Delhi Farmer Protest : दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चात आता परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. सुमारे अर्धा तास पोलिसांशी वाद झाल्यानंतर शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचा आणि पाण्याच्या तोफांचा वापर केला. तर 9 शेतकरी जखमी झाले आहेत. हरियाणा-पंजाबच्या शंभू सीमेवरून 101 शेतकरी दुपारी 12 वाजता दिल्लीला रवाना झाले. घग्गर नदीवर बांधलेल्या पुलावर पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत.






शेतकऱ्यांवर घग्गर नदीमधील दुर्गंधीयुक्त पाण्याचा मारा


पोलिस रॉकेट लाँचरमधून बॉम्ब आणि गोळ्या झाडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. घग्गर नदीचे दुर्गंधीयुक्त पाणी वापरले जात आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने अंबाला जिल्ह्यातील 12 गावांमधील इंटरनेट बंदी 18 सेंबरपर्यंत वाढवली आहे.






खनौरी सीमेवर सलग 19व्या दिवशी युनायटेड किसान मोर्चा (गैर-राजकीय) नेते जगजीत डल्लेवाल आमरण उपोषणाला बसले आहेत. शेतकरी नेते सर्वन पंढेर म्हणाले की, डल्लेवाल यांच्या प्रकृतीबद्दल संपूर्ण देश चिंतेत आहे, पण देशाच्या पंतप्रधानांना नाही.






केमिकल पाण्याचा फवारा 


पोलिसांनी शेतकऱ्यांवर रासायनिक पाण्याचा फवारा केल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला. पाण्याचा मारा करायचा होता, तर निदान शुद्ध पाणी तरी मारा, अशी टीकाही त्यांनी केली. पोलिसांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आणि देशातील शेतकऱ्यांवर घाण पाण्याचा मारा सुरु केल्याचे ते म्हणाले. हरियाणा पोलिसांनी शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या असून यावेळी एक शेतकरी जखमी झाला. त्याला स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेण्यात आले.


इतर महत्वाच्या बातम्या