Maharashtra News Updates 02 February 2023 : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकच्या परशुराम घाटात दरड मार्गावर आल्याने घाटातील वाहतूक ठप्प

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Feb 2023 02:16 PM
#Breaking नागपूरात जरीपटका पोलिस ठाण्यात रायफलमधून चालली गोळी

Nagpur Police : नागपुरातील जरीपटका पोलिस ठाण्यात गार्ड ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचारी आपली रायफल चेक करत असताना रायफलमधून गोळी सुटली. मात्र बॅरेल छताच्या दिशेने असल्याने गोळी छताला लागली असून छताला छिद्र पडला. प्राप्त माहितीनुसार पोलिस ठाण्याच्या आतमध्येच ही गोळी चुकून सुटली असून यात कुठलीही हानी झाली नाही.

#Breaking नागपुरातील जरीपटका पोलिस ठाण्यात फायरिंग

Nagpur Police : नागपुरातील जरीपटका पोलिस ठाण्यात पोलिसाच्या बंदूकीतून गोळी झाडल्या गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही गोळी चुकून चालली असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.

RSS : या देशात राहणारे सगळेच हिंदू; संघ उजव्या विचारांचा नाही तर राष्ट्रवादी विचारांचा: होसबळे

RSS :  या देशात राहणारे सगळेच हिंदू असून संघ उजव्या विचारांचा नाही तर राष्ट्रवादी विचारांचा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी म्हटले.  

मनोरमध्ये प्रसूत मातेचा उपचारादरम्यान मृत्यू, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

मनोर ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान सुनिता रोकडे या प्रसूत मातेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.   नांदगाव तर्फे मनोर गावच्या हद्दीतील मोहू पाड्याची रहिवासी असलेली सुनीता कोरडा (वय.24) या गरोदर महिलेला प्रसुती काळा येत असल्याने मंगळवारी सकाळी मनोर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणी अंती नैसर्गिक बाळंतपण शक्य नसल्याने सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मनोर ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ यादव यांनी मंगळवारी सकाळी सिझेरियन शास्त्रकिया करून बाळाला जन्म दिला होता.त्यानंतर गेले दोन दिवस सुनीता कोरडा हिच्यावर उपचार सुरू होते.दरम्यान तिच्या शरीरात रक्ताची कमतरता आढळल्याने दोन युनिट रक्त चढवण्यात आले होते.मयत सुनीता कोरडा गुरुवारी सकाळी प्रातर्विधी साठी गेली असताना बेशुद्ध पडली,त्यानंतर तात्काळ तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते.मात्र आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकच्या परशुराम घाटात दरड मार्गावर आल्याने घाटातील वाहतूक ठप्प
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकच्या परशुराम घाटात दरड मार्गावर आल्याने घाटातील वाहतूक ठप्प झालेली आहे. दरड हटवण्याचे काम सुरू आहे. 

 

मुंबई गोवा महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू असताना डोंगरकटाई मध्ये परशुराम घाट कापला गेलेला आहे आणि डोंगरावरील दरड खाली आल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकच्या परशुराम घाटात दरड मार्गावर आल्याने घाटातील वाहतूक ठप्प
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकच्या परशुराम घाटात दरड मार्गावर आल्याने घाटातील वाहतूक ठप्प झालेली आहे. दरड हटवण्याचे काम सुरू आहे. 

 

मुंबई गोवा महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू असताना डोंगरकटाई मध्ये परशुराम घाट कापला गेलेला आहे आणि डोंगरावरील दरड खाली आल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
Pune Crime News: कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलीस अँक्शन मोडमध्ये, 2 जणांना अटक

Pune Crime News: कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलीस अँक्शन मोडमध्ये


बेकायदेशीर रित्या कोयता बाळगल्याप्रकरणी दोघांना सापळा रचून पोलिसांनी केली अटक


मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर परिसरात बेकायदेशीर रित्या कोयते बाळगल्याप्रकरणी 2 जणांना अटक केली आहे


त्यांच्याकडून 18 कोयते जप्त करण्यात आले असून मार्केट यार्ड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे


एका रिक्षामधून हे कोयते जप्त करण्यात आले


याप्रकरणी पोलिसांनी भवणसिंग भुरसिंग भादा (35), गणेशसिंग हुमनसिंग टाक (32) अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव 


या प्रकरणी पोलिसांनी दोघांकडून 18 कोयते आणि एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास मार्केट यार्ड पोलिस करत आहेत

मुंबई-गोवा महामार्ग फेब्रुवारी 2024 पर्यंत पूर्ण होणार



मुंबई गोवा महामार्गाची दुरुस्ती आणि रुंदीकरणाचे काम बहुतांश पूर्ण होत आल्याने डिसेंबर 2023 पर्यंत हे काम पूर्ण होईल असे वाटत असताना आता भारतीय राष्ट्रीय प्राधिकरणाने आणि राज्य सरकारतर्फे पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात हे काम फेब्रुवारी 2024 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.त्यामुळे आता महामार्ग रुंदीकरणाचे घोंगडे अजूनही किती भिजत पडणार आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. 



नंदुरबारमधील ठाणेपाडा जंगलात गुराख्यांच्या सतर्कतेमुळे चंदन तस्करीचा कट फसला

Nandurbar News : नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा जंगलात गुराख्यांच्या सतर्कतेमुळे चंदन तस्करीचा कट फसला.


जंगलात चंदन तस्कर आल्याची माहिती गुराख्यांनी फोनद्वारे गावकऱ्यांना दिल्यानंतर तस्करांनी केले पलायन....


घटनास्थळावर सापडलेले चंदन लाकूड दिले वन विभागाच्या ताब्यात

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा स्थगित, पुढील तारीख आणि माहिती वेबसाईटवर कळवली जाईल, विद्यापीठाची माहिती

Kolhapur News : कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा स्थगित


शिक्षकेत्तर कर्मचारी आंदोलनाचा परिणाम


विविध मागण्यांसाठी आजपासून कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन


परीक्षेची पुढील तारीख आणि माहिती संकेस्थळावर कळवली जाईल - विद्यापीठ

Mumbai News: मुंबईत गोवरचा उद्रेक कमी झालेल्या भागातील आरोग्य केंद्रे बंद

Mumbai News: गोवरचा मुंबईमध्ये उद्रेक झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेकडून प्रभागांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली होती 


मात्र मागील काही दिवसांपासून गोवरची रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ज्या भागामध्ये उद्रेक नाही, त्या प्रभागातील लसीकरण केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे 


त्यानुसार मुंबईतील 6 आरोग्य केंद्र बंद करण्यात आली आहेत 


केंद्र सरकारच्या निर्देशानुसार शेवटच्या ताप व पुरळ आलेला रुग्ण सापडल्यानंतर पुढील 28 दिवसांमध्ये एकही ताप व पुरळ रुग्ण सर्वेक्षणात आढळून आलेला नाही 


अशा भागातील गोवरचा उद्रेक आटोक्यात आल्याचे समजण्यात येते. त्यामुळे मुंबईतील अप्पापाडा, शांतीनगर, सर्वोदय, पांजरपोळ, हिमालया, नेहरू नगर येथील आरोग्य केंद्रे मुंबई महानगरपालिकेने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

Mumbai Pollution Update: जानेवारी महिन्यात मुंबई आणि आजूबाजूच्या उपनगरातील प्रदूषणात वाढ

Mumbai Pollution Update: जानेवारी महिन्यात मुंबई आणि आजूबाजूच्या उपनगरातील प्रदूषणात वाढ 


राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हवा गुणवत्ता निर्देशांकाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट 

 

ग्रीन प्लानेट सोसायटीच्या सुरेश चोपणे यांचा अहवाल 

 

मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण या चारही औद्योगिक क्षेत्रात 31 दिवसांपैकी 31 दिवस प्रदूषित आढळल्याचं अहवालातून समोर 

 

मुंबईतील प्रदूषणास धूलीकण, वाहनांची वाढती संख्या, बांधकाम, ज्वलन कचरा कारणीभूत

 

सोबतच मुंबईची भौगोलिक परिस्थिती, वाऱ्याची संथ गती आणि  हिवाळ्यातील कमी तापमान देखील कारणीभूत 

 

नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात आलाय, त्याची कडक अंमलबजावणी करण्याची गरज, तसेच दिल्लीप्रमाणे अनेक अन्य उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचं अहवालातून स्पष्ट 

 

हवा गुणवत्ता निर्देशांक खालीलप्रमाणे : 

1) मुंबई (पवई केंद्र)

●चांगला निर्देशांक (Good) -00 दिवस

●समाधानकारक-(Satisfactory)- 02 दिवस

●साधारण प्रदूषण(Moderate)-13 दिवस

●जास्त प्रदूषण ( Poor) -16 दिवस

● धोकादायक प्रदूषण आढळले नाही

----------------------

2) नवी मुंबई (महापे केंद्र)

●चांगला निर्देशांक (Good) -00 दिवस

●समाधानकारक-(Satisfactory)- 01 दिवस

●साधारण प्रदूषण (Moderate)-18 दिवस

●जास्त प्रदूषण ( Poor) -12 दिवस

● धोकादायक प्रदूषण आढळले नाही

----------------------

3) ठाणे (पिंपलेश्वर मंदिर केंद्र )

●चांगला निर्देशांक (Good) -00 दिवस

●समाधानकारक-(Satisfactory)- 00 दिवस

●साधारण प्रदूषण (Moderate)-14 दिवस

●जास्त प्रदूषण ( Poor) - 14 दिवस

● धोकादायक प्रदूषण-(very poor) - 03 दिवस 

----------------------

4) कल्याण (खडकपाडा केंद्र)

●चांगला निर्देशांक (Good) -00 दिवस

●समाधानकारक-(Satisfactory)- 00 दिवस

●साधारण प्रदूषण (Moderate)-22  दिवस

●जास्त प्रदूषण ( Poor) -09 दिवस

● धोकादायक प्रदूषण आढळले नाही
MLC Election Result: विधानपरिषद निवडूणकीचा आज निकाल, त्यापूर्वी उमेदवारांचं देवदर्शन

MLC Election Result: विधानपरिषद निवडूणकीचा आज निकाल, त्यापूर्वी उमेदवारांचं देवदर्शन 


नागपूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सकाळीच साईचरणी


निकालाच्या दिवशी साईंचा आशिर्वाद मिळावा म्हणून सुधाकर आडबाले साईंच्या दर्शनाला 

Mumbai News: गोवंडीमध्ये भाजप आणि नागरिकांचे तीन दिवस सुरू असलेले उपोषण अखेर स्थगित
Mumbai News: गोवंडी येथील देवनार गाव रोडला असलेल्या विविध रेडिमिक्स काँक्रीट प्लांटच्या विरोधात भाजप आणि स्थानिक नागरिकांनी आमरण उपोषण गेले तीन दिवस सुरू होते.भाजप चे अणुशक्ती नगर मंडल अध्यक्ष आणि माजी नगरसेवक दिनेश  पांचाळ आणि स्थानिक नागरिक या प्लँट च्या समोरच सोमवार पासून आमरण उपोषणाला होते. अखेर रात्री हे उपोषण स्थगित करण्यात आले.वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या या रेडिमिक्स प्लँट च्या आजूबाजूला दाट लोकवस्ती आहे.या प्लांटच्या प्रदूषणाने त्यांचे आरोग्य धोकादायक बनले आहे.या प्लँट मधून उडणारे सिमेंट हे लोकांच्या घरात, जेवणात आणि नाकातोंडात जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.या बाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ, पालिका या सर्वांकडे तक्रार करून ही कारवाई होत नसल्याने अखेर भाजप आणि स्थानिक नागरिक उपोषणाला बसले होते. मात्र तीन दिवसानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पालिकेने एक प्लांट बंद केला आणि चार दिवसात उर्वरितवर कारवाईचे आश्वासन आंदोलकांना दिले.त्यामुळे हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे. आपल्याला अधिकाऱ्यांवर विश्वास नाही.परंतु तरी ही चार दिवसांचा अवधी प्रशासनाला देत आहोत, अथवा आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचे भाजपचे माजी नगरसेवक दिनेश  पांचाळ म्हणाले.
Nanded News: अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या महासत्संग सोहळ्यास लाखों अनुयायांची गर्दी

Nanded News: आर्ट ऑफ लिव्हिंगचे अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या महासत्संग कार्यक्रमाला मराठवाडा,विदर्भासह परराज्यातील अनुयायांचीही तुफान गर्दी झाली होती. नांदेड शहरातील कौठा परिसरात संध्याकाळी 10 वाजता अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचा महासत्संग सोहळा संपन्न झालाय. या महासत्संगात लाखों साधक आणि अनुयायांचा जनसागर उसळलाय. आर्ट ऑफ लिव्हिंगचे अध्यात्मिक गुरू कार्यक्रम स्थळी येताच भक्तांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. त्या दरम्यान गुरू रविशंकर यांनी भक्तांवर पुष्पवृष्टी केलीय. तसेच भक्तांनी दिलेले विविध वस्तू, पुष्पगुच्छ, पुष्पहार  रविशंकर यांनी स्विकारले. यावेळी स्वागताध्यक्ष असलेले अशोक चव्हाण आणि गुरुद्वाराचे बाबा बलविंदर सिंग यांनी रविशंकर यांचे सत्कार केलाय. महासत्संग सोहळ्याला मराठवाडा, विदर्भातील एक लाखाच्यावर भक्त उपस्थित होते.


दरम्यान, राजकारणातील वाढत्या वैमनस्या विषयी अशोक चव्हाण ही भयभीत, याविषयी गुरूंनी मार्गदर्शन करण्याची विनंती, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलीय.

 
Govind Pansare Murder Case: तपासात हस्तक्षेप करण्याचा आरोपींना अधिकार नाही : हायकोर्ट

Govind Pansare Murder Case: कॉम्रेड गोविंद पानसरे (Comrade Govind Pansare) यांच्या हत्येचा खटला (Govind Pansare Murder Case News) जलदगतीनं चालवण्याची मागणी करण्याचा अधिकार आरोपींना आहे. मात्र, तपासाला विरोध करण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही, असं स्पष्ट करत हायकोर्टानं (Bombay High Court) याप्रकरणातील आरोपींनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीस नकार दिला आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 30 जानेवारीला मतदान झालय. त्याचा निकाल आज लागणार आहे.  यात तीन शिक्षक तर दोन पद्वीधर मतदार संघाचा समावेश आहे.  पाचही ठिकाणी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. शिवाय सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या स्वतंत्र दोन बैठका होणार आहेत. 


विधान परिषद मतमोजणी  (Legislative Council Counting )


विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 30 जानेवारीला मतदान झालय. त्याचा निकाल आज लागणार आहे.  यात तीन शिक्षक तर दोन पद्वीधर मतदार संघाचा समावेश आहे.  पाचही ठिकाणी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. मतदान प्रक्रिया मतपत्रिकेवर पार पडल्यामुळे निकाल दुपारनंतर येणं अपेक्षित आहे.
  
सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर सर्वात अगोदर पोस्टल मतपत्रिका मोजल्या जातील.  त्यानंतर उमेदवारांची पहिल्या पसंतीची मते मोजली जातील. त्यानंतर वैध आणि अवैध मतमोजली जातील.  त्यानंतर वैध मतांच्या आधारावर विजयासाठीचा कोटा ठरवला जाईल.  पहिल्या पसंती क्रमांकात कोणताही उमेदवार जिंकला नाही तर दुसऱ्या पसंतीची मतमोजली जातील.  ही निवडणुक प्रक्रिया पसंती क्रमांकानुसार पार पडली असल्यामुळे दुसरा आणि गरज लागल्यास तिसरा पसंती क्रमांक मोजला जाईल. 









सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या स्वतंत्र दोन बैठका होणार आहेत.  शिंदे गटाची सकाळी 11 वाजता तर भाजपची संध्याकाळी 7 वाजता बैठक होणार आहे. शिंदे गटाच्या बैठकीला सर्व आमदार मंत्री, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना दौऱ्यावर 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी 11 वाजता वाटूर येथे श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शेतकरी मेळाव्याला ते उपस्थित रहातील.  
 
विरोधी पक्ष नेते अजित पवार आज पुणे आणि पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर
  
विरोधी पक्ष नेते अजित पवार आज पुणे आणि पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आहेत. पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोट निवडणुकीबाबत अजित पवार भुमिका स्पष्ट करतील. 


मनसे नेते अमित ठाकरे  सांगली दौऱ्यावर


मनसे नेते अमित ठाकरे आज सांगली, तासगाव, विटा भागात दौरा करणार आहेत. विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधणार आहेत. संध्याकाळी 6 वाजता विटा येथे डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांच्या तालमीला भेट देणार आहेत. 
 
आमदार बच्चू कडू सोलापूर दौऱ्यावर


प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. सोलापुरात दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.


'कृषीगंगा' या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला सुरुवात


पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आजपासून 'कृषीगंगा' या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे, सकाळी 10 वाजता. माजी मंत्री हसन मुश्रीफ,  पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
 
चंद्रकांत पाटील यांच्या विरोधातील भीम आर्मीच्या याचिकेवर सुनावणी


भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त विधान करून शाहु-फुले आणि आंबेडकरांचा अपमान केल्याबद्दल त्यांच्याविरोधात अँट्रोसिटी अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करत भीम आर्मीनं दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.