Maharashtra News Live Updates : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालूक्यात मुसळधार पाऊस
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा
उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्कमध्ये होणार आहे. तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर होणार आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. हा वाद कोर्टात असला तरी दोन्ही नेत्यांमध्ये दसऱ्या मेळाव्यात आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार? कुणावर टीका करणार? भाषणामध्ये कळीचा मुद्दा कोणता असणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालूक्यात मुसळधार पाऊस
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालूक्याला पावसानं झोडपलंय. तेल्हारा तालूक्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे.
Shirdi News : शिर्डी साईबाबा पुण्यतिथी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भिक्षा झोळी परंपरा
Shirdi News : शिर्डीत साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव आज पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातोय. कालपासून सुरू झालेला हा उत्सव चार दिवस साजरा केला जाणार आहे. आज उत्सवाचा दुसरा मुख्य दिवस असून पहाटे साईबाबांच्या काकड आरतीने कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. साईबाबा आपल्या हयातीत भिक्षा मागत असे आजही तीच परंपरा साईसंस्थान आणि ग्रामस्थांनी जपली आहे. विजयादशमीच्या दिवशी गावातून भिक्षा मागितली जाते ही परंपरा कायम असून साईभक्त आणि ग्रामस्थ गावातून निघालेल्या भिक्षा झोळीत धान्य टाकतात आणि झोळीतील साईभक्त यातील धान्य आपल्या घरी प्रसाद म्हणून घेऊन जातात.
Nagpur Rains : नागपुरात जोरदार पावसाला सुरुवात
नागपूरः परतीचे वेध लागलेल्या मॉन्सून जाता जाता पुन्हा गोंधळ घालण्याचा हवामान खात्याचा अंदाज खरा होताना दिसत असून बुधवारी सकाळी शहरातील काही भागात दुपारपर्यंत नंदनवन, मानकापूर, झिंगाबाई टाकळी, रामदासपेठ, सिव्हील लाइन आदी भागात जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे.
Nashik News : नाशिकमध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या नवरात्रोत्सव मंडळात राडा, एकाचा मृत्यू
Nashik News : नाशिक शहरात दांडिया दरम्यान डीजे ऑपरेटरचा शॉक लागून मृत्यू झाल्यानंतर आता मधून धक्कादायक घटना समोर येत आहे. काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या नवरात्रोत्सव मंडळात राडा झाला असून यात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
KCR National Party Launch : तेलंगणा सीएम केसीआर यांचा राष्ट्रीय राजकारणात चंचुप्रवेश; 2024 साठी नेमकी रणनीती आहे तरी काय?
KCR National Party Launch : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे (Telangana Rashtra Samiti) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव आज विजयादशमीचा मुहूर्त साधत आपल्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा करणार आहेत. केसीआर हे केंद्रात भाजपसमोर एक मजबूत विरोधक उभे करण्यासाठी अनेक दिवसांपासून नियोजन करत होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव राष्ट्रीय राजकारणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. बुधवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर ते 'भारतीय राष्ट्र समिती' या राष्ट्रीय पक्षाची घोषणा करणार आहेत. यानंतर वर्षअखेरीस राजधानी दिल्लीत जाहीर सभा घेण्याचा प्लॅन त्यांनी तयार केला आहे. अलीकडेच केसीआर यांनी बिहार, कर्नाटकसह अनेक राज्यांना भेटी दिल्या आणि मुख्यमंत्र्यांसह मोठ्या राजकीय नेत्यांची भेट घेतली होती.