Maharashtra News Updates 01 November 2022 : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवासंची वाढ
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
1 नोव्हेंबर रोजी देशातील अनेक राज्यांच्या निर्मितीचा इतिहास आहे. 1 नोव्हेंबर 1956 रोजी मध्य प्रदेशची स्थापना झाली. जे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि लोकसंख्येच्या बाबतीत सहावे मोठे राज्य आहे. 1 नोव्हेंबर 1966 रोजी भाषेच्या आधारावर हरियाणाची निर्मिती झाली. हा पूर्वी पूर्व पंजाबचा भाग होता. हरियाणा हे ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचे आहे, कारण पानिपतच्या तीन लढाया पानिपतच्या मैदानात झाल्या होत्या. हरियाणातील प्रमुख शहरांमध्ये गुडगाव, फरिदाबाद, अंबाला, हिसार, रोहतक आणि सोनीपत यांचा समावेश आहे. छत्तीसगड हे भारतातील दहावे सर्वात मोठे राज्य आहे. जे मध्य प्रदेशातील काही जिल्हे मिळून 1 नोव्हेंबर 2000 रोजी स्थापन झाले. 1 नोव्हेंबर 1956 रोजी कर्नाटकची स्थापना झाली. 1950 मध्ये भारत प्रजासत्ताक बनला तेव्हा विशिष्ट प्रदेशात बोलल्या जाणार्या भाषांच्या आधारे अनेक राज्ये आणि प्रांत निर्माण झाले. त्याच वेळी दक्षिण भारतातील कन्नड भाषिक लोकांसाठी म्हैसूर नावाचे राज्य निर्माण झाले. परंतु अनेक प्रदेशांनी म्हैसूर हे नाव स्वीकारले नाही आणि लोकांनी राज्याचे नाव बदलण्याची मागणी केली. शेवटी 1 नोव्हेंबर 1973 रोजी त्याचे कर्नाटक असे नामकरण करण्यात आले. केरळची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली आणि या दिवशी केरळ पिरवी दिनम दरवर्षी साजरा केला जातो. 1 नोव्हेंबर 1956 च्या राज्य पुनर्रचना कायद्याने हैदराबाद संस्थानाचे विभाजन होऊन तेलगू भाषकांचा आंध्र प्रदेश निर्माण झाला.
1950 : भारतातील पहिले वाफेचे इंजिन तयार करण्यात आले
भारतातील पहिले वाफेचे इंजिन याच दिवशी चित्तरंजन रेल कारखान्यात तयार करण्यात आले होते. 1950 मध्ये या दिवशी भारतातील पहिले वाफेचे इंजिन चित्तरंजन रेल कारखान्यात तयार करण्यात आले होते. 1971 मध्ये येथे वाफेच्या इंजिनांचे उत्पादन पूर्णपणे बंद करण्यात आले आणि त्या जागी डिझेल इंजिन बनवण्यास सुरुवात करण्यात आली.
1956 : दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश बनले
स्वातंत्र्यानंतर दिल्ली देशाची राजधानी बनली. नंतर 1 नोव्हेंबर 1956 रोजी याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला.
1963 : नीता अंबानी यांचा जन्मदिवस
नीता अंबानी यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1963 रोजी मुंबईत झाला. नीता अंबानी या सुप्रसिद्ध व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या पत्नी आहेत.
1973: ऐश्वर्या राय बच्चनचा जन्मदिवस
ऐश्वर्या राय बच्चनचा आज वाढदिवस आहे. ऐश्वर्या ही भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. 1994 मध्ये मिस इंडिया स्पर्धेची उपविजेती ठरल्यानंतर तिने त्याच वर्षी जागतिक सौंदर्य स्पर्धा जिंकली. ऐश्वर्या रायने हिंदीशिवाय तेलुगू, तामिळ, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
आजच्या दिवशी घडलेल्या इतर महत्वाच्या घटना :
1870: अमेरिकेत हवामान विभागाने पहिला अधिकृत हवामान अंदाज सांगितला.
1940: भारताचे 35वे सरन्यायाधीश रमेश चंद्र लाहोटी यांचा जन्म.
1945: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म.
1974: क्रिकेटपटू वी. वी. एस. लक्ष्मण यांचा जन्म.
1873: बंगाली नाटककार दीनबंधू मित्र यांचे निधन.
Chembur Accident : चार दिवसांपूर्वीच्या अपघाताप्रकरणी 18 वर्षीय तरुणाला अटक
चेंबूर पोलिसांनी एसयूव्ही कार चालवणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. मोटारसायकल चालवणाऱ्या 30 वर्षीय व्यक्तीला गाडीने धडक देऊन मारल्याप्रकरणी, चार दिवसांनंतर सोमवारी ही अटक करण्यात आली आहे. मयत हा आपल्या बहिणीकडे भाईदूज साजरी केल्यानंतर आपल्या घरी परत जात होता. मृत गौरव नरोटे 30, हा मोटारसायकलवरून घरी जात असताना चेंबूर येथील मल्हार हॉटेलजवळ 26 ऑक्टोबर रोजी भरधाव वेगाने येणाऱ्या टोयोटा फॉर्च्युनरने त्याला धडक दिली. हा भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्यानंतर ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव हृदय भानुशाली असून तो घाटकोपरचा रहिवासी आहे.
नितीन राऊत भारत जोडो यात्रे दरम्यान जखमी
काँग्रेस नेते नितीन राऊत भारत जोडो यात्रे दरम्यान हैदराबाद मध्ये पायी चालताना गर्दीमध्ये इतरांचा धक्का लागून खाली पडले. त्यामुळे त्यांच्या डोळ्याजवळ किरकोळ जखम झाली आहे. सध्या सोबतच्या कार्यकर्त्यांसह ते हैदराबादचे एका खाजगी रुग्णालयात गेले आहेत.
त्यांचा कुटुंबीयांसोबत बोलणं झालं असून ते ठीक असल्याची माहिती राऊत कुटुंबीयांनी दिली आहे.
आमदार भास्कर जाधव यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने २३ नोव्हेंबरपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर
आमदार भास्कर जाधव यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने २३ नोव्हेंबरपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. वैभव नाईक यांना लाचलुचपत विभागाच्यावतीने चौकशीची नोटीस पाठविण्यात आल्याने त्यांच्या समर्थनार्थ १८ ऑक्टोबर रोजी कुडाळ येथे महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चा नंतरच्या भाषणात भास्कर जाधव यांनी प्रक्षोभक भाषण केले होते. विशेषतः केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या कुटबियांवर आरोप केले होते. त्यामुळे भाजप कार्यकर्ते संतप्त झाले होत कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणी अटक होवू नये यासाठी जिल्हा न्यायालयात आमदार भास्कर जाधव यांनी अटक पूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर आज न्यायालयाने सुनावणी केली असुन २३ नोव्हेंबर पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे
एसटी महामंडळाच्या दिवसाच्या सरासरीच्या उत्पन्नात 12 कोटी रुपयांची वाढ
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवासंची वाढ
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवासंची वाढ झाली आहे. देशमुख यांच्यासह पालांडे आणि शिंदे या दोन आरोपींना मुंबई सत्र न्यायालयानं 15 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून अटक झाली होती. सध्या ईडी प्रकरणात अनिल देशमुखांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र सीबीआयच्या प्रकरणात देशमुख अजुनही जामीनाच्या प्रतिक्षेत न्यायालयीन कोठडीत आहेत.