Maharashtra News Updates: पैठणमधील सार्वजनिक दहिहंडीविरोधातील नाथ वंशजांची याचिका फेटाळली
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
HSC Exam paper Leak : बुलढाणा: बारावीचा गणिताचा पेपरफुटी प्रकरणाचा मास्टर माईंड SIT ने शोधला.
लोणार येथील खाजगी शाळेतील शिक्षक असलेला अकील मुनाफ हाच पेपरफुटी चा मुख्य आरोपी.
अकील मूनाफ याने गणिताचा पेपर सुरू होण्याआधी आपल्या मोबाईल केमेरात पेपरचे फोटो काढून इतरांना पाठविले.
अकील मुनाफ सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
आज SIT च्या सूत्रांनी दिली माहिती.
HSC Exam paper Leak : बुलढाणा: बारावीचा गणिताचा पेपरफुटी प्रकरणाचा मास्टर माईंड SIT ने शोधला.
लोणार येथील खाजगी शाळेतील शिक्षक असलेला अकील मुनाफ हाच पेपरफुटी चा मुख्य आरोपी.
अकील मूनाफ याने गणिताचा पेपर सुरू होण्याआधी आपल्या मोबाईल केमेरात पेपरचे फोटो काढून इतरांना पाठविले.
अकील मुनाफ सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
आज SIT च्या सूत्रांनी दिली माहिती.
पुणे धायरी, गणेश नगर, गल्ली क्रमांक 22 येथे एका कारखान्यात आग लागली आहे. या ठिकाणी पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून आठ वाहने दाखल झाली असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांच्याबाबत आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण विरोधात शिवसेनेच्या युवती सेनेकडून महाराष्ट्र आज राज्य महिला आयोग कार्यालयात जाऊन युवती सेनेच्या कार्यकारिणी सदस्यांनी कायदेशीर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले.
पैठणच्या नाथ मंदिराबाहेर श्री संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळाच्या सार्वजनिकरीत्या दहिहंडी फोडण्याच्या निर्णयाविरोधात नाथवंशजांकडून दाखल करण्यात आलेली फौजदारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठाने फेटाळली. पैठणमध्ये सध्या नाथषष्ठीचा उत्सव सुरू असून बुधवारी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत सार्वजनिकरीत्या आणि मंदिरातही नाथवंशजांकडून दहिहंडी फोडण्यात येते. याप्रकरणी नाथवंशजांच्या वतीने मधुसुदन रघुनाथराव गोसावी यांनी ॲड. तुंगार यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. नाथवंशजांकडून सार्वजनिकरीत्या दहिहंडी फोडण्याविरोधात मनाई हुकूम काढावा, अशी विनंती करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. दहिहंडी फोडण्याच्या संदर्भाने जुनाच वाद आहे. विश्वस्तांकडून आयोजित दहिहंडी फोडण्याचा उत्सव हा सहा लाख वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडतो.
गौरी भिडे यांची याचिका फेटाळली; उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांना हायकोर्टाचा मोठा दिलासा. ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेविरोधात सवाल उपस्थित करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली
शिंदे गटाकडून आज हरीश साळवे नीरज किशन कौल मनिंदर सिंह महेश जेठमलानी यांचे युक्तिवाद पूर्ण झाले आहेत. उद्या राज्यपालांच्यावतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे युक्तिवाद करणार आहेत. त्यानंतर ठाकरे गटाचे वकीलकपिल सिब्बल यांच्यावतीने रिजाँईंडर युक्तिवाद होईल.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कल्याण डोंबिवली मनपा अधिकाऱ्यांसह सोमवारी मध्यरात्री डोंबिवलीतील संदप गावातील वॉटर प्लांटची पाहणी केली. यावेळी ज्या ठिकाणी पाणी चोरीचे आरोप केले होते त्या ठिकाणी कल्याण अधिकाऱ्यांनी कोंबिंग ऑपरेशन केले. या ऑपरेशन दरम्यान कुठेही पाणी चोरी केल्याचे आढळून आले नाही.
उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या चौकशीबाबत आज हायकोर्टाचा फैसला
बेहिशेबी मालमत्ता जमवल्याबद्दल चौकशी मागणी करणारी याचिका
गौरी भिडे यांची याप्रकरणी सीबीआय किंवा ईडीमार्फत चौकशीची मागणी
या याचिकेवरील सुनावणी झाली आहे पुर्ण
8 डिसेंबर रोजी हायकोर्टानं राखून ठेवला होता निकाल
याचिका सुनावणीसाठी दाखस करून घ्यायची की नाही?, यावर कोर्ट देणार निकाल
दुपारी 4 वाजून 45 मनिटांनी निकाल जाहीर होणार
हसन मुश्रीफांचे लेखापाल महेश गुरव यांचाही मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज
मुंबई सत्र न्यायालयात 21 मार्चला होणार सुनावणी
गुरव हे हसन मुश्रीफ यांचे चार्टर्ड अकाऊंटंट
मुश्रीफ यांची 3 मुलं नाविद, साजिद, आबिद आणि यांच्यासह आता गुरव यांच्या अटकपूर्व जामीनावरही होणार एकत्रित सुनावणी
न्यायमूर्ती एम.जी. देशपांडे यांच्या कोर्टात होणार सुनावणी
अनिल परब यांना हायकोर्टाचा तूर्तास अटकेपासून दिलासा
सोमवार, 20 मार्चपर्यंत अंतरिम संरक्षण
दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी तूर्तास कठोर कारवाई न करण्याचे निर्देश
हसन मुश्रीफांना हायकोर्टाचा तूर्तास दिलासा
ईडीच्या प्रकरणात पुढील दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश
दरम्यान हसन मुश्रीफांना मुंबई सत्र न्यायालयात रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देश
सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं या अर्जावर तातडीनं सुनावणी पूर्ण करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
गुन्हा रद्द करण्यासाठीच्या याचिकेवरील सुनावणी तूर्तास तहकूब
भोपाळ गॅस पीडितांना 7844 कोटी रुपयांच्या अतिरिक्त भरपाईसाठी केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
कोर्ट म्हणाले, 1989 मध्ये सरकार आणि कंपनीमध्ये नुकसानभरपाईचा करार झाला होता.
त्याला सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली. आता नव्याने भरपाईचे आदेश कसे दिले जाऊ शकतात? असा प्रश्नही कोर्टानं उपस्थित केला.
न्यायालयाने असंही म्हटलं आहे की, आमच्या मते, नुकसान भरपाईची रक्कम पुरेशी होती. सरकारला अधिक भरपाई आवश्यक वाटली तर ती स्वतःच द्यायला हवी होती. तसे न करणे हा सरकारचा निष्काळजीपणा होता.
Kolhapur News: करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची केंद्रीय पुरातत्व खात्यानं पाहणी केलीय. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 55 मिनिटे मूर्तीची पाहणी केली. आता या पाहणीनंतर अधिकारी कशा पद्धतीने अहवाल देतात हे पाहणं महत्वाचं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य पुरातत्व विभागाचे अधिकारी येऊन पाहणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रीय पुरातत्व विभागाला पाहणी करण्यासाठी विनंती केली. त्यानुसार आज केंद्रीय अधिकारी येऊन त्यांनी पाहणी केली. त्यामुळे आता अंबाबाई देवीच्या मूर्ती संदर्भात कोणता निर्णय घेतला जातो हे पाहणं गरजेचं आहे.
Mumbai News: मुंबईतल्या माझगावच्या वस्तू आणि सेवा करभवनमध्ये सुद्धा शंभर टक्के तृतीय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे वस्तू आणि सेवा कर भवनमध्ये कामकाज जवळपास ठप्प आहे. कारण कार्यालयामध्ये फक्त अधिकारी कामावर आलेले आहेत. मात्र इतर कर्मचारी काम बंद आंदोलन पुकारून जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संपात सहभागी झाले आहेत.
जीएसटी भवनच्या मेन गेटवर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.
Beed News: बीडच्या कडा येथील बाजार समितीमध्ये एकाच दिवशी ऐंशी हजार गोण्या कांद्याची आवक झाली असून हा कांदा दुबईला पाठवण्यात आला आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कडा बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाली असून कड्यामध्ये सध्या आठशे ते अकराशे रुपये दराने कांद्याची खरेदी केली जात आहे.
एका दिवसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्यामुळे सव्वातीन कोटीची उलाढाल झाली असून तब्बल चार टन कांदा दुबईच्या बाजार समितीमध्ये दाखल झाला होता. त्यापैकी चांगल्या दर्जाचा कांदा हा दुबईला पाठवण्यात आला आहे.
Hasan Mushrif: हसन मुश्रीफांची ईडीच्या कारवाईविरोधात हायकोर्टात याचिका
मुश्रीफांच्या याचिकेवर सुनावणी सुरू
हायकोर्टानं मूळ प्रकरणांत दिलासा दिल्याच्या दुस-याच दिवशी ईडीनं छापेमारी सुरू केली
आमदार या नात्यानं आपण सध्या विधानसभेत व्यस्त असल्याची मुश्रीफांची माहिती
मुश्रीफांच्यावतीनं आभात पोंडा यांचा युक्तिवाद सुरू
ईडी सध्या करत असलेल्या तपासांत हसन मुश्रीफांना आरोपी बनवलेलंच नाही
त्यामुळे तूर्तास त्यांच्या अटकेचा प्रश्नचं नाही
सध्या तपासअधिकारी प्राथमिक तपास करत आहेत
त्यांच्या तिन्ही मुलांनी या प्रकरणात सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केलेला आहे
जर त्यांना अटकेची भिती असेल तर त्यांनीही रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करावा
ईडीतर्फे एएसजी अनिल सिंह यांची हायकोर्टात माहिती
ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना बीडच्या माळसजवळा या गावात घडलीये. दोन्ही गट तलवार आणि दांडे घेऊन एकमेकांवर धावले यावेळी तुंबळ हाणामारी झाल्याचे पहावयास मिळाले. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेत तीन जण जखमी आहेत. जखमींवर बीडमध्ये उपचार सुरू आहेत. माळस जवळा हे गाव शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य ठरवणारी सुप्रीम कोर्टातली सुनावणी अधांतरीच
जुलै 2022 पासून या प्रकरणात वारंवार तारखावर तारखा पडत आहेत
आज पण नियोजित तारखेला ना सुनावणी होणार ना मेन्शनिंग होणार
आज प्रकरण मेन्शन केलं जाणार नाही घटनापीठाचे काम पूर्ण झाल्यानंतरच मेंशन केले जाणार
15 किंवा 16 ला घटनापीठाचे कामकाज पूर्ण होण्याची शक्यता त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रकरण नव्या तारखेसाठी कोर्टापुढे मेन्शन केले जाणार
Sayaji Shinde: सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला
सिने कलाकार सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला
पुणे-बंगलोर महामार्गावरील झाडांचं पुनर्रोपण करण्यासाठी थांबलेल्या सयाजी शिंदेवर मधमाशांचा हल्ला
पुणे बेंगलोर महामार्गाचे रुंदीकरण सुरू असल्यामुळे तेथील झाडे वाचवण्यासाठी ते तासवडे येथे स्वतः उपस्थित
Parbhani News: जुन्या पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी आज राज्यभरातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप आहे. परभणीतही या संपाला सुरुवात झाली आहे. परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारक परिचारिकांनी या संपात आपला सहभाग नोंदवत जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडी समोर जोरदार निदर्शने केली आहेत. सरकारने इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे. जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे आरोग्य सेवेवर याचा मोठा परिणाम होणार आहे.
Kolhapur News : कोल्हापुरातील विशाळगडावर दारु नेणाऱ्या तरुणांना शिवप्रेमींनी चोप दिल्याची घटना घडली आहे. हा प्रकार मागील आठवड्यात शुक्रवारी (10 मार्च) रोजी घडला होता. महत्त्वाचं म्हणजे पोलीस बंदोबस्त असताना गडावर मद्य कसे नेले असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान गडाच्या पायथ्याला चेक पोस्ट करण्याची मागणी गडप्रेमींनी केली आहे. तसंच दारुची चोरटी वाहतूक करणाऱ्यांचाही कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
Chandrapur News : चंद्रपुरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बिबट्याचे दोन काळे बछडे आढळले. मदनापुर गेट परिसरात वनाधिकाऱ्यांना मादी बिबट्यासोबत दोन काळे बछडे आढळले. वनाधिकारी अशोक गेडाम जंगलात ट्रांजिट लाईनच्या कामासाठी फिरत असताना त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात हा व्हिडीओ कैद केला. या भागात स्वच्छंदपणे रस्ता ओलांडत असलेल्या मादी बिबट आणि दोन काळ्या बछड्यांचे दर्शन झाले. प्रकल्पात हे दोन बछडे आढळल्याने वनकर्मचाऱ्यांमध्ये मोठा आनंद पसरला आहे.
Kisan Sabha: किसान सभा शिष्टमंडळाची आजची सरकार सोबत होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आज होणारी बैठक उद्या दुपारी तीन वाजता होणार आहे. किसान सभेच्या विविध मागण्यांसाठी आज मुंबईत बैठक होणार होती . किसान सभेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित खात्याचे मंत्री अधिकारी सोबत चर्चा करणार होते.
Amravti News: मेळघाटातील अनेक नद्यामध्ये पाणी आटल्याने प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. खरंतर प्राण्यांना पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही वनविभागाकडे आहे. जागोजागी पाणवठे बनविल्या जातात. मात्र, यंदा पाणवठे कमी बनविल्या गेले आणि ज्याठिकाणी आहे ते कोरडे पडले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. असाच एक गवांचा कळप सेमाडोह ते हरीसाल मार्गावर पाहायला मिळालं. त्याची दृष्य धारणी येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश तोटे यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहे.
Maharashtra News Updates: बारावीच्या परीक्षा घेणार पण संप काळात बारावी बोर्ड परीक्षा उत्तरपत्रिका तपासणी नाही, राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनांची भूमिका
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाच्या कार्यकारिणीने आज झालेल्या बैठकीमध्ये बारावीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थीहित तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक बिघडू नये, विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा तयारी करावी लागू नये म्हणून परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे.
परंतु बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी तसेच अकरावीच्या परीक्षा, मूल्यमापन, अध्यापन करणार नसल्याची भूमिका स्पष्ट करीत जुनी पेन्शन योजना व इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या 14 मार्चपासून सुरू होणाऱ्या संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे हे शिक्षक केवळ बारावीच्या परीक्षा विषयक कार्य करतील व इतर कोणतेही कार्य करणार नाहीत. महाविद्यालयाची कोणतीही कामे करणार नाहीत हे महासघाने स्पष्ट केले आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
राज्यातलील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी आहे. ईडीने समन्स बजावल्यानंतर मुश्रीफ यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाचा दिवस आहे. एकीकडे सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा सुरू होईल तर दुसरीकडे महाराष्ट्रात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात नवी तारीख काय असणार याचे उत्तर मिळणार आहे.
राज्यातलील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी बेमुदत संपावर
राज्यातलील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्याने कर्मचारी संपावर ठाम आहेत. यामध्ये सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील शाळा, कॉलेज, रुग्णालये, सरकारी कार्यालयांना या संपाचा मोठा फटका बसू शकतो. संप काळामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक बारावी बोर्ड पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यावर ठाम आहेत. त्यामुळे पेपर तपासणीवर त्याशिवाय बोर्डाचा निकाल वेळेवर जाहीर करताना विलंब होऊ शकतो. त्याशिवाय शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा संपावर पुन्हा एकदा जात असल्याने बोर्ड परीक्षेच्या नियोजनामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर हे कर्मचारी आंदोलन करणार आहेत.
माकपच्या मोर्चाचा तिसरा दिवस
नाशिकवरून मुंबईकडे निघालेलं लाल वादळ मुक्कामानंतर मुंढेगाववरून सकाळी पुन्हा मुंबईकडे निघणार आहे. विविध मागण्यांसाठी माकप, किसान सभेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाचा आज तिसरा दिवस आहे.
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
राज्याचं अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनातील आठवड्याचा आज दुसरा दिवस आहे. विविध मागण्यांसाठी आजही विरोधक आक्रमक होतील. अर्थसंकल्पीय आदेशनावरती चर्चा झाल्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देणार आहेत. चर्चेदरम्यान विरोधकांनी अर्थसंकल्पावरती अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले त्यामुळे उपमुख्यमंत्री यांच्या फक्त देताना काही राजकीय आरोप सुद्धा होण्याची शक्यता आहे. या सगळ्या मुद्द्यांवरती विरोधकांचं सभागृहाच्या बाहेर आंदोलन होणार आहे.
कोल्हापूरचे ठाकरे गटाचे नेते संग्राम कुपेकरांचा भाजप प्रवेश
कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील नेते संग्राम कुपेकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दिवंगत नेते बाबा कुपेकर यांचे ते पुतणे आहेत. मुंबईत भाजप कार्यालयात देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी 12.30 वाजता हा प्रवेश होणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं बजेट
पिंपरी पालिकेचे बजेट आज सकाळी 11 वाजता आयुक्त सादर करणार आहेत. मिळकत कर आणि पाणी पट्टीत वाढ होण्याची शक्यता आहे.
हसन मुश्रीफांच्या याचिकेवर सुनावणी
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी आहे. ईडीने समन्स बजावल्यानंतर मुश्रीफ यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे.
महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार आणि कर्मचारी संघटन आजपासू संपावर
महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार व कर्मचारी संघटन आजपासून अनिश्चित कालीन संपावर आहे. याच संपामध्ये नागपूर महानगरपालिकेचे सर्व विभागातील कर्मचारी सहभागी होणार आहेत. फक्त अग्निशमन आणि महापालिकेचे रुग्णालय अशा आकस्मिक सेवेचे कर्मचारी सोडून आजपासून महापालिकेचे सर्व कर्मचारी संपावर जाणार आहेत. सकाळी 11 वाजता सर्व कर्मचारी संविधान चौकात एकत्रित आंदोलन करणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -