मुंबई : रेल्वेने दादरचे 80 वर्षे जुने हनुमानाचे मंदिर (Hanuman Mandir) पाडण्यासाठी नोटीस बजावली होती. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर हल्लाबोल केला. 'एक है तो सेफ है म्हणतात, पण मंदिरही सेफ नाहीत', अशी टीका त्यांनी केली होती. तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आज हनुमान मंदिरात महाआरती करायला जाणार आहेत. मात्र त्याआधीच मंदिराला मिळालेल्या नोटीसीला रेल्वेकडून स्थगिती देण्यात आली आहे. आता यावरून आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र डागले.
आदित्य ठाकरे म्हणाले की, काल उद्धव ठाकरे यांनी भाजपाचं नकली हिंदुत्व एक्स्पोज केले. आणि आज रेल्वेने मंदिर पडण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. काही भाजपचे लोक तिथे नाटक करत आहेत. आम्ही 5.30 वाजता तिथे जाणार आहोत. भाजपचं नकली हिंदुत्व आहे. फक्त निवडणुकीसाठी हिंदुत्व वापरलं जात आहे. भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात आली आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
आता तरी भाजपला जाग आली
तर मुंबईत रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे सुरू असून ही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला. या कामांच्या दर्जाची तपासणी करावी व निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावरून आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटलंय की, रस्त्याचा घोटाळा आम्ही समोर आणला. त्यानंतर पालिकेला मान्य करावं लागलं की अॅडव्हान्स मोबिलिटीची गरज नाही. दीपक केसरकर घोटाळा करत आहे की नाही, हे मला माहीत नाही. पण अद्याप शाळेतील मुलांना गणवेश मिळाला नाही. मुंबईतील भाजपवाले बोलत आहे की, रस्त्यासाठी SIT लावा आणि चौकशी करा. आता तरी भाजपला जाग आली आहे. एसआयटीपेक्षा आर्थिक गुन्हे शाखेची चौकशी लावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
शिंदे, केसरकरांना सरकारमधून बाहेर बसवा
आमदार आणि पत्रकारांना देखील त्यात बसवा. आम्ही बोलत होतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातून रस्त्याचे उद्घाटन करू नका, त्यांचा अपमान होईल. पण यांनी ऐकले नाही. एकनाथ शिंदे यांनी घाईगडबडीत उद्घाटन केले. आता पालिकेची बातमी आली आहे की, कचऱ्यासाठी पैसे घ्यायचे. मुंबईचा कचरा 10 हजारावरून आपण साडेसहा हजार मेट्रिक टनवर आणला. आता भाजपचे सरकार आले, त्यानंतर एकदम पालिकेला जाग आली आहे. मुंबईत अनेक जागांवर कचऱ्याचे ढिगारे आहेत. मग त्याचे पैसे आम्हाला देणार का? मुंबईला अदानीच्या घशात घातले आहे. देवेंद्र फडणवीसांना आता मौका आहे की, साफ सरकार चालवायचं असेल तर एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना सरकारमधून बाहेर बसवावे. त्यांची चौकशी करा, आम्ही मान्य करू की तुमचे वाशिंग मशीनचे सरकार नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
आणखी वाचा
Kirit Somaiya: 'आम्ही उद्धव ठाकरेची सेना नाही, ज्याने बापाचं नाव बुडवलं'; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल