Maharashtra News Updates 06 December 2022 : महाविकास आघाडीचा आणखी एक निर्णय शिंदे सरकारकडून रद्द, म्हाडाच्या एकत्रित पुनर्विकासाचा निर्णय रद्द
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आणखी एक निर्णय रद्द.
म्हाडाच्या अंतर्गत असणाऱ्या इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता, त्यामुळे एका इमारतीचा पुनविकास करण्यासाठी परवानगी मिळत नव्हती.
एका इमारतीचा पुनर्विकास केला तर नागरिकांना सोयीसुविधा मिळत नाहीत. त्यामुळे अनेक इमारती एकत्र करून त्यांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता.
हा निर्णय आता शिंदे फडणवीस सरकारने रद्द केल्याने पूर्वीप्रमाणे एका इमारतीचा देखील आता पुनर्विकास करता येणार आहे.
एकत्रित पुनर्विकास करताना मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुरर्विकास करायला वेळ लागतो, त्यामुळे घातपात होण्याची शक्यता नाकराता येत नाही.
त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच हा निर्णय कायम ठेवला आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून वसईत पासपोर्ट ऑफिसचा आज लोकार्पण सोहळा पार पडला आहे. परराष्ट्र आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही मुरलीधरण यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. वसई हे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय मुंबईच्या अखत्यारीतील 14 वे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र आहे. वसई पूर्व एव्हरशाईन सिटी पूजा टावरच्या ग्राउंड फ्लोरला हे कार्यालय नव्याने सुरू झाले आहे. आता पालघर आणि वसई-विरारकरांना 1500 रुपयात पासपोर्ट मिळणार, नव्याने या पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन पार पडल्याने वसई विरारकरांसह पालघर जिल्ह्यातील नागरिक देखील आनंदात आहेत.
संविधानाने सर्वांना अधिकार दिलेत आहेत, ज्यानी हे संविधान दिले त्यांच्या महापरिनिर्वाण दिवशी आज काही तोडफोडीची घटना घडली आहे. कर्नाटक सरकारकडून सातत्यानं वेगवेगळ्या गोष्टी करण्यात येत आहेत. सातत्यानं वेगवेगळी वक्तव्ये येतं आहेत. हे अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे सीमाप्रश्नी आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
बेळगावमध्ये महाराष्ट्रातील सहा ट्रकवर दगडफेक केल्यानंतर आता त्याच्या नेषेधार्थ पुण्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसेसना काळा आणि भगवा रंग लावला आहे. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापाट झाली.
पुण्यातील स्वारगेट भागात खाजगी पार्किंगमधे उभ्या असलेल्या कर्नाटक सरकारच्या बसेस बाहेर काढण्यास सांगण्यात आलं आहे. या ठिकाणी आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.
बेळगाव: महाराष्ट्राच्या ट्रकवर कन्नड संघटनांकडून दगडफेक, हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळील घटना
Maharashtra Political Crisis: सत्तासंघर्षाची सुनावणी 10 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा वाद सुप्रीम कोर्टात प्रलंबित. मुख्य युक्तिवाद 10 जानेवारीपासून होण्याची शक्यता
PCMC News : पिंपरी चिंचवडमध्ये एका कंपनीला आग लागलेली आहे. अगरबत्ती बनविणारी ही कंपनी असल्याचं समजत आहे. सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अग्निशमन दलाची सहा वाहनं घटनास्थळी दाखल झालेली आहेत. सुदैवाची बाब म्हणजे कंपनीत कोणी ही नसल्याचं बोललं जातंय. कंपनीला लागूनच असणाऱ्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खबरदारी म्हणून बाहेर काढलेलं आहे.
पैठणमध्ये भरचौकात बायकोची डोक्यात फावडे मारून हत्या
सकाळी सात वाजेची धक्कादायक घटना
बायकोवरील संशयाच्या कारणावरून भर चौकात डोक्यात फावडे मारून हत्या
ज्ञानेश्वर पुंडलिक पौळ बायकोची हत्या करून फरार
घटनेने परिसरामध्ये खळबळ
पैठण पोलीस घटनास्थळी दाखल
Palghar News : प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जाग आली असून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षा उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी सायरस मिस्त्री यांचा अपघात घडला त्या ठिकाणी आता क्रॅश कुशन बसवण्यात आलं असून या महामार्गावर प्रथमच अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अछाड ते घोडबंदरपर्यंत जवळपास 29 ब्लॅक स्पॉट असून सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या सुरक्षा उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने सिग्नल यंत्रणा दोन लेनच्या मध्ये अनधिकृत असलेले कट बंद करणे, त्याचप्रमाणे सूचना देणारे फलक अशा उपाययोजना करण्यात येत आहे.
Chiplun News: चिपळुणातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखा विभागातील दोघां लिपिकांनी संगनमताने ठेकेदारांनी ठेवलेली अनामत रक्कम परस्पर ऑनलाईन पद्धतीने बोगस ठेकेदारांच्या नावे वगळून तब्बल 4 कोटी 8 लाखाचा अपहर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीच आला आहे.यात एका महिलेसह एकूण 7 जणांना चिपळूण पोलिसांनी अटक केली आहे हा प्रकार गेल्या दोन वर्षापासून सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे.
Ratnagiri News : आमदार राजन साळवी यांना एसीबीची नोटीस आल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. एसीबीच्या नोटीसनंतर आमदार साळवी यांच्या समर्थनार्थ ठाकरे गट सरसावला असून राजन साळवी यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्याचं नियोजन सुरु आहे. शुक्रवारी निघणाऱ्या मोर्चाला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे उपस्थित राहू शकतात. दरम्यान राजन साळवी यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी असून आम्ही घेरले तर अवघड होईल, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे.
Mahaparinirvan Day: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावी दर वर्षाप्रमाणे यंदाही त्यांना अभिवादन करण्यात येणार. आंबडवे येथे दरवर्षी आंबेडकर कुटुंबीय आणि आंबेडकरी अनुन्यायी यांच्याकडून प्रतिवर्षाप्रमाणे स्मारकात अस्थीकलश व बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून पूजन करून अभिवादन करण्यात येते.
Mahaparinirvan Day: आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं आंबेडकरांचे अनुयायी दाखल होणार आहेत. सकाळी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येतील. यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित राहतील.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं आंबेडकरांचे अनुयायी दाखल होणार आहेत. सकाळी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येतील. यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित राहतील. याबरोबरच गुजरातमधून आणलेल्या सिंहाची जोडी सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये सोडण्यात येणार आहे. तर अनिल देशमुखांच्या जामीनावर आजपासून हायकोर्टात सुनावणी सुरू होणार. त्याशिवाय अनेक महत्वाच्या घडामोडी आज दिवसभरात घडणार आहे. वाचा आज दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडींबद्दल
आज महापरिनिर्वाण दिन
आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं आंबेडकरांचे अनुयायी दाखल होणार आहेत. सकाळी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येतील. यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित राहतील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबडवे या मूळ गावी त्यांना अभिवादन करण्यात येणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावी दर वर्षाप्रमाणे यंदाही त्यांना अभिवादन करण्यात येणार. आंबडवे येथे दरवर्षी आंबेडकर कुटुंबीय आणि आंबेडकरी अनुन्यायी यांच्याकडून प्रतिवर्षाप्रमाणे स्मारकात अस्थीकलश व बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून पूजन करून अभिवादन करण्यात येते.
अमरावतीत पदयात्रा
काँग्रेसच्या वतीने शहरातील इर्विन चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नया अकोला येथे पदयात्रा काढली जाणार आहे. जवळपास 15 किलोमीटर ही पदयात्रा असून यामध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
आज मुंबईत जंगलचा राजा येणार
गुजरातमधून आणलेल्या सिंहाची जोडी सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये सोडण्यात येणार आहे. ही सिंहांची जोडी काही दिवसांपूर्वी गुजरातेतील सक्करबाग प्राणी संग्रहालयातून मुंबईत दाखल झाली आहे. ती आज बोरिवली नॅशनल पार्क मध्ये सोडली जाईल.
भाजपचा कोकण महोत्सव
शिवसेनेच्या कोकण महोत्सवाला भाजपच्या कोकण महोत्सवाने उत्तर दिलं जातं आहे. आगामी मुंबई महानगर पालिकेसाठी शिवसेनेनंतर आता भाजपचा कोकणी मतांवर डोळा आहे. यामुळे गोरेगाव नेस्कोमध्ये भाजपने स्वराज्य भूमी कोकण महोत्सव आयोजित केला आहे. याचं उद्घाटन सकाळी साडेआठ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.
राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा आज शेवटचा दिवस
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सहा दिवशीय कोकण दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे.
मुंबईत शंभूराज देसाई यांची पत्रकार परिषद
राज्य उत्पादन शूल्क मंत्री शंभूराज देसाई यांची पत्रकार परिषद होणार आहे.
अनिल देशमुखांच्या जामीनावर आजपासून हायकोर्टात सुनावणी
अनिल देशमुखांच्या जामीनावर आजपासून हायकोर्टात सुनावणी सुरू होणार. सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीनासाठी देशमुखांची याचिका, मुंबई सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्याच्या निर्णयाला आव्हान. देशमुखांच्या याचिकेत तथ्य आढळल्यानं गुणवत्तेच्या आधारावर सुनावणी घेण्याचं हायकोर्टाने मान्य केल आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -