Maharashtra News LIVE Updates : प्रकाश आंबेडकरांची मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
खैरेंना उमेदवारी मिळताच विनोद पाटील दानवेंच्या घरी, पाटील शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याची शक्यता
चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळताच विनोद पाटील यांनी घेतली दानवे यांची भेट. अंबादास दानवे यांच्या घरी जाऊन विनोद पाटील यांनी घेतली भेट. विनोद पाटील लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक. विनोद
यांना शिवसेनेकडून तिकीट मिळण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची. निवडणूक लढण्यासाठी मागितला पाठिंबा...
नाशिक लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे मुंबईच्या दिशेनं रवाना होणार
नाशिक लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि इच्छुक उमेदवार हेंमत गोडसे आपल्या समर्थकांसह मुबंई च्या दिशेनं रवाना होणार
नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती कडून छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा झाल्यानं शिवसेनेमध्ये अस्वस्थता त्या असवस्थेतून शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी रवाना होणार
खेड शिवापूर रांजे येथे एका पेंटच्या कंपनीमध्ये आग, वेळीच आगीवर नियंत्रण
खेड शिवापुर, रांजे येथे एका पेंटच्या कंपनीमध्ये आग लागली होती. पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचत वेळीच आगीवर नियंञण मिळवून आग इतरञ पसरु न देता धोका दुर केला . आग विजली आहे. सध्या कुलिंग च काम सुरू आहे.
खासदार भावना गवळी तातडीने मुंबईसाठी रवाना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीनं बोलावल्याची माहिती
खासदार भावना गवळी तातडीने मुंबई साठी रवाना ,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी यांना तातडीने बोलविल्याची माहिती
यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीचा तिढा कायम
संजय राठोड यांचे नाव पुढे असल्याची माहिती
महायुतीच्या राज्यातील स्टार प्रचारकांची नावे जाहीर
महायुतीच्या राज्यातील स्टार प्रचारकांची नावे जाहीर झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे पी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , तसेच योगी आदित्यनाथ, गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, अशोक चव्हाण, विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार करणार प्रचार.