Maharashtra News Updates: अलिबागच्या तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात, तहसीलदार मीनल दळवी लाच घेताना ताब्यात
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
जितेंद्र आव्हाड यांचा ज्या ठिकाणी मुक्काम आहे. त्या वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून बसण्यासाठी गाद्या आणून ठिय्या मांडत आंदोलन सुरु आहे
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम फोफावत असताना त्यास संरक्षण देणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्या अर्थपूर्ण संबंधांवर नेहमीच टीका होत असताना भिवंडी महानगरपालिकेच्या बिट निरीक्षकास अनधिकृत बांधकामास संरक्षण देण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी केल्या प्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत एकास अटक केली आहे .रमाकांत म्हात्रे असे अटक पालिका प्रभाग समिती क्रमांक तीनच्या बिट निरीक्षकाचे नाव आहे.एका अनधिकृत बांधकामास संरक्षण देण्यासाठी प्रत्येक स्लॅब नुसार पन्नास हजार रुपयांची मागणी बिट निरीक्षक रमाकांत म्हात्रे यांनी 13 ऑक्टोबर रोजी केली होती व सदर रक्कम त्रयस्थ व्यक्ती कडून स्वीकारण्याचे मान्य केले होते .या बाबत फिर्यादी यांनी ठाणे लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली असता तक्रारीची शहानिशा करीत बुधवारी सायंकाळी भिवंडी महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक 3 कार्यालयात कारवाई करीत रमाकांत म्हात्रे यास ताब्यात घेत अटक केली आहे .लाचलुचपत विभागाच्या या कारवाईने भिवंडी महानगरपालिकेतील अनधिकृत बांधकामास संरक्षण देणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यात खळबळ माजली आहे हे नकी.
राज्यातील साखर कारखान्यांना ऊस तोडणी आणि वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना किती पैसै मोजायचे आहेत याचे दरपत्रक साखर आयुक्तांकडून जाहीर करण्यात आलय. यापेक्षा अधिक पैसे घेणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. राज्यातील सहकारी आणि खाजगी साखर कारखाने शेतकऱ्यांचा उस त्यांच्या शेतात ऊसतोड कामगार पाठवून गाळपासाठी घेऊन जतात. त्यासाठी येणारा खर्च शेतकऱ्यांच्या उसाच्या बीलातुन वजा केले जातात. मात्र साखर कारखाने तोडणी आणि वाहतुकीसाठी येणारा खर्च वाढवून दाखवतात असा शेतकरी संघटनांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्यातील 200 साखर कारखान्यांचे प्रती मेट्रिक टन उसाचे तोडणी आणि वाहतुकीचे दरपत्रक जाहीर केलय. या दरपत्रकात नमुद करण्यात आलेली रक्कमच कारखाने शेतकऱ्यांच्या बीलातुन वजा करू शकणार आहेत. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना स्वतः उस तोडून साखर कारखान्यापर्यंत पोहचवायचा असेल तर त्यांना तशी मुभा देण्यात आलीय.
बीड जिल्ह्यातील दीड हजार प्राथमिक शिक्षकांच्या होणार बदल्या
बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षक संवर्गातील बदली प्रक्रिया अंतर्गत पात्र असलेल्या 1 हजार 573 शिक्षकांच्या याद्या जाहीर केल्या असून लवकरच जिल्हा अंतर्गत बदली बाबतची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे..
बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अंतर्गत सलग सेवा दहा वर्ष व सध्या कार्यरत असलेल्या शाळांवर पाच वर्षे पूर्ण झालेले आहे अशे 1 हजार 573 शिक्षक जिल्हा अंतर्गत बदलीसाठी प्राप्त ठरले आहेत.
अलिबाग येथील तहसीलदार लाचलुचपतच्या जाळ्यात...
तहसीलदार मीनल दळवी यांना लाच घेताना ताब्यात..
सुमारे दोन लाख रुपयांची लाच घेताना पकडले ...
गोंधळपाडा येथील घरी लाच घेताना कारवाई...
नवी मुंबई लाचलुचपत विभागाची कारवाई..
अल्पवयीन मुलीचा विवाह तिच्या प्रियकराशी लावून दिल्याप्रकरणी पोलिसांनी आई व प्रियकराविरोधात बलात्कार आणि बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. हा सगळा प्रकार वडगाव शेरी भागात घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब वडगाव शेरी भागात वास्तव्यास आहे. पिडीत मुलीची आईचे संबंध एका व्यक्तीशी होते आणि तिने तिच्या मुलीला "हेच तुझे वडील आहेत" असे सांगितले मात्र काही दिवसांनंतर आईनेच मुलीला "तुला या व्यक्तीशी लग्न करावे लागेल नाहीतर मी जीव देईन" अशी धमकी दिली आणि त्यानंतर पीडित मुलीला आरोपिशी लग्न करण्यास भाग पाडले. यानंतर आरोपीने अनेक वेळा या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.
रवींद्र नाट्य मंदिरात हा ऐतिहासिक क्षण आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झाले. आज मी शिंदे साहेबांसोबत जात आहे. गेले अडीच वर्षाचे महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे सरकार ठाकरेंचे होते पण चालवत पवार होते.
प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक प्रशासन शिवसैनिकांना जुमानत नव्हते. मी ज्येष्ठ असून देखील विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांना मोठी पद दिली. अखेर सर्वांनी बोलून एकनाथ शिंदे सोबत जाण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरेंचा काँग्रेससोबतचा पुढचा प्रवास खडतर आहे त्यामुळे शिवसैनिकांनी उठाव करणं गरजेचं आहे. उद्धवजींनी चुकीच्या माणसांना बाजूला घेतलं. त्यामुळे आज मीही बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आलो आहे.
पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयातील पालकांच्या गटाची सहल रायगड येथे गेली होती. सहलीतून परत येताना त्यातील एका बसला अपघात झाला. त्या बसमध्ये 25 महिला दोन पुरुष आणि पाच मुले होती. दोन जणांना थोडी अधिक दुखापत झाली असून, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. बाकी सर्वजण सुखरूप आहेत. कोणत्याही मुलाला काहीही इजा झालेली नाही.
पुण्यात हडपसर जवळ दोन पीएमटी बसचा अपघात झाला आहे. हडपसर परिसरातील गाडीतळ जवळ दोन पीएमपी बस एकमेकांना घासल्या गेल्या. बस मध्ये प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
वाघोलीकडे जाणारी बस सिग्नलला थांबली असता ही घटना घडली. या अपघातात दोन्ही बसच्या काचा फुटल्या असुन इतर कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार गजानन किर्तीकर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी दाखल झालेत. दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे.
हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पडल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांना वर्तक नगर पोलीस ठाण्यात अटक झाल्यानंतर या प्रकरणी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी कायद्यात हातात कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणाला नाही अशी प्रतिक्रिया दिली याबाबत बोलताना शंभूराजे देसाई यांनी मला यामधील कल्पना नाही परंतु जर एखादा गुन्हा घडला असेल एखादा गुन्हा दाखल झाला असेल तर पोलिसांनी नियमप्रमाणे त्यांचं काम केलं असेल कुठल्याही बळाचा वापर राजकीय केला जात नाही.पुढे बोलताना शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक ठिकाणी कोणी जाईल दंगा करेल.. एखाद्या सिनेमा बघणाऱ्या लोकांवर...हात उचलेल दादागिरी दमदाटी करेल.. कायदा हातात घेण्याचा कोणाला अधिकार नाही कायद्याचे रक्षण करण्याचे काम सामान्य जनतेचे रक्षण करण्याचा काम पोलीस करत असतात.. त्याचाच एक भाग म्हणून त्यांच्यावर कदाचित कारवाई झाली असेल
म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे वरळी बीडीडी चाळीतील इमारत क्रमांक ३२, ३३, ३९,४० व सावली इमारतीमधील ३२२ पात्र गाळेधारकांना पुनर्विकासाअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुनर्विकास इमारतीमध्ये यादृच्छिक (Randomised Allotment Tenement) पद्धतीने संगणकीय प्रणालीद्वारे सदनिकांचा क्रमांक निश्चितीचा कार्यक्रम सोमवार, दि. १४ नोव्हेंबर, २०२२ रोजी दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रम वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील गुलझारीलाल नंदा सभागृहात होणार आहे. सदनिका निश्चितीच्या कार्यक्रमासाठी उच्च स्तरीय देखरेख समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीच्या उपस्थितीमध्ये पात्र गाळेधारकांकरिता सदनिका क्रमांक निश्चितीसाठी सोडत काढण्यात येणार आहे. या सदनिका निश्चितीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी संबंधित चाळींमधील प्रथम येणाऱ्या ५ सदस्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहू इच्छिणाऱ्या गाळेधारकांनी संबंधित चाळीमधील गाळेधारक असल्याबाबत पुरावा सादर करणे आवश्यक आहे, असे आवाहन मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे करण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना उद्या कोर्टात हजर केलं जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे त्यांची आजची रात्र तुरूंगात जाण्याची शक्यता आहे.
Sanjay Raut Majha Katta Live : महाराष्ट्राचं नुकसान आपापसांतल्या भांडणामुळे होतंय. त्याला जबाबदार आपण सगळे आहोत. हे 40 लोक जे सोडून गेले आहेत. त्यांनी जर शांतपणे विचार केला असता की आपण काय करतो आहोत. शिवसेना ही निर्भय लोकांची संघटना आहे. काही लोकांना वाटलं असेल हा भार सहन करता येणार नाही. असे लोक गेले. पण महाराष्ट्राचं नुकसान होत असेल तर त्यासाठी आपण कायम एकत्र राहिले पाहिजे.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक केल्यानंतर आता या प्रकरणामध्ये अभिनेत्री केतकी चितळेने उडी घेतली आहे. केतकी चितळेच्या वतीने वर्तक नगर पोलिस ठाण्याला एक नोटीस पाठवण्यात आली आहे.
आव्हाड यांच्यावर लावण्यात आलेले गुन्हे पुरेसे नसून अजून कलमे त्यात लालावी अशी मागणी, केतकी चितळे हिने नोटीसीमधून केली आहे.
मारहाण झालेल्या तरुणाच्या पत्नीला देखील मारहाण झाल्याने कलम 354 लावावे आणि प्लॅनिंग करून सर्व केल्याने कलम 120 ब लावावे, अशी मागणी केतकीने केली आहे. वर्तक नगर पोलिसांनी हे केले नाही तर केतकी हाय कोर्टात जाणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद केली आहे.
जितेंद्र आव्हाड प्रकरणात केतकी चितळेंची उडी
केतकी चितळे यांच्या वतीने वर्तक नगर पोलीस स्टेशनला एक नोटीस
आव्हाड यांच्यावर लावण्यात आलेले गुन्हे पुरेसे नसून अजून कलमे त्यात लालावी अशी मागणी
मारहाण झालेल्या तरुणाच्या पत्नीला देखील मारहाण झाल्याने कलम 354 लावावे आणि प्लॅनिंग करून सर्व केल्याने कलम 120 ब लावावे, अशी मागणी
जर वर्तक नगर पोलिसांनी हे केले नाही तर केतकी हाय कोर्टात जाणार असल्याचे नोटीस मध्ये नमूद
Sanjay Raut Majha Katta Live : तुरुंगात असताना बाहेर रोजच युद्धाचा प्रसंग सुरु होता. मी गजाला घट्ट हात पकडून स्वत:ला शांत करत होतो. की मी बाहेर पाहिजे होतो आता. कुठेतरी माझेही रक्ताचे दोन थेंब सांडायला हवे होते असं सारखं मला वाटत होतं.
Sanjay Raut Majha Katta Live : शेवटच्या दिवशी तुरुंगातून बाहेर पडताना मला जेलच्या अधिकाऱ्याने पैसे दिले. मी तीन महिने पैसेच पाहिले नव्हते. हे पैसे म्हणे माझी कमाई आहे. आतमध्ये जगण्यासाठी घरून एक मनिऑर्डर पाठवली जाते. त्याचे राहिलेले पैसे आहेत. माझा जो तुरुंगात राहण्याचा, खाण्याचा, पाण्याचा खर्च तरीही त्यातून वाचलेले हे पैसे आहेत.
सांगली : जितेंद्र आव्हाड यांना मुद्दामहून अटक करण्यात आली आहे. सरकारने त्यांचं काम करावं, मात्र महाराष्ट्रातील जनता आवाडे यांच्या मताशी सहमत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड महाराष्ट्र कधीही खपवून घेणार नाही. सरकारने यात हस्तक्षेप करायला हवा होता, सरकारने हा चित्रपट दाखवून देऊ नये असं सांगायला हवं होतं. याउलट हा चित्रपट दाखवण्यासाठी समर्थन करणारे काहीजण पुढे येऊ लागलेत असं मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
"असा इतिहास का दाखवता? हे सरकारने चित्रपट निर्मात्यांना विचारायला हवं होतं. मात्र आज आवाडांना केलेल्या अटकेवरून सरकार या चुकीच्या चित्रपटाशी सहमत आहे असं दिसतंय. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर त्यांची भूमिका आणि मत बदलतील असं नाही. संजय राऊत आपल्या मतावर ठाम असणारे गृहस्थ आहेत, त्यामुळे ते आपली भूमिका बदलती असं वाटत नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
Sanjay Raut Majha Katta Live : माझ्या आयुष्यात मी कधीच आर्थिक गैरव्यवहार केलेला नाही. मी साधारण मध्यमवर्गीय नोकरी करणारा माणूस आहे. मला ज्या प्रकरणात अटक केली ते प्रकरणच मला माहित नाही. त्या प्रकरणाविषयी मला माहित नाही. पत्राचाळ कुठे आहे, हे मला माहित नाही. एखाद्याशी संबंध असणं, नातं असणे म्हणजे गुन्हा असू शकत नाही. पण कुठेतरी विषय जोडायचा आणि त्याला आत टाकायचं, असे दिल्लीकरांचं सुरु आहे. कधी ना कधी या प्रवृत्तीचा अंत आहे, असे संजय राऊत म्हणाले. यावेळी ते माझा कट्ट्यावर बोलत होते.
Sanjay Raut Majha Katta Live : कुणावरही तुरुंगात जाण्याची वेळ येऊ नये, अनेक चांगले उद्योगपती आतमध्ये आहेत. ज्यांच्याबद्दल आदर आहे, तेही लोक तुरुंगात आहेत. ते आतमध्ये जायला नकोत. मी तुरुंगात गेलो, लढलो बाहेर आलो. म्हणजे लढाई संपली नाही. कारण देशातील वातवारण असे आहे की, आपला राजकीय शत्रू हा देशाचा शत्रू आहे असं म्हणून कारवाई करायची अन् त्याला कायमचं संपवायचं. तो माझ्याविरुद्ध बोलतो, लिहितो, आंदोलन करतो.. म्हणून तो माझा दुश्मन नाही, देशाचा दुश्मन आहे. असं म्हणून तो संपला पाहिजे. या देशांमध्ये असं वातावरण कधीच नव्हतं. ब्रिटिशांबद्दलही लोक बोलत होते, पण त्यांच्यावर अशा कारवाया झाल्याच नाहीत.
Sanjay Raut Majha Katta Live : एक वर्ष तुरुंगाबाहेर येणार नाही असं वाटलं होतं. काही जण दोन दोन वर्ष तुरुंगात आहेत. अनिल देशमुख दीड वर्षांपासून तुरुंगात आहेत. अनेकांचा दोष नसताना तुरुंगात आहेत. विशेष कायद्याचा सरकारकडून गैरफायदा घेतला जात आहे. राजकीय गैरवापरातून अनेकजण तुरुंगात आहेत. ब्रिटिशांच्या काळातही असे कायदे नव्हते. मी जेव्हा तुरुंगात होतो, तेव्हा विचार करत होतो. तुरुंगातील एक एक तास 100 दिवसांसारखा होता. लोकमान्य टिळक, सावरकर इतके दिवस कसे तुरुंगात राहिले असतील, याचा मी विचार करत होतो.
Sanjay Raut Majha Katta Live : तुरुंगात गेलो, मी रडत बसलो नाही. मला तुरुंगात का टाकताय? असं म्हटलं नाही. तुरुंगात गेल्यानंतर मरणार आहे? असे कधीही वाटलं नाही. तुरुंगात कधीही कोणतीही सुविधा घेतली नाही. पण तुरुंग हा तुरुंग असतो. तुरुंगात सगल 100 दिवस काढले. आर्थर रोड तुरुंगाबाहेर एक स्तंभ आहे, पण तो खराब झाला आहे. तो स्तंभ दुरुस्त करावा, असं मी तुरुंग अधिक्षकांना सांगितलं. तो स्तंभ कशासाठी आहे? तुरुंगात आलेले काही स्वातंत्र्य लढ्यातील लोक आले होते, त्यांच्या स्मरणार्थ हा स्तंभ आहे. पण या स्तंभाबाबत कुणाच्या लक्षात येत नाही. स्वातंत्र्य लढ्यानंतर अनेक लढाया झाल्या. त्यासुद्धा आपल्याला सत्य, स्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी तुरुंगात जावं लागतं, त्याची तयारी ठेवायला हवी. तुरुंग हे अनुभव घेण्याचं शिकण्याचं आणि बाहेरच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं व्यासपीठ आहे.
Sanjay Raut Majha Katta Live :100 दिवसानंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. ज्या शिवसेनेत माझा जन्म झाला, त्या शिवसेनेचं नाव बदललं गेलं. ज्या शिवसेनेसाठी मी 40 वर्ष दिले, त्या शिवसेनेचं नाव चोरलं गेलं. ज्या धनुष्यबाणासाठी रस्त्यावर लढलो, ते राहिलं नाही. तुरुंगात असताना हे सर्व पाहत होतो. त्यावेळी तुरुंगाच्या गजावर हात ठेवत मी अस्वस्थ होत होतो.
Sanjay Raut Majha Katta Live : जगभरात लिहिणारे-बोलणारे जे होते त्यांना तुरुंगात टाकलं गेलं. भारतातील लोकशाही मोठी आहे या देशात असं होता कामा नये. असं संजय राऊत माझा कट्ट्यावर बोलताना म्हणाले.
Sanjay Raut Majha Katta Live : मी सामान्य माणूस आहे. तुरुंगातला एक तास माझ्यासाठी 100 दिवसांसारखा होता असं संजय राऊत यांनी माझा कट्ट्यावर बोलताना सांगितलं.
यवतमाळ : यवतमाळच्या पाटन ते बोरी मार्गावरील अहेरअल्ली गावाजवळील रेल्वे बोगद्यात बस आणि दुचाकीचा अपघात झालाय. यात धानोरा येथील रामदास तुडमवार ( वय 50 ) यांचा जागीच मृत्यू झालाय.
धानोरा येथील रामदास तुडमवार हे काही कामानिमित्त आपल्या दुचाकीने आदिलाबाद येथे जात असताना समोरून येणाऱ्या मानव विकास मिशनच्या बसने पाटन बोरी मार्गावरील अहेरअल्ली गावाजवळील रेल्वे बोगद्यात दुचाकीला जोरदार धडक दिली. यात रामदास तुडुमवार हे खाली पडले. डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना ऑटोमधून उपचारासाी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
अनिल देशमुखांच्या जामीनावर सोमवारी हायकोर्टात पुन्हा सुनावणी
देशमुखांचे वकील अनिकेत निकम यांनी प्रकरण तातडीनं न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यापुढे सुनावणीसाठी सादर केलं
तेव्हा न्यायमूर्ती शिंदे यांनी त्यांना हे प्रकरण सोमवारी पुन्हा सादर करण्याची मुभा दिली
अब्दुल सत्तार यांना दीपक केसकर यांनी मतिमंद शाळेच्या मास्तराकडून कसं बोलायचे याच प्रशिक्षण द्यावं, अशी मागणी काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्या पदयात्रे संबंधी गोरंट्याल यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात सत्तार यांच्यावर प्रश्न केला असता गोरंट्याल यांनी सत्तार यांच्यावर टीका केलीय.
थोड्याच वेळात जितेंद्र आव्हाड यांना ठाणे कोर्टात हजर केलं जाणार आहे. आजच सुनावणी झाली तर जामिन मिळण्याची शक्यता आहे. अन्यता आव्हाडांना सोमवारपर्यंत वर्तक नगर पोलीस स्टेशन मध्येच मुक्काम करावा लागेल.
भिवंडी शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यात भिवंडी गुन्हे शाखेस आतापर्यंत चांगले यश आले आहे. भिवंडी गुन्हे शाखेने शिताफीने तपास करून नारपोली पोलीस ठाण्यातर्गत चोरीच्या गुन्ह्यातील चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.सुहेल शाहआलम शेख (२२ रा.गौरीपाडा,आजमीनगर),आकीब मकबुल खान (१९ रा.गायत्रीनगर),मोहम्मद सपाद अब्दुल हमीद अन्सारी (१९ रा.शांतीनगर),सुफियान अलीहसन खान (२१ मूळ रा.उत्तरप्रदेश) अशी ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेल्या सराईत चोरट्यांची नावे आहेत.चोरट्यांकडून १७ लाख ८४ हजार १६० रुपये किमतीचे डेल कंपनीचे २६ लॅपटॉप हस्तगत करण्यात आले आहेत.चोरट्यांनी दापोडे येथील कृष्णा कंपाउंडमधील गोदामातून घरफोडी करून सदर लॅपटॉपची चोरी केली होती.याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात भादवि कलम ४५४,४५७,३८० न्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड करीत असताना त्यांनी गुप्त बातमीदारामार्फत गोपनीय माहितीच्या आधारे सुहेल शेख यास पोलीस पथकासह सापळा रचून ताब्यात घेऊन अटक केली आहे.त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्या अन्य तीन साथीदारांचा शोध घेऊन चौघांना अटक करण्यात आली आहे .
Bhandara News : उद्या भंडारा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत असल्याने त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आंदोलकांचा पेंडाल मध्यरात्री काढून फेकला. याचा निषेध नोंदविण्यासाठी आज जय जवान जय किसान संघटनेने भंडारा येथील खाम तलाव चौकात निदर्शने केले. यावेळी प्रशासन, आमदार आणि खासदार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यामुळे काही काळ रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. भंडारा पोलिसांनी सतर्कता बाळगून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राड्याचं प्रकरण, नितेश राणेंचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारची हायकोर्टात याचिका, सुनावणी 28 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. जामिनातील अटीशर्तींचा भंग केल्याचा आरोप.
Radhakrishna Vikhe Patil : राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात आज शेतक-यांनी तहसील कार्यालयावर बि-हाड मोर्चा काढला. मोर्चात राष्ट्रवादी, काँग्रेससह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना शासकीय मदत तसेच पिकविमा मिळावा ही मागणी घेऊन आंदोलक राहता तहसिल कार्यालयावर धडकले. पोलिसांनी आंदोलकांना कार्यालयात येण्यास मज्जाव केल्याने काही काळ तणावही निर्माण झाला होता. सरकारने पिकविमा घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केल्याने शेतकऱ्यांनी हजारो रूपये पिक विम्यासाठी खर्च केले. मात्र, आता सरकार आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
Belagavi News : संत कनकदास यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीच्या अग्रभागी संत कनकदास यांची ट्रॅक्टरवर ठेवण्यात आलेली भव्य प्रतिमा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. संत कनकदास यांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित देखावा देखील काही चित्ररथावर साकारण्यात आला होता. महिला आणि पुरुष हळदी रंगाचे फेटे परिधान करून मिरवणुकीत संत कनकदास यांचा जयघोष करत सहभागी झाले होते. कर्नाटकातील विविध भागातून आलेली कला पथके, धनगरी ढोल पथक देखील मिरवणुकीत सहभागी झाले होते. कुमार गंधर्व मंदिर येथे मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणुकीत राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, आमदार अभय पाटील, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, पोलिस उपायुक्त रवींद्र गडादी, कन्नड आणि संस्कृती खात्याच्या उपसंचालक विद्यावती बजंत्री यांच्यासह शेकडो जण मिरवणुकीत सहभागी झाले होते.
Mumbai Seat Belt : मुंबई वाहतूक पोलिसांनी चारचाकी वाहनांमध्ये चालक व सर्व प्रवाशांसाठी सीटबेल्टची कारवाई पुन्हा पुढे ढकलली आहे. वाहतूक पोलिसांनी 1 नोव्हेंबरपासून कारवाई करण्याचे जाहीर केले होते. परंतु वाहनधारकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही कारवाई 11 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. परंतु आता अनेक टॅक्सी चालक युनियनने विनंती केली आहे की ते अद्याप सीट बेल्ट लावण्यासाठी तयार नाहीत. वाहतूक पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की ते आता जनजागृती करत आहेत. ही कारवाई पुढचा आठवड्यात सुरू होणार पण आजून तारीख ठरवली नाही.
Mumbai News: मुंबईत 13 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या तीस दिवसांच्या काळात शहरात ड्रोन, रिमोट कंट्रोलने उडवीता येणारी हलकी विमाने, पॅराग्लायडर्स यांच्यावर प्रतिबंध घातले गेले आहेत.या शिवाय खासगी हेलीकॉप्टर्स, गरम हवेचे फुगे उडविण्यावर सुद्धा बंदी घातली गेली आहे.मुंबई पोलिसांनी यावेळी वरील वस्तूंचा वापर करून मुंबईवर आकाशातून दहशतवादी हल्ला चढविला जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबई पोलिसांनी सीआरपीसीच्या कलम 144 नुसार हे आदेश जारी केले असून आदेशाचे उल्लंघन केल्यास शिक्षा होऊ शकणार आहे.
Sangola News: परतीच्या पावसाने सांगोला तालुक्याचे मोठे नुकसान झाले असताना सध्या माण नदीवरील वाटंबरे बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत . सांगोला हा कायम दुष्काळी तालुका असून येथील नद्या नेहमीच कोरड्या असतात . यंदा चांगला पाऊस झाल्याने माण नदीवरील बंधारे भरलेले आहेत . त्यामुळे हिवाळा आणि उन्हाळ्यात पिकाच्या पाण्याची सोय झाल्याने शेतकरी चिंतामुक्त होते . मात्र आता वाटंबरे येथील बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू झाल्याने शेतकऱ्यांना काळजी वाढली आहे . सांगोला येथील आमदर शहाजीबापू पाटील यांनी तातडीने पाटबंधारे विभागाला आदेश देऊन गळती बंद करण्याची मागणी होऊ लागली आहे .
Pune Pollution : महाराष्ट्रात सर्वात शुद्ध हवा पुणे शहरात आहे. एअर क्वॉलिटी इंडेक्स व्हॅल्यू फक्त 43 आहे, मुंबईचा एअर क्वॉलिटी इंडेक्य व्हॅल्यू 179 आहे, सेंट्रल पोल्यूशन कंट्रोल बोर्डाच्या संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे
Bharat Jodo Nanded Accident : भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या दोन जणांना आयशर टेम्पोने धडक दिली..या धडकेत एक ठार तर एकजण गंभीर जखमी झालाय काल रात्री ही घटना नांदेड - अकोला महामार्गावरील अर्धापूर तालुक्यातील महादेव पिंपळगाव जवळ घडलीय.....राहुल गांधी यांची सभा संपल्यानंतर पिंपळगाव कडे जात असताना हा अपघात झाला.. तामिळनाडू राज्यातील 62 वर्षीय गणेशन असं अपघातात मृत्यू झाला तर सोबतचा सायलू हा गंभीर जखमी झाला होता. अपघाताची माहिती मिळताच कांग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी जखमीला जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन भेट घेतली
Ratnagiri News :खेडमधील शेलारवाडी वाकी धरणाला गळती चिपळूणमधील तिवरे धरण दुर्घटनेनंतर कोकणातील धरणांच्या सुरक्षिततेविषयी चर्चा सुरु झाल्या.जिल्ह्यात पूर्ण असलेल्या धरण प्रकल्पांमधील निम्मी धरणे नादुरुस्त आणि गळकी असून आता यामध्ये आणखी एका धरणाची भर पडली आहे, जिल्ह्यातल्या खेडमधील माणी येथील शेलारवाडी-वाकी प्रकल्पाला गळती लागली आहे.धरणाच्या बंधाऱ्याची मुख्य भिंतीलाही गळती लागली असून पाटबंधारे विभागाने हे धरण फुटू नये,म्हणून मर्यादित पाणी साठा करायला सुरुवात केली आहे.या धरणाची पाणी साठवण उंचीची क्षमता 84 तालांक असून आता प्रत्यक्षात या धरणात ७० तालांकाच्या वर धरण फुटीच्या भीतीने पाणी साठवले जात नसल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या खामला चौकातील जनसंपर्क कार्यालयामध्ये पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आज विदर्भवादी नेत्यांनी गडकरी यांच्या कार्यालयाला घेराव घालण्याची घोषणा केली मात्र पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्न बघता ही सुरक्षा वाढवण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Beed : बीडच्या माजलगावमध्ये दीड महिन्याच्या बाळाला एका खाजगी डॉक्टराने मुदतबाह्य डोस पाजल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोग्य विभागाकडे तक्रार करण्यात आलीय. माजलगाव शहरातील पवार हॉस्पिटलमध्ये दीड महिन्याच्या बाळाला आजी आजोबा डोस देण्यासाठी घेऊन गेले होते, डोस दिल्यानंतर त्याच्यावरील तारीख ही मुदत संपलेली होती त्यामुळे मुदतबाह्य डोस दिल्याने डॉक्टर शरद पवार यांच्या विरोधात आरोग्य विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे..
Anil Deshmukh: सीबीआयच्या प्रकरणात दाखल जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात तातडीच्या सुनावणीसाठी अनिल देशमुखांकडून विनंती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी याप्रकरणात तात्काळ सुनावणी का हवी? असा सवाल देशमुखांच्या वकिलांना विचारला. त्यावर वकीलांनी हायकोर्टात देशमुखांचं वाढत वय आणि खालावलेली तब्येत याचा दाखला दिला. त्याशिवाय, ईडीच्या प्रकरणात त्यांना जामीन देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. देशमुखांच्या जामीनावर सुनावणी कधीपासून सुरू होणार हे आज निश्चित होण्याची शक्यता आहे.
Nandurbar News : शहादा औरंगपूर रस्त्यावर मार्केटिंग करणाऱ्या वाहनाला अडवून त्यावरील कर्मचाऱ्यांकडून चाकू आणि हत्यारांचा धाक दाखवत रस्ता लूट करण्यात आली होती. या प्रकरणी शहादा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनास्थळाला भेट दिली होती. रस्ता लुटीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शहादा पोलिस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा यांनी संयुक्त पणे या गुन्ह्याचा तपास सुरु केला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार वाहनांवरील चालक या गुन्ह्यात सहभागी असल्याच्या लक्षात आलं. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोंडाईचा येथील सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा उघड केला. या टोळीने किती गुन्हे केले आहेत ते तपासात उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या या कारवाईने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात कापूस चोरीच्या घटना वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कधी घरातून तर कधी थेट शेतातून कापूस चोरला जात आहे. त्यामुळे ऐन थंडीत रात्रीच्या वेळी कापसाची राखण करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सध्या कापसाला चांगला भाव मिळत असल्याने चोरटे थेट शेतातून कापूस वेचून नेत आहेत, तर श्रीगोंदा तालुक्यातील म्हातारपिंपरी येथे घर फोडून कापसाची चोरी झाल्याची घटना समोर आली होती. यातील अट्टल गुन्हेगाराला श्रीगोंदा पोलिसांनी सापळा रचून बाजार समितीत शिताफीने जेरबंद केलं. रवींद्र भोसले असं अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी दीड क्विंटल कापूस, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल यासह एक लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. कोपरगाव तालुक्यात देखील कापूस चोरीची घटना घडली होती. बळीराजाच्या पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांचा डोळा असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्याला डोळा लागत नाही.
Vasai News: वसई पश्चिमेच्या वसंत मंदिर या परिसरात एका महिलेचा मृतदेह घरामध्ये सापडलेला आहे. काल सायंकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना समोर आलेली आहे.ममता भट असं या मृत महिलेचं नाव आहे. ममता यांचा मृत्यू नेमकं कशामुळे झाला हे कळू शकलेलं नाही. घरातल्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार घरामधील फरीशवर पाणी साडलं होतं. पाय घसरून ती पडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
Maharashtra Kustigir Parishad : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अधिकारावरून दोन गटात वाद सुरु आहे. बाळासाहेब लांडगे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणी बरखास्त करण्याचा भारतीय कुस्तीगीर महासंघाचा निर्णय बेकायदेशीर असल्याचं न्यायालयानं म्हटल्याचा दावा लांगडे यांनी केलाय. त्यामुळे 20 ते 24 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र केसरी स्पर्धा आपणच भरवू असं त्यांनी जाहीर केलंय. तर रामदास तडस यांच्या नेतृत्वाखालील संघटनेनंही त्यांचीच कार्यकारिणी स्पर्धा भरवेल असं म्हटलंय. या पार्श्वभूमीवर आज दोन्ही गटांनी पत्रकार परिषदेचं आवाहन केलंय.
Nashik News: नाशिक औरंगाबाद महामार्गावर चांदोरी गावाजवळ गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी होऊन रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडला होता. स्थानिक नागरिक आणि रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी बिबट्याला बघण्यासाठी गर्दी केली होती. निपचित पडल्याने तो जिवंत आहे की नाही हे लक्षात येत नव्हते, नागरिकांनी बिबट्यावर पाणी ओतले असता तो शुद्धीवर आला आणि जवळीलच एका द्राक्षबागेत त्याने धूम ठोकली. काही वेळातच वनविभागाचे पथक येथे दाखल झाले. द्राक्ष बागेत त्याचा शोध घेत असतांनाच बिबट्याने वन कर्मचाऱ्यावर हल्ला केला यात वनरक्षक विजय माळी हे जखमी झाले आहेत.
Nandurbar Chilli Price : देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरची ची बाजार पेठ म्हणून नंदुरबार ची ओळख आहे. या वर्षी मिरचीच्या बाजारात पहिल्या पासून तेजी पाहण्यास मिळत आहे. नंदुरबार बाजार समिती त कोरड्या लाल मिरचीला 28000 हजार प्रतिक्विंटल दर मिळाला असून सुक्या मिळते त्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या मिरचीचे दर वेगवेगळे असल्याने त्यामुळे कोरड्या मिरचीच्या दरातही वेगवेगळे दर आपल्याला पाहण्यास मिळत आहेत . नंदुरबार बाजार समितीतला ओल्या लाल मिरचीचे ही दर वाढल्या असून आठ हजार बारा हजार प्रतिक्विंटल ओल्या लाल मिरचीला दर मिळत आसल्याने शेतकरी समाधानी असला तरी सर्वसामान्य माणसांच्या जेवणातील चटणी महगणार असल्याचे चित्र आहे
Palghar News : बसच्या धडकेने भिंत अंगावर पडल्याने एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जव्हार डेपोमध्ये ही घटना घडली. डहाणू जव्हार बस जव्हार डेपोत रिव्हर्स घेताना बसची भिंतीला धडक. अपघातात 11 वर्षीय ओवीस मडकिया या चिमुकल्याचा जागीच मृत्यू तर पंधरा वर्षीय सिंनाल मोडिया रफिकभाई गंभीर जखमी आहे. अपघातानंतर बसचे चालक आणि वाहक दोघेही फरार आहेत. जखमीवर जव्हारच्या कुटीर रुग्णालयात उपचार सुरू असून जव्हार पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे
मुंबईत गोवर या आजाराची साथ वाढली असून, केंद्र सरकारनंही त्या आजाराची गंभीर दखल घेतली आहे. काही दिवसांआधी गोवंडीत गोवरमुळे तीन बालकांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मुंबईत उच्चस्तरीय पथक तैनात करण्यात आलं आहे. मुंबईत जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत गोवरचे 109 रुग्ण आढळले आहेत. मुंबई महापालिकेनं या आजारावर उपाययोजनेला सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्थापन करण्यात आलेल्या समितीकडून आज मुंबईतील गोवंडी आणि इतर ठिकाणी आढावा घेऊन विशेष अहवाल सादर करण्यात येणार आहे..
Supreme Court : प्रतापगडावरील अफझल खानाच्या कबरीजवळचं अनधिकृत बांधकामावर केलेल्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. अफझल खानाच्या कबरीजवळचं अनधिकृत बांधकाम पाडण्यास प्रशासनानं काल सुरुवात केली. हा वाद सुप्रीम कोर्टात गेलाय. त्यावर आज सुनावणी होणार आहे.
Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या रत्नागिरीला रवाना झाले आहेत. ठाण्याहून तेजस एक्स्प्रेसने सोमय्या रत्नागिरीकडे रवाना झाले आहेत. वादग्रस्त साई रिसाॅर्ट प्रकरणी ठाकरे गटाचे नेते अनिल परब ते यांच्याविरोधात जबाब नोंदविणार आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आदित्य ठाकरे आज काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार
आज राहुल गांधींची यात्रा हिंगोली जिल्ह्यात पोहचणार आहे. आदित्य ठाकरे आज काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार. दुपारी चार वाजता आदित्य ठाकरे यात्रेत उपस्थिती लावणार आहे. सकाळी 6 वाजता अर्धापूर, नांदेड येथून यात्रेला सुरुवात होईल. सकाळी 10 वाजता सकाळचा ब्रेक होईल. त्यानंतर दुपारी 4 वाजता चोरंबा फाटा, हिंगोली येथून पुन्हा पदयात्रेला सुरुवात होईल.
संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी
शिवसेना खासदार संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. गुरुवारी वेळेअभावी ही सुनावणी होऊ शकली नव्हती. संजय राऊत यांचा जामीन रद्द व्हावा अशा आशयाची याचिका ईडीने उच्च न्यायालयात दाखल केली होती.
कलिनच्या नियमित जामीन अर्जावर आज निकाल
सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या नियमित जामीन अर्जावर आज निकाल लागणार आहे. याप्रकरणी गुरुवारी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली. या दरम्यान ईडीने सांगितले की, जॅकलिनविरोधात पुरेसे पुरावे आहेत, त्यामुळे तिला नियमित जामीन देऊ नये.
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आज आंदोलन
वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भातील खासदारांच्या घरासमोर विदर्भवाद्यांकडून आज घेराव घातला जाणार आहे. नागपुरात केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या घराजवळही विदर्भवादी आंदोलन करणार आहेत. चंद्रपुरात वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी खासदार बाळू धानोरकर यांच्या घरासमोर आंदोलन होणार आहे.
अजित पवार आज तळेगाव दाभाडे येथील कार्यक्रमांना उपस्थिती लावणार
राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. त्यांच्या हस्ते तळेगाव दाभाडे येथे टीजीएच ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटरचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर इंद्रायणी भात खरेदीचा शुभारंभ त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. अजित पवार शिर्डी अधिवेशनात शरद पवार आले त्यादिवशी उपस्थित नव्हते. तसेच सुप्रिया सुळेंबाबत सत्तारांनी केलेल्या वक्तव्यावरही ते बोलले नव्हते. त्यानंतर ते प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -