Maharashtra News Live Updates : अनिल देशमुखांचे खासगी सचिव कुंदन शिंदे यांना जामीन मंजूर
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.
आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर होणार
आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधला शेवटचा पूर्ण अर्थ संकल्प सादर करणार आहेत. सकाळी 10.15 वाजता कॅबिनेट बैठकीत बजेटला मंजुरी देतील. सकाळी 11 वाजता लोकसभेत बजेट मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा होणार, करदात्यांना दिलासा मिळणार का, रेल्वे अर्थसंकल्पीय तरतुदीत कोणत्या घोषणा होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. संसदेचे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात असणार आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पाचवा आणि शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. अधिवेशनादरम्यान 14 फेब्रुवारी 2023 ते 12 मार्चपर्यंत सुट्टी असेल. अधिवेशनाचा दुसरा टप्पा 13 मार्चपासून सुरू होणार आहे.
राज्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे आज काम बंद
राज्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे आज काम बंद आंदोलन आहे. या आंदोलनात 10 हजार डॉक्टरांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कोलमंडण्याची शक्यता असून, रुग्णांना खाजगी रुग्णालयात जाण्याची वेळ येणार आहे. शासकीय रुग्णालयातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्यासाठी यापूर्वी अनेकदा प्रशासनाला निवदेन दिले आहे. सोबतच यापूर्वी देखील अनेकदा आंदोलनं देखील केली आहेत. मात्र तरीही आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्याने, समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी एक दिवसीय काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे.
महाराष्ट्रातील माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप
महाराष्ट्र शासनाकडे माथाडी कामगारांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्रातील माथाडी कामगारांनी लाक्षणिक संप पुकारला आहे. या लाक्षणिक संपात मुंबईत विविध ठिकाणी काम करणारे माथाडी कामगार देखील सहभागी होणार आहेत.
राखी सावंतच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी
राखी सावंतच्या अटकपूर्व जामीनावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. 1 फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे हायकोर्टाने मुंबई पोलिसांना निर्देश दिले होते. मूळ तक्रारदार शर्लिन चोप्रा या प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे. शर्लिनच्या तक्रारीवरूनच आंबोली पोलीस ठाण्यात राखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हॉटसअपच्या याचिकेवर सुनावणी
व्हॉटसअपच्या प्रायव्हेट पॉलिसी विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर सुनावणी होणार आहे. युजर्सची माहिती फेसबुकसह अन्य माध्यमांध्ये शेअर करण्याविरोधात ही याचिका आहे.
बीडमध्ये अपघात, तीन जणांचा मृत्यू
माजलगाव ते तेलगाव रोडवरील शिंदेवाडी फाट्याजवळ स्विफ्ट गाडीने दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये लहामेवाडी येथील तीन तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली.
रेती माफियांचा महसुलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला
वर्ध्यात हिंगणघाट येथे वणा नदी पात्रात अवैध रेती वाहतूक करीत असणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसुल प्रशासनाच्या पथकावर रेती माफियांनी हल्ला केल्याची घटना घडली आहेय. दगडफेक करीत लाथा बुक्क्यांनी तालाठ्याला मारहान करण्यात आलीय. या घटनेने महसूल प्रशासनात खळबळ निर्माण झाली असून रोष व्यक्त होत आहे. याबाबत हिंगणघाट येथील नायब तहसीलदारांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसात कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन् पंकजा मुंडे अचानक पोहोचल्या पाव भाजी सेंटरवर
मामाच्या ऐवजी मारेकर्यांनी भाचाची केली हत्या
मिरा रोड येथे सोमवारी ३० जानेवारीला एका डिलिवरी बॉयची ९ जणांनी चाकू भोसकून हत्या केली होती. याप्रकरणात काशी मिरा गुन्हे शाखा क्रमांक १ ने नउ जणांना अटक केलं आहे. मामाला मारण्याऐवजी मारेक-यांनी भाचाची हत्या केल्याच हत्येच कारण समोर आलं आहे. तर पेट्रोल पंपावर बाईक पुढे घेण्याच्या किरकोळ वादावरुन ही हत्या झाल्याच ही उजेडात आलं आहे.
Pune : फुलेंचं राष्ट्रीय स्मारक उभारण्यावर राज्य सरकार ठाम, 24 फेब्रुवारीला होणार सुनावणी
Pune Bhide Wada : पुण्यातील भिडे वाड्याचा प्रश्न सामोपचारानं मार्गी लावण्यास तयार असल्याची ग्वाही बुधवारी राज्य सरकारच्यावतीनं हायकोर्टात देण्यात आली. मात्र, चर्चेतून प्रश्न न सुटल्यास त्या जागी स्मारक उभारण्याकरता न्यायालयीन लढा देण्याची तयारी राज्य सरकारनं दर्शवली आहे. बुधवारी यासंदर्भात हायकोर्टात पार पडलेल्या सुनावणीकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ जातीनं उपस्थित होते.