्र प्रदर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

पंढरपूर वारी छायाचित्र प्रदर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली आहे. हा उपक्रम खूपच चांगला असल्याचे मुख्यंत्र्यांनी यावेळी म्हटले आहे.  

पालघरमध्ये समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळेतील 12 वर्षीय विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू

Palghar News : पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील उधवा येथील ल.सी. कोम या समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळेतील 12 वर्षीय विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  प्रशांत विष्णू हरपाले असं या 12 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव असून हा विद्यार्थी सहावीत शिक्षण घेत होता. रात्रीच्या सुमारास विषारी सर्प दरवाज्याच्या खालून विद्यार्थी राहत असलेल्या वर्ग खोलीत शिरला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सर्पदंश झाल्यावर प्रथम या विद्यार्थ्याला उधवा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याची प्रकृती खालावल्याने त्याला खानवेल येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या सगळ्या घटनेमुळे समाज कल्याण विभागाच्या निवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Andheri East Bypoll 2022 : माझी निष्टा उद्धव ठाकरेंसोबतच, मशाल चिन्हावरच निडणूक लवढणार; ऋतुजा लटके यांचा निर्धार

Andheri East Bypoll 2022 : माझी निष्टा उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असून मी मशाल चिन्हावरच निडणूक लवढणार आहे, असा निर्धार अंधेरी पोटनिवडणुकीतल ठाकरे गटाच्या अमेदवार ऋतुजा लटके यांनी केलाय.   

Andheri East Bypoll 2022 : ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू: महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल

उद्धव ठाकरे गटाच्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्रतिक्रिया महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे. ही प्रक्रिया 30 दिवसांची असेल असंही ते म्हणाले. त्यामुले ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीविषयी अजूनही संदिग्धता आहे. 

Andheri Bypoll Election : ऋतुजा लटके यांच्या राजीनामा स्वीकारला नाही, या प्रकरणी उद्धव ठाकरे गटाची न्यायालयात धाव, उद्या 11 वाजता सुनावणी

ऋतुजा लटके या अंधेरी पूर्व विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पण प्रशासनाने त्यांचा राजीनामा अद्याप स्वीकारला नाही. या प्रकरणी उद्धव ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली असून उद्या 11 वाजता त्यावर सुनावणी होणार आहे. 

Andheri East Bypoll 2022 : ऋतुजा लटके यांच्या  याचिकेवर उद्या हायकोर्टात सुनावणी

Andheri East Bypoll 2022 : अंधेरी पोट निवडणुकीच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या  याचिकेवर उद्या हायकोर्टात सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात लटके यांनी याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. 

Andheri Bypoll Election : ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला जात नाही, प्रशासनावर दबाव टाकला जातोय: महाडेश्वर 

ऋतुजा लटके यांनी राजीनामा दिला, एक महिन्याचं वेतनही जमा केलं आहे. पण त्यांचा राजीनामा अद्याप स्वीकारला नाही. प्रशासन कुणाच्यातरी दबावाखाली काम करतंय, ही लोकशाहीसाठी काळीमा फासणारी गोष्ट आहे असं शिवसेनेचे नेते महाडेश्वर यांनी म्हटलंय. ऋतुजा लटके या अंधेरी पूर्व विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत असंही ते म्हणाले. 

Andheri East Bypoll 2022 : अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक शिंदे गट लढण्याची दाट शक्यता, भाजपाचे संभाव्य उमेदवार मुरजी पटेल यांची माघार?

Andheri East Bypoll 2022 : अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक शिंदे गट लढण्याची दाट शक्यता


भाजप शिंदे गट युतीमध्ये अंधेरीची जागा बाळासाहेबांच्या शिवसेनेला जाण्याची शक्यता


भाजपाचे दावेदार उमेदवार मुरजी पटेल यांची माघार?

Andheri East Bypoll 2022 : ऋतुजा लटके यांच्या राजीनामा मंजूर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात दाद मागणार

Andheri East Bypoll 2022 : अंधेरी पोटनिवडणूक रंगात, उमेदवारांसाठी ठाकरे आणि शिंदे गटात रस्सीखेच 


ऋतुजा लटके प्रकरणात शिवसेना कोर्टात जाणार 


राजीनामा मंजूर प्रकरणी ठाकरे कोर्टात दाद मागणार


कोर्टांच्या निकालानंतर अर्जांची तारीख ठरणार 


शिंदे गटाकडून ऋतुजा लटकेंवर दबाव असल्याचा ठाकरे गटाकडून आरोप

केंद्राकडे महाराष्ट्राची तब्बल 22 हजार 794 कोटींची जीएसटीची थकबाकी

2019-20 ची 1 हजार 29 कोटी रुपये


2020-2021 ची 6 हजार 470 कोटी रुपये


2021-2022ची 8 हजार 2 कोटी रुपये बाकी


केंद्रसरकारकडे पाठपुरावा करण्यात राज्य सरकर कमी पडत असल्याचा विरोधकांचा आरोप


थकबाकीची रक्कम मिळतं नसल्याने विकासकामांवर परिणाम होतं असल्याचा विरोधकांचा दावा

धार्मिक स्थळांचा सध्याचा दर्जा कायम ठेवण्याच्या आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी

सर्व धार्मिक स्थळांचा सध्याचा दर्जा कायम ठेवण्याच्या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या याचिकांमध्ये असे म्हटले आहे की 1991 चा प्रार्थनास्थळ कायदा 15 ऑगस्ट 1947 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांचा दर्जा कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो. ते हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन समाजाच्या विरोधात आहे. त्यामुळे ज्या पवित्र स्थळांवर परकीय आक्रमकांनी बळजबरीने मशीद बांधली होती, त्या ठिकाणांवर तो हक्क सांगू शकला नाही. यावर केंद्र सरकारने उत्तर द्यावे. 

दिल्लीत आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक

आज सकाळी 10.30 वाजता केंद्रीय कॅबिनेटची बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत गहू आणि रब्बी पिकांची एफआरपी ठरवली जाण्याची शक्यता आहे. सध्या गव्हाची एफआरपी 2015 रूपये इतकी आहे. 

धुळ्यात गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक

मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे, सकाळी 11 वाजता. 

अमरावती विद्यापीठाचा युवा महोत्सव

अमरावती विद्यापीठाचा युवा महोत्सव 2022 महोत्सव 12 ते 15 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. याचं उद्घाटन सकाळी 10 वाजता विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमाला अभिनेता निखील वैरागर आणि सिने अभिनेत्री मोनालिसा बागल उपस्थित राहणार आहेत.

नोटा बंदी विरोधाल्या याचिकेवर खंडपीठा पुढे सुनावणी

2016 साली झालेल्या नोटा बंदी विरोधाल्या याचिकेवर खंडपीठा पुढे सुनावणी होणार आहे. आज खंडपीठ हे ठरवले कि खरच आता हा विषय ऐकण्याची गरज आहे की नाही.

Mumbai News : मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Mumbai News : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सकाळी 11 वाजता मंत्रालयात होणार आहे.  

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.  


मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक  


आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सकाळी 11 वाजता मंत्रालयात होणार आहे.  


नोटा बंदी विरोधाल्या याचिकेवर खंडपीठा पुढे सुनावणी
 
2016 साली झालेल्या नोटा बंदी विरोधाल्या याचिकेवर खंडपीठा पुढे सुनावणी होणार आहे. आज खंडपीठ हे ठरवले कि खरच आता हा विषय ऐकण्याची गरज आहे कि नाही.


अमरावती विद्यापीठाचा युवा महोत्सव 


अमरावती विद्यापीठाचा युवा महोत्सव 2022 महोत्सव 12 ते 15 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. याचं उद्घाटन सकाळी 10 वाजता विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिलीप मालखेडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमाला अभिनेता निखील वैरागर आणि सिने अभिनेत्री मोनालिसा बागल उपस्थित राहणार आहेत.


धुळ्यात गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक


मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे, सकाळी 11 वाजता. 


दिल्लीत आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक 


आज सकाळी 10.30 वाजता केंद्रीय कॅबिनेटची बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत गहू आणि रब्बी पिकांची एफआरपी ठरवली जाण्याची शक्यता आहे. सध्या गव्हाची एफआरपी 2015 रूपये इतकी आहे. 


उधमपूर येथे एअर शो 


जम्मू, काश्मीर आणि लडाखमधील हवाई दलाला 60 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल उधमपूर, जम्मू येथील एअर फोर्स स्टेशन येथे साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने उधमपूर एअर स्टेशनवर एअर शो आयोजित केला जाईल, ज्यामध्ये भारतीय वायुसेनेची सर्व आधुनिक लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर सहभागी होतील.  


 धार्मिक स्थळांचा सध्याचा दर्जा कायम ठेवण्याच्या  आव्हान देणाऱ्या याचिकांवर  सुनावणी 


सर्व धार्मिक स्थळांचा सध्याचा दर्जा कायम ठेवण्याच्या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या याचिकांमध्ये असे म्हटले आहे की 1991 चा प्रार्थनास्थळ कायदा 15 ऑगस्ट 1947 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांचा दर्जा कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो. ते हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन समाजाच्या विरोधात आहे. त्यामुळे ज्या पवित्र स्थळांवर परकीय आक्रमकांनी बळजबरीने मशीद बांधली होती, त्या ठिकाणांवर तो हक्क सांगू शकला नाही. यावर केंद्र सरकारने उत्तर द्यावे. 


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून  14 ऑक्टोबरपर्यंत आसाम आणि त्रिपुराच्या दौऱ्यावर


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 14 ऑक्टोबर या कालावधीत त्रिपुरा आणि आसामला भेट देणार आहेत. राष्ट्रपती मुर्मू आज आगरतळा येथील नरसिंगगड येथे त्रिपुरा राज्य न्यायिक अकादमीचे उद्घाटन करतील आणि त्रिपुरा राष्ट्रीय कायदा विद्यापीठाची पायाभरणी करतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.