Maharashtra Live Updates : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Pune Accident News: पुण्याजवळील पंढरपूर-पुणे मार्गावरील दिवे घाटामध्ये एका टँकरने दोन दुचाकी वाहनांना धडक दिली. धडक दिल्यानंतर हा टँकर घाटातून खाली दरीत गेला. तर यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दिवे घाटातून जात असताना टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर समोरील दोन दुचाकीला धडकला.
Pune Accident News: पुण्याजवळील पंढरपूर-पुणे मार्गावरील दिवे घाटामध्ये एका टँकरने दोन दुचाकी वाहनांना धडक दिली. धडक दिल्यानंतर हा टँकर घाटातून खाली दरीत गेला. तर यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दिवे घाटातून जात असताना टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर समोरील दोन दुचाकीला धडकला.
मणिपूर येथे सुरु असलेल्या हिंसाचार मधून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुखरूप पुन्हा महाराष्ट्र मध्ये आणण्यात महाराष्ट्र शासनाला यश आले आहे. गेल्या चार ते पाच दिवसापासून मनिपुर येथे हिंसाचार प्रकरण सुरू आहे त्यामधूनच महाराष्ट्रातील विद्यार्थी हे शिक्षण घेण्यासाठी तिकडे गेले असताना त्या ठिकाणी अडकले होते तेथून बाहेरून येण्यासाठी विद्यार्थ्यांनी सरकारला साद घातली होती.
Unseasonal Reason: उन्हाळ्यात कोथिंबिरीला भाव चांगला मिळतो म्हणून बेळगाव परिसरातील शेतकरी विहिरीचे पाणी वापरून कोथिंबीर लागवड करतात. उन्हाळ्यात कोथिंबीरमुळे हातात चार पैसे शेतकऱ्याच्या हातात खेळतात. पण अचानक आलेल्या पावसामुळे पूर्ण वाढ झालेल्या कोथिंबिरीच्या शेतात पाणी साचून मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्याला हाताशी आलेले कोथिंबीर गमवावी लागली. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे.
मुंबईमध्ये रविवारी कॉन्स्टेबल पदासाठी झालेल्या लेखी परीक्षा दरम्यान कॉपी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. मुंबईच्या विविध केंद्रावर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले. यापैकी गोरेगाव पश्चिमेकडील उन्नत नगर महापालिका शाळेत ही परीक्षा सुरू असताना परीक्षार्थी भावी पोलिसांचे वागणे संशयास्पद वाटलं. या विद्यार्थ्यांची तपासणी केली असता त्याच्या हातावर एक डिवाइस सापडला आणि त्या डिवाइसमध्ये एक सिमकार्ड सापडले तसेच त्याच्या कानात मायक्रोफोनही सापडले. हा प्रकार कॉपीचा भाग असल्याने त्यास अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या परीक्षार्थीचे नाव युवराज धनसिंग जारवाल (19) असून तो औरंगाबाद येथे राहतो. पोलीस त्याच्या साथीदाराचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.
Maharashtra Unseasonal Rains: पुणे शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. ऐन सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांचे हाल झाले.
Diva Mumbra water cut: ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम होणार असल्याने दिवा- मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या कल्याण फाटा ते शंकर मंदिर या परिसरातील पाणी पुरवठा बुधवार, १० मे रोजी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत बंद राहणार आहे.या भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. नागरिकांनी याची नोंद घेण्याचे तसेच काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Anil Parab: दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
परब हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आहेत. साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीनं मुंबई सत्र न्यायालय विशेष पीएमएलए कोर्टात आरोपपत्र दाखल केलं . याप्रकरणी अनिल परब यांच्यासह सदानंद कदम, जयराम देशपांडे सहआरोपी आहेत. या प्रकरणात उद्या 9 मे ला होणार पुन्हा सुनावणी होणार आहे.
Bihar CM: बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार 11 मे रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईत विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेणार आहेत. आधी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यानंतर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांची भेट घेणार आहेत.
Beed News: बीड मधून हजला जाण्यासाठी यापूर्वी 14 ते 15 हजार रुपयाचं तिकीट विमान प्रवासासाठी काढावं लागायचं आता मात्र हवाई दलाकडून 14 हजारावरून चक्क 84 हजार तिकीट भाडे वाढवल्याने हज यात्रेकरूसाठी परवडणार नसून वाढलेले तिकिटाचे दर कमी करावे यासाठी बीडच्या मौलानांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी केली आहे
Malad Bridge: मालाड पश्चिमेच्या लगून रोड ते इन्फिनिटी मॉलदरम्यान होत असलेल्या वाहतूककोंडीला नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय... या परिसरात इन्फिनिटी मॉलपर्यंत उड्डाणपूल बांधण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जातेय. अखेर या पुलाला महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाने परवानगी दिली आहे.
Samana : सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून शरद पवारांवर टीका करण्यात आली आहे.. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत, तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले, असं सामन्यातील अग्रलेखात लिहिण्यात आलंय.. पवारांच्या आत्मचरित्रात माजी मुख्य़मंत्री उद्धव ठाकरेंवर परखड टीका करण्यात आलीये.. त्याचीच ही परतफेड आहे की काय, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्याचबरोबर, राष्ट्रवादीतील आमदारांचा एक मोठा गट भाजपमध्ये जाण्यासाठी बॅगा भरूनच बसला होता, असा दावा अग्रलेखात करण्यात आला आहे.
RTO: राज्यातील आरटीओ कामकाज आज ठप्प होणार आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सकाळच्या सत्रात दोन तास लेखणी बंद आंदोलन करण्याचा निर्णय मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने घेतला आहे. त्यामुळे आपल्या कामानिमित्त आरटीओ कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.
National News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर असून, येत्या 1 जुलैपासून महागाई भत्ता 3-4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी केंद्राने मार्च 2023 मध्ये महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला असून, जानेवारी 2023 पासून ही वाढ लागू झाली होती. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4 टक्के वाढल्यानंतर एकूण डीए 42 टक्के झाला आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
महाडच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गट कॉग्रेस मध्ये जुंपणार?
महाडच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गट कॉग्रेस मध्ये जुंपणार? उद्धव ठाकरे याना सूचना देऊनही त्यांनी गोगावले यांच्या विरोधात काँग्रेसच्या स्नेहल जगताप याना प्रवेश देऊन चूक केली आहे. त्यांची उमेदवारी देखील जाहीर केल्याने काँग्रेस या ठिकाणी उमेदवारी देणार असं नाना पटोले यांनी म्हंटलं आहे.
पवार पूर्वपदावर आले पण महाविकास आघाडीचं काय?
पवार पुर्वपदावर आले पण महाविकास आघाडीचं काय? शरद पवार यांनी राजीनाम्या दिल्यानंतर ते राजीनामा मागे घेईपर्यंत राष्ट्रवादी, कॅाग्रेस आणि शिवसेनेते अंतर वाढत गेलं आहे. उद्धव ठाकरेंबद्दल पवारांनी पुस्तकात लिहिलंलं मत, नाना पटोले आणि अजित पवाराचं संजय राऊतांबद्दलचं मत आणि पृथ्वीराज चव्हाणांनी पवारांबद्दल व्यक्त केलेलं मत यामुळे महाविकास आघाडी गेल्या काही दिवसांत डॅमेज झाली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीच काय होणार अशी चर्चा सुरु आहे.
कर्नाटक निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस
कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी 10 मे ला मतदान होणार आहे. त्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावतील. कॉग्रेसकडून राहुल गांधी आज प्रचार सभा, रोड शो, आणि पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी सोनिया गांधी सुद्धा सहभागी होणार आहेत, सकाळी 9 वाजता, तर प्रियांका गांधी रोड शो आणि सभा घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आज निपाणीत शरद पवार यांची सभा होणार आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार दोन दिवसांच्या सातारा दौऱ्यावर
विरोधी पक्षनेते अजित पवार दोन दिवसांच्या सातारा दौऱ्यावर आहेत. दुपारी 12 वाजता कोरेगाव येथे शेतकरी मेळाव्याला उपस्थित रहातील. दुपारी 4 वाजता जिल्हा बॅकेच्या सभागृहात यशवंत पाटणे यांच्या गौरव ग्रंथ पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित रहातील. संध्याकाळी 6 वाजता सर्किट हाऊसला रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत
अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात अवकाळी पावसाचा धुमाकूळ
मागील काही दिवसात अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असलं तरी दुसरीकडे निसर्गावर मात्र याचा काहीसा अनुकूल असा परिणाम झाल्याचे दिसून येतोय. मे महिना सुरु झाला आहे. मे महिन्यात सगळीकडे वाळलेले झाडं, सुखलेलं जंगल पाहायला मिळते पण या आठ दिवसाच्या अवकाळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यात नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळतय. सगळीकडे हिरवी चादर दिसतेय
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -