Maharashtra News Updates 6th March 2023: Dhule Rain: धुळ्याला गारपिटीनं झोडपलं, बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Mar 2023 08:27 PM
Thane : ठाण्यात पुन्हा शाखेवरून ठाकरे गट आणि शिवसेना आमने-सामने

ठाण्यातील शिवाई नगर या परिसरात शिवसेनेचे शाखा घेण्यावरून ठाकरे गट आणि शिवसेना आमने-सामने आले आहे. यावरून पुन्हा वाद चिघळताना दिसत आहे.

Dhule Rain: धुळ्याला गारपिटीनं झोडपलं, बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला

धुळ्यातील खोरी टिटने भागात मोठ्या प्रमाणात गारपीठ झाल्याने शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अचानक झालेल्या या गारपिटीमुळे बळीराजाच्या तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. 

बुलढाण्यातील पेपर फुटीच्या तपासासाठी विशेष तपास एसआयटी स्थापन

बुलढाण्यातील पेपर फुटीच्या तपासासाठी विशेष तपास पथक ( SIT ) स्थापन करण्यात आले आहे. मेहकरचे पोलिस उपअधीक्षक या पथकाचं नेतृत्व करणार आहेत. या विशेष पथकात तीन अधिकाऱ्यांसह चार कर्मचाऱ्यांची नेमणूक. पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांनी एसआयटी स्थापन केली आहे. 

अंत्यविधीसाठी जाणाऱ्या पती-पत्नीच्या गाडीला अपघात

अंत्यविधीसाठी जाणाऱ्या पती-पत्नीच्या गाडीला अपघात झाल्याने या अपघातात पतीच्या जागी मृत्यू झाला आहे, तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना मिड सांगवी गावाजवळ घडली आहे. अंबादास उगले यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला असून ते शिक्षक म्हणून गेवराई येथे कार्यरत होते. अंबादास उगले आणि त्यांच्या पत्नी अंत्यविधीसाठी आपल्या कार मधून आष्टीकडे जात होते यावेळी मिडसांगवी गावाजवळ त्यांच्या कारला अपघात झाला आणि गाडी चारशे फूट खोल दरीत कोसळल्याने अंबादास उगले यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.

हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पुढे ढकलली

हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पुढे ढकलली


याचसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यानं सत्र न्यायालयात  पुढील सुनावणी 10 मार्चपर्यंत तहकूब


तूर्तास मुश्रीफ यांच्या मुलांविरोधात कोणतीही कठोर कारवाई करणार नसल्याची, ईडीच्या वकिलांनी कोर्टात हमी दिलेली आहे


नाविद, आबिद आणि साजिद या हसन मुश्रीफांच्या तीन मुलांचा मनी लाँड्रिंग प्रकरणी विशेष कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज


राजकीय हेतून ईडीमार्फत अटकेच्या धमक्यांचा वापर केला जात असल्याचा जामीन अर्जात उल्लेख

पुरंदर महागाई आणि शेतमालाच्या हमीभावासाठी राष्ट्रवादीचे आंदोलन

पुरंदर तालुक्यातील सासवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं. गॅस आणि इधनाच्या वाढलेल्या किमती बद्दल केंद्र सरकारचा यावेळी  निषेध करण्यात आला. सासवड येथील शिवतीर्थ चौकात  हे आंदोलन करण्यात आले.  यावेळी होळी पेटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने बोंब ठोकण्यात आली. यावेळी  अनेकांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालत, हातात कांदे घेऊन व गॅस सिलेंडर मांडून आंदोलन केलं. यावेळी राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 

आदमापूरमधून बालकाचे अपहरण; सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

कोल्हापूर जिल्ह्यातल्या आदमापूर येथील बाळूमामा देवालय परिसरातून सहा वर्षाच्या बालकाचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुदरगड पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. आयुष राहुल नाईकनवरे या सहा वर्षीय बालकाचं अपहरण झालं असून ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. आयुष हा सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिवाजीनगर येथील रहिवाशी आहे.आयुष व त्याची आई सुषमा हे संत बाळूमामाच्या दर्शनासाठी आदमापुर येथे आले होते. दरम्यान एका पन्नास वर्षीय पुरुष आणि तीस वर्षीय अनोळखी महिलेने आयुषला फुस लावून त्याचं अपहरण केल आहे.दरम्यान सीसीटीव्ही फुटेच्या आधारे पोलीस शोध घेत आहेत.

कोपरखैरणे गावात पाणी मीटर चोरीचा सुळसुळाट; प्रकार सीसीटीव्हीत कैद

नवी मुंबई महानरपालिकेच्या माध्यमातून नवी मुंबईकरांना पाण्याचे मीटर हे बसून देण्यात आले आहेत.पाण्याचे बिल या मीटर च्या माध्यमातून तपासले जाते. बसविण्यात आलेले मीटर हे पितळेची असल्याने यांच्या चोरीत गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे. असीच चोरी कोपरखैरणे गावात घडली असून हा प्रकार सीसीटीव्हीत कॅमेर्यात कैद झाली आहे. पहाटे चार च्या सुमारास या चोरट्याने सहा ते सात मीटरची चोरी केली आहे. चोरी करतानाचा व्हीडीयो समोर आल्याने पोलीसांकडून या आरोपीचा शोध घेतला जात आहे.  पाण्याचे मीटर चोरी जात असल्याने यामुळे नागरिकांची मात्र गैरसोय होत असून पाणी वापराबाबत आव्वाच्या सव्वा बिल दिले जात आहे.

तळकोकणातील निवती समुद्रात बोटीला अज्ञाताने आग लावली; बोटीसह तीन इंजिन, जाळी, टीव्ही कॅमेरा, फिश फायंडर आणि लाईट सिस्टिम जळून नुकसान

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्यामधील निवती समुद्रात मत्स्य व्यावसायिक श्याम सारंग यांच्या मालकीच्या 'चांदणी' या मिनी पर्सनेट बोटीला मध्यरात्रीनंतर समुद्रात जाऊन अज्ञाताने आग लावली. यात बोटीवरील तीन इंजिन आणि जाळ्यांनी पेट घेतल्याने समुद्रात आगडोंब उसळला. या आगीत बोटीसह तीन इंजिन, जाळी, टीव्ही कॅमेरा, फिश फायंडर आणि लाईट सिस्टिम जळून नुकसान झाले. या घटनेत सुमारे 35 लाखाचं नुकसान झाले. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक तपास करत  आहेत.

आंघोळ करताना अल्पवयीन मुलीच चित्रीकरण करणाऱ्याला माजलगाव पोलिसांनी केली अटक
बीडच्या माजलगावमध्ये आंघोळ करताना एका अल्पवयीन मुलीचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याप्रकरणी पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अनिकेत मोरे असं चित्रीकरण करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी त्याला अटक केली आहे. एक अल्पवयीन मुलगी आंघोळ करत असताना आरोपींने आपल्या मोबाईल मध्ये चित्रीकरण केलं. हा प्रकार मुलीच्या लक्षात आल्यानंतर तिने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली या प्रकारानंतर आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 
Sharad Pawar:  धनशक्तीला लोक जुमानत नाही हे यावेळी दिसलं : शरद पवार

Sharad Pawar:  भाजपचा कसबा गड ढासळला.  कसब्यात महाविकासआघाडीची एकजूट दिसली.  धनशक्तीला लोक जुमानत नाही हे यावेळी दिसलं  : शरद पवार

Sharad Pawar:  बदलासाठी सर्वपक्षीयांना एकत्र यावंच लागेल : शरद पवार

Sharad Pawar:  आगामी निवडणुका एकत्र लढण्याबाबत काळजी घेतली जाईल.  लोकांना बदल हवाय हे स्पष्ट झालंय. बदलासाठी सर्वपक्षीयांना एकत्र यावंच लागेल : शरद पवार

समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या नादुरस्त टँकरवर मागून येणारा ट्रक आदळला, नागपूर कॉरिडॉरवरील वाहतूक काही काळ खोळंबली

Buldhana News : समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा जवळ रस्त्याच्या कडेला नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या टँकरला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र यामुळे पुन्हा समृद्धी महामार्गावरुन धावताना, नादुरुस्त वाहने महामार्गावर उभी राहिल्याने मागून येणाऱ्या वाहनांची सुरक्षा धोक्यात आली आहे. महामार्गावर नादुरुस्त अवस्थेत वाहने उभी राहिल्याने आणि त्यावर मागून येणारे वाहन धडकल्याने आतापर्यंत समृद्धी महामार्गावर जिल्ह्यातील सात अपघात झाले आहेत. त्यात नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

MNS:  मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मूक मोर्चा

MNS:  मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मूक मोर्चा  काढण्यात येणार आहे.  शिवाजी महाराज पार्क येथून मूक मोर्चाला सुरुवात होणार आहे. जाहीर निषेध नोंदवण्यासाठी लोकशाही पद्धतीने मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. काळ्या फिती बांधून कार्यकर्ते मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे.


 

सहा महिन्यांपासून बंद असलेले बीड जिल्ह्यातील जनावरांचे बाजार सुरु होणार

Beed News : सहा महिन्यांपासून बंद असलेले बीड जिल्ह्यातील जनावरांचे बाजार सुरु होणार आहेत. लम्पी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जनावराचे बाजार बंद करण्यात आले होते. यासंदर्भात एबीपी माझाने जनावरांचे बाजार बंद असल्याने कोट्यवधी रुपयाचे कसे नुकसान होत आहे हे समोर आल्यानंतर अखेर प्रशासनाने जनावरांचा बाजार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील 282 गावे लम्पी आजाराने बाधित झाली होती.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या तरुणाविरोधात नागपुरात गुन्हा दाखल

Nagpur News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या मुंबईतील तरुणाविरोधात नागपुरातील लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसीच्या कलम 354, 500, 504, 505, 507 आणि आयटी ॲक्टच्या कलम 67 अन्वये सार्थक कपाडी या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्थक कपाडी या तरुणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप नेते चंद्रकांत पाटील, भाजप नेते अतुल भातकळकर यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे या सर्वांच्या विरोधात एकानंतर एक आक्षेपार्ह ट्वीट केले होते. नागपुरातील काही भाजप कार्यकर्त्यांनी ते ट्वीट्स पाहिले आणि त्यानंतर रात्री उशिरा लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्थक कपाडी हा उद्धव ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे.

सरकारचं गुणगान केलं तर बरं अन्यथा विरोधात बोललं तर जीवे मारण्याचे प्रयत्न होत आहेत : अशोक चव्हाण

Ashok Chavan : सरकारचं गुणगान केलं तर बरं आहे अन्यथा विरोधात बोललं तर जीवे मारण्याचे प्रयत्न होत आहेत. जे आणीबाणीच्या काळात घडलं नाही ते आता होतंय, अशा शब्दात काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. पानसरे, कलबुर्गी या विचारवंतांच्या हत्येचा फक्त तपास सुरु आहे, त्याच पुढे काहीच होत नाही, असंही अशोक चव्हाण म्हणाले. नांदेडमध्ये रविवारी (5 मार्च) संगीत शंकर दरबार सोहळ्यात ख्यातनाम साहित्यिक ना. धो. महानोर यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र हिरावले जात असल्याची टीका सरकारवर केली.

Maharashtra News:  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या तरुणा विरोधात नागपुरात गुन्हा दाखल

Maharashtra News:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या मुंबईतील तरुणाच्या विरोधात नागपुरात लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसीच्या कलम 354, 500, 504, 505, 507 आणि आयटी ॲक्ट च्या कलम 67 अन्वये सार्थक कपाडी या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आज अहमदनगर बंदची हाक

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांच्यावर चार ते पाच दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज (6 मार्च) अहमदनगर शहरात बंदचे हाक देण्यात आली आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला आहे. कुणाल भंडारी यांच्यावर रामवाडी परिसरात हल्ला झाला होता. या प्रकरणात तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप आरोपींना अटक न झाल्याने आज बंदची हाक देण्यात आली आहे.

मुंबई-गोवा हायवेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, पावसाळा आणि गणेशोत्सवापूर्वी भुयारी मार्ग खुला होण्याचे संकेत

Ratnagiri News : मुंबई - गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर


पावसाळा आणि गणेशोत्सवापूर्वी भुयारी मार्ग खुला करण्याचे राष्ट्रीय महामार्गाचे संकेत

 

भुयारी मार्ग खुला झाल्यानंतर अंतरासह वेळेची देखील होणार बचत; अपघात देखील टळणार

 

 नोव्हेंबर 2019 मध्ये सुरु झाले भुयारी मार्गाचे काम 
Bhiwandi News: आम्ही हेरलं म्हणून त्यांना चोरलं; नाकाखालून 40 जण निघून घेल्याची निराशा सभेत दिसली : देवेंद्र फडणवीस

Bhiwandi News: केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भिवंडीत आले असून यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील चषकचे भव्य आयोजन करण्यात आले होते. कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोदी सरकारच्या हर घर जल ,हर घर नल या योजनेचा केक तयार करण्यात आले असून हे केक कापून मंत्री कपिल पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मैदानात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या गोलंदाजीवर भन्नाट अशी फलंदाजी केली तर दुसरीकडे केक वर बच्चेकंपनीने ताव मारला. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...  


पीएमपीएल बस गाड्या पुरवणाऱ्या ठेकेदारांचा आज संप आहे. अचानक पुकारलेल्या संपामुळे बस गाड्यांची संख्या आज कमी असण्याची शक्यता आहे. या संपाचा पुणेकरांना फटका बसण्याची शक्यता आहे. याबरोबरच भारतीय संस्कृतीत विशेष महत्व असलेला होळीचा सण आज देशभरात साजरा होणार आहे.  


आज देशभर होळीचा उत्साह, कोकणातही पहायला मिळणार पारंपारीक होळीची परंपरा


भारतीय संस्कृतीत विशेष महत्व असलेला होळीचा सण आज देशभरात साजरा होणार आहे. कोकणातही मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने होळीचा सण साजरा करण्यात येणार आहे. 


 रामदास कदम यांची पत्रकार परिषद 
 
 कालच्या खेडच्या सभेनंतर आज सकाळी साडेनऊ वाजता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईकडे रवाना होणार आहेत.  उद्धव ठाकरेंच्या सभेवर शिंदे  गटाचे नेते रामदास कदम यांची पत्रकार परिषद होणार आहे.  


पुण्यासाठी पी एम पी एल बस गाड्या पुरवणाऱ्या ठेकेदारांचा संप


 पी एम पी एल बस गाड्या पुरवणाऱ्या ठेकेदारांचा आज संप आहे. अचानक पुकारलेल्या संपामुळे पी एम पी एल बस गाड्यांची संख्या आज कमी असण्याची शक्यता आहे.  अचानक केलेल्या संपामुळे नागरिकांचे हाल होतील. तीन महिन्यांपासूनचे बिल थकल्यामुळे चार ठेकेदारांनी अचानक संप पुकारला आहे. 


नाशिकचे शेतकरी कृष्णा डोंगरे कांदा पीक जाळणार 


 नाशिकच्या येवला तालुक्यातील शेतकरी कृष्णा डोंगरे आज सकाळी 11 वाजता कांदा पिकाला अग्निडाग देणार आहेत. आधी होळी साजरा करणार आणि त्यांनतर दीड एकरावरील कांदा पीक जाळणार. कांद्याला भाव नाही सरकार दखल देत नाही त्यामुळे कांदा पीक जाळून टाकण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. 


 खासदार इम्तियाज जलिल यांच्या साखळी उपोषणाचा तिसरा दिवस 


औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर नको या मागणीसाठी खासदार इम्तियाज जलील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे.


 राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात पत्रकार परिषध 
 
 राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सकाळी 9.45 वाजता पुण्यात पत्रकार परिषद होणार आहे.  
 
 दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांची  सीबीआय कोठडी संपणार
 
 दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांची आज सीबीआय कोठडी संपणार आहे. त्यामुळे दुपारी दोन वाजता सिसोदिया यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. 


हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी 


राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. नाविद, आबिद आणी साजिद या हसन मुश्रीफांच्या मुलांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. राजकीय दबावापोटी केंद्रीय तपासयंत्रणेच्या माध्यमातून दबाव टाकला जात असल्याचा याचिकेतून दावा करण्यात आलाय. 
 
पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील यात्रा उत्सवाला  सुरुवात 


अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील यात्रा उत्सवाला आजपासून सुरुवात होणार आहे. सकाळी नऊ वाजता कैकाडी समाज्याची मानाची काठी मंदीराच्या कळसाला भेटवून तर सायंकाळी गोपाळ समाजाची मानाची होळी पेटवल्यानंतर मढी यात्रेस प्रांरभ होणार आहे. जिल्ह्यासह राज्यातून हजारोच्या संख्येने भाविक श्री क्षेत्र मढी येथे दर्शनासाठी येत असतात. 


काँग्रेसचे आंदोलन 

अदानी समूहातील गैर कारभाराची हिडणाबर्ग अहवालाची संसदीय समितीच्या मार्फत चौकशी करावी, एलआयसी, स्टेट बँक व अन्य वित्तीय संस्थांमधील गुंतवणुकीची चर्चा व्हावी यासाठी काँग्रेसच्या वतीनं भंडाऱ्यात मोहाडी येथील स्टेट बँकेच्या समोर आंदोलन करण्यात येणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.