Maharashtra News Updates 7th March 2023: मंदिरात दर्शनासाठी आली, अन देवीचा हार चोरुन गेली, अंबरनाथच्या कालिका माता मंदिरातील घटना
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
नाशिक जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी ही अवकाळी पावसाची हजेरी
कळवण तालुक्याला सायंकाळी अवकाळी पावसाने झोडपले
- कळवण तालुक्यातील एकलहरे, नाकोडे, शिरसमणी, ओतूर परिसरात गारांचा पाऊस
शेतकिपीकाना फटका बसण्याची रोगराई वाढण्याची शक्यता
Ambarnath News : अंबरनाथ पश्चिमेच्या चिंचपाडा परिसरात कालिका मातेचं मंदिर आहे. या मंदिरात सोमवारी (6 मार्च) सकाळी नऊच्या सुमारास निळा ड्रेस घातलेली एक महिला दर्शन घेण्याच्या बहाण्याने आली. यानंतर तिने गाभाऱ्यासमोर असलेल्या रेलिंगवरुन आत जात थेट देवीच्या गळ्यातला सोन्याचा हार चोरला आणि पळून गेली. काही वेळाने मंदिराचे पुजारी नवीन शेट्टी हे तिथे आल्यानंतर त्यांना देवीच्या गळ्यातील हार फुलं अस्ताव्यस्त दिसली, त्यामुळे त्यांनी जवळ जाऊन तपासलं असता देवीच्या गळ्यातला सोन्याचा हार गहाळ असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळं त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक करताच त्यातमध्ये दर्शनासाठी आलेल्या या महिलेने देवीचा हार चोरल्याचं स्पष्ट झालं. याप्रकरणी नवीन शेट्टी यांच्या तक्रारीनुसार अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या आधारे या महिलेचा शोध घेत आहेत.
Chandrapur News : मालगाडीच्या इंजिनवर बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याची विचित्र घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. घुग्घुस येथील न्यू रेलवे कोल साइडिंग येथे ही घटना उघडकीस आली. आज सकाळी ही मालगाडी चंद्रपूर थर्मल पावर स्टेशन मधून या कोल सायडिंग मध्ये दाखल झाली. त्यावेळी इंजिन च्या वर बिबट्या मृतावस्थेत दिसून आला. चंद्रपुर थर्मल पावर स्टेशन परिसरात मोठया प्रमाणात वन्यजीवांचा वावर आहे. त्यामुळे मालगाडीच्या वर चढलेल्या बिबट्याला हायटेंशन इलेक्ट्रिक तारेचा स्पर्श झाला असावा आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वनविभाग आणि रेल्वे प्रशासन घटनेचा तपास करत आहेत.
मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनरच्या धडकेत दोन बाईकस्वारांचा मृत्यू. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनावेळी मृतांच्या नातेवाईकांची गर्दी.
मुंबईतल्या दक्षिण भागात काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसानं वातावरणात किंचित बदल झाला. पण पावसाला सुरुवात होण्याआधी काल मुंबईत यंदाच्या मोसमातील कमाल तापमानाची नोंद झाली. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईचा पारा चक्क 40 अंश सेल्सियसच्या जवळ पोहोचला होता. मुंबईतल्या सांताक्रूझ हवामान केंद्रावर काल 39.3 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. कुलाब्यातही काल कमाल तापमान 37 अंश सेल्सियसवर पोहोचलं होतं. दरम्यान, सांताक्रूझ हवामान केंद्रावर शनिवार आणि रविवारी अनुक्रमे 37 अंश आणि 38.1 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती.
देशभरात आज धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. सामान्य जनतेसोबतच राजकीय नेते आणि चित्रपट कलाकारही धुळवडीत न्हाऊन निघणार आहेत. नैसर्गिक रंगांचा वापर करून सुरक्षित धुळवड साजरी करा.
उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अजित गोवारी हे अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले आहेत. एका बांधकाम ठेकेदाराकडून 20 हजारांची लाच घेताना गोवारी यांच्यासह प्रभाग समितीचा मुकादम आणि कंत्राटी चालक यांना ठाणे अँटी करप्शन विभागाने बेड्या ठोकल्या आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
क्रिकेट विश्वात 'लिटिल मास्टर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील गावस्कर यांनी 7 मार्च 1987 रोजीच कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करण्याचा विक्रम केला होता. ही कामगिरी करणारे ते जगातील पहिले क्रिकेटपटू ठरले. त्याच्यानंतर अनेक फलंदाजांनी धावांचे हे शिखर गाठले आहे. मात्र जेव्हा जेव्हा या विक्रमाची चर्चा होते तेव्हा गावसकर यांचे नाव नक्कीच घेतले जाते. कसोटी इतिहासात जेव्हा जेव्हा कोणत्याही फलंदाजाने हा पराक्रम गाजवला तेव्हा भारताच्या सुनील गावस्कर यांनी आपल्या बॅटने हा आकडा पहिल्यांदा स्पर्श केला होता हे सांगायलाच हवे. याबरोबरच आजच्या दिवशी म्हणजे 7 मार्च 1955 रोजी चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांचा जन्म झाला.
1876 : अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांना टेलिफोनचे पेटंट मिळाले
29 वर्षीय ग्रॅहम बेल यांनी 7 मार्च 1876 रोजी टेलिफोनचे पेटंट घेतले होते. जगातील सर्वात वादग्रस्त पेटंटमध्ये टेलिफोन पेटंटचे नाव घेतले जाते. जेव्हा बेलने टेलिफोनच्या शोधाची घोषणा केली तेव्हा 600 हून अधिक लोकांनी त्यावर दावा केला. परंतु, शेवटी हे पेटंट ग्रॅहॅम बेल यांच्याच नावे राहिले. ग्रॅहम बेल लहानपणापासूनच हुशार होते. वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी त्यांनी आपल्या मित्राच्या धान्य गिरणीसाठी डी-हॉकिंग मशीनचा शोध लावला होता.
1911 : प्रसिद्ध हिंदी लेखक आणि साहित्यिक सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन 'अज्ञेय' यांचा जन्म
सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन 'अज्ञेय' यांजा जन्म 7 मार्च 1911 रोजी झाला. ते त्यांच्या काळातील हिंदीतील सर्वात प्रसिद्ध कवी, कथाकार, निबंधकार, पत्रकार, संपादक, प्रवासी, शिक्षक होते. त्यांचे बालपण लखनौ, काश्मीर, बिहार आणि मद्रास येथे गेले. बी.एस्सी. इंग्रजीत M.A करून क्रांतिकारी चळवळीत सहभागी झाले. याच कामी ते बॉम्ब बनवताना पकडला गेले आणि तेथून पळून गेले. 1930 च्या अखेरीस त्यांना पकडण्यात आले. अज्ञने हे साहित्यविश्वात प्रयोगशीलता आणि नवकविता प्रस्थापित करणारे कवी होते. त्यांनी अनेक जपानी हायकू कवितांचा अनुवाद केला. बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे समृद्ध आणि प्रखर कवी असण्याबरोबरच त्यांची छायाचित्रण देखील उत्कृष्ट होती.
1952 : वेस्ट इंडिजचा फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्सचा जन्म
सर आयझॅक व्हिव्हियन अलेक्झांडर रिचर्ड्स यांचा जन्म 7 मार्च 1952 रोजी सेंट जॉन्स, अँटिग्वा येथे झाला. ते वेस्ट इंडीजचे माजी क्रिकेटपटू आहेत. विस्डेनने त्यांना एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वकाळातील तीन महान फलंदाजांपैकी एक आणि कसोटी क्रिकेटमधील तीन महान फलंदाजांपैकी एक म्हणून घोषित केले. 125 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात केवळ दोनच फलंदाज त्यांच्यापेक्षा वरच्या क्रमांकावर आहेत. यामध्ये सर डॉन ब्रॅडमन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे यांचा समावेश होतो.
1955 : चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांचा जन्म
अनुपम खेर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे स्टार आहेत. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज ते त्यांचा 68 वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या वर्षी 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटामुळे ते आणखी प्रसिद्धीझोतात आले. याशिवाय ते त्यांच्या स्पष्ट वक्तृत्वासाठीही ओळखले जातात. त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट केले आहेत. अनुपम खेर यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. अनुपम खेर त्यांच्या चित्रपटांमधून चांगली कमाई करतात. ते त्यांच्या प्रत्येक चित्रपटासाठी करोडो रुपये घेतात. यासोबतच अनुपम खेर अनेक ब्रँडच्या जाहिराती करून मोठी कमाई करतात.
1969 : गोल्डा मीर या इस्रायलमध्ये देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या
गोल्डा मीर यांचा जन्म 3 मे 1898 रोजी रशियामधील कीव्ह (आता युक्रेन) येथे झाला. 1905 मध्ये त्यांचे वडील न्यू यॉर्क शहर युनायटेड स्टेट्स येथे स्थलांतरित झाले. 7 मार्च 1969 रोजी त्यांची पंतप्रधानपदासाठी निवड झाली आणि त्या इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. त्यांना इस्रायली राजकारणाची ‘आयर्न लेडी’ म्हटले जायचे.
1977 : पाकिस्तानमध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर
1970 नंतर पाकिस्तानमध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या. 1947 मध्ये पाकिस्तानच्या अस्तित्वानंतर नागरी शासनाच्या अंतर्गत झालेल्या या पहिल्या निवडणुका होत्या.
1987 : टीम इंडियाचे माजी सलामीवीर सुनील गावस्कर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण केल्या
क्रिकेट विश्वात 'लिटिल मास्टर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील गावस्कर यांनी 7 मार्च 1987 रोजीच कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करण्याचा विक्रम केला होता. ही कामगिरी करणारे ते जगातील पहिले क्रिकेटपटू ठरले. त्याच्यानंतर अनेक फलंदाजांनी धावांचे हे शिखर गाठले आहे. मात्र जेव्हा जेव्हा या विक्रमाची चर्चा होते तेव्हा गावसकर यांचे नाव नक्कीच घेतले जाते. कसोटी इतिहासात जेव्हा जेव्हा कोणत्याही फलंदाजाने हा पराक्रम गाजवला तेव्हा भारताच्या सुनील गावस्कर यांनी आपल्या बॅटने हा आकडा पहिल्यांदा स्पर्श केला होता हे सांगायलाच हवे.
1987 : अमेरिकेच्या माईक टायसनने जागतिक बॉक्सिंग असोसिएशन चॅम्पियनशिप बेल्ट जिंकला
अमेरिकेच्या माईक टायसनने वयाच्या 20 व्या वर्षी जागतिक बॉक्सिंग असोसिएशन चॅम्पियनशिप बेल्ट जिंकला. जेम्स स्मिथला 12 फेऱ्यांमध्ये नॉकआउट करून ही कामगिरी करणारा तो सर्वात तरुण ठरला.
2009 : केपलर दुर्बिणीचे प्रक्षेपण
नासाने केपलर दुर्बिणीचे प्रक्षेपण केले. ही दुर्बिण सूर्याभोवती फिरते आणि सुमारे दहा लाख सूर्यासारख्या ताऱ्यांचा मागोवा ठेवते. केप्लर दुर्बिणी ही त्या काळी मानवजातीच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली दुर्बिणी मानली जात होती.
2010 : अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक कॅथरीन बिगेलो सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा अकादमी पुरस्कार जिंकणारी पहिली महिला
अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक कॅथरीन बिगेलो सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा अकादमी पुरस्कार जिंकणारी पहिली महिला ठरली. 2008 मध्ये 'द हर्ट लॉकर' या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -